The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मालगुडी डेज’ने आर के नारायणांना जगभरात प्रसिद्ध केले..

by द पोस्टमन टीम
10 October 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


८० च्या दशकात शंकर नाग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मालगुडी डेज‘ या मालिकेने असंख्य लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. ही मालिका प्रसिद्ध साहित्यिक आर. के. नारायण यांच्या १९४३ साली प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मालगुडी डेज’ या लघुकथा संग्रहावर आधारित होती.

मालगुडी डेज ही लेखक आर. के. नारायण यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मालगुडी नावाच्या काल्पनिक शहरात राहणाऱ्या लोकांची कथा आहे. या कथेत इतक्या सुंदर रीतीने वर्णन करण्यात आले आहे की, लोक वाचताना मालगुडी या काल्पनिक शहराला भेट द्यायची मनिषा बाळगू लागतात.

या पुस्तकात आर. के. नारायण यांनी मानवी संबंधांचे एक अत्यंत सुरेख नैसर्गिक वर्णन केले आहे. हे वर्णन वाचताना वाचक त्या कथेत हरवून जातो. मालगुडी डेजमुळे आर. के. नारायण यांना भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्धी मिळाली. आर. के. नारायण त्या काही निवडक लेखकांपैकी आहेत, ज्यांचे नाव भारतीय साहित्य क्षेत्रातून इंग्रजी साहित्य लेखनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे.

आर. के. नारायण यांचा जन्म १० ऑक्टोबर, १९०६ रोजी चेन्नईच्या रासीपुरम येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णा स्वामी होते, ते एका शाळेत मुख्याध्यापक होते. आर. के. नारायण यांचे पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी होते. आर. के. नारायण हे आपल्या नऊ भावंडांपैकी तिसरे होते. लहानपणी त्यांना घरी प्रेमाने कुंजप्पा म्हणत असत. त्यांच्या आईच्या आजारपणामुळे चेन्नईला त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासूनच त्यांना लेखन वाचनाचे मोठे वेड होते. ते आपल्या वडिलांच्या ग्रंथालयात असलेल्या मोठमोठ्या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन करायचे.



आपले माध्यमिक शिक्षण त्यांनी चेन्नईला पूर्ण केले. पुढे पित्याच्या आज्ञेवरून ते म्हैसूरला गेले व तिथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षण झाल्यावर काही वर्षे त्यांनी आपल्या पित्याप्रमाणे शिक्षक म्हणून कार्य केले, पण त्यात त्यांचे मन रमले नाही. अखेरीस त्यांनी आपला मोर्चा त्यांच्या आवडत्या छंदाकडे म्हणजे लेखनाकडे वळवला. आर. के नारायण हे इंग्रजीचे एक सिद्धहस्त लेखक होते. सुरुवातीला आर. के. नारायण हे लघुकथा लेखन करायचे.

त्यांनी आपल्या बहुतांश रचना इंग्रजी भाषेत लिहिल्या. असं असलं तरी हिंदी, मराठी, तेलगू, कन्नड व इतर भारतीय भाषांत त्यांचे साहित्य अनुवादित झाल्यामुळे विविध भाषिक लोकांमध्ये आर. के. नारायण यांचे नाव प्रसिद्ध झाले.

मालगुडी डेज ही आर. के. नारायण यांची सर्वात प्रसिद्ध कलाकृती होती. या कलाकृतीने त्यांना साठच्या दशकात घरोघरी लोकप्रिय केले होते. त्यांच्या ‘द गाईड‘ या कादंबरीवर याच नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती, ज्याने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले होते. या चित्रपटात देवानंद आणि वाहिदा रहमान या दिग्गज कलाकारांनी भूमिका वठवल्या होत्या.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आर. के. नारायण यांनी लिहलेली ‘स्वामी अँड हिज फ्रेंड्स‘ ही कथा, शाळकरी मुलांच्या सामूहिक प्रयोगांवर आधारित होती. त्यांनी या कादंबरीचे लेखन केल्यावर ती ग्राहम ग्रीन यांच्याकडे पाठवली तेव्हा त्यांना ही इतकी आवडली की त्यांनी १९३५ साली इंग्लंडला प्रकाशित केली होती.

१९३७ साली आर. के. नारायण यांच्या ‘बॅचलर ऑफ आर्ट्स‘ या कॉलेजवयीन तरुणांच्या आयुष्यावरील पुस्तकाला देखील ग्राहम ग्रीन यांनी प्रकाशित केले. १९३८ साली त्यांनी वैवाहिक जीवनावर लिहलेल्या डार्क रुम या कादंबरीचे प्रकाशन केले. यात त्यांनी वैवाहिक जीवनाच्या पैलूंचा सुंदरपणे उलगडा केला. या सर्व इंग्रजी कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनावर ताबा घेतला. १९८० साली त्यांनी कर्नाटकातील पर्यटनाला चालना देणारे एमरल्ड रूट हे पुस्तक लिहिले.

आर. के. नारायण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या द गाईड या कादंबरीला १९५८ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९६४ साली त्यांना पद्मभूषण आणि २००० साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले. आर. के. नारायण ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’चे स्नातक (पोस्ट ग्रॅज्युएट) होते आणि अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटर्सचे मानद सदस्य होते. रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरद्वारा त्यांना १९८० साली एसी बेंसन पुरस्काराने सन्मानित केले गेले. १९८९ साली त्यांना राज्यसभेवर नेमण्यात आले, तिथे त्यांनी शैक्षणिक सुधारणा घडवून आणण्यात मोठे प्रशंसनीय कार्य केले होते.

१९९२ साली लिहण्यात आलेल्या ‘द ग्रँडमदर्स टेल‘ या त्यांच्या अंतिम कादंबरीने मोठं यश कमावलं. १३ मे, २००१ रोजी आर. के. नारायण यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते जरी त्यावेळी हे जग सोडून गेले तरी त्यांच्या अजरामर अशा द इंग्लिश टीचर, वेटिंग फॉर महात्मा, द गाईड, द मॅन इटर ऑफ मालगुडी, द वेंडर ऑफ स्वीटस, अ टायगर ऑफ मालगुडी या पुस्तकांच्या रूपाने ते अजूनही आपल्या स्मृतीत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: malgudi daysr k narayan
ShareTweet
Previous Post

५०९७ मध्ये ब्रम्हांड नष्ट होईल असं म्हणणाऱ्या बाबा वेंगाने स्वतःच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली होती !

Next Post

एकेकाळी भारतात वेगवेगळी वेळ दाखवणारे चार घड्याळ वापरले जायचे !

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एकेकाळी भारतात वेगवेगळी वेळ दाखवणारे चार घड्याळ वापरले जायचे !

एकाच झाडापासून तयार होतात तरी भारतात 'भांग' विक्रीला सूट आणि 'गां*जा' विक्रीला बंदी का आहे ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.