The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या रात्रीची भीषणता आणि तुकाराम ओंबळेंचं साहस आपण कधीच विसरू शकणार नाहीत

by द पोस्टमन टीम
26 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


एक तप उलटून गेले तरी २६/११च्या ह*ल्ल्याचे व्रण आजही पुसले गेले नाहीत. २००८ साली झालेल्या या द*हश*तवादी ह*ल्ल्याने संपूर्ण मुंबई हादरून गेली होती. या ह*ल्यात १६० निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता तर, एटीएस पथक प्रमुखांसह पोलिस दलातील आणखी दोन अधिकाऱ्यांनी आपले प्राण गमावले.

संपूर्ण मुंबईला वेठीस धरणाऱ्या हा रात्रीच्या ह*ल्ल्याचा थरार ऐकल्यास आजही अंगावर काटा येतो. पाकिस्तातून आलेल्या दहा शस्त्रसज्ज द*हश*तवाद्यांनी अक्षरश: मुंबईत रक्ताचे पाट वाहिले. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि द*हश*तवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबा या संस्थांनी या द*हश*तवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. यातून नागरिकांचे रक्षण करताना भारतीय सशस्त्र दल आणि मुंबई पोलिसातील अनेक जणांना आपल्या प्राणांस मुकावे लागले.

वीर मरण आलेल्या या सर्वांमध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे देखील होते.

तुकाराम ओंबळे यांनी त्या दिवशी जे धाडस दाखवले आणि ज्या धैर्याने त्यांनी अजमल कसाबला जिवंत पकडून ठेवले ते पाहता त्याच्या शौर्याला आणि साहसाला तोडच नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अजमल कसाबने त्यांच्यावर एके-४७नी गोळ्या झाडल्या. छातीत गोळी लागली असूनही त्यांनी अजमलला त्याच्या रायफलसह ताकदीनिशी घट्ट पकडून ठेवले जेणेकरून त्याला हालचाल देखील करता येऊ नये.

तुकाराम ओंबळे यांच्या या धाडसामुळेच अजमल कसाबसारखा क्रू*र द*हश*तवादी मुंबई पोलिसांच्या हाताला लागू शकला. पुढे या ह*ल्ल्याचे सूत्रधार कोण आणि त्यांनी या ह*ल्ल्याचे कसे नियोजन केले हे अजमलच्या सुनावणीतून हळूहळू स्पष्ट झालेच.



२६/११च्या त्या रात्रीची भीषणता आणि तुकाराम ओंबळेंचे साहस या दोन्ही गोष्टी भारतीय जनता कधीच विसरू शकणार नाही.

२६ नोव्हेंबरची रात्र. रात्रीचे ९ वाजून २० मिनिट झाले होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

मुंबई नेहमीप्रमाणे धावपळीत व्यस्त होती. अचानक दक्षिण मुंबईच्या अनेक भागात द*हश*तवाद्यांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. अक्षरशः तासाभरात द*हश*तवाद्यांनी जवळपास १०० नागरिकांना गोळ्या घातल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दोन द*हश*तवाद्यांनी ह*ल्ला केला. सीएसएमटीवर झालेल्या अंधाधुंध गोळीबारात जवळपास ६० लोकांचा मृत्यू झाला होता. द*हश*तवादी अजमल कसाब आणि इस्माईल खान तब्बल अडीच तास सीएसएमटीवर गोळीबार करतच होते. संपूर्ण स्टेशन रक्ताने माखून गेले होते.

सीएसएमटीवर ह*ल्ला केल्यानंतर अजमल कसाब आपल्या साथीदारांसह कामा हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. कामा हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या एका पोलीस व्हॅनवर त्यांनी ह*ल्ला केला. या पोलीस व्हॅनमधील एटीएस प्रमुखांसह सहा पोलीस अधिकाऱ्यांची ह*त्या केली आणि पोलीस व्हॅनचे अपहरण केले.

रात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोलिसांची एक गाडी कामा हॉस्पिटलच्या रस्त्याने बाहेर पडली. द*हश*तवादी ह*ल्ल्याचे वार्तांकन करणाऱ्या प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपले.

परंतु, पोलीस व्हॅनचे अपहरण करून त्यात बसलेल्या द*हश*तवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. काही वेळापूर्वीच या द*हश*तवाद्यांनी पोलीस व्हॅनवर ह*ल्ला करून एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामठे आणि विजय साळसकर या अधिकाऱ्यांची ह*त्या केली आणि आता पोलीस व्हॅनमध्ये बसूनच ते पुन्हा मुंबईत अन्य ठिकाणी ह*ल्ले करण्यासाठी निघाले .

जवळच असलेल्या गिरगाव चौपाटीवर पोलीस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. त्याचवेळी ओबेरॉय हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ह*ल्ला झाल्याचे संदेश वायरलेसवर मिळत होते. गिरगाव चौपाटीवरील पोलिसांना कंट्रोल रूमद्वारे संदेश मिळला की द*हश*तवादी आता पोलीस व्हॅन सोडून एका स्कोडा गाडीमधून फिरत आहेत. ही गाडी सरळ उत्तरेच्या दिशेने धावत आहे. हा रस्ता सरळ गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात होता. जिथे आधीच पोलीस तैनात होते.

१२ वाजून ३० मिनिटांनी एक स्कोडा गाडी गिरगाव चौपाटीवर आली. पोलिसांना पाहून त्यांनी थोड्या अंतरावरच गाडी थांबवली. ही तीच गाडी होती ज्याबद्दल पोलिसांना आधीपासूनच सूचना मिळाल्या होत्या. गाडीच्या आतील दृश्ये पोलिसांना दिसू नये म्हणून ड्रायव्हरने वाईपर सुरु केले. पोलिसांनी थांबण्याची सूचना देताच त्यांनी गाडीला वळवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत गाडी डिव्हाइडरवर जाऊन आदळली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी आपल्या बंदुका गाडीवर रोखल्या आणि ते गाडीच्या समोरच्या दिशेला आले. तेव्हा द*हश*तवाद्यांनी गोळीबार सुरु केला. पोलिसांच्या गोळीबारात गाडी चालवत असलेला द*हश*तवादी मेला. त्याच्या शेजारचा द*हश*तवादी देखील जखमी झाला होता. दोन्हीकडून सुरु असलेला गोळीबार थांबल्यानंतर एक विचित्र शांतता वातावरणात पसरून राहिली.

आत बसलेले सगळेच द*हश*तवादी मेले की जिवंत आहेत हे पाहण्यासाठी सब-इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे यांनी गाडीचा दरवाजा उघडला. त्यांच्या मागे अजून काही पोलीस होते. त्यांच्या हातात कोणतेही ह*त्यार नव्हते, फक्त काठी होती.

गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताच आत बसलेल्या द*हश*तवाद्याने आपल्या एके-४७मधून तुकाराम ओंबळे यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. गोळी छातीत घुसली असतानाही तुकाराम ओंबळे यांनी अजमलच्या रायफलची नोझल हातात दाबून धरली.

अजमल त्यांच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करत होता. पण तुकाराम ओंबळे यांची पकड इतकी घट्ट होती की तो हलू शकला नाही. सोबतच्या पोलिसांनी अजमलला पकडले आणि त्याला गाडीतून बाहेर खेचले. पोलिसांनी अजमलला ताब्यात घेईपर्यंत सब-इन्स्पेक्टर तुकाराम ओंबळे यांना पाच गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

तीन तासाच्या थरारक पाठलागानंतर लीयोपोल्ड कॅफे परिसरात एका द*हश*तवाद्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले होते. या ह*ल्ल्यानंतर मुंबई तीन दिवस थिजून गेली होती. ह*ल्ल्यात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. १० दह*शत*वाद्यांपैकी ९ द*हश*तवादी मारले गेले होते.

या ह*ल्ल्यात जिवंत पकडलेल्या अजमल कसाबवर आयपीसीनुसार खटला सुरु झाला. ३ मे, २०१० रोजी त्याला विशेष न्यायालयाने भारता विरोधात षडयंत्र रचणे आणि यु*द्ध घोषित करणे, असे ८० आरोप लावण्यात आले.

६ मे २०१० रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

२१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये अजमल कसाबला सकाळी ७.३० वाजता फाशीवर लटकवण्यात आले. तुकाराम ओंबळे यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. शहीद तुकाराम ओंबळेंनी दाखवलेल्या अतुलनीय सहसाबद्दल त्यांना भारत सरकारद्वारे अशोक चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अजमलच्या हातात जाणून बुजून कलावा बांधण्यात आला होता, जर तो मारला गेला असता तर मीडियाने त्याला “हिंदू द*हश*तवादी” म्हणून घोषित केले असते.

गिरगाव चौपाटीजवळील तुकाराम ओंबळे यांचे स्मारक

ज्या ठिकाणी अजमल कसाबला नि:शस्त्र तुकाराम ओंबळे यांनी जिवंत पकडले होते, त्याच ठिकाणी त्यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. त्यांच्या साहस शौर्य आणि त्यागातून आज अनेकांना संकटांचा मुकाबला करण्याची प्रेरणा मिळत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपल्याला माहितही नसलेल्या या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव नासाने चंद्रावरील क्रेटरला दिलंय

Next Post

डॉक्टर कोटणीसांचे उपकार चीनी सैनिक आजही विसरले नसतील

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

डॉक्टर कोटणीसांचे उपकार चीनी सैनिक आजही विसरले नसतील

ब्रिटनच्या सरदार घराण्यात जन्मलेल्या 'मीराबेन'चा भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात सक्रीय सहभाग होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.