The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतरंगी स्कीमा सांगून लोकांना चुना लावणारा पहिला माणूस म्हणजे ‘चार्ल्स पॉन्झी’

by द पोस्टमन टीम
28 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जगात फसवणाऱ्या लोकांची कमतरता तोपर्यंत पडत नाही जोपर्यंत लोक फसले जात नाहीत. हर्षद मेहता स्कॅम, सत्यम कॉम्प्युटर स्कॅम, शारदा ग्रुप चिट फंड स्कॅम, मल्टी लेव्हल मार्केटिंग स्कॅम असे स्कॅम्स सतत घडतच असतात. एक स्कॅम उघडकीस आल्यावर त्याबद्दल चर्चा होते आणि त्यानंतर काही वर्षांत तसाच दुसरा स्कॅम होत राहतो.

याचे कारण म्हणजे लोक अनेक वेळा स्वत:ची फसवणूक होऊनही पैसे दुप्पट, तिप्पट, चौपट करून द्यायची स्कीम आल्यावर तिची पार्श्वभूमी तपासून पाहावी असे वाटत नाही. कदाचित या वेळी आपलं नशीब उजाडेल, यावेळी पैसा चौपट मिळेल या आशेवर लोक आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावतात आणि फसतात.

आर्थिक अफरातफरीचे जे प्रकार आहेत त्याचे सतत दिसणारे पॅटर्न म्हणजे नेटवर्क मार्केटिंग सिस्टीम, मल्टी लेवल मार्केटिंग सिस्टीम, पिरॅमिड स्कीम आणि पॉन्झी स्कीम!

साधारणपणे साखळी पद्धत या प्रत्येक प्रकारच्या स्कॅम मध्ये वापरली जाते. पण तुम्हाला माहित आहे का वर जे प्रकार दिले आहेत यातला जो शेवटचा प्रकार आहे पाँझी स्कीम हे नाव खरोखर एका जिवंत व्यक्तीचे आहे.



पाँझी स्कीम ज्याच्या नावाने ओळखली जाते त्याचे पूर्ण नाव चार्ल्स पाँझी असे होते. चार्ल्स पाँझीने जो आर्थिक अफरातफरीचा मोठा घोटाळा केला त्यावरून नंतर व्यवहारात अशा प्रकारच्या आर्थिक घोटाळ्यांना पाँझी स्कीम असे म्हटले जाऊ लागले.

आज जर तुम्ही डिक्शनरीमध्ये पाँझी स्कीमचा अर्थ पहिला तर साधारणपणे ज्या आर्थिक योजना अगदी कमी कालावधीमध्ये स्कीममध्ये गुंतवलेल्या रकमेवर अशक्य असणारा भरघोस परतावा देण्याचे वचन देतात त्यांना पाँझी स्कीम म्हणून ओळखले जाते.

यात ग्राहकांकडून तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या पैशावर आम्ही चौपट परतावा देतो असे आमिष दाखवून अगोदर पैसे गोळा केले जातात. पुरेसे पैसे गोळा झाले कि या कंपन्या आपल्या गाशा गुंडाळून परागंदा होतात. मग जेव्हा या कंपन्यांचा काहीही पत्ता लागत नाही तेव्हा मग ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याचे समजते. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या अशा प्रकारच्या अनेक स्कीम आज देशात चालू आहेत. मागे कडकनाथ काळ्या कोंबडीचे चिकन फार फेमस झाले होते. हे चिकन अनेक रोगांवर गुणकारी म्हणून त्याचा प्रचार झाला, अनेक शेतकरी लोकांनी पैसे गुंतवून कडकनाथच्या कोंबड्या पाळल्या आणि नंतर या कोंबड्यांची मागणी बंद झाली. शेतकऱ्यांना स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास भाग पडणारे लोक परागंदा झाले.

काही वर्षांपूर्वी पुण्यात घडलेली अगरवाल चिट फंड स्कॅमची केससुद्धा अशाच प्रकारची होती, ज्यात ग्राहकांनी दामदुप्पट मिळेल म्हणून ठेवलेला पैसा घेऊन मूळ मालक फरार झाला होता.

अशा प्रकारच्या योजनांची सुरुवात करण्याचे श्रेय अर्थात चार्ल्स पाँझी याला जाते.

तर, कोण होता हा चार्ल्स पाँझी?

पाँझी हा मुळचा इटालियन नागरिक. ६०- ७० वर्षांपूर्वी इटलीची अवस्था फार चांगली नव्हती. देश पूर्णपणे माफियांच्या ताब्यात होता आणि माफिया लोक इटलीचे समांतर सरकार चालवत असत. अनेक लोक इटलीत त्यांच्या शिक्षणाला, कौशल्याला काहीही वाव नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात स्थलांतर करत होते. त्यात युरोप आणि अमेरिकेमध्ये बेकायदेशीर येणाऱ्या आणि नंतर अमेरिकेत व्यवसाय करून अमेरिकन विसा मिळवणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त होते.

पाँझी इटलीवरून अमेरिकेत आलेला एक निर्वासित होता. पाँझीचा जन्म ३ मार्च १८८२ चा. त्याने त्याच्या आयुष्यात काय केले अथवा शिक्षण कोठे घेतले याबाबत जास्त माहिती उपलब्ध नाही. १९०३ साली वयाच्या एकविसाव्या वर्षी तो अमेरिकेतील बोस्टन शहरात आला.

अमेरिकेत आल्यानंतर त्याने बरेच उद्योग करून पाहिले. अर्थात हे सगळे उद्योग बेकायदेशीर होते. त्यावेळी पाँझीचे नाव अनेक किरकोळ गुन्ह्यांमुळे पोलीस रेकॉर्ड्समध्ये आले.

Behind every great success there is a crime हे इटालियन लेखक मारिओ पुझोचे वाक्य पाँझीच्या बाबतीत समर्पक वाटते.

१९२० साली साधारणपणे पहिल्या महायु*द्धा दरम्यान पाँझीला पैसे कमावण्याची एक अफलातून स्कीम सापडली. ही स्कीम होती पोस्टल कुपनमधून पैसे कमावण्याची.

साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर त्याकाळी जी पत्रे एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यात येत असत त्या पत्राबरोबर एक पोस्टल रिप्लाय कुपन देण्यात येत असे. जेणेकरून जर दुसऱ्या देशातील माणसाला त्या पत्राला उत्तर पाठवायचे असेल तर तो ते कुपन आपल्या देशातील पोस्टात देवून त्या बदल्यात पोस्टल स्टँप घेऊन पत्राला उत्तर पाठवू शकत असे.

पोस्टल कुपन = पोस्टल स्टँप असे गणित होते.

त्याकाळी अमेरिकन डॉलर इतर देशातील करन्सीच्या मानाने मोठ्या किमतीचा मानला जात होता. यामध्ये पाँझी बाहेरच्या देशातील पोस्टल कुपन विकत घेऊन तो अमेरिकेत आणायचा आणि अमेरिकेतील पोस्ट ऑफिसमध्ये या कुपनच्या बदल्यात अमेरिकन स्टँप एक्सचेंज करून घ्यायचा आणि हे एक्सचेंज झालेले पोस्टल स्टँप जास्त किमतीला विकायचा.

उदाहारण, भारत देशातील १ पोस्टल कुपन जर १० रुपयाचे असेल तर असे ८ कुपन पाँझी भारतातून घेणार आणि अमेरिकेत या ८ कुपनच्या बदल्यात ८ पोस्टल स्टँप घेणार. आता एका पोस्टल स्टँपची किंमत उदाहरणा दाखल १ डॉलर पकडू. आता समजा आंतरराष्ट्रीय बाजारात एक डॉलरची भारतीय रुपयात किंमत ८० रुपये आहे.

१ डॉलर = ८० रुपये= ८ भारतीय पोस्टल कुपन

हेच ८ भारतीय पोस्टल कुपन एक्सचेंज करून पाँझीने त्याचे ८ अमेरिकन स्टँप घेऊन ते विकले तर पाँझीला मिळणारी रक्कम ८ डॉलर. पाँझीला पोस्टल कुपनचा आलेला खर्च १ डॉलर. एकूण नफा ७ डॉलर.

अशा प्रकारचा बिझनेस करणे हे त्याकाळी अमेरिकेत पूर्णपणे कायदेशीर होते. या पोस्टल कुपनच्या किमतीमध्ये होणाऱ्या चढ उताराचा फायदा घेऊन पाँझीने आपला बिझनेस उभा केला. वेगवेगळ्या देशात आपले एजंट्स नेमून त्यांच्याकडून पोस्टल कुपन मागवणे सुरु केले. यापुढे पाँझीची हाव वाढली आणि त्याने आपल्या या उद्योगात लोकांची भरती करायला सुरुवात केली.

तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवा मी तुम्हाला ४५ दिवसांत त्या रकमेच्या ५० पट जास्त रिटर्न देतो असे सांगायला त्याने सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी आपले पैसे पाँझीकडे गुंतवले आणि पाँझीने अगदी कबुल केल्याप्रमाणे त्यांना त्यांचे रिटर्न्ससुद्धा दिले.

याने गुंतवणूकदारांचा पाँझीवरचा विश्वास वाढला. लोक पाँझीची तारीफ करू लागले. त्याची प्रसिद्धी वाढत गेली. त्याबद्दल वृत्तपत्रे, रेडीओ, मॅगझीनमधून छापून यायला सुरुवात झाली.

इथे अगदी सत्यम कॉम्प्युटर्ससारखी केस झाली. ज्याप्रमाणे सत्यमच्या मालकाने आपल्या सीएला पैसे देऊन कागदोपत्री कंपनीचा नफा फुगवला त्याचप्रमाणे पाँझीने पत्रकारांना पैसे देऊन स्वत:ची अमाप स्तुती करायला भाग पाडले.

पाँझी एक फायनांशियल विझार्ड असल्याच्या बातम्या खुबीने पेरल्या गेल्या. पाँझी स्कीम किती फुल प्रुफ स्कीम आहे हे लोकांच्या मनात सतत मीडियामधून पेरले गेले. त्यानंतर पाँझीने देशभरात आपल्या इन्व्हेस्टर्सचे जाळे उभे केले होते.

पाँझीने आपल्या नवीन इन्व्हेस्टरकडून आलेला पैसा घेऊन आपल्या जुन्या इन्व्हेस्टरचे रिटर्न दिले पण नवीन इन्व्हेस्टर्सना तो आपल्या पोस्टल कुपनच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमिशनमधून रिटर्न देणार होता हे कच्चे गणित नंतर अमेरिकेतील “वॉल स्ट्रीट जर्नल”चा संपादक “क्लेरंस बॅरन”च्या लक्षात आले.

त्याने या प्रकरणाची खोलात जाऊन माहिती घेतली. तेंव्हा अशी माहिती समोर आली की संपूर्ण जगभरात केवळ २७००० पोस्टल कुपन सर्क्युलेट झाले आहेत, त्यापेक्षा जास्त नाही, त्यामुळे या पोस्टल कुपनच्या जोरावर पाँझी आपल्या इन्व्हेस्टर्सना कबुल केलेले ५०% रिटर्न्स कधीही देऊ शकत नाही.

क्लेरंस बॅरनने जुलै १९२० मध्ये “बोस्टन डेली” या प्रसिद्ध पेपरमध्ये ही पोलखोल केली पण त्याहीवेळी लोक आजच्यासारखेच मूर्ख म्हणावे लागतील कारण अनेक लोकांनी उलट क्लेरंस बॅरनला डीफेमेशनसाठी दोषी ठरवले. परंतु ही पोस्ट योग्य ठिकाणी योग्य संदेश घेऊन गेली आणि पाँझीच्या ऑफिसवर रेग्युलेटरी ऑथोरीटीनी धाड टाकली तिथे त्यांना कसलाही पोस्टल कुपनचा साठा सापडला नाही.

त्यानंतर चक्र वेगाने फिरले. पोस्ट ऑफिस संबंधित प्रचंड मोठी फसवणूक केल्याबद्दल पाँझीवर खटला भरण्यात आला आणि त्यात त्याला साडे तीन वर्षांची शिक्षा ही झाली. ती शिक्षा भोगून बाहेर आल्यावर त्याच्यावर बोस्टन स्टेटने फसवलेल्या लाखो इन्व्हेस्टर्सच्या वतीने क्रिमिनल चार्जेस दाखल केले. त्यात त्याला पुन्हा ९ वर्षांची शिक्षा झाली. मात्र या केसमध्ये पाँझी जामिनावर बाहेर आला.

नंतर त्याने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात असाच स्कॅम सुरु केला. शेवटी त्याला पकडून सरकारने ९ वर्षे तुरुंगात ठेवले आणि त्यानंतर सरळ इटलीला नेऊन सोडले. त्याला अमेरिकेत पाय ठेवण्याची देखील बंदी घालण्यात आली. सगळा पैसा तर कधीच जप्त झाला होता.

शेवटी वयाच्या ६७व्या वर्षी पाँझी ब्राझीलच्या रिओ डी जानेरो’मध्ये हलाखीच्या अवस्थेत मरण पावला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पुण्यात त्याकाळी गोऱ्या साहेबासह भारतीयांना जेवण देणारं दोराबजी एकमेव रेस्टॉरंट होतं

Next Post

इतक्या वर्षांनी अचानक कॉंग्रेसला नरसिंहरावांची आठवण का येतेय…?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इतक्या वर्षांनी अचानक कॉंग्रेसला नरसिंहरावांची आठवण का येतेय...?

भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनमुळे सियाचीन आजही भारतात आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.