The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा भारतीय माणूस बनलाय चीनचा रामदेव बाबा !

by द पोस्टमन टीम
20 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतात उगम पावलेली योगविद्या सध्या जगभरात लोकप्रिय झाली असून अनेक लोक आपल्याला शरीराला फिट ठेवण्यासाठी योगा व प्राणायम करत असतात. जगभरात योगाला प्रोत्साहन मिळावे म्हणून संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून पाळण्याची घोषणा देखील केली आहे. भारताचे प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा यांनी जगभरात आपल्या योगाचा प्रचार व प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्याप्रमाणेच एका भारतीय योगगुरूने चीनमध्ये योगाचा प्रचार व प्रसार करण्यास सुरुवात केली आहे.

मूळचे उत्तरखंडचे निवासी असलेले मनमोहन भंडारी हे चीनमध्ये योगगुरू म्हणून प्रसिद्ध झाले असून त्यांच्या योगा केंद्राच्या चीनच्या वेगवेगळ्या भागात ५० हून अधिक शाखांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

लोक भंडारी यांना चीनचे रामदेवबाबा म्हणूनच ओळखतात. भंडारी यांनी योगाच्या साधनेचे एका बिझनेस मॉडेलमध्ये रूपांतर केले असून चीनच्या विविध भागात त्यांनी आपल्या योगा सेंटर्सच्या माध्यमातून हजारो लोकांना योगाचे धडे शिकवायला सुरुवात केली आहे.

भंडारी २००३ मध्ये चीनमध्ये गेले आणि त्यांनी तिथल्या लोकांना योगाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली त्यावेळी चीनमधील लोकांना योगाविषयी माहिती नव्हती. भंडारींच्या आधी अमेरिकन व युरोपियन ट्रेनर्स चीनमध्ये योग साधना शिकवायचे, यामुळे बहुतांश चिनी नागरिकांना असे वाटायचे की योगाचा शोध अमेरिकेत लावला गेला!

भंडारी यांचे चीनमध्ये वास्तव्य करणे हे योगाच्या प्रसाराच्या दृष्टीने फार हितकारक ठरले होते. भंडारी यांची पत्नी यिन यान ही एका आंतरराष्ट्रीय फॅशन साप्ताहिकाची संपादक होती. यिन यांना योगाचे शिक्षण घ्यायचे होते यासाठी त्या ऋषिकेशजवळील अय्यंगर स्वामींच्या मठात आल्या होत्या. याठिकाणीच त्यांची मनमोहन भंडारी यांच्याशी गाठ पडली व दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मनमोहन भंडारी यांनी त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच उंची मिळवून दिली. यिन यांना फक्त अध्यात्मिक नव्हे तर जीवन प्रवासासाठी एक साथीदार मिळाला.



यिन आपल्या पतीला घेऊन जेव्हा चीनमध्ये परतल्या आणि त्यांनी तिथे देशातील सगळ्यात मोठी योग अकॅडमी सुरू केली. आठ वर्षात या अकॅडमीतून या दांपत्याने ४० लाख अमेरिकन डॉलर्सची कमाई केली होती.

दिवसेंदिवस योग हा प्रकार लोकप्रिय होत गेल्याने या अकॅडमीच्या अनेक शाखा निर्माण करण्यात आल्या व त्यांचा चीनमध्ये सर्वदूर विस्तार करण्यात आला. मोठ्या संख्येने चिनी नागरिक या शाखांमध्ये जाऊन योग प्रशिक्षण घेतात.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या अकॅडमीला चीनच्या क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. चीनच्या बीजिंग, शांघाय, गुआंगझाऊ इत्यादी प्रमुख शहरांत या योगा अकॅडमीच्या शाखा आहेत. या अकॅडमीचे फ्रांचायझी युनिट्स देखील चीनमध्ये पसरले आहेत.

मनमोहन भंडारी हे योगा अकॅडमीचे अध्यात्मिक प्रमुख असून त्यांची पत्नी यिन ही या अकॅडमीच्या बिझनेस संबंधित गोष्टींवर लक्ष देण्याचे काम पाहते. वर्ष २०११ पर्यंत चीनमध्ये योगा अकॅडमीचे ५७ केंद्र उघडण्यात या दांपत्याला यश आले आहे.

भंडारी चीनमधील आपल्या योग अकॅडमीमधील विविध केंद्रावर चिनी लोकांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देतात. ते गायत्री मंत्राच्या बरोबरीने ध्यान योगाच्या सत्राचे देखील आयोजन करतात. संयुक्त राष्ट्र संघाकडून ज्यावेळी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती, त्यावेळी चीनमध्ये योग करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली होती.

भंडारींच्या योग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घ्यायला येणाऱ्या लोकांमध्ये बहुतांश लोक पत्रकार, लेखक, बिझनेसमॅन आणि विद्यार्थी आहेत. योग हा प्रकार गेल्या काही वर्षात चीनमध्ये फार लोकप्रिय झाला आहे. सामाजिक, आर्थिक व भौतिक रचनेत घडत गेलेल्या बदलांमुळे योगासनांकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. चीनमधील उच्च मध्यमवर्गीय तसेच मध्यमवर्गीय लोकांमध्ये योगसाधना लोकप्रिय होताना आढळते आहे.

या योग अकॅडमीत हजारो योग टिचर्सला प्रशिक्षण देण्यात येते. इथे योगविषयक अनेक पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे. भंडारी यांच्याप्रमाणेच भारतातून, खासकरून ऋषिकेशमधून, अनेक प्रशिक्षक चीनमध्ये या अकॅडमीत काम करायला गेले आहेत. योगा अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्यांना ऋषिकेशला आणून स्पेशल ट्रेनिंग देण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

मनमोहन भंडारी हे चीनमध्ये लोकप्रिय आहेत. व्यावसायिकदृष्ट्या स्थिरता आल्याने त्यांनी आता ध्यान योगाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

भंडारी चिनी लोकांना योगच नव्हे तर योगाशी निगडित असंख्य गोष्टींविषयक मार्गदर्शन करत असतात. दिवसेंदिवस त्यांची चीनमधील लोकप्रियता वाढतच चालली आहे. मनमोहन भंडारी आपल्या चिनी विद्यार्थ्यांना त्याच योगसाधनेची दीक्षा देतात, जे ती ऋषिकेश येथे शिकले आहेत.

काही दिवसांपूर्वी भारताचे प्रसिद्ध योगगुरू बी. के. एस. अय्यंगार यांनी चीनमधील भंडारी यांच्या अकॅडमीचा दौरा केला होता. या अकॅडमीमधील चिनी नागरिकांचा सहभाग बघून ते भारावून गेले होते. भंडारी हे अय्यंगर यांचेच शिष्य आहेत. त्यांच्याच ऋषिकेश येथील आश्रमात त्यांनी अध्यात्म व योगाचे धडे गिरवले आहेत.

भंडारी यांना चीनमध्ये स्थायिक होऊन बराच काळ लोटला असला तरी ते दरवर्षी एकदा तरी भारतात येण्यासाठी उत्सुक असतात. चीनच्या योगा इंडस्ट्री डेव्हलपमेंटच्या रिपोर्टनुसार चीनमध्ये २०१७ साली, १०८०० योग प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहेत, यात मनमोहन भंडारी यांचा मोठा वाटा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भटकंती – पुण्याजवळच्या या मंदिरातल्या भिंतींवर रामायण, महाभारत कोरलंय

Next Post

मुस्लिम शासकांनी भारतीय संगीताला राजाश्रय देऊन भरभराटीला आणले

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मुस्लिम शासकांनी भारतीय संगीताला राजाश्रय देऊन भरभराटीला आणले

ब्राऊन एग्ज पौष्टिक असतात म्हणून जास्त पैसे खर्च करताय, तर हे वाचाच..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.