The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी लहानग्यांचे भावविश्व रंगवणारे टार्गेट मासिक आता फक्त आठवणीत उरले आहे!

by द पोस्टमन टीम
19 May 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


८०- ९० च्या दशकात ‘टार्गेट’ मासिक हाती असलं म्हणजे एखाद्या मुलाला त्याच्या मित्रमंडळीत ‘कुल’ मानले जायचे. असं टार्गेटच्याच काही जुन्या वाचकांनी ‘द प्रिंट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. हे वाचक मासिकाच्या इतक्या प्रेमात होते की त्यांनी आजपर्यंत त्या मासिकाचे अंक जपून ठेवले आहेत.

लिव्हिंग मीडिया लिमिटेड नावाच्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येणारे टार्गेट हे एक प्रसिद्ध मासिक होते. १९७९ ते १९९५ या काळात हे इंग्रजी मासिक मोठ्या प्रमाणावर खपायचे. आजच्या प्रसिद्ध इंडिया टुडे ग्रुपचे सर्वेसर्वा अरुण पुरी यांच्याच सुपीक मेंदूतून ‘टार्गेट’चा जन्म झाला होता.

ज्याकाळात समाजमाध्यमे व कार्टुन चॅनल्स नव्हते त्याकाळी या मासिकाच्या माध्यमातून मुलं आपल्या मनोरंजन विश्वात रंग भरायचे. मासिकातील एक अन एक लेख मुलं वाचायचे.

एखाद्या १२ वर्षांच्या मुलाला आकर्षित करण्यासारख्या असंख्य गोष्टी या मासिकात होत्या. यात कोडी असायची, परीक्षेसाठी वेगवेगळ्या टिप्स दिलेल्या असायच्या, लघुकथा असायचा, शाब्दिक खेळ असायचे तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तींची थोडक्यात माहिती दिलेली असायची.



या मासिकात ‘डिटेक्टिव्ह मुंच्छावाला’, गरधब दास व टेग्राट द सुपर स्लेयुथ, यांसारख्या व्यंगचित्र कथा असायच्या ज्यामुळे त्यावेळी लहान मुलांचे मन सतत त्यानेच व्यापलेले असायचे. अजित निनान जे टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडिया टुडेसाठी राजकीय व्यंगचित्र काढायचे त्यांनीच ‘डिटेक्टिव्ह मुंच्छावाला’चे पात्र चितारले होते.

रोझलिंड विल्सन जेव्हा या मासिकाचे संपादक झाले तसा मासिकाने प्रसाराचा वेग धरला. विल्सन यांनी रस्किन बॉण्ड, रुपा पाल, गीता धर्मराजन, पारो आनंद व मंजुळा पद्मनाभन यांच्यासारख्या अनेक दिग्गज बालसाहित्यकारांना एकत्र करत त्यांनी टार्गेटचे रुपडे पालटले होते.

टार्गेट हे इंग्रजीतीले पहिले बालकांना समर्पित मासिक होते. चंपक, पराग यांच्यासारख्या असंख्य तत्कालीन नामांकित मासिकांच्या तुलनेत टार्गेटचा दर्जा हा फार उत्तम होता. इतरांप्रमाणे टार्गेट राजा राणीच्या गोष्टी न छापता, ८० व ९० च्या दशकातील बालकांना झेपतील अशा शब्दात आजूबाजूला घडणाऱ्या घटनाक्रमाचे वर्णन केलेले असायचे. एक प्रकारे मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्याचे काम टार्गेट मासिक करत होते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

बालदिनाच्या दिवशी टार्गेटचा संपूर्ण अंक बालकांच्या प्रतिक्रिया आणि लेखांनी व्यापलेला असायचा. द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत पश्चिम बंगालच्या एका पत्रकाराने आपल्या यशाचे क्रेडिट त्याने लहानपणी टार्गेट मासिकात लिहलेल्या अशाच एका लेखाला दिले होते. तो पत्रकार म्हणाला होता की त्याच्या वाटचालीची सुरुवात टार्गेट मासिकातून झाली होती.

टार्गेट मासिकाचे संपादकीय मंडळ बऱ्याचदा लहान मुलांना अनेक मोठ्या सेलिब्रिटी लोकांच्या मुलाखती घ्यायला लावत, त्यांच्यासाठी निरनिराळ्या कार्यक्रमांचे, वर्कशॉप्सचे आयोजन करत असे. मुलांना चित्रकला, कागदकाम, ओरिगामी इत्यादींचे प्रशिक्षण देखील टार्गेटच्या माध्यमातून देण्यात येत होते.

९० च्या दशकात एवढ्या मोठ्या प्रमाणावर खप असणारे हे मासिक, खरंतर कुठल्याही मोठ्या मार्केटिंग अथवा जाहिरातीविना खपायचे, हे देखील एक वैशिष्ट्य आहे. टार्गेटचा मजकूर इतका सुलभ व आकर्षक स्वरूपाचा होता की लोक आपोआपच टार्गेटकडे आकर्षित होत असत.

टार्गेटची लोकप्रियता लक्षात घेता अमिताभ बच्चन, कपिल देव व लिएन्डर पेस सारखे दिग्गज सहजपणे मुलाखत देण्यासाठी उपलब्ध व्हायचे. मुलांचे टार्गेटवरील प्रेम हे अपरंपार होते, त्यातूनच टार्गेटची प्रसिद्धी व्हायची.

आज टार्गेट बाजारात नाही, आजची आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळातील पिढी १९९५ साली टार्गेट बंद पडल्यानंतर दुरावत गेली, पुन्हा टार्गेट सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो अयशस्वी ठरला व अखेरीस एकेकाळी लहानग्यांचे भावविश्व रंगवणारे टार्गेट मासिक आता फक्त आठवणीत आणि त्याच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या वाचकांच्या संग्रहात उरले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

धैर्याने मुघलांना तोंड देणाऱ्या चांदबिबीची गोष्ट..!

Next Post

श्रीलंकेच्या वर्ल्डकप विनिंग टीमचा हिस्सा असलेला सुरज सध्या ऑस्ट्रेलियात बस चालवतोय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

श्रीलंकेच्या वर्ल्डकप विनिंग टीमचा हिस्सा असलेला सुरज सध्या ऑस्ट्रेलियात बस चालवतोय

मॅरेथॉनची सुरुवात होण्यामागे हा इतिहास आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.