The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या कॅमेऱ्यामुळे फोटोस्टुडिओत न जाता फोटो काढायची सोय झाली होती

by द पोस्टमन टीम
25 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजच्या जमान्यात फोटो काढणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि प्रत्येक जण फोटोग्राफर बनलेला असतो. जेव्हापासून मोबाईलमध्ये कॅमेरा आला तेव्हापासून तर अनेक हौशी फोटोग्राफर जन्माला आले. मोबाईल कॅमेराने फोटोग्राफरची एक नवीन पिढी जन्माला घालण्याचं काम केलेले आहे.

आता फोनमध्ये कॅमेरा असल्यामुळे फोटो काढणे जितके सोपे वाटते तितके जुन्या जमान्यात फोटो काढायचा म्हटल्यावर त्याला किती सोपस्कार करावे लागत असत याची कल्पना नवीन पिढीला नाही.

आपण प्रत्येकाने आपल्या घरच्या अल्बममध्ये आपल्या आई-वडिलांचे जुने फोटो बघितले असतील. एक काळ असा होता जेव्हा फोटो हे फोटो स्टुडिओ मधूनच काढून मिळत असे.

फोटो काढायचा असेल तर अगोदरच घरातून सगळी तयारी करून जावे लागत असे शिवाय अनेक वर्षे काळ्यापांढर्‍या फोटोचीच चलती होती त्यात नंतर फोटोसाठी कलर प्रिंटचा ऑप्शन आला.

त्यामुळे स्टुडीओमधील कागदी चंद्रावर बसलेल्या किंवा रंगीत फुलदाणी समोर काढलेल्या फोटोपासून आजच्या मोबाईल फोनमधल्या सतराशे साठ मोबाईल ऍप्समध्ये बुडवून काढलेल्या फोटोपर्यंत कॅमेराचा इतिहास मोठा रंजक आहे.



कॅमेऱ्याचा शोध तर तसा १८८० सालामध्येच लागला. भारतामध्येही इंग्रजांच्या काळात
कॅमेऱ्याचे आगमन झाले. अर्थात त्या काळात फोटोग्राफी हा पूर्णवेळ व्यवसाय होता. लोकांना फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफरकडे जावे लागत असे. शिवाय फोटो चांगला येण्यासाठी डार्क रूममध्ये फोटो काढावे लागत असत.

कॅमेऱ्याचा शोध लागल्यापासून सुमारे १०० वर्षात त्याच्या स्वरुपात फारसे बदल झाले नाहीत. अगदी स्वातंत्र्योत्तर काळातही अवजड कॅमेरा, डार्करूम, सिंगल लेन्समधून येणारे फोटो, एकेका फोटोला लागणारा १५ दिवसांचा वेळ हे गणित फारसे बदलले नव्हते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

साधारणपणे ८०च्या दशकाच्या सुरुवातीला हातात घेऊन फिरता येतील एवढे कॅमेरे बाजारात यायला सुरुवात झाली. पण पूर्वी लग्नाचे फोटो काढायला लग्न लागल्यावर फोटोग्राफरच्या स्टुडीओमध्ये जावे लागायचे पण आता लग्न समारंभासाठी फोटोग्राफरलाच आपल्या घरी बोलावू लागली इतकाच काय तो फरक.

अर्थात असे कॅमेरेसुद्धा वजनाने आणि आकाराने मोठे असत. शिवाय यांच्या किमतीही खूप जास्त असल्यामुळे प्रोफेशनल फोटोग्राफर सोडले तर कोणी हे विकत वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नसे.

भारतात फोटोग्राफीच्या जगात खरी क्रांतीची लाट १९८५ नंतर आली जेंव्हा तळहातात मावणारा आणि अगदी सहजपणे कुठे नेता येणारा कमी वजनाचा, छोट्या आकाराचा कॅमेरा बाजारात विकायला आला.

कोनिका कंपनीने भारतात मिड ८० मध्ये “हॉट-शॉट कॅमेरा” या नावाने अगदी आजच्या मोबाईलच्या आकाराचाच कॅमेरा विकायला आणला. हॉट-शॉटने खऱ्या अर्थाने भारतीय फोटोग्राफीच्या विश्वात क्रांती आणली.

पुढे असे अनेक कॅमेरे कोनिका, कॅनन, कोडॅक, याशिका कंपनीने आणले पण या सर्वांचा पूर्वज म्हणजे हॉट-शॉट कॅमेरा.

हे कॅमेरे ८५मिमी बाय ४५मिमी बाय३९ मिमी इतके लहान आकाराचे होते. या कॅमेऱ्याचे वजन फक्त ३४ ग्रॅम इतके होते यावरून तुम्हाला हॉट- शॉट कॅमेऱ्याच्या रुपाची कल्पना येईलच. ८० च्या दशकात हा कॅमेरा ७५ रुपयात उपलब्ध होता.

हा कॅमेरा विकत घेणे याचा अर्थ होता तुम्हाला फोटो काढायला स्टुडीओमध्ये जायची गरज नाही, तुम्हाला पैसे देऊन फोटोग्राफरला आपल्या घरच्या कुठल्याही कार्यक्रमाला फोटो काढण्यासाठी बोलावण्याची गरज नाही.

तुमच्या कुठल्याही समारंभात आणि आउट डोअर कार्यक्रमात तुम्ही तुमचे फोटो काढू शकता. शिवाय यासाठी खास फोटोग्राफीचा कोर्स करण्याची किंवा फोटोग्राफी शिकण्याची देखील गरज नव्हती. थोडक्यात तुम्ही तुमचे फोटोग्राफर बनू शकत होतात.

आपल्या आयुष्यातील आठवणी साठवून ठेवण्याचे फोटो हे एक महत्वाचे माध्यम असते त्यामुळे जेंव्हा प्रत्येक माणसाच्या हातात त्याला हाताळण्याइतका छोटा कॅमेरा आल्यावर फोटोग्राफीची व्याख्याच बदलून गेली.

या हॉट- शॉट कॅमेऱ्याची जाहिरात देखील भन्नाट तयार करण्यात आली होती. तब्बल दीड मिनिटापेक्षा जास्त काळ टीव्हीवर चालणारी हि जाहिरात होती पण याचे जिंगल्स हिंदी न ठेवता पूर्णपणे इंग्रजी ठेवले गेले.

पाश्चात्य पद्धतीचे जॅझ संगीत या जाहिरातीला वापरले गेले. शिवाय जाहिरातीत वारंवार वापरला गेलेला कोड वर्ड होता “ऍटॅक” हा शब्द जाहिरातीमध्ये जे जे कँडीड क्लिक्स दाखवले गेले त्यांच्यासाठी वापरला गेला होता. या जाहिरातीच्या जिंगलची सुरुवात साधारणपणे अशा प्रकारची होती.

Attack… I am hotshot guy and play it cool… I pick up my camera and fun is my rule… I always get the snap but that deck attack!

या जाहिरातीत वेगवेगळ्या पार्टीमध्ये, लग्न समारंभांमध्ये, कार्यक्रमामध्ये लोक कसे हॉट शॉट कॅमेरा वापरून अगदी सहजपणे फोटो घेतात हे दाखवले गेले होते. या जाहिरातीची जिंगल भारतीय जाहिरातींच्या इतिहासातील सगळ्यात मोठी जिंगल असावी असे जाहिरात बघताना आपल्याला एकदा तरी वाटून जाते.

पुढे कॅमेऱ्याच्या फीचर्स विषयी सांगताना जिंगल कंटिन्यू केली जाते आणि आपल्याला पुढील शब्द ऐकू येतात-

It’s loaded with fun, its easy to shoot, just pick up a camera don’t give a hoot…

थोडक्यात हॉट- शॉट कॅमेरा म्हणजे ९० च्या दशकातील इन्स्टाग्राम होता. प्रत्येक कॉलेजवयीन मुला मुलीकडे तेव्हा हा कॅमेरा असायचा.

याच्यातील फोटो फार चांगले यायचे अशातला भाग नाही मात्र क्विक आणि हँडी असणारा तो एकमेव ऑप्शन होता त्यामुळे या कॅमेऱ्याची लोकप्रियता देखील तुफान होती. या कॅमेऱ्यात फोटो काढून त्याची फिल्म फोटोग्राफरच्या स्टुडीओमध्ये डेव्हलपिंगला देण्याची सोय होती. एका कॅमेरा रोलमध्ये साधारण ३६ फोटो काढून मिळायचे.

या कॅमेऱ्याची कॅचलाईन ठेवली गेली होती “हॉट-शॉट कॅमेरा – जस्ट एम अँड शूट”. या टॅगलाईन मधूनच आपल्याला कॅमेऱ्याची उपयुक्तता लक्षात येते.

अत्यंत प्रसन्न वातावरण, वेगवेगळे समारंभ, वेगवेगळे आयुष्यातील महत्वाचे प्रसंग, मित्र- मैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबरच्या भेटी गाठी आणि हे आनंदी क्षण टिपणारा हॉट- शॉट चा कॅमेरा अशी ही दीड मिनिटाची जाहिरात कुठेही कंटाळवाणी वाटत नाही.

यानंतर बऱ्याच कंपन्यांनी असे कॅमेरे विक्रीला आणले. कॅमेऱ्याच्या दर्जात, प्रिंट क्वालिटीमध्ये सुधारणा होत गेली. हळूहळू भारतात नंतर फोटो क्लिक केल्या केल्या प्रिंट मिळणारे पोलराईड कॅमेरे देखील आले. त्यानंतर सगळ्यात मोठी क्रांती आपल्या मोबाईल फोनमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याने घडवली. पण याची सुरुवात जिथून झाली तो हॉट शॉट कॅमेरा आज विस्मृतीत गेलेला आहे.

आजच्या घडीला उपलब्ध असणारी त्याची नितांत सुंदर जॅझ म्युझिकची जाहिरात फक्त त्याने त्या काळी घडवलेल्या इतिहासाची आपल्याला साक्ष देते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या अकरा वर्षाच्या फुटबाॅल प्लेअरचा ‘मेस्सी’सुद्धा फॅन आहे

Next Post

शिक्षणाच्या नावाखाली चीन जगभरातील विद्यापीठांमध्ये नवा साम्राज्यवाद आणतोय..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

शिक्षणाच्या नावाखाली चीन जगभरातील विद्यापीठांमध्ये नवा साम्राज्यवाद आणतोय..!

अजितदादांच्या बंडाचा या माणसाने तीन दिवस आधीच अचूक अंदाज बांधला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.