The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

‘कॅप्टन मॉर्गन’चा हा इतिहास अट्टल बेवड्यांनासुद्धा माहिती नसेल !

by द पोस्टमन टीम
5 April 2021
in मनोरंजन
Reading Time:1min read
0
Home मनोरंजन

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब

स्पाइस गोल्ड रमच्या बॉटलवरील कॅप्टन मॉर्गनचे चित्र तुम्ही पहिलेच असेल. पण, हा कॅप्टन मोर्गन कोण होता आणि त्याचा रमशी काय संबंध होता हे तुम्हाला माहिती आहे का?

कॅप्टन मॉर्गन हा सतराव्या शतकातील एक खलाशी आणि गुप्तहेर होता. तो समुद्रात गस्त घालत घालत इतर देशाच्या समुद्री हालचालींवर नजर ठेवी. तसेच इतर देशाच्या या जहाजापासून त्याच्या जहाजाला काही धोका आहे असे वाटल्यास त्या जहाजांवरील सैनिकांशी युद्ध करून ते जहाज आपल्या ताब्यात घेण्याचा अधिकारही त्याला होता. त्याचे पूर्ण नाव हेन्री मॉर्गन. फक्त एका रमच्या बॉटलवर त्याचे चित्र झळकावे इतका काही तो अगदीच कोणीतरी नव्हता. त्याचे कर्तृत्व त्याहून खूप मोठे आहे.

वेल्समधील मॉंमॉथशायर येथे १६३५ मध्ये त्याचा जन्म झाला. मॉर्गनच्या बालपणीविषयी काहीच फारशी माहिती मिळत नाही. इतकेच काय त्याच्या आईवडिलांचे नाव काय हेही माहित नाही. फक्त त्याला दोन काका की मामा होते एवढीच माहिती मिळते. आणि त्याचे हे मामा लष्करात खूप मोठ्या पदावर होते.

मॉर्गनने लहानपणीच शाळा सोडली. त्याला पुस्तकापेक्षा खंजीर चाकू अशा धारधार तीक्ष्ण हत्यारांत खूप रस होता. हा मॉर्गन कॅरिबियनला कसा पोहोचला त्याबद्दलही कुणाला निश्चित माहिती नाही.

अँग्लो-स्पॅनिश युद्धाचा भाग म्हणून कदाचित ऑलिव्हर क्रॉमवेलने त्याला रोबर्ट वेनाबेल्सच्या सैन्य तुकडीत समाविष्ट होण्याचे आदेश दिले असावेत किंवा त्याचे अपहरण करण्यात आले असावे. 

कॅप्टन मॉर्गनच्या जीवन चरित्रातही याबद्दल लिहिले आहे. परंतु त्याचे हे चरित्र आलेक्झांड्रे एक्सक्वेमेलीन नावाच्या एका सर्जनने लिहिले आहे. आलेक्झांड्रे एक्सक्वेमेलीन हा मॉर्गनच्या जहाजावरच सर्जन होता. म्हणून मॉर्गनबद्दल त्याने लिहिलेली माहिती अधिकृत आहे असा दावा करता येतो पण, आलेक्झांड्रे मॉर्गनचा द्वेषही करत असे असं म्हणतात. त्यामुळे त्याने लिहिलेले मॉर्गनचे चरित्र काहीसे एकांगी वाटते. त्याने मॉर्गनला एक अत्यंत क्रूर खालाश्याच्या रुपात रंगवले आहे. अर्थात, यात फार आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण एक्सक्वेमेलीनला नेहमी असे वाटत असे मॉर्गन त्याच्यावर अन्याय करतो आहे किंवा त्याला फसवतो आहे, म्हणूनच त्याच्यावर एका प्रकारे सूड उगवण्यासाठीच त्याने पुस्तक लिहिले की काय असे वाटते.

१६५५ साली हेन्री मॉर्गन बार्बाडोसमध्ये आला. तिथे त्याने अगदी शिपायापासून आपल्या लष्करी कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्याने बढती मिळवली आणि एका सध्या शिपायापासून तो सन्माननीय खलाशी झाला. १६६० मध्ये मॉर्गन सर ख्रिस्तोफर मिंगीस याच्या खलाशी समूहाचा भाग होता. ख्रिस्तोफर मिंगीस सोबत त्याने समुद्री प्रवास सुरु केला. या प्रवासात त्याने जहाजे कशी हाकावीत याबद्दलचे सगळे ज्ञान घेतले. १६६२ मध्ये तो एका छोट्या जहाजाचा कप्तान बनला.

हे देखील वाचा

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !

या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत

सतराव्या शतकात खलाशी हे गुप्तहेराचेही काम करत असत म्हणून त्यांना प्रायव्हेटीअर म्हटले जात असे. परंतु यांच्यावर विरोधी देशाचा जहाजे नष्ट करण्याचीही जबाबदारी सोपवलेली असे. कॅरिबियन आणि मध्य अमेरिकेच्या समुद्रात ते गस्त घालत. स्पानिश जहाजापासून कॅरिबियन समुद्र किनाऱ्यालागतच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी ब्रिटनने मॉर्गनची नेमणूक केली होती. स्पॅनिश आणि ब्रिटन जहाजामध्ये त्याकाळी खूप स्पर्धा चालत असे.

 मॉर्गन स्पॅनिश जहाजांवर आणि त्यांच्या शहरावर हल्ला करून त्यांना लुटत असे.

१६६६ मध्ये त्याने एडवर्डची मुलगी मेरी एलिझाबेथ मॉर्गनशी त्याने लग्न केले. १९६५ पर्यंत तो स्पॅनिश शहरांवर हल्ला करत होता. १६६० ते १६७० पर्यंत त्याने अनेक स्पॅनिश जहाजांवर हल्ला केला आणि त्यांची लुट केली. स्पॅनिश शहरेही लुटत होता. याचवेळी तो जमैकाचे गव्हर्नर थॉमस मोडीफोर्ड यांच्या संपर्कात आला. थॉमस मोडीफोर्ड यांनी त्याला स्पॅनिश जहाजे आणि शहरे लुटण्याचा परवानाच दिला. प्युरटो प्रिन्सिपायवर हल्ला केल्यानंतर मॉर्गनची प्रसिद्धी खूपच वाढली.

१६६८ मध्ये त्याने ३००० स्पॅनिश सैनिकांचा पराभव केला. या सगळ्या सैनिकांना त्याने कैद केले आणि त्याच्या सुटकेसाठी एक लाख युरोची मागणी केली.

ADVERTISEMENT

१६७१ मध्ये मॉर्गनने जुन्या पनामा शहरावर हल्ला केला. हे स्पनिश अमेरिकच्या राजधानीचे शहर होते. या हल्ल्यात स्पॅनिशचे ४०० ते ५०० सैनिक मारले गेले. तर मॉर्गनचे फक्त १५ सैनिक मारले गेले. पनामा शहरात तो पोहोचण्याआधीच त्याची कीर्ती पोहोचली होती. त्यामुळे या सैनिकांनी शहरातील सगळे दागदागिने आणि सोने दूरवर कुठेतरी लपवून ठेवले होते. त्यामुळे हा हल्ला करूनही त्याच्या हाताला फारसे काही लागले नाही. शिवाय याचवेळी स्पेन आणि इंग्लंड दरम्यान शांततेचा करार झाला होता, त्यामुळे स्पेनच्या समाधानासाठी जैमाकाच्या गव्हर्नरनी मॉर्गनला अटक करण्याचा फतवा काढला.

खरंतर, गव्हर्नरला देखील मॉर्गनला अटक करायची इच्छा नव्हती. १९६२ साली त्याला लंडन मध्ये सुनावणीसाठी बोलावण्यात आले. परंतु इथे त्याच्यावर खटला चालवण्याऐवजी खलाशी गुप्तहेर मॉर्गनचा सत्कार करण्यात आला. त्याला सरदाराचा दर्जा देण्यात आला. १६७४ मध्ये त्याला पुन्हा जमैकाचा लेफ्टनंट गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आले. यानंतर मॉर्गन इंग्लंडला परत गेलाच नाही.

मॉर्गनला पिण्याचे व्यसन खूप होते आणि जुगाराचा छंदही. त्यामुळे तो सरदार उमरावांच्या वर्तुळात कधी शोभलाच नाही. १६७७ मध्ये तो लेफ्टनंट गव्हर्नर पदावरून पायउतार झाला. त्यानंतर तो पुन्हा खलाशी आणि गुप्तहेरांसोबतच काम करू लागला. पण, मॉर्गनचे पिण्याचे व्यसन मात्र दिवसेंदिवस वाढतच होते. हे व्यसन इतके वाढले की, त्याच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला.

२५ ऑगस्ट १६८८ रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्युनंतर शाही इतमामात त्याला अखेरची मानवंदना देण्यात आली. त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीच्या नावावर त्याने जमैकामधील शेती आणि १३१ गुलाम ठेवले होते. त्यांना मुलबाळ नसल्याने जर त्याच्या पुतण्याने मॉर्गन आडनाव लावले तर ही सर्व संपत्ती त्यांच्या नावावर होईल अशीही तरतूद त्याने केली होती.

१९४४ साली जेंव्हा सीगरम कंपनीला त्यांच्या ब्रँडेड रमसाठी लोगो हवा होता तेंव्हा अचानक त्याच्यासमोर हे नाव आले. कारण मॉर्गन म्हटले की, एक खोडकर, खट्याळ आणि पिऊन आउट होणारा खलाशी एवढीच प्रतिमा त्या कलाकारासमोर उभी राहिली असेल. जी रमच्या बॉटलवर शोभूनही दिसते.

एकेकाळचा हा धाडसी खलासी आज फक्त रमच्या बॉटलवरील त्याच्या चित्राच्या रुपात जिवंत आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

हे दशक मानवी इतिहासातील सर्वात वाईट दशक मानलं जातं !

Next Post

एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती
इतिहास

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !
इतिहास

मध्ययुगात तब्बल १० वर्षे आकाशात चंद्रच दृष्टीस पडला नव्हता !

8 April 2021
या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत
इतिहास

या एका दगडावरून आजवर बरेच राडे झालेत

7 April 2021
‘एलोन मस्क’पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?
मनोरंजन

‘एलोन मस्क’पेक्षा श्रीमंत असूनही मुकेश अंबानींनी सेकंड हॅन्ड टेस्ला कार का विकत घेतली..?

6 April 2021
या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !
मनोरंजन

या कारणांमुळे या तीन देशांमध्ये आढळत नाहीत साप !

5 April 2021
एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !
मनोरंजन

एकेकाळी लंडनच्या रस्त्यावर मांजर दारु विकायचे !

3 April 2021
Next Post
एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

दाऊदने बॉम्बस्फोट घडवून त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली होती

20 February 2021
नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

नवऱ्याला अरुण गवळीच्या टोळीने मारलं नसतं तर दाऊदची बहीण अंडरवर्ल्ड डॉन झाली नसती

25 February 2021
त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

त्या रात्री दारूने सरबजीतचा घात केला होता

8 March 2021
मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

26 March 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह दफन न करता जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021
या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

या एका खटल्याने आपल्या देशातील संविधान आणि लोकशाहीला वाचवलंय

11 April 2021
सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

10 April 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

11 April 2021
इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

11 April 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!