The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातील एकमेव मंत्री ज्याने ४२ विद्यापीठांमधून तब्बल २० पदव्या मिळवल्या होत्या..

by द पोस्टमन टीम
14 September 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


त्यांना अवघ्या ४९ वर्षांचं आयुष्य लाभलं. पण, इतक्या कमी कालावधीत त्यांनी जी किमया केली तीला निव्वळ एक चमत्कार म्हणता येईल. वयाच्या ३६व्या वर्षापर्यंत त्यांनी जगभरातील ४२ विद्यापीठांच्या परीक्षा दिल्या होत्या आणि तब्बल २० पदव्या मिळवल्या होत्या.

ते आयएएस होते, आयपीएस होते, डॉक्टर होते, वकील होते, पत्रकार होते. इतकंच नाही तर खासदार, आमदार आणि मंत्रीही होते. शिवाय कीर्तनकारही होते. 

विविध विद्यापीठातील आणि विविध ज्ञानशाखेतील २८ सुवर्णपदके त्यांनी पटकावली होती. त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रातील कुबेर म्हटले तरी वावगं ठरणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी जे यश मिळवले ते पाहता साक्षात सरस्वतीच त्यांच्यावर भाळली होती की काय अशी शंका निर्माण होते.

शिक्षण क्षेत्रातील या महामेरूचे नाव होते डॉ. श्रीकांत जिचकार.

एम ए. पासून डिलीटपर्यंत (डॉक्टर ऑफ लिटरेचर) देशातील सर्व पदव्या मिळवण्याचा विक्रम डॉ. जिचकारांच्या खात्यावर जमा आहे. यामध्ये एमबीबीएस, एलएलबी, एलएलएम, डीबीएम, एमबीए, जर्नालिझम अशा पदव्यांचा समावेश आहे. त्यांनी लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, पुरातत्वशास्त्र आणि मानसशास्त्र अशा १० विषयातून एमए पूर्ण केले. 



संस्कृतमध्ये तर त्यांना डिलीटही (डॉक्टर ऑफ लिटरेचर) मिळाले. विशेष म्हणजे या सर्व पदव्यांमध्ये ते विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी एलएलएम (आंतरराष्ट्रीय कायदा) ही पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यांच्याकडे पत्रकारितेतील मास्टर ऑफ जर्नालिझमची देखील पदवी होती.

आयपीएस आणि आयएएससारख्या सरकारी नोकऱ्यांवर पाणी सोडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आमदार झाले. मंत्री म्हणूनही त्यांनी केवळ एकाच विभागाचा नाही तर तब्बल १४ विभागांचा कार्यभार सांभाळला.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी एमबीबीएस डॉक्टर म्हणून केली होती. मग त्यांनी नागपूरमधून एम. डी. केले. नंतर ते आयपीएस झाले, मग आयएएस झाले. परंतु दोन्ही नोकऱ्यांवर त्यांनी पाणी सोडले.

१९८० साली ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले. या निवडणुकीत त्यांना विजयही मिळाला. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी आमदार झालेले जिचकार देशातील सर्वात तरुण आमदार होते. 

१९८२ ते ८५ याकाळात ते महाराष्ट्रातील ताकदीचे मंत्री होते. त्यांच्याकडे १४ खात्यांचा भार सोपवण्यात आला होता. १९८६ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचेही सदस्य झाले. १९९२ पर्यंत ते विधान परिषदेत होते.

१९९२ ते १९९८ या काळात ते राज्यसभेतही गेले. या काळात वेगवेगळ्या समित्यांवरही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी युनो आणि युनेस्कोतही भारताचे प्रतिनिधित्व केले.

१९९९ साली लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला. यानंतर त्यांनी राजकारणाकडे पाठ फिरवली, ती कायमचीच. यानंतर त्यांनी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन तिथे आरोग्य, शिक्षण आणि धर्म अशा विषयांवर व्याख्याने दिली.

भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही त्यांची दाखल घेतली आहे.

जिचकारांची व्यक्तिगत लायब्ररीही समृद्ध होती. त्यांच्याकडे ५२००० पेक्षाही जास्त पुस्तकांचा संग्रह होता. कदाचित ही देशातील एकमेव सर्वांत मोठी पर्सनल लायब्ररी असावी.

इतक्या पदव्या, इतकी सुवर्ण पदके आणि इतके मोठे यश मिळवणारे जिचकार अकॅडमिक विद्वान तर होतेच शिवाय, पेंटर, प्रोफेशनल फोटोग्राफर आणि अभिनेते देखील होते. जिचकरांवर देवी सरस्वतीने मुक्त हस्ते आपल्या गुणांची उधळण केली होती.

हात लावील तिथे सोने करणाऱ्या मिडास राजाची गोष्ट आपण वाचली होती. पुराण कालीन त्या मिडास राजाचाच हा पुनर्जन्म असावा म्हणूनच जिचकार ज्या गोष्टीला हात घालत त्याचे सोनेच करून सोडत. 

१९९२ साली त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था स्थापन केली. नंतर त्यांनी फक्त स्वतःच्या जोरावर संस्कृत विद्यापीठाचीही स्थापना केली. या विद्यापीठाचे कुलगुरू ते स्वतःच होते.

नियतीने अत्यंत कमी वयात जिचकरांना भरभरून दिले. पण त्याच नियतीला कदाचित जिचकरांचे हे यश पाहवले नाही. २ जून २००४ रोजी जिचकार आपल्या एका मित्राच्या फार्महाउसवरून नागपूरला चालले होते. ते स्वतः गाडी चालवत होते.

रस्त्यात एका बसची आणि त्याच्या कारची जोरात धडक झाली. या अपघातात केवळ ४९व्या वर्षीच त्यांचे निधन झाले. लहान वयातच त्यांचे निधन झाले ही खरे असले तरी, इतक्या कमी वयात त्यांनी जे यश मिळवले, नाव कमावले त्याला खरोखरीच तोड नाही. ज्ञानाच्या क्षेत्रातील या मिडास राजालाही शेवटी दु:खाचा फेरा सुटला नाहीच.

एका मराठी माणसाच्या गौरवाची ही गाथा खूप कमी लोक जाणतात. इतके मोठे कर्तृत्व गाजवूनही जिचकारांनी मराठी मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आजच्या तरुणांनी जिचकारांच्या या ज्ञान-तपस्येचा आदर्श निश्चितच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतातून मोबाईलचा पहिला कॉल एका कम्युनिस्ट नेत्याने केला होता!

Next Post

या कॉमिक्सने भारताचा गौरवशाली इतिहास पहिल्यांदा मुलांपर्यंत पोहोचवला होता

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

या कॉमिक्सने भारताचा गौरवशाली इतिहास पहिल्यांदा मुलांपर्यंत पोहोचवला होता

'हम लोग' : अशी होती दूरदर्शनची पहिलीवहिली टीव्ही मालिका

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.