The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुगल न्यूजच्या मागे या भारतीयाचं डोकं आहे

by द पोस्टमन टीम
25 December 2025
in विश्लेषण, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारतातील अनेक तरुण आयटी क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत. या क्षेत्रात भारतीय तरुणांनी चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. जगभरातील आयटी कंपन्यांमध्ये भारतीय तरुण मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला अशी कितीतरी नावे तुम्ही ऐकली असतील.

याच यादीतील आणखी एक नाव म्हणजे – कृष्णा भारत. हे नाव तितकेसे कोणाला परिचित नसले तरी त्यांनी केलेले काम मात्र सर्वांच्या परिचयाचे आहे.

गुगल न्यूज हे ऍप तर सर्वांनाच माहिती आहे. जगभरातील बातम्या या ॲपवर एकाच क्लिकवर पाहता येतात. आज अशी अनेक ॲप्स आहेत ज्यामुळे जगाच्या कुठल्या कोपऱ्यात काय चालले आहे याची माहिती आपल्याला अगदी एका बोटाच्या क्लिकवर मिळते.

परंतु काही वर्षांपूर्वी, म्हणजे सुमारे वीस वर्षांपूर्वीची स्थिती मात्र याच्या अगदी उलट होती. दुसऱ्या दिवशीचे वर्तमानपत्र वाचल्यावरच जगाच्या कुठल्या कोपऱ्यात काय घडले याची माहिती मिळत असे. त्याकाळी सामान्यतः वर्तमानपत्रे आणि टेलिफोन हीच दोन माहिती पुरवणारी साधने होती.



त्यानंतर टीव्हीचा जमाना आला तरी, टीव्हीवर सगळ्याच बातम्या तपशीलवार दाखवल्या जात नसत. आजच्यासारखी फक्त बातम्यांसाठी वाहिलेल्या चॅनेल्स अजून आले नव्हते.

एखाद्या घटनेशी संबधित सगळीच माहिती बातम्यांमधून दिली जात नसे. एखाद्या घटनेमागील खऱ्या कारणांचा उलगडा होण्यास आणि तो सर्वत्र प्रसारित होऊन त्याची माहिती मिळण्यास बराच कालावधी लागे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

9/11च्या बाबतीत, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर द*हशत*वाद्यांनी ह*ल्ला केला. हा ह*ल्ला दुसऱ्या महायु*द्धाच्या काळातील पर्ल हार्बर ह*ल्ल्यापेक्षाही भयानक होता असे मानले जाते.

या ह*ल्ल्याच्या वेळी कृष्णा एक सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी लुसियाना येथे गेले होते. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथेच त्यांना या ह*ल्ल्याची बातमी मिळाली. या ह*ल्ल्यानंतर सगळीकडची विमानसेवा बंद करण्यात आली होती.

कृष्णा यांना आपल्या परिवाराची काळजी वाटत होती. त्यांना आपल्या कुटुंबियांकडे तातडीने परतायचे होते. आपापल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आतुर झालेली अशी कितीतरी माणसे त्या हॉटेलमध्ये होती. सगळ्यांनाच या ह*ल्ल्याची संपूर्ण माहिती हवी होती. परंतु त्यांच्यापर्यंत सगळी माहिती वेळेत पोहोचत नव्हती.

त्या हॉटेलच्या रूममध्ये बसल्या बसल्या कृष्णा विचार करू लागले की, एखाद्या मोठ्या घटनेबद्दलची सगळी माहिती लोकांना एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळाली तर त्या घटनेशी संबधीत असणाऱ्या लोकांना याचा किती फायदा होतील. त्या घटनेने प्रभावित झालेल्या लोकांना यामुळे मदत मिळेल. असा विचार करता करताच त्यांना न्यूज सर्च इंजिन बनवण्याची कल्पना सुचली.

इथेच गुगल न्यूजचा पाया घातला गेला. कृष्णा यांनी हे सर्च इंजिन तयार करण्यासाठी काय काय करावे लागेल याबद्दल माहिती गोळा करण्यास काय काय करावे लागेल याचा ताळमेळ लावू लागले. किमान ज्यांच्याकडे इंटरनेट असेल त्यांना तरी एकाच ठिकाणी एका घटनेसंबंधी सगळी माहिती मिळेल, अशी काही सुविधा निर्माण झाली पाहिजे असे त्यांना वाटत होते.

त्यांना माहिती गोळा करण्यासाठी इकडे-तिकडे पळापळ करावी लागणार नाही. त्यांची धावपळ वाचेल. समोर टीव्ही सुरु होता आणि कृष्णा गुगल न्यूजच्या कल्पनेत बुडून गेले.

लवकरच विमानसेवा सुरु झाल्या. कृष्णा आपल्या कामावर पुन्हा रुजू झाले. त्यांनी न्यूज सर्च इंजिन बनवण्याची कल्पना खूपच मनावर घेतली.

आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या खाजगी कामासाठी म्हणून काही काळ इंटरनेट वापरण्याची मुभा गुगलने दिली होती. हे कर्मचारी कामाच्या ठिकाणी काही वेळ वैयक्तिक कारणासाठी इंटरनेट वापरू शकत होते. याच वेळेचा वापर करून कृष्णा त्यांच्या या न्यूज सर्च इंजिनशी निगडीत संशोधन करू लागले.

काही दिवसांनी त्यांनी स्वतः शोधलेली सगळी माहिती गुगलच्या बुलेटीन बोर्डवर अपलोड करण्यास सुरुवात केली. आपल्या ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांनाही त्यांनी आपल्या मनातील कल्पना बोलून दाखवली.

ऑफिसमधील कर्मचारीही कृष्णा यांच्या या नव्या प्रयोगात सामील झाले. सर्वांनी मिळून गुगल न्यूजला यशस्वीपणे आकार दिला.

२०१४ साली गुगल न्यूज जगातील ७० भाषांतून काम करू लागली. यावर एकाच वेळी ५० हजार बातम्या येऊ लागल्या. यामुळे कोणतीही न्यूज लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचू लागली. गुगल न्यूजमुळे लोकांच्या जीवनात कोणकोणते बदल झाले याचे तर आपण सर्वच साक्षीदार आहोत.

कृष्णा यांचा जन्म ७ जानेवारी १९७० रोजी कर्नाटकमध्ये झाला. बंगलोर येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी आयआयटी मद्रास येथे प्रवेश घेतला. येथून त्यांनी कंप्युटर सायन्समधून पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी जॉर्जिया येथून ह्युमन कंप्युटर इंटरॲक्शन या विषयात पीएचडी पूर्ण केली.

१९९९ साली ते अमेरिकेत गुगलमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून दाखल झाले. इथे काम करत असतानाच त्यांना गुगल न्यूजची कल्पना सुचली आणि ती त्यांनी साकार करून दाखवली. गुगलमध्ये त्यांनी पंधरा वर्षापेक्षा जास्त काळ काम केले.

त्यानंतर ते एका मशीन लर्निंग सॉफ्टवेअर स्टार्टअपसाठी सल्लागार म्हणून काम करू लागले. २०१९ साली ते पुन्हा गुगलमध्ये रुजू झाले.

गुगल न्यूज ही साईट स्वतः कृष्णा यांनी बनवली असली तरी गुगलवरून जेव्हा फेक न्यूज प्रसारित झाली तेंव्हा त्यांनी गुगल न्यूजला विरोध दर्शवला. गुगलचा जन्म लोकांना खऱ्या आणि अधिकृत बातम्या मिळाव्यात यासाठी झाला असल्याची त्यांनी गुगलला आठवण करून दिली.

२०१७ साली लास वेगास येथे एका माथेफिरूने गोळीबार केला होता. या ह*ल्ल्यात ५८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. गुगलने एका व्यक्तीला शुटर समजून त्यासंबधी बातम्या प्रसारित केल्या. पण, प्रत्यक्षात ती व्यक्ती शुटर नव्हती.

तेव्हा कृष्णा यांनी गुगल न्यूजच्या या बातमीबद्दल लिहिले होते – टॉप स्टोरीजसाठी गुगल न्यूजची निर्मिती करण्यात आली आहे, टॉप अफवेच्या प्रसारासाठी नाही. या घटनेनंतर गुगल न्यूजने आपल्या साईटची नियमावली अधिक कठोर केली. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडेही लक्ष दिले.

कृष्णा यांच्या एका आयडीयाने जगभरातल्या घडामोडी एका क्लिकवर आणून ठेवल्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

उत्तर कोरियाचे लोक ज्या पर्वताला पवित्र मानतात तिथेच त्यांच्या डोकेदुखीचा जन्म झालाय

Next Post

ही चकाचक दिसणारी इमारत कॉर्पोरेट ऑफिस नसून एक ग्रामपंचायत कार्यालय आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ही चकाचक दिसणारी इमारत कॉर्पोरेट ऑफिस नसून एक ग्रामपंचायत कार्यालय आहे

मौल्यवान रत्नांचे इतके साठे असूनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भाव का नाही?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.