आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
दुसरे महायु*द्ध संपले होते. इतर देशांना सोविएत रशियाच्या रूपात एक नवी डोकेदुखी समोर अली होती. बहुदा सोविएत रशियाने जर्मनीला काबीज करण्याची योजनाच बनवली होती. जग एका महायु*द्धातून सावरले जात असतानाच, आता दुसऱ्या अशाच यु*द्धाने शिंगे वर काढण्याची चिन्हे दिसत होती.
सगळ्या जगाला सोविएत रशियाला सामोरे जाणे म्हणजे एक संकटच वाटत होते. असं असताना कोणतीही शस्रे न वापरता इतर देशांच्या मदतीने सोविएत रशियाच्या हातून जर्मनीचा एक भाग किफायतशीरपणे काढून घेतला गेला. कसे शक्य झाले असेल हे?
१९४५ साली दुसरे महायु*द्ध संपले. जर्मनीच्या विभाजनासाठी आणि प्रशासनासाठी एक शांती संमेलन बोलावले गेले. जर्मनीचे ४ भागांत विभाजन करून त्यांचे प्रशासन चार वेगवेगळ्या प्रशासकांना सोपवले.
त्या चार सत्ता होत्या सोविएत संघ, ब्रिटन, अमेरिका आणि फ्रांस. पूर्व जर्मनीला लोकशाही गणराज्य (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ जर्मनी) तर पश्चिम जर्मनीला संघीय जर्मन गणराज्य (फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी) असे नाव देण्यात आले. आणि बर्लिन प्रांताला संयुक्त नियंत्रणाखाली ठेवले गेले.
पश्चिम जर्मनीवर अमेरिकेचा प्रभाव असल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था होती तर, सोविएत रशियाच्या प्रभावाखाली असणारी पूर्व जर्मनीत साम्यवादी अर्थव्यवस्था होती.
विभाजनानंतर जर्मनीच्या चार वेगळ्या भागांत चार वेगळ्या अर्थव्यवस्था होत्या. जर्मनीत सगळीकडे एकाच प्रकारची अर्थव्यवस्था असावी यावर सोविएत रशिया वगळता तीन देशांचे एकमत होते.
१९४८ साली सोविएत रशियातून बर्लिनकडे जाणारा प्रमुख महामार्ग दुरुस्तीचे कारण पुढे करून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. यानंतर ९ दिवसांतच रेल्वेमार्ग आणि जलमार्ग देखील पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे पश्चिम बर्लिनचा जगाशी संपर्क तुटला. एवढेच नव्हे तर तिथे पोचणारी वीज आणि पाण्याची सुविधा देखील बंद करण्यात आली. बर्लिनचे सुरू असलेले उद्योगधंदे ठप्प झाले. लोकांपुढे उपासमारीचे संकट उभे ठाकले.
अशा परिस्थितीत अमेरिका काहीतरी कार्यवाही करू शकत होती, पण त्यामुळे त्या दोन्ही महासत्तांमधील शीतयु*द्ध लवकरच महायु*द्धात रूपांतरित झाले असते. अणू यु*द्धाची ही शक्यता जगाला परवडणार नव्हती.
दुसऱ्या महायु*द्धानंतर सोव्हियत रशियासोबत यु*द्ध करण्यासाठी कोणताही देश तयार नव्हता. त्यामुळे सर्व सत्ता बर्लिनला मदत करण्यासाठी इतर पर्यायांच्या शोधात होते.
याच पार्श्वभूमीवर विमानाने बर्लिनच्या नागरिकांना मदत पाठविण्याची योजना आखली गेली. ज्याचं नाव होतं ‘ऑपरेशन विटल्स’.
अमेरिकन एअरफोर्सच्या विमानांतून खाद्यपदार्थ आणि कोळसा इत्यादी बर्लिनला पोचविण्यात आले.
पॅराशूटच्या सहाय्याने बर्लिनच्या लोकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवले गेले. जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी दररोज विमान पाठविण्यात येऊ लागले. त्यामुळे सोवियत रशियाचा, बर्लिनला कोंडीत पकडण्याचा डावपेच उधळण्यात यश आले. या मोहिमेसाठी फक्त लढाऊ विमाने नव्हे तर प्रवासी विमाने देखील वापरण्यात आली.
ब्रिटन आणि अमेरिकेच्या शासकांनी आपल्या नागरिकांकडून बर्लिनसाठी मदत मागितली. नागरिकांनी कपडे व अन्नपदार्थ, इतर जीवनावश्यक वस्तू सढळ हाताने दान केल्या. बाकीच्या देशांकडून मदतीची अपेक्षा करणे चुकीचे होते कारण, त्या देशांमध्ये आधीच त्या वस्तूंची चणचण होती.
एवढ्या दूर मदत पाठवणे अजिबात सोपे नसतानाही अमेरिकेने हे आव्हान लीलया पेलले.
बर्लिनला पाठवली जाणारी मदत एवढी प्रचंड होती की कधी कधी एका मिनिटाच्या आत चार ते पाच विमाने उड्डाण घेत होती. ‘ईस्टर परेड’चा दिवस या मोहिमेतील सर्वांत कठीण दिवस मानला जातो. या दिवशी तब्बल १२४४० टन इतका पुरवठा बर्लिनला केला गेला होता.
विशेष म्हणजे या मोहिमेनंतर सोवियत रशिया आणि इतर देशांमध्ये कोणत्याही प्रकारची कटुता निर्माण झाली नाही. सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
या ऑपरेशनअंतर्गत तब्बल तीन लाख विमाने उडवली गेली आणि त्याद्वारे २५ लाख टन एवढी प्रचंड मदत बर्लिनला पाठविण्यात आली.
अर्थात, या मोहिमेदरम्यान सोव्हिएत रशियाची टांगती तलवार सतत डोक्यावर होतीच. सोव्हिएत रशियाकडून बॉ*म्ब गोळ्याच्या सहाय्याने मदतीला पाठविलेली विमाने पाडण्याची शक्यता कायम होती. पण, असे काही घडले नाही.
१९४९ साली बर्लिनवरील सर्व प्रकारची बंधने उठविण्यात आली. बर्लिनबाबतीतील आपली धोरणे स्वीकारणे पश्चिमी राष्ट्रांना भाग पाडणे हाच सोव्हिएत रशियाचा उद्देश असावा. पण, बर्लिनवरच्या बंदीमुळे सोव्हिएत रशियाची खरी बाजू जगाच्या समोर आली. बर्लिनवरील बंदी सपशेल अपयशी ठरली ते वेगळं.
बर्लिनपासून सोव्हिएत रशियाला वेगळे करणे हे आव्हानात्मक काम होतं. या दरम्यान झालेल्या छोट्याशा चुकीचेही अणु यु*द्धात रूपांतर होऊ शकले असते. अमेरिका व ब्रिटनच्या काळजीपूर्वक कार्यवाहीमुळे जग एका मोठ्या यु*द्धापासून परावृत्त राहिले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










