The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्विटवर #BringBackRolaCola ट्रेंड झालं आणि पार्लेने त्यांचं १३ वर्ष जुनं प्रोडक्ट मार्केटमध्ये परत आणलं

by द पोस्टमन टीम
15 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


९० च्या दशकात जन्मलेली मुलं शिक्षण आणि खाण्या-पिण्याच्या दृष्टीनं नशीबवान म्हणावी लागतील. जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर जन्मलेल्या या पिढीला खाण्याच्या अनेक नवीन-नवीन गोष्टी चाखण्यास मिळाल्या. कॉटन कँडी(ज्याला आपण म्हातारीचे केस असं देशी नाव दिलं आहे), आईस लॉली, चोकोबार, लॉलीपॉप, गोट्यांसारखे दिसणारे रंगीबेरंगी च्युइंगम, आंबट-गोड चवीचं बोरकुट यांसारख्या कितीतरी गोष्टींनी या मुलांचं जग समृद्ध होतं.

यामध्ये अशी एक गोष्ट होती जी कोला आणि कँडीचं परिपूर्ण मिश्रण होतं. तुमच्यापैकी काहींच्या लगेच लक्षात आलं असेल मी, पार्लेच्या ‘रोल-ए-कोला’ म्हणजेच रोला कोलाबद्दल बोलत आहे. चमकदार लाल आणि काळ्या पॅकेटमध्ये गुंडाळलेल्या, कडक, नाण्याच्या आकाराच्या या कँडी खूप लहान-मोठ्यांमध्ये लोकप्रिय होत्या. ‘कोका-कोला पिण्याऐवजी खाऊ शकतो’ या कल्पनेवर आधारलेल्या पार्लेच्या या गोळ्या खिशाला परवडणारा पर्याय होता. 

काही कारणास्तव पार्लेनं भारतात या गोळ्यांचं उत्पादन आणि विक्री बंद केली होती. मात्र, १३ वर्षांनंतर रोला-कोलानं पुन्हा भारतीय बाजारात जोरदार पुनरागमन केलं आहे! आपल्या लाडक्या रोला-कोलासाठी नेटिझन्सनी सोशल मीडियावर मोहीमच सुरू केली होती. त्यामुळं रोला-कोलाला भारतात पुन्हा यावंच लागलं. अशा या रोला-कोलाची संपूर्ण गोष्ट जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल!

१९९३ मध्ये १७ वर्षांनंतर जेव्हा कोका-कोला भारतात परतला, तेव्हा भारतीयांनी पुन्हा एकदम ‘खुल्या दिलानं’ आणि शासनानं डझनभर नियमांसह स्वागत केलं. मात्र, बाजारपेठेत पेप्सी (१९८८ मध्ये पंजाब सरकारसोबत रणनीतिकरित्या भागीदारी केली होती) आणि थम्सअपचा सामना कोलाला करावा लागला. अनेकांना कोला, पेप्सी आणि थम्सअपच्या चवीमध्ये देखील फरक करण अशक्य झालं होतं. इतका बाजारात गोंधळ उडाला होता. भारतातील ‘कोलायुद्घा’दरम्यान मुंबईतील आघाडीची मिठाई आणि बिस्किट उत्पादक कंपनी पार्लेनं संधी साधली.



पार्लेनं ‘रोला कोला’नावाची एक अनोखी संकल्पना बाजारात आणली. कोका-कोलाची चव असलेल्या सॉलिड ‘रोला कोला’ कँडीजचं पॅकेट फक्त 2 रुपयांना विकण्यास पार्लेनं सुरुवात केली. रुपयांची बाटली विकत घेण्यापेक्षा २ रुपयांच्या १० कँडी घेणं ग्राहकांना जास्त परवडत होतं. कंपनीनं तरुणांना नजरेसमोर ठेवून या कँडी तयार केल्या होत्या मात्र, तरुणांसोबत लहान मुलांनी देखील या कँडीला प्रचंड प्रतिसाद दिला.

लाडक्या पार्ले-जी बिस्किची निर्मात्यांना या क्षेत्रात बराच अनुभव होता. त्यांची किसमी बार, पॉपपिन्स आणि मँगो बाईट सारखी उत्पादनं अगोदरचं बाजारात होती. त्यामुळं रोला कोलाच्या निर्मितीनंतर मार्केटिंगसाठी त्यांना विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत. या रोला कोलानं पॉपिन्स आणि कोका-कोला आवडणाऱ्या दोन गटांना एकत्र आणण्याचं काम केलं. मात्र, कन्फेक्शनरी (गोड खाद्य पदार्थ) मार्केटमध्ये असलेली तीव्र स्पर्धा आणि नवनवीन जागतिक ब्रँडच्या गर्दीत पार्लेचा रोला कोला जास्त काळ तग धरू शकला नाही.

२००४ पर्यंत, कँडी उत्पादनात अनेक असंघटित खेळाडूंनी पाय ठेवले होते. नंतर लवकरच त्यांचं देखील एकत्रीकरण होऊ लागलं. चेन्नई स्थित मुरुगप्पा ग्रुपचा भाग असलेली पेरीज् कन्फेक्शनरी कोरियातील आघाडीचा ब्रँड असलेल्या ‘लोटे’नं विकत घेतली. जून २००६ मध्ये, गोदरेज फूड्स अँड बिव्हरेजेस लिमिटेडनं महा लॅक्टो बनवणाऱ्या ‘न्यूट्रिन कन्फेक्शनरी’चं अधिग्रहण केले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या अधिग्रहणानंतर, भारतीय ग्राहकांना नवीन आकार, पोत आणि चवीच्या इतर अनेक कँडीचे पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळं साहजिकचं रोला कोलाच्या मागणीत घट झाली आणि कंपनीला नुकसान होऊ लागलं. परिणामी पार्लेनं भारतात रोला-कोलाचं उत्पादन आणि विक्री बंद केली. मात्र, घाना, इथिओपिया, केनिया आणि काही मध्य पूर्वेकडील देशांमध्ये रोला कोलाचं उत्पादन आणि विक्री दोन्हीही सुरू ठेवण्यात आलं होतं. जेव्हा रोला कोला कँडी बाजारातून गायब झाली तेव्हा भारतात मेंटॉस, मिंट, पोलो यासारख्या उत्पादनांनी बाजारपेठेत आपली जागा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. रोला कोला कँडी परत आणण्यासाठी कुणीही भारतात स्थिर होत असलेल्या सोशल मीडियाच्या सामर्थ्याचा विचारही केला नव्हता.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी केरळस्थित सिद्धार्थ साई नावाच्या व्यक्तिनं ट्विट करून पार्ले कंपनीकडं रोला कोला पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. त्याने सोशल मीडियावर ‘#BringBackRolaCola’ हा हॅशटॅश वापरला. पार्लेनं सिद्धार्थच्या ट्विटला रिप्लाय देखील देली. ‘जर भारतात रोला कोला पुन्हा पाहिजे असेल तर आम्हाला १० हजार रिट्विट मिळाले पाहिजेत’, असा तो रिप्लाय होता. अल्पावधीतचं हे ट्विट व्हायरल झालं आणि ते १० हजारपेक्षा जास्त वेळा रिट्विट झालं. हे पाहून कंपनीला रोला कोलाच्या रिलॉन्चचा फायदा होईल याची खात्री झाली.

ऑक्टोबर २०१९मध्ये पार्लेनं ट्विट करून रोला कोलाच्या आगमनाची खुशखबर चाहत्यांना दिली. कंपनीनं देखील ‘RolaColaIsBack’ हॅशटॅश चालवला. सामूहिक नॉस्टेल्जियामुळं बाजारात पुन्हा येणारा रोला कोला हा काही एकमेव ब्रँड नाही. महिंद्रा ग्रुपनं काही वर्षापूर्वी आपली आयकॉनिक मोटरसायकल ‘जावा’ बाजारात परत आणली. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘लिरील’साबणानं देखील रिलॉन्चचे अनेक प्रयत्न केले आहेत.

उत्पादन प्रत्यक्षात बाजारात आणण्याअगोदर सप्टेंबर २०१९मध्येचं पार्लेनं रोला कोलाची निर्मिती सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसांतच नवीन बोल्ड लोगो, लाला रॅपरसह १२ कँडी असलेलं पाच रुपयांचा नवाकोरा ‘रोला कोला’ बाजारात दाखल झाला. मार्केटिंगच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ होती जेव्हा सोशल मीडियावरील ग्राहकांच्या मागणीमुळे एखादा खाद्यपदार्थाचा ब्रँड पुन्हा बाजारात आणला गेला होता.

पार्लेनं रोला कोलावर आणि ग्राहकांवर पूर्व विश्वास दाखवला आहे. रिलॉन्चनंतर पहिल्या वर्षात १०० कोटींची विक्री कंपनीला अपेक्षित होती. रिलॉन्च झाल्यानंतर पहिल्याचं आठवड्यात कंपनीला ४० टनांच्या ऑर्डर्स मिळाल्या.

सोशल मीडियाचा वापर करून नेटिझन्सनी रोला कोला कँडी परत आणली. हा किस्सा वाचून तुम्हाला जर तुमची आवडती गोष्ट बाजारात परत आणण्याची इच्छा निर्माण झाली तर यात काही गैर नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

एकेकाळी अमेरिकेपेक्षा जास्त दरडोई उत्पन्न असलेला देश आज भिकेला का लागलाय..?

Next Post

इसवीसन ६४५सालीच केरळमध्ये भारतातली पहिली मशीद बांधली होती.

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इसवीसन ६४५सालीच केरळमध्ये भारतातली पहिली मशीद बांधली होती.

जंगल बुकच्या लेखकाने 'जनरल डायर'चं जाहीर कौतुक केलं होतं, त्याच्यासाठी निधीही दिला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.