The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेटक : ऑनलाईन नाटक मराठी रंगभूमीवरील एक अभिनव प्रयोग

by सोमेश सहाने
14 August 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मोगरा या नेटकची अगदी थोडक्यात पण समर्पक समीक्षा संदीप बर्वे यांनी केली आहे. 31 जुलैला पुण्यातल्या रसिकांसाठी नेटकचा प्रयोग होता. प्रयोग संपल्यावर इतर अनेक विशेष उपस्थितांसह संदीप बर्वे त्यांचं मत मांडत होते. त्यांच्या मते, “नाटकाशी निगडित लोकं खूप चिवट असतात. दुसऱ्या महायुद्धात लंडनवर बॉम्ब पडत असतानाही तिथली नाट्यागृहे चालू होती. तेव्हा एका रसिकाला अनुभव विचारला असता तो म्हणाला की नाटक उत्तम होतं, फक्त मध्येमध्ये मोठे आवाज येत होते म्हणून डिस्टर्ब होत होतं”.

नेटकमधील निगडित कलाकारांनीही तो त्यांचा चिवटपणा चांगल्या अर्थाने सिद्ध करून दाखवला. बाहेर महायुद्धापेक्षा भीषण संकट असताना एक विरंगुळा नव्हे तर एक मनावर परिणाम करणारी खिळून ठेवणारी कलाकृती सादर करणं हे बॉम्ब हल्ल्यात नाटक सादर करण्याइतकं धाडसी काम नसलं तरी महत्वाचं आहे.

नेटकच्या दर्जाविषयी चर्चा होऊ शकेल पण हृषीकेश जोशी यांनी यानिमित्ताने एक नवीन कलाक्षेत्र, नव्या शक्यतांसह व्यवहारात आणलंय हे नक्की. जसं सिनेमा, मालिका, वेब सिरीजनंतर टीव्हीएफने युट्युब स्केचेस भारतीय बाजारात आणले. आणि आज त्यातल्या शक्यता आणि दर्जा झपाट्याने वाढताय.

नेटक म्हणजे नाटक क्षेत्राचं न्यू नॉर्मल. सगळं बंद असताना दर्दी प्रेक्षक जुने नाटकं वाचतायत, युट्युबवर बघतायत, अशात त्यांची “लाईव्ह” काहीतरी बघण्याची हौस नेटक व्यवस्थित पूर्ण करतं. 

एकदाच रेकॉर्ड करून अपलोड करण्यापेक्षा प्रत्येकवेळी लाईव्ह सादरीकरण केल्यामुळे यातला नाटकाचा भाग जास्तं जिवंत राहतो. नैपथ्य, अभिनय, ध्वनी, प्रकाश या सगळ्यांसोबतच “झूम ऍप” तंत्रज्ञानावर पकड हे नेटक करण्यासाठी लागणारं अजून एक कौशल्य.



सगळे झुमच्या लिंकवर ऑनलाइन असताना कुठेही काहीही बफर न होऊ देता, बदलणारे कॅमेरा अँगल, म्युजिक यातून अत्यंत एंगेजिंग अनुभव आपल्या वाट्याला येतो.

या मोगरामध्ये चार वेगवेगळया क्षेत्रातील आणि वयोगटातील महिला त्यांच्या वाट्याला फक्त त्या “स्त्री” आहेत म्हणून आलेल्या संघर्षाची कहाणी सांगतात. पण हे रडगाणं नाही. त्या त्यांच्या बेडरूममधून त्यांच्या स्वातंत्र्याच्या, आनंदाच्या क्षणाला सामोरे जाण्याच्या जस्ट आधी आरशात बघून जे स्वतःला सांगत असतील तेच आपण बघत असतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

यात ना त्या स्वतःचं दुःख सांगून सिपंथी घेतायत, ना संघर्षकथा सांगून टाळ्या मिळवतायत. त्या फक्त आयुष्याला मागे वळून बघतायत. उपदेश न देता फक्त आशा देतायत.

लेखक तेजस रानडेने हे लिहिताना मुख्य सीनभोवतीची परिस्थिती अशी काही जुळून आणली आहे की आपल्याला कुठेच भाषण ऐकल्यासारखं होत नाही. प्रत्येक प्रसंगासोबत पुढे काय झालं मग? अशी आतुरता तयार होईल असं लिखाण केल्यामुळं कथा खिळून ठेवते, एंगेज करते.

आपल्या घरी सोफ्यावर रेलून पडलेलेलो आपण आपसूकच उठून बसतो, लक्ष द्यायला भाग पाडेल असं सादरीकरण ही या प्रयोगाची जमेची बाजू.

खऱ्या आयुष्यात ज्या गोष्टी कधीच कुठली महिला स्पष्ट बोलून दाखवणार नाही त्या गोष्टी त्यातल्या गांभीर्यासकट खऱ्या वाटाव्यात एवढा दर्जेदार अभिनय भार्गवी चिरमुले, वंदना गुप्ते, स्पृहा जोशी, मयूरा रानडे आणि गौरी देशपांडे यांनी केलाय. 

मुळात मराठी नाटक आणि सिनेमा यातला अभिनयच मूळतः डायलॉगवर अवलंबून असतो. पण इथं कॅमेरा असल्याने अशाही बऱ्याच जागा तयार झाल्या ज्यात डायलॉगपेक्षा छोटे छोटे हावभाव जास्त प्रभावशील ठरतात.

“थप्पड” सिनेमात फायनली स्त्री प्रश्नाची खरी आणि रिलेटेबल बाजू प्रेक्षकांसमोर आली. सिनेमात 5 विवाहित स्त्रियांचा दुखवलेला स्वाभिमान आणि एका थप्पडनंतर त्यांच्या त्या अन्यायाबद्दल जिवंत झालेल्या जाणीवा यांचं एक कलात्मक सादारीकर आहे.

 “मोगरा”मध्ये त्याच्याही पुढे जाऊन त्यापेक्षा जास्त विषय त्याच संवेदनशीलतेने हाताळले आहेत. जो दुर्दैवी भूतकाळ बऱ्याचशा स्त्रियांच्या आयुष्याचा भाग असतो, जो पुरुषांना अगदीच नगण्य वाटतं, त्या भूतकाळाची कल्पना देणारा हा मोगरा, म्हणूनच पुरुषांनी आवर्जून बघावा. 

स्त्रियांनी यातून नवी प्रेरणा घ्यावी. एकदा गोष्टी बिघडल्या म्हणजे परत कधीच सुधारणार नाहीत या भीतीत कित्येक तरुणी अडकलेल्या असतात, मोगरा त्यांना होप्स देईल हे नक्की.

वऱ्हाड निघालंय लंडनला, बटाट्याची चाळ, नॉक नॉक सेलिब्रिटी असे एकपात्री नाट्यप्रयोग मराठी रंगभूमीला नवीन नाहीत. आमच्या पिढीने तरी लिजेंडरी नाटकं बटाट्याची चाळ आणि वऱ्हाड निघालं लंडनला हे युट्युबवरच बघितले आहेत. त्यामुळं आता हृषिकेश जोशींचं “मोगरा” हे मोनोलॉगचं नाटक जेव्हा ऑनलाइन बघावं लागतं तेव्हा त्याला “नेटक” असं वेगळं नाव देण्याची गरजही आमच्या पिढीला वाटत नाही.

हे नाटक युट्युबवर बघितल्यासारखंच आहे. विदेशातही त्यांचे प्रयोग हाऊसफुल्ल झालेत. 

यातून काही प्रमाणात काही लोकांसाठी उपजीविकेसाठीचं ही साधन तयार होतंय ही बाजूही महत्वाची आहेच.

यानिमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशी हिची मुलाखत आम्ही घेतली, ती “द पोस्टमन” या आमच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे. त्यात नेटक, अभिनय, मराठी सिनेमातली घराणेशाही, कविता याबद्दल बरीच चर्चा झाली.

यानंतर नेटकचा प्रयोग तुमच्या शहरात कधी होईल ते बघून ठेवा, आणि आवर्जून बघा!


या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या हिंदू राजाने पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंसाठी वेगळा पक्ष काढला होता

Next Post

भारतातला असह्य उन्हाळा थंडगार रसनाच्या दोन घोटांनी सुसह्य होतो

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भारतातला असह्य उन्हाळा थंडगार रसनाच्या दोन घोटांनी सुसह्य होतो

कॉम्रेड ज्योती बसू कम्युनिस्टांमुळेच पंतप्रधानपदाला मुकले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.