The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या महायु*द्धात सैनिकांना मोफत वाटप करून झिप्पो लायटरने आपला ब्रँड जगभर पोहचवला होता !

by द पोस्टमन टीम
1 February 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


एखादा व्यवसाय जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतो तेंव्हा सगळ्यांना त्याबद्दल कौतुक वाटते. पण, त्या व्यवसायाला ही उंची गाठण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल हे मात्र कोणाला दिसत नाही. आज अमेरिकेतील १०० पैकी ९८ लोकांना झिप्पो लायटरबद्दल इत्थंभूत माहिती आहे.

एखाद्या ब्रँडला किती प्रसिद्धी मिळू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पण झिप्पोला हे यश एका रात्रीत मिळालेले नाही. गेली ८५ वर्षे कंपनीने आपला दर्जा सांभाळल्यानेच हे यश मिळवणे शक्य झाले आहे. जॉर्ज जी. ब्लेसडेल यांनी आपल्या ग्राहकांची गरज ओळखून सगळ्याच बाजूनी आपले उत्पादन चांगले कसे होईल याकडे सतत लक्ष दिले. म्हणूनच झिप्पो लायटरला आज जगभरात नावाजले जाते. जॉर्ज जी. यांनी वाईंडप्रुफ लायटरची काढलेली कल्पना अमेरिकेत तरी बरीच लोकप्रिय ठरली.

ब्लेसडेल एकदा पेनिसिल्व्हानियाच्या ब्रॅडफोर्ड येथील कंट्री क्लबमध्ये गेले असता त्यांच्या मित्राच्या हातात ऑस्ट्रेलियन बनावटीचे लायटर बघून त्यांना आश्चर्य वाटले. तेंव्हाच त्यांना अशाच प्रकारचे लायटर बनवण्याचा निर्णय घेतला. १९३३ साली त्यांनी झिप्पो लायटरच्या निर्मितीला सुरुवात केली.

अगदी सुरुवातीपासूनच झिप्पोच्या प्रत्येक लायटरचा दर्जा सर्वोत्कृष्ट असेल याकडे लक्ष दिले. सुरुवातीच्या झिप्पो लायटरची किंमत होती $१.९५, परंतु आजवर एकाही ग्राहकावर झिप्पोची दुरुस्ती करण्याची वेळ आलेली नाही. एकदा लायटर विकत घेतला की त्यावर कोणताही खर्च करायला नको, हीच ब्लेसडेल यांची खासियत.

ब्लेसडेल हे प्रखर राष्ट्रभक्त असल्याने दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात त्यांनी उत्पादित केलेले सर्वच झिप्पो लायटर फक्त सैन्यासाठीच देण्याचे ठरवले. यादरम्यान काही काळ लायटर उत्पादनही थांबवले. याच काळात त्यांना स्टील केस असलेला लायटर बनवला. अनेक अमेरिकन सैनिकांनी यु*द्धभूमीवर हेच लायटर वापरण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे आपोआपच सैनिकांची या लायटरशी भावनिक नाळ जोडली गेली. ज्या ज्या यु*द्धभूमीवर अमेरिकन सैनिक लढले तिथे तिथे झिप्पो हा एक अमेरिकन लायटर ब्रँड म्हणून प्रसिद्ध झाला.



यु*द्धाचा ज्वर ओसरल्यानंतर शांततेच्या काळात ब्लेसडेल यांनी खऱ्या अर्थाने आर्थिक प्रगती साधली. याकाळात अमेरिकन अर्थव्यवस्थेनेही मोठी झेप घेतली. झिप्पो लायटरचा खप वाढला. १९४७ साली झिप्पो कारची कल्पना अस्तित्वात आली. ओंटारिओमधील नायगारा फॉल्सजवळच याचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. याच काळात ते प्रत्येक झिप्पो लायटरवर त्याची उत्पादन केल्याची तारीखही टाकू लागले. त्यामुळे झिप्पो लायटरचा संग्रह करणाऱ्यांना याचा खूप फायदा होत आला आहे.

नंतर १९५६ मध्ये झिप्पोने महिलांसाठी म्हणून पातळ म्हणजे ज्याची जाडी कमी असेल असे विंड प्रुफ लायटर बाजारात आणले. यामुळे तर अमेरिकेतील महिला आणि पुरुष सगळ्यांचाच हा आवडता ब्रँड बनला. यु*द्धकाळात त्यांची एक जी प्रतिमा बनली होती त्यातून बाहेर पडण्यास वाव मिळाला. प्रत्येक अमेरिकन लोकांच्या हातातच नाही तर हृदयातही या ब्रँडने स्थान मिळवले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

याच वर्षात त्यांनी आणखी काही पूरक उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. जसे की स्टीलचा छोटा पॉकेट टेप, किचेन, छोटे चाकू, आणि छोटी पॉकेट साइज बॅटरी. अशा प्रकारे त्यांनी आपल्या उत्पादनांची व्याप्ती वाढवली.

ब्लेसडेल यांच्या निधनानंतरही त्याच्या दोन मुलींनी हॅरिएट बी. विक आणि साराह बी. डॉर्न दोघींनी हा व्यवसाय समर्थपणे सांभाळला.

७० आणि ८० दशकात या उत्पादनाने परकीय बाजारपेठा देखील काबीज केल्या. जागतिकीकरणाच्या लाटेत हा ब्रँड तब्बल १६० देशांत पोहोचला.

ब्लेसडेल कुटुंबाने झिप्पोच्या प्रगतीची घौडदौड सुरूच ठेवली. ब्लेसडेल यांच्या निधनानंतर या कंपनीने आपल्या उत्पादनांची व्याप्ती आणखी वाढवली. लायटर सोबत त्यांनी आता सिगारेट केस आणि पॉकेट चाकूचा दर्जा सुधारण्यावर भर दिला.

जाहिरातीमुळे या ब्रँडने आणखी उंची गाठली. प्रसार माध्यमे आणि टीव्हीवर झळकणाऱ्या जाहिरातींनी अक्षरश: अनेकांवर मोहिनी घातली. २००० पेक्षा जास्त चित्रपटांत झिप्पो लायटर झळकला. अनेक टी.व्ही. शोजमधील प्रसिद्ध पात्रांनी हा लायटर वापरला. थिएटर असो की स्क्रीनवर झळकणारा कंटेंट झिप्पोने त्यातही स्थान निर्माण केले. ‘आय लव्ह ल्युसी’ आणि ‘द एक्स-मेन’सारख्या चित्रपटांत एखाद्या पात्राचे वैशिष्ट्य दाखवण्यासाठी म्हणूनही झिप्पोचा लायटर दाखवण्यात आला.

एखाद्या संगीत कार्यक्रमात गायकांबद्दल सन्मान व्यक्त करण्यासाठी म्हणूनही झिप्पो लायटर उंचावला जाई. अनेक अल्बमच्या कव्हरवर झिप्पो लायटरची पेटलेली ज्योत दखवली जाते.

आजच्या घडीला तर झिप्पोच्या चाहत्यांची संख्या अब्जावधीच्या घरात आहे. झिप्पो लायटरचा संग्रह करणाऱ्या लोकांचा आकडा तर चार दशलक्षपेक्षा पुढचा आहे. युट्युबवर तुम्हाला झिप्पोशी संबंधित ३४,००० व्हिडीओ सापडतील. झिप्पोच्या सोशल मिडीयावरील कोट्यावधी फॉलोअर्स आहेत.

झिप्पोचे स्वतःचे मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ज्याचे १.८ करोड वापरकर्ते आहेत.

झिप्पोच्या सुरुवातीच्या उत्पादन युनिटच्या शेजारीच झिप्पोने स्वतःचे रिपेअर युनिट आणि म्युझियम सुरु केले आहे. दरवर्षी या म्युझियमला भेट देण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक इथे येतात.

आजही झिप्पो लायटरचा प्रत्येक नग कारखान्यातून बाहेर पडण्यापूर्वी हाताने तपासूनच पुढे पाठवला जातो. इतक्या वर्षांनंतरही या अमेरिकन ब्रँडने आपला दर्जा राखला आहे. आजही झिप्पोच्या विक्रीत आणि लोकप्रियतेत किंचितही कमतरता जाणवलेली नाही. ब्लेसडेलने अनेक वर्षांपूर्वी आपल्या लायटरसाठी जी डिझाईन आणि आकार ठरवला होता, आजही झिप्पो त्याच रुपात पाहायला मिळतो. झिप्पोने आपल्या उत्पादनांची व्याप्ती वाढवली असली तरी, त्याच्या दर्जात कुठलीही तडजोड केलेली नाही.

त्याच्या ८५व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी लेझर डिझाईन असलेला लायटर बाजारात आणला. लेझर तंत्रज्ञान नवीन असले तरी या नव्या तंत्रज्ञानासह निर्माण केलेल्या लायटरचे रूप मात्र जुनेच आहे.

झिप्पो उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेनेच झेपावत आहे. एका साध्या क्लबमध्ये सिगारेट पिता पिता या व्यवसायाची कल्पना सुचली. तोच व्यवसाय आज जगभरात आपले नाव कमावत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: WWIIZippo Lighter
ShareTweet
Previous Post

१९७१ च्या यु*द्धात भारताने पाकिस्तानला हरवले म्हणून कंपनीने स्कुटरचे ‘विजय सुपर’ नाव ठेवले होते

Next Post

बंगाली लोकांनी सुरु केलेली सत्यनारायणाची पूजा महाराष्ट्रात लोकप्रिय कशी झाली ?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

बंगाली लोकांनी सुरु केलेली सत्यनारायणाची पूजा महाराष्ट्रात लोकप्रिय कशी झाली ?

८०० विमानांनी एकत्रितपणे बॉ*म्बह*ल्ला करून जर्मनीचं एक अख्ख शहर बेचिराख केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.