The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टायटॅनिक बुडणार हे या माणसाने आधीच लिहून ठेवलं होतं

by द पोस्टमन टीम
29 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


टायटॅनिक… हा शब्द उच्चारला की, आपल्या नजरेसमोर येतं, ते एक भव्य जहाज आणि त्याबद्दल माहीत असलेल्या गोष्टी. विसाव्या शतकात घडून गेलेल्या या घटनेचे पडसाद जागतिक इतिहासात आजही उमटतात. यावरच आधारित काही वर्षांपूर्वीचा जेम्स कॅमेरुनचा चित्रपटही आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. त्यामधली ती जॅक आणि रोझची फेमस कपल पोझ, ती बासरीची ट्यून असलेलं ते गाणं हे सगळं आठवलंच असेल एव्हाना. प्रत्यक्षात मात्र काही घटना या चित्रपटात वास्तवापेक्षा वेगळ्या दाखवल्या होत्या.

टायटॅनिक जहाजाबद्दल असं बोललं जायचं की, हे जहाज कधीच बुडणार नाही. प्रत्यक्षात मात्र पहिल्याच प्रवासात टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. 

मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की, टायटॅनिक जहाज हे बुडणार असल्याची भविष्यवाणी एका व्यक्तीने खूप आधीच करून ठेवली होती, तेही तब्बल १४ वर्षांपूर्वी! आश्चर्य वाटलं ना? चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती.

टायटॅनिक जेव्हा समुद्रप्रवासाला निघालं, तेव्हा त्याचं एकूण वजन होतं सुमारे ४६,००० टन. हे जहाज तरंगण्याकरिता वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान त्याकाळी नवीनच होतं. त्यामुळे त्याच्या भरवशावर प्रवाशांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र टायटॅनिकच्या निर्मात्यांनाही त्याबद्दल पूर्ण खात्री नव्हती.



मात्र जेव्हा टायटॅनिकचं कच्चं डिझाईनसुद्धा तयार झालं नव्हतं, त्या काळात एका लेखकाने लिहिलेल्या एका कादंबरीत या सगळ्या घटनांचं वर्णन आधीच केलेलं होतं. त्या लेखकाचं नाव होतं मॉर्गन रॉबर्टसन व कादंबरीचं नाव होतं, ‘द रेक ऑफ द टायटन’ किंवा ‘द फ्यूटिलीटी’. सन १८९८ साली ही कादंबरी प्रकाशित झाली होती.

या कादंबरीतलं वर्णन हे टायटन नावाच्या ब्रिटिश जहाजाचं असलं तरी ते बऱ्याच प्रमाणात टायटॅनिकसोबत हुबेहूब जुळतं. ही गोष्ट जॉन रोलँड नावाच्या माणसाची होती, जो भरपूर दारू प्यायचा आणि कदाचित त्यामुळेच त्याला नेव्ही ऑफिसरचं पद सोडावं लागलं. जगामधील सर्वात मोठं जहाज ‘टायटन’वरती आता तो नोकरी करतोय. मॉर्गननी या जहाजाचं वर्णन कधीही न बुडणारं जहाज, त्याशिवाय मानवी प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार असं केलं होतं. टायटन जहाजाचाही प्रवासात एका हिमनगावरती आपटून अपघात होतो आणि ती इतिहासातली सर्वात मोठी शोकांतिका ठरते, असं वर्णन त्या कादंबरीत होतं.

टायटन हे जहाज सुमारे ४५,००० टन वजन घेऊन समुद्रात सुमारे ८०० फूट लांबीवर तरंगत होतं. जवळजवळ २५०० लोक त्यावेळी त्यातून प्रवास करत होते. ज्या-ज्या लोकांनी ते जहाज पाहिलं, त्यांनी हे कधीही समुद्रात बुडणार नाही, असं सांगितलं होतं. पण न्यूफाऊंडलँडपासून ४०० मैल अंतरावर असताना टायटनचा अपघात होऊन ते समुद्रात बुडू लागलं, आणि त्यातल्या लाईफबोट्सची संख्या कमी असल्यामुळे कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मॉर्गन रॉबर्टसन यांच्या काल्पनिक कथेतलं टायटन आणि प्रत्यक्षातलं टायटॅनिक या दोघांतही केवळ नावातच नाही, तर इतरही अन्य गोष्टींमध्ये साम्यं आहेत. टायटनची लांबी साधारण ८०० फूट होती, तर टायटॅनिकची ८८२ फूट होती. या दोन्ही जहाजांची क्षमता सुमारे ३००० प्रवाशांची होती. टायटन हे २५०० प्रवाशांनी भरलेलं होतं, तर टायटॅनिकमध्ये २२०० प्रवासी होते. 

दोन्ही जहाजं इंग्लंडमधून अमेरिकेच्या दिशेने जायला निघाली होती. हिमनगाशी टक्कर झाली, त्यावेळी टायटनचा वेग होता २५ नॉट्स तर टायटॅनिकचा वेग २२.५ नॉट्स होता. ही दोन्ही जहाजं ब्रिटिश मालकीचीच होती. दोन्ही जहाजांचा अपघात एप्रिल महिन्यातच मध्यरात्रीच्या सुमारासच झाला. स्टारबोर्डच्या बाजूनेच ही दोन्ही जहाजं हिमनगावर आदळली होती.

उत्तर अटलांटिक महासागरात न्यूफाऊंडलँडपासून ४०० मैल अंतरावरच असताना दोन्ही जहाजं बुडली होती. या दोन्ही जहाजांत लाईफबोट्सची संख्या दोन्ही जहाजांमध्ये बरीच कमी होती. टायटन २४ तर टायटॅनिक २० लाईफबोट्स घेऊन निघालं होतं.

इतकी समानता असली तरी या दोघांमध्ये फरकही आहेत. टायटनच्या अपघातामध्ये केवळ १३ जणच वाचले होते, तर टायटॅनिकच्या वेळी जवळपास ७०५ जणांची सुटका झाली होती. टायटन हिमनगावर आपटल्यानंतर समुद्रात उलटलं होतं, तर टायटॅनिकचे मात्र सरळ दोन तुकडे झाले होते.

द रेक ऑफ टायटन हे या प्रकारचं पहिलंच पुस्तक नव्हतं. त्याच्याही आधी १८८६ साली त्यावेळचे संशोधक पत्रकार डब्ल्यू. टी. स्टीड यांनीही अशाच स्वरूपाचं लिखाण केलं होतं. त्या कथेतही एका बुडलेल्या आगबोटीतून वाचलेल्या खलाशाचं मनोगत अशा स्वरूपाचीच मांडणी होती. पण त्यात कोणत्याही प्रकारे जहाजाचं नाव वगैरे दिलं नव्हतं. त्या घटनेत एकूण ७०० प्रवाशांपैकी सुमारे २०० प्रवाशांना वाचवण्यात आलं होतं. नायक पाण्यात बुडत असताना एक लाईफबोट मागून येऊन त्याला वाचवते, असं वर्णन स्टीड यांच्या कथेत होतं. दुर्दैवी योगायोग असा की, स्टीड यांचाही मृत्यू हा पाण्यात बुडूनच झाला.

मॉर्गन रॉबर्टसन यांचं द रेक ऑफ टायटन हे टायटॅनिकच्या दुर्घटनेनंतर १९१२ साली पुन्हा प्रकाशित करण्यात आलं. त्यांच्या पुस्तकातील वर्णन आणि प्रत्यक्षात घडलेली घटना यांच्यातली साम्य बघता त्यांच्यावर अनेक दोषारोप लावले गेले, कारण काल्पनिकतेचा वास्तवासोबत इतका जवळचा संबंध असलेली जगाच्या आजवरच्या इतिहासामधली ही कदाचित एकमेवच घटना असेल. किंबहुना तशी शक्यताच त्यानंतर जवळजवळ नाही. पण या सगळ्याचं मूळ मॉर्गन यांच्या बालपणात सापडतं. मॉर्गन यांचे वडील हे स्वतः एक शिप कॅप्टन होते. मॉर्गन केबिन बॉय म्हणूनच लहानाचे मोठे झाल्याने त्यांना समुद्रातील अशा बाबींचं सखोल ज्ञान होतं. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचं लिखाण झालं तर त्यात नवल नाहीच. मात्र त्याचा वास्तवाशी आलेला संबंध हा निव्वळ योगायोग आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जेव्हा एका भारतीय राजाचं लॉर्ड माउंटबॅटनच्या घरी डिनर टेबलवरच निधन झालं होतं..!

Next Post

पहिल्याच बॉलवर विकेट घेतली, नंतर इतकी धुलाई झाली की पुढची विकेट घ्यायला चार वर्ष लागले

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

पहिल्याच बॉलवर विकेट घेतली, नंतर इतकी धुलाई झाली की पुढची विकेट घ्यायला चार वर्ष लागले

'रॉकी'साठी रिऍलिस्टिक सिन करण्याच्या नादात सिल्वेस्टर स्टॅलोनला ICUमध्ये भरती व्हावं लागलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.