The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या एका आजारामुळे अमेरिका सुपरपॉवर बनलाय

by द पोस्टमन टीम
17 May 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


कोव्हीड-१९च्या महामारीच्या समस्येने संपूर्ण जगाला भेडसावले होते. या महामारीनंतर संपूर्ण जगभर एक नवी व्यवस्था निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. महामारीचा संसर्ग संपल्यानंतर जगातील महासत्तांचा क्रमही बदलेला असेल असेही म्हटले जात होते. पण सध्यातरी तशी परिस्थिती दिसत नाही.

सध्या तरी अमेरिकेकडेच सर्वांत प्रबळ जागतिक महासत्ता म्हणून पाहिले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय होण्यामागेही अशीच एक साथ कारणीभूत ठरली होती. या साथीच्या आजारामुळेच महासत्तेचा मुकुट चढवणे अमेरिकेसाठी शक्य झाले होते.

ही गोष्ट आहे १८०१ सालची. फ्रांसचा लष्करी जनरल नेपोलियनला कॅरेबियन देश आपल्या ताब्यात घायचा होता. यासाठी त्याने हैतीमध्ये फ्रांसमधून अफाट फौज पाठवली. फ्रांसचे सैनिक जे कधीच कुठल्या सैन्यासमोर हार मानत नव्हते त्या अफाट सैन्याला अशाच एका महामारीने जेरीस आणले होते. या महामारीमुळे फ्रांसच्या बऱ्याच सैनिकांच्या मृत्यू झाला.

सैनिकांच्या या मृत्यूमुळे हैराण झालेल्या नेपोलियनने शेवटी हैतीवर कब्जा करण्याचा मनसुबा रद्द करून आपल्या उरलेल्या सैन्याला फ्रांसमध्ये माघारी बोलावून घेतले. फ्रांसचा सेनापती देखील या आजाराला बळी पडला होता.



फ्रांसने हैतीतून घेतलेली ही माघार अमेरिकेच्या पथ्यावर पडली आणि तेव्हाच अमेरिका महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली.

युरोपमध्ये गुमामगिरीची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आजही तिथे श्वेत-अश्वेत भेदभाव केला जातो. हैतीमध्ये विना-मोबदला काम करणाऱ्या कृष्णवर्णीयांची संख्या भरपूर होती. हे कृष्णवर्णीय गुलाम फुकटात शारीरिक कष्टाची कामे करीत असत. त्यामुळे जमीनदारांचा मोठा फायदा होत होता.

हैतीवर कब्जा मिळाला असता तर हैतीतून हे गुलाम फ्रांसमध्ये नेऊन तिथे त्याच्याकडून कामे करवून घेण्याचा नेपोलियनचा मनसुबा होता. सेंटो डॉमिंग्वे हा कॅरेबियन देशही फ्रान्सच्या ताब्यात होता. इथे कॉफी आणि साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात असे. इथली साखर आणि कॉफी इतर देशात विकून फ्रांसला भरपूर फायदा मिळत होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या शेतीमध्ये काम करण्यासाठी गुलामांची गरज भासत असे. गुलामांना योग्य मोबदला दिला जात नव्हता. शिवाय त्यांना पोषक अन्नही मिळत नव्हते. अनेक गुलाम शारीरिक कष्ट आणि भूकमारीचे बळी ठरले. गुलामांची संख्या कमी होऊ लागली. 

गुलामांनी या अमानवीय प्रथेविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. १७९१ साली गुलामांनी मोठे आंदोलन केले. यानंतर फ्रांसने कॅरेबियन देशातून गुलामीची प्रथा बंद करून टाकली. जमीनदार आणि श्रीमंत लोकांना मात्र याबद्दल प्रचंड नाराजी होती.

म्हणून फ्रांसला इतर देशातून आपल्या देशात गुलाम आणायचे होते. याच उद्देशाने नेपोलियनने १८०१ साली सेंट डॉमिंग्वेमध्ये आपले भले मोठे सैन्य पाठवले. या सैन्यात ६० ते ८५ हजार सैनिक होते.

सेंट डॉमिंग्वेवर कब्जा करून तिथून फ्रांसमध्ये गुलाम आणले की देशातील कामे पुन्हा सुरळीत सुरु होतील, अशी नेपोलियनची अपेक्षा होती. कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढणारे नेते टॉस्सैंट यांचेही अपहरण करून त्यांना ताब्यात घेण्याची योजनाही आखण्यात आली.

फ्रांसची सेना सेंट डॉमिंग्वेमध्ये दाखल झाली. ठरल्यानुसार त्यांनी कृष्णवर्णीय नेते टॉस्सैंट यांचे अपहरण केले. टॉस्सैंट यांना मात्र त्यांना कैद केल्याची जराही खंत नव्हती. कारण, या सैनिकांवर कोणती आपत्ती ओढवणार आहे, याचा त्यांना अंदाज होता. त्यामुळे हे सैनिक स्वतःच सेंट डॉमिंग्वेमधून पळून जातील हेही त्यांनी ओळखले होते. दुर्दैवाने टॉस्सैंट यांचे फ्रांसच्या कैदेत असतानाच निधन झाले.

सेंट डॉमिंग्वेमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात पीत ज्वराची साथ येत असे. या साथीचा मृत्युदर ५०% होता. इतकी ही साथ भयानक होती. नेपोलियनच्या सैनिकांत पीत ज्वराची ही साथ पसरली. त्याच्या सैन्यातील ८०% सैनिक या साथीतच दगावले. सैनिकांचा सेनापती देखील याच साथीत दगावला. नेपोलियनने आपल्या उर्वरित सैनिकांना तातडीने माघारी बोलावले.

फ्रांसने सेंट डॉमिंग्वेमधून माघार घेतल्यानंतर इतर देश या प्रदेशात रस घेऊ लागले. यानंतर अनेक फेरबदल होऊ लागले. स्पेनने आपली लुइसियाना प्रांताचा ताबा फ्रांसला दिला.

अमेरिकेचा बराचसा भाग फ्रांसच्या वसाहतीत सामील झाला होता. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती होते थॉमस जेफरसन. त्यांनी नेपोलियनकडून ‘न्यू ऑरलेंस’ विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला. नेपोलियनने हा प्रस्ताव आनंदाने मान्य केला. एवढेच नाही तर त्याने लुइसियाना वसाहतही अमेरीकेला देण्याची तयारी दर्शवली.

नेपोलियनची आर्थिक अवस्था याकाळी खूपच बिकट झाली होती. त्यामुळे त्याला देशातील काही भूभागाचा सौदा करणे भाग पडले. फ्रांसने खूप दूरपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. परंतु इतक्या विशाल प्रदेशाची देखरेख करण्यासाठी खूप पैसे खर्च होत होते.

नेपोलियनने फ्रांसपासून दूरचा प्रदेश विकल्यास, जवळच्या प्रदेशातील प्रशासन सुरळीत चालवता येईल असा विचार केला. याच उद्देशाने त्याने लुइसियाना वसाहत अमेरिकेला देऊन टाकली.

१८०३ साली अमेरिका आणि फ्रांसमध्ये झालेल्या करारानुसार अमेरिकेने फक्त दीड कोटी डॉलर्समध्ये आपला सर्व प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. यानंतर अमेरिकेने आपल्या सीमा विस्तारण्याचे धोरण अवलंबले. टेक्सास आणि कॅलिफोर्निया ही राज्ये देखील अमेरिकेने आपल्या अधिपत्याखाली आणली. दोन्ही बाजूंनी पॅसिफिक आणि अटलांटिक महासमुद्राने वेढलेला असल्याने अमेरिका इतर देशांपासून दूर झाला. 

अमेरिकेची ही भौगोलिक परिस्थितीही त्याच्या फायद्याची ठरली. वारंवार होणाऱ्या आक्र*मणापासून अमेरिकेचा सहजच बचाव झाला. त्यामुळे लढाईत आपली शक्ती व्यर्थ घालवण्या ऐवजी अमेरिकेने आर्थिक प्रगती आणि विकास साधण्यावर जास्त भर दिला. 

पीत ज्वर हा आजार इडीस इजीप्टीआई या डासापासून संक्रमित होतो. हा एक विषाणूजन्य आजार आहे. ज्यामुळे भरपूर ताप, डोकेदुखी, अंतर्गत रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसून येतात. 

या आजारावर लस शोधण्यात संशोधकांना यश मिळाले असले तरी, याचा मृत्यूदर मोठा आहे. दक्षिण अमेरिका, पश्चिम युरोपातील काही भागात आणि पश्चिम आफ्रिका या देशांत अजूनही ही साथ पसरते. पीत ज्वराची ही साथच अमेरिकेच्या पथ्यावर पडली असे म्हणतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जाणून घ्या कसा आहे नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला “क्लास ऑफ ’83”

Next Post

CD चा काळ संपला आणि ‘प्लॅनेट एम’चं दिवाळं निघालं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

CD चा काळ संपला आणि 'प्लॅनेट एम'चं दिवाळं निघालं

चीनला धडा शिकवण्यासाठी अटलजी ८०० मेंढ्या घेऊन चीनी दुतावासासमोर जाऊन उभे राहिले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.