The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाणून घ्या, केरळमध्ये हिंदूंविरोधात झालेला मोपला विद्रोह काय होता…?

by द पोस्टमन टीम
26 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


२० ऑगस्ट १९२१ चा दिवस हा केरळच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. याच दिवशी केरळच्या मलबार प्रांतात एका मोठ्या विद्रोहाला सुरुवात झाली होती. या विद्रोहाला मोपला विद्रोह म्हणून ओळखले जाते. इंग्रजांविरोधात सुरू झालेल्या या मोपला विद्रोहाला पुढे हिंदू मुस्लिम दं*गलीचे स्वरूप प्राप्त झाले.

असं म्हटलं जातं की या दं*गलीत मलबारमधील मोपला मुसलमानांनी हजारो हिंदूंची ह*त्या केली होती. यावेळी हिंदू महिलांवर बला*त्कार करण्यात आले होते. हजारो हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवण्यात आले होते.

केरळमध्ये या मोपला दं*ग्याची चर्चा आज देखील केली जाते. केरळमधील हिंदुत्ववादी या दं*गलीवरून आज देखील तिथल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर राजकीय टीकास्त्र सोडत असतात. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील प्रचारादरम्यान केरळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षावर भाजपाने कडाडून ह*ल्ला चढवला होता. केरळच्या भाजपा अध्यक्षाने याला हिंदूंच्या विरोधात मुसलमानांचा पहिला जि*हाद म्हटले होते. त्यावेळी हे प्रकरण फार चर्चेत आले होते.

केरळच्या मलबारमध्ये सुरू झालेल्या या मोपल्याचा बंडाची प्रेरणा खिलाफत चळवळीत दडली होती.

पहिल्या महायु*द्धात तुर्कस्थानचा पराभव झाला होता. त्यावेळी इंग्रजांनी त्या देशाचा राजाला जो जगभरातील मुसलमानांचा खलिफा होता, त्याला सत्तेतून खाली खेचले होते. इंग्रजांच्या या कारवाईमुळे जगभरातील सर्वच मुसलमान इंग्रजांवर नाराज झाले होते. तुर्कस्थानच्या सुलतानाला त्याची राजगादी परत मिळवून देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती.



भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम नेत्यांनी या चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यात प्रामुख्याने अबुल कलाम आझाद, जफर अली खाँ, मोहम्मद अली आणि शौकत अली यांचा समावेश होता. महात्मा गांधींनी देखील या चळवळीला आपला पाठींबा दर्शवला होता. महात्मा गांधींचा या चळवळीला समर्थन देण्यामागे हिंदू मुस्लिमांना स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्र करण्याचा उद्देश होता.

याच काळात महात्मा गांधींनी असहकार चळवळीला सुरुवात केली होती. अनेक हिंदुत्ववादी इतिहासकार असे मानतात की असहकार चळवळीच्या माध्यमातून गांधी हिंदूंना एकप्रकारे खिलाफत चळवळीला समर्थन मिळवून देण्यासाठी तयार करत होते. परंतु अनेक गांधीवादी अभ्यासकांच्या मते महात्मा गांधींनी असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ फक्त हिंदू – मुस्लिम एकता घडवून आणायला एकत्र केली होती, तिचा उद्देश ब्रिटिश विरोधाचाच होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

केरळमध्ये खिलाफत चळवळीच्या आंदोलनात मलबारमधील मोपला मुसलमान सामील झाले होते.

मलबारमध्ये राहणाऱ्या मल्याळी मुसलमानांना “मोपला” असे संबोधले जात होते. या मोपला मुसलमानांमध्ये बहुतांश लोक हे शेती आणि व्यापार करायचे, या भागातील बहुतांश जमिनीवर आणि मोठ्या व्यापारावर हिंदूंचा कब्जा होता.

मोपला मुसलमान यांच्याकडे वेठबिगारी करायचे. त्यांना तिथे राबायची चौथाई मिळत असे.

खिलाफत चळवळीच्या सुरुवातीला तिचे स्वरूप हे इंग्रजांच्या विरोधात जनआंदोलनाचे होते. इंग्रजांनी या आंदोलनाला दडपण्याची योजना आखली होती. त्यांनी सुरुवातीला या आंदोलनाच्या मोठ्या नेत्यांना जेरबंद केले. यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व मुसलमानांच्या हाती गेले. मोपला मुसलमानांच्या हाती नेतृत्व गेल्यामुळे त्यांनी हिंदू जमीनदारांवर ह*ल्ले करण्यास सुरुवात केली.

या चळवळीला जमीनदारांच्या विरोधात वेठबिगारांच्या बंडाचे स्वरूप प्राप्त झाले. मोपला मुसलमान हे हिंदू जमीनदार त्यांना देत असलेल्या अल्प मजुरीमुळे व त्यांच्या वेगळ्या धार्मिक परंपरामुळे त्यांच्यावर नाराज होते. केरळात असे बंड आधी देखील घडले होते. १८३६ आणि १८४९ साली झालेले असे बंड देखील फार मोठे होते, परंतु १९२१ साली याला मोठे हिं*सक स्वरूप प्राप्त झाले होते.

मोपला मुसलमानांनी अनेक पोलीस स्टेशनांना आग लावली होती, सरकारी दौलत लुटली होती, इंग्रजांवर ह*ल्ला केल्यानंतर त्यांनी हिंदूंवर ह*ल्ला चढवला होता, अनेक हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले होते, हजारो हिंदूंचे धर्मांतर केले होते.

यानंतर आर्य समाजाने या धर्मांतर झालेल्या हिंदूंचे शुद्धीकरण चळवळीच्या माध्यमातून पुन्हा शुद्धीकरण केले व त्यांची घर वापसी केली होती.

या शुद्धीकरण चळवळीचे अग्रणी होते स्वामी श्रद्धानंद ज्यांची, २३ डिसेंबर १९२६ रोजी राशीद खान नावाच्या मुसलमानाने दिल्लीत गोळ्या घालून ह*त्या केली होती.

मोपला बंडाला प्राप्त झालेले हिंदूविरोधी दं*गलीचे स्वरूप हे स्वातंत्र्य आंदोलनाला सुरुंग लावण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न होते, असं अनेक डावे इतिहासकार मानतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी या मोपला दं*गलीवर ‘मोपल्याचे बंड’ असे पुस्तक लिहले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्या ‘पाकिस्तान’ या ग्रंथात या दं*गलीच्या वेळी घेतलेल्या सावध भूमिकेमुळे महात्मा गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.

मोपल्याची दं*गल ही हिंदुत्ववादी चळवळीच्या उदयाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील एक कारण असल्याचे अनेक इतिहासकार मानतात. एकंदरीत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघितले तरी या दं*गलीला भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे, हे नाकारता येत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

दक्षिण चीनी समुद्रात गंभीर परिस्थिति असताना ‘क्वाड’ एक शक्तीशाली गट बनु शकेल काय?

Next Post

१९६५च्या यु*द्धाच्या वेळी निजामाने भारतीय सैन्याला ५००० रुपयांची मदत केली होती का…?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

१९६५च्या यु*द्धाच्या वेळी निजामाने भारतीय सैन्याला ५००० रुपयांची मदत केली होती का...?

'हमारा बजाज'ने मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने गती दिली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.