The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्राचीन काळी पर्शियन लोकांनी वाळवंटात विजेशिवाय चालणारे रेफ्रिजरेटर बनवले होते

by द पोस्टमन टीम
26 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पूर्वी गाव-खेड्यांमध्ये मातीची घरं असायची. काही ठिकाणी आजही अशी घरं आहेत. वरती शेतातील धान्याच्या पाचरटाचं छप्पर, खाली मातीच्या कच्च्या विटा आणि मातीचंच प्लास्टर असलेल्या भिंती असलेली ही घरं असतात. या घरांचं एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे, अशा घरांमध्ये हिवाळ्यात जास्त थंडी वाजत नाही आणि उन्हाळ्यात जास्त गरम होत नाही! हो.., ही गोष्ट नक्की आश्चर्याची आहे मात्र, एकदम खरी आहे.

या घरांमध्ये उन्हाळ्यात ना एसी लागतो ना हिवाळ्यात हिटर. प्राचीन काळी जगातील विविध ठिकाणी अशी घरं अस्तित्वात होती. या घरांव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींची निर्मिती आपल्या पूर्वजांनी केली होती. अशा गोष्टींमध्ये पर्शियन लोकांनी शोधलेल्या रेफ्रिजरेटरचा समावेश होतो. पर्शियन लोकांनी इसवी सन पूर्व ४०० वर्षांपूर्वीच एका अशा रेफ्रिजरेटरचा शोध लावला होता जे विजेशिवाय चालत होतं. इराणमध्ये अशी रेफ्रिजरेटर्स आढळली आहेत. या नॅचरल फ्रीजची रचना कशी आहे आणि त्यांचा वापर कशा प्रकारे केला जाई, याबाबत आपण माहिती घेऊया..

सध्या भाजीपाला आणि लवकर खराब होणारे खाद्यपदार्थ साठवण्यासाठी फ्रिजरचा वापर केला जातो. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीमाल साठवण्यासाठी शीतगृहांचाही वापर होतो. मात्र, प्राचीन काळी अत्याधुनिक सुविधा आणि उपकरणे अस्तित्त्वात नव्हती. अन्न-धान्य साठवण्याची गरज तर तेव्हाही होती.

प्राचीन लोकांनी इसवी सनपूर्व १००० पर्यंत बर्फाची साठवणूक केल्याचे लिखित पुरावे आढळलेले आहेत. प्राचीन चिनी, ज्यू, ग्रीक आणि रोमन साहित्यामध्ये बर्फाच्या साठवणूकीचे संदर्भ आहेत. ज्याठिकाणी नैसर्गिक बर्फ पडत होता, तेथील लोक तो बर्फ साठवू शकत होते. मात्र, वाळवंटामध्ये आणि उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना बर्फाची साठवणूक करणं शक्य नव्हतं.



बर्फाला पर्याय म्हणून साधारण इसवीसन पूर्व ४०० मध्ये पर्शियन लोकांनी अशा एका रेफ्रिजरेटरचा शोध लावला ज्यामुळं त्यांना चक्क वर्षभर बर्फ साठवणं शक्य झालं. या फ्रिजला ते लोक ‘याक्चल’ या नावानं ओळखत असत. याक्चल हा पर्शियन शब्द असून ‘याक’ आणि ‘चाल’ या दोन शब्दांची संधी होऊन तो तयार झाला आहे. ‘याक’ म्हणजे बर्फ आणि ‘चाल’ म्हणजे खड्डा, असा त्यांचा अर्थ होतो.

याक्चलची रचना दोन भागात विभागलेली असते. त्याचा अर्धाभाग जमिनीच्यावरती असतो तर अर्धाभाग जमिनीच्या खाली. जमिनीखालच्या भागात स्टोरेज स्पेज असते. त्याठिकाणी नाशवंत गोष्टी साठवता येतात. पृष्ठभागाच्या वरती १८ मीटरपर्यंत याक्चलची उंची वाढवता येते. आपण दुरून पाहिल्यास याक्चल मातीच्या घुमटासारखे दिसतात.

याक्चलच्या आकारमानाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ते एखाद्या गोदामापेक्षा नक्कीच कमी नव्हते. एका याक्चलमध्ये साधारण ५ हजार घनमीटर क्षमतेपर्यंत साठवण करता येत होती. पाणी थंड करण्यासाठी, भाज्या आणि फळांसारख्या नाशवंत वस्तू साठवण्यासाठी त्याचा वापर होत असे. विशेष म्हणजे याक्चलमध्ये पाणी ठेवल्यानंतर आतील कमालीच्या कमी तापमानामुळं त्याचं बर्फात देखील रुपांतर होत असे. कुठल्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाशिवाय याक्चल इतकं प्रभावीपणे कार्य कसं करत होतं, असा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिक आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

याक्चल, वाळवंटातील उष्ण वातावरणात देखील प्रभावी ठरण्याचं गुपित त्याच्या रचनेमध्ये आहे. त्याची रचना वायुगतिकीशास्त्रावर (एअरोडायनॅमिक्स) आधारित होती. शंकू आकाराच्या याक्चलच्या वरच्या बाजूला छिद्र ठेवलं जाई. या छिद्रामुळे थंड हवेला आतमध्ये प्रवेश करता येत होता. जसजशी थंड हवा आतमध्ये प्रवेश करे तसतशी आतील उष्ण हवा वरच्या बाजूला ढकलली जावून बाहेर पडत असे. आतील सर्व गरम हवा बाहेर पडल्यानंतर आतमध्ये कमालीचं थंड वातावरण निर्माण होत असे.

याक्चलच्या बांधकामासाठी वापरलं जाणारं साहित्यसुद्धा अनोखं होतं. या ‘डेझर्ट कूलर’च्या भिंती इन्सुलेट मटेरियलच्या बनलेल्या होत्या. बांधकामासाठी ‘सरूज’ नावाचा पारंपारिक गिलावा वापरला जात असे. इराणमधील बहुतांशी प्राचीन बांधकामांमध्ये हा गिलावा प्रामुख्यानं आढळतो. ठराविक प्रमाणात चिकणमाती, वाळू, चुना, अंड्यातील पांढरा भाग, राख आणि बकरीचे केस यांचं मिश्रण करून ‘सरूज’ तयार केला जातो. काही याक्चलमध्ये हवा खेळती राहण्यासाठी विंड कॅचिंग टॉवर वापरले गेले होते.

जमिनीखालील साठवणीची जागा दोन मीटर जाडीच्या भिंतींनी वेढलेली असे. शक्य असल्यास हिवाळ्यात लोक जवळपासच्या पर्वतांवरून बर्फ गोळा करत आणि तो याक्चलमध्ये आणून ठेवत. बर्फ उपलब्ध होण शक्य नसल्यास जवळच्या पाण्याच्या डबक्यांतून पाण्याचा प्रवाह याक्चलमध्ये सोडण्याची सोय केली जाई. रात्री याक्चलमधील वातावरण कमालीचं थंड झालं की, या पाण्याचं रुपांतर बर्फात होत असे. यामुळं याक्चलची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरली.

याक्चलची रचना आणि भव्यता पाहता प्रत्येकाला आपल्यासाठी स्वतंत्र याक्चलची निर्मिती करणं शक्य नव्हतं. राजांच्या आर्थिक सहकार्यातून सामुहिकपणे याक्चलची निर्मिती केली जाई. त्यामध्ये राजघराण्यांच्या वस्तूंसोबत सामान्य जनतेच्या देखील वस्तू ठेवल्या जात असत. पुढे काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं याक्चलचं महत्त्व कमी होतं गेलं. पारंपरिक याक्चलची जागा आधुनिक आणि स्वस्त रेफ्रिजरेटर्सनी घेतली.

याक्चलच्या तुलनेत घरगुती रेफ्रिजरेटर्समधील खाद्यपदार्थ जास्त सुरक्षित आणि फ्रेश राहतात. मात्र, त्याकाळचे काही याक्चल इतक्या चांगल्या प्रकारे बांधले गेले होते की त्यापैकी काही रचना आजही उभ्या आहेत. इराणमधील केरमन प्रांताची राजधानी केरमान येथे एक याक्चल आहे. त्याची उंची सुमारे अठरा मीटर आहे. एकेकाळी खाद्यपदार्थ साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या याक्चलला पाहण्यासाठी आणि त्याच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी अनेक लोक केरमान प्रांताला भेट देतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाला मारून ब्रिटिशांनी कलकत्त्याच्या ब्लॅक होलचा बदला घेतला

Next Post

संधी मिळत नाही म्हणून निराश होताय..? मग क्रिकेटर प्रवीण तांबेंची ही गोष्ट वाचाच..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

संधी मिळत नाही म्हणून निराश होताय..? मग क्रिकेटर प्रवीण तांबेंची ही गोष्ट वाचाच..!

भारतीय महिलांचं दुसऱ्या महायु*द्धातलं योगदान आपल्या पूर्णपणे विस्मरणात गेलं आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.