The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वास बसणार नाही पण आजच्या वापरातले हे शोध ‘लिओनार्दो-द-विंची’ने लावलेत..!

by Heramb
28 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सगळ्या प्राण्यांमध्ये मानवी शरीररचना अतिशय विशिष्ट पद्धतीची आहे. मानवी शरीरात मस्तक वर असते आणि सर्व प्राण्यांमध्ये ज्याप्रमाणे हत्तीची सोंड शक्तिशाली असते, वाघाचा जबडा शक्तिशाली असतो, त्याचप्रमाणे माणसाचे बुध्दिबल सर्वश्रेष्ठ असते. त्याच बुद्धिबलावर माणसाने आजवर अनेक शोध लावून प्रगती घडवून आणली. या प्रगतीमध्ये काही लोकांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. आजवरचा सगळ्यांत महत्वाचा, चाकाचा शोध कोणी लावला हे आपल्याला माहिती नाही.

पण आजही ज्यांचे संशोधनकार्य आपल्या उपयोगात येते असे अनेक शास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहेत. त्यापैकी काही प्रमुख शास्त्रज्ञ आर्किमिडीज, बेन्जामिन फ्रँकलिन, निकोला टेसला, आयजॅक न्यूटन, अल्बर्ट आईन्स्टाईन आणि लिओनार्दो-द-विंची.  लिओनार्दो-द-विंचीला आपण इतिहासातील सर्वात महान संशोधक म्हणू शकतो.

तत्कालीन तंत्रज्ञानावर लिओनार्दो-द-विंचीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. त्याच्या अनेक संशोधनांचे डिझाईन्स उपलब्ध आहेत, परंतु या संशोधनांमध्ये त्याचा रस कमी झाल्याने किंवा जास्त खर्चामुळे ते शोध प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. तरी लिओनार्दो-द-विंचीने लावलेले शोध काळाच्या पुढचे होते. आजमितीसही, जग या शोधांसाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. चला तर मग अशा काही महत्वाच्या शोधांवर एक नजर टाकूया.

१. पॅराशूट:

मानवी उड्डाणाच्या कल्पनेने झपाटलेल्या लिओनार्दो-द-विंचीने लोकांना हवेत तरंगता यावे यासाठी पॅराशूटची रचना केली. लिओनार्दो-द-विंचीने तयार केलेला पॅराशूट पिरॅमिडच्या आकाराचा होता. त्याने आपल्या वहीत लिहिल्याप्रमाणे पॅराशूटमुळे माणूस कितीही उंचीवरून उडी मारून कोणतीही शारीरिक इजा न होता सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकतो.

एकविसाव्या शतकात दा लिओनार्दो-द-विंचीचे डिझाइन्स साधनसामुग्रीच्या उपलब्धतेमुळे प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केले गेले, तेव्हा त्याच्या डिझाईनची कार्यक्षमता सिद्ध होऊ शकली.



यामुळे लिओनार्दो-द-विंचीला आपल्या संशोधनाबद्दल आणि अभ्यासाबद्दल किती आत्मविश्वास होता हे सिद्ध होते. त्याच्या कल्पना काळाच्या खूप पुढे असल्याने, तत्कालीन साधनसामुग्रीच्या मदतीने त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवता येणार नव्हत्या. तसेच या पॅराशूटचा आकार, वायुगतिकीय (एरोडायनॅमिक) दृष्टीकोनातून फारसा कार्यक्षम नव्हता.

२. द ऑर्निथोप्टर:

लिओनार्दो-द-विंचीला पक्ष्यांचे भरपूर आकर्षण होते. त्याने पक्ष्यांचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केला.  लिओनार्दो-द-विंचीने पक्षांच्या उड्डाणाचे डिझाईन तयार केले. हे डिझाईन म्हणजे ऑर्निथोप्टर.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या सैद्धांतिक ऑर्निथोप्टरच्या मदतीने मानवांना पक्ष्यांप्रमाणे हवेतून वर जाता येणार होते. लिओनार्दो-द-विंचीच्या पॅराशूटच्या मदतीने माणूस कोणतीही इजा न होता हवेतून उडी मारू शकणार होता. पण तरीही हवेत पाहिजे तसा प्रवास करणे अद्याप मानवाला शक्य नव्हते. ऑर्निथोप्टरमुळे माणसाला जमिनीच्या पातळीपासून हवेत भरारी घेणे शक्य होणार होते.

डिझाईनमध्ये हे मशीन कोणत्याही आधुनिक विमानापेक्षा एखाद्या पक्ष्यासारखे किंवा वटवाघळासारखे दिसते. हा शोध लिओनार्दो-द-विंचीला एरोडायनॅमिक्सबद्दलचे उत्तम ज्ञान असल्याचे सिद्ध करतो. पॅराशुटप्रमाणेच हे डिझाइनसुद्धा साधनसामुग्रीच्या कमतरतेमुळे प्रत्यक्षात आले नाही. या डिझाईनला इम्प्लिमेंट करण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री वजनाने फारच हलकी होती आणि एका माणसाचे वजन ऑर्निथोप्टरवर टिकून राहील अशी मजबूत सामग्री त्यावेळी उपलब्ध नव्हती.

३. मशीन गन:

लिओनार्दो-द-विंचीची सबमशीन गन, किंवा ‘३३ बॅरल-ऑर्गन’, आजसारखी अद्ययावत मशीन गन नव्हती. ही गन एकाच बॅरलमधून एका वेळी अनेक गोळ्या मारू शकत नव्हती. तरी अनेकांच्या मते, लिओनार्दो-द-विंचीची मशीन गन हे पहिले ऑटो-फायरिंग शस्त्र होते.

त्याच्या मशीन गनच्या डिझाईनमध्ये जेव्हा पहिल्यांदा ११ बॅरेलचा एक सेट पूर्ण फायर होईल तेव्हा दुसरा सेट त्याची जागा घेत असे आणि तोपर्यंत पहिला सेट रीलोड केला जात असे. यामुळे शत्रूवर होणारी फायरिंग थांबण्याचा प्रश्नच येत नसे.  लिओनार्दो-द-विंचीने ही सगळी किमया एका त्रिकोणी ब्लॉकवर केली होती.

लिओनार्दो-द-विंचीच्या नोंदवहीमध्ये त्याला यु*द्धाचा आणि असे जीवघेणे मशिन्स किंवा संकल्पना तयार करण्याचा तिरस्कार असल्याचे वारंवार समोर येते. पण तरीही त्याला उदरनिर्वाहासाठी पैशाची आवश्यकता होती आणि असे डिझाइन्स तयार करून राजाला किंवा एखाद्या श्रीमंताला किंवा स्थानिक शासकाला देणे हे पैसे कमावण्याच्या दृष्टीने सोपे होते.

४. ह्युमनॉइड रोबोट:

लिओनार्दो-द-विंचीचा रोबोटिक नाइट हा मानवाने तयार केलेला पहिला रोबो होता. लिओनार्दो-द-विंचीला मानवी शरीरशास्त्राने भुरळ घातली होती आणि मानवी शरीर कसे कार्य करते हे शोधण्यासाठी त्याने प्रेतावर अनेक प्रयोग केले. याच अभ्यासात त्याने आपला बराच वेळ व्यतीत केला. यामुळे त्याला स्नायू आणि हाडे कशी काम करतात हे समजले. हीच तत्त्वे कारला लागू करता येतील, असे त्याने तर्क केले.

याच ज्ञानाच्या मदतीने लिओनार्दो-द-विंचीने प्रत्यक्षात रोबोटिक नाइट तयार केल्यासारखे दिसते. हा रोबोटिक नाईट मुख्यतः श्रीमंत संरक्षक, लोडोविको स्फोर्झाच्या पार्ट्यांमध्ये मनोरंजनासाठी वापरला जात असे. लिओनार्दो-द-विंचीचा रोबोट फार काळ टिकला नाही आणि तो नेमका काय करण्यास सक्षम होता हे कोणालाही माहिती नाही.

परंतु तो चालू शकत होता, बसू शकत होता आणि त्याचा जबडा हलवू शकत होता असे दिसून येते. लिओनार्दो-द-विंचीने तयार केलेले रोबोटिक नाइटचे स्केचेस नंतर नासाने देखील वापरले होते.

५. डायव्हर सूट:

समुद्रात खोलवर जाणारे डायव्हर्स एक विशिष्ट पद्धतीचा सूट वापरतात हे आपल्याला माहितीच आहे, पण पहिल्यांदा त्याचा शोध लावला तो  लिओनार्दो-द-विंचीने. पंधराव्या शतकात व्हेनिसमध्ये राहत असताना,  लिओनार्दो-द-विंचीने आक्रमण करणाऱ्या जहाजांना पराभूत करण्यासाठी एक अतिशयोक्तीपूर्ण कल्पना शोधून काढली.

शत्रूच्या जहाजांना छिद्र पाडण्यासाठी त्याने पाण्यामध्ये माणसे पाठवावीत असे सांगितले आणि एक डाइव्ह सूट तयार करून बंदराच्या तळाशी काही माणसे पाठवली. लिओनार्दो-द-विंचीने हवेत तरंगणाऱ्या बेलशी जोडलेली श्वासोच्छ्वासाची नळी बांधली, अंडरवॉटर  असल्यावर गोष्टी पाहता याव्यात यासाठी डायव्हर्सच्या मास्कला जोडलेले काचेचे गॉगल घातले. 

लिओनार्दो-द-विंचीच्या या पाच मुख्य शोधांनी मानवाचे जीवन परिवर्तित केले आहे आणि यानंतर जगामध्ये मोठे बदल होण्यास सुरुवात झाली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

महाराष्ट्रातील या दोन बहिणींनी ४० मुलांचं अपहरण करून त्यांचा अमानुषपणे खू*न केला होता..!

Next Post

अनेकांना माहिती नाही, पण रशिया आणि अमेरिका यांच्यातही एक समोरासमोर लढाई झाली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अनेकांना माहिती नाही, पण रशिया आणि अमेरिका यांच्यातही एक समोरासमोर लढाई झाली होती

१९९६ वर्ल्डकप - रणतुंगा म्हणाला, 'आत्ताच फोटो काढू नका, उद्या ती ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.