The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रशियाने खोदली होती नरकात घेऊन जाणारी विहीर!!

by द पोस्टमन टीम
29 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब 


लहानपणापासून बऱ्याचदा आपल्या कानांवर पडलेलं असतं की अमुक पापं केली की नरकात जावं लागतं! तिथे खूप भयानक शिक्षा मिळतात, गरम तेलात तळून काढतात वगैरे वगैरे… बऱ्याचदा आपली कल्पनाशक्ती आपल्याला नरकात घेऊन जाते! पृथ्वीच्या खाली खोलवर हे नरक असतं, मग कुणी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल का? किंवा खोदत गेल्यानंतर नरक सापडेल असं काही संशोधन झालं असेल का? हे प्रश्न बरेच वलयांकित आहेत.

आज रशियातील सायबेरियाच्या भागात एक रहस्यमय विहीर आहे! नरकात घेऊन जाणारी! तिच्याबद्दल जाणून घेऊयात.

२००२ साली कॉस्ट टू कॉस्ट नावाच्या अमेरिकन रेडिओ चॅनेलवर एक शो सुरू होता. यादरम्यान रेडिओच्या श्रोत्यांकडून त्यांना एक ऑडिओ क्लिप मिळाली, त्यात खालील मजकूर रेकॉर्ड केलेला होता-

“माझ्या काकांनी मला ही गोष्ट साधारण एका वर्षभरापूर्वी सांगितले असेल, मी त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवला नाही. ती गोष्ट म्हणजे नरकात घेऊन जाणाऱ्या विहिरीच्या खोदकामाची गोष्ट.ज्या विहिरीत गेल्यावर नरकात शिक्षा भोगत असणाऱ्या आत्म्यांचे आवाज अगदी स्पष्ट ऐकू येतात!”

यानंतर या रेकॉर्डिंगमध्ये माणसांच्या किंचाळण्याचे आवाजसुद्धा होते. त्यातून असे स्पष्ट जाणवत होतं की ही माणसे भयानक यातना भोगत आहेत. आणि असाही दावा केला गेला की ही माणसे नरकात त्यांची शिक्षा भोगत आहेत आणि तिथे होणाऱ्या भयानक शिक्षेमुळेच ते असे किंचाळत आहेत!!



अमेरिकन रेडिओच्या म्हणण्याप्रमाणे सायबेरियातील एका निर्जन स्थळी एक कायम बर्फाच्छादित असणारा भाग आहे. तिथे रशियाच्या जिओलॉजी टीमने ८.९ मैल खोल विहीर खोदली आहे. हे खोदकाम सुरू असताना जेव्हा त्यांचे ड्रिल मशीन एका विशिष्ट  अंतरावर पोहोचले तेव्हा चक्क तरंगू लागले! त्यांच्या लक्षात आले की त्याखाली एक पोकळ अवकाश आहे!

त्या जिओलॉजीस्टला आश्‍चर्याचा धक्काच बसला! त्यावेळी त्यांनी तिथलं तापमान मोजलं तर ते तब्बल दोन हजार डिग्री फॅरेनहाईट एवढं प्रचंड होतं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या मायक्रोफोन्स आणखी खोलवर सोडले. त्यातून त्यांना किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. पण एवढ्या तापमानामुळे लगेचच ते मायक्रोफोन वितळले.

ते जॉलॉजीस्ट प्रचंड अस्वस्थ झाले. आणि त्यांनी नरकाचे गृहितक जगासमोर मांडले. एवढेच नव्हे तर त्यांनी नरकात जाणारी विहीर खोदली म्हणून त्यांना लोक महान समजू लागले. त्यातून आणखी अंधश्रद्धांना जन्म मिळाला, लोक आणखी वेगळ्या प्रकारच्या भय कथा रचू लागले. आणि ही परंपरा आजतागायत सुरूच आहे!

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मग नेमकी खरी गोष्ट काय? खरंच रशियाने अशी नरकात जाणारी विहीर खोदली होती काय? की रशिया व अमेरिकेत तेव्हा सुरू असणाऱ्या शीतयु*द्धादरम्यान काहीतरी मोठी गोष्ट लपविण्यासाठी रशियानेच पसरलेली ही आख्यायिका होती? या प्रश्नाचे उत्तर आजही कोणाला सापडलेला नाही!

पण ती विहीर मात्र जरूर अस्तित्वात आहे. शीतयु*द्धादरम्यान अमेरिका व रशिया यांच्यात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू होती. आणि दोघांपैकी कोण सर्वप्रथम अवकाशात झेप घेतो तसेच कोण सर्वांत आधी पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत पोचतो, यात अटीतटीची लढत सुरू होती. दोन्ही देशांनी आपले संशोधनक्षेत्र पणाला लावली होती. पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल संशोधन करणे एवढाच या मोहिमांचा हेतू नव्हता तर पृथ्वीच्या पोटात असणाऱ्या सगळ्या खनिज साठ्यावर कब्जा मिळवण्यासाठी दोन्ही महासत्तांचा हा आटापिटा सुरू होता. रशियात या मोहिमेची धुरा ज्या शास्त्रज्ञाने सांभाळली होती आणि त्यानेच पुढे रहस्यमय विहिरीबद्दलसुद्धा माहिती दिली.

या खोदकामादरम्यान जेव्हा जिओलॉजीस्ट नऊ मैलांपर्यंत खोल पोहोचले, तेव्हा तापमान २०० डिग्री फॅरेनहाइटपर्यंत जाऊन पोहोचले. त्यानंतर सोबतच्या इंजिनियर्स आणि शास्त्रज्ञांनी त्यांच्याकडे असलेले खास उष्णतारोधक मायक्रोफोन्स आणि इतर साधने आणखी खोलवर सोडले.

उष्णतेमुळे मायक्रोफोन वितळण्यापूर्वीच त्यात २० सेकंदाचा एक ऑडिओ रेकॉर्ड झाला. ती शोध मोहीम तिथेच थांबवली गेली. पण बाहेर आलेले ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून सगळ्यांनाच कापरे भरले! ही ऑडिओ क्लिप २००२ पर्यंत लपवून ठेवण्यात आली होती. त्यात चक्क लोकांच्या किंचाळण्याचे आवाज रेकॉर्ड झाले होते. त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरेल म्हणून ही क्लिप पसरवली गेली नाही.

त्या जिओलॉजीस्टला तर प्रचंड मानसिक धक्का बसला होता. बऱ्याच शास्त्रज्ञांनी त्यांची नोकरी सोडली होती आणि धक्का बसलेल्या शास्त्रज्ञांना डॉक्टरांच्या मदतीने बरे करण्यात आले. त्यांच्यावर पुढील काही वर्ष ट्रीटमेंट सुरू होती.

या घटनेनंतरसुद्धा बऱ्याच अफवांनी सायबेरियात गोंधळ माजवला. काहींनी तर असेही सांगितले की

एक शक्तीने त्या विहिरीतून धुराचा एक लोळच्या लोळ आकाशात पाठवला होता. आणि त्या धुराने, “I have conquered” असं आकाशात लिहिलं होतं म्हणे! काहीजण तर असेही सांगत होते की त्या धुराने आकाशात जाऊन वटवाघळाच्या आकार धारण केला होता.

शेवटी १९९० मध्ये ख्रिश्चन टुडे या वर्तमानपत्राने या सगळ्या अफवांना पूर्णविराम दिला. त्यांनी सांगितले की सायबेरियात रशियाने असे कोणतेही खोदकाम केलेले नाही. आणि २००० डिग्री फॅरेनहाईट एवढ्या प्रचंड तापमानात तग धरू शकेल अशी वस्तू आजपर्यंत बनवताच आलेली नाही. आणि सर्वात मोठी अफवा म्हणजे त्या ऑडिओ क्लिपची. त्या रेकॉर्डिंगमधे येणारा किंचाळण्याचे आवाज १९७२ मधल्या ब्एरन ब्लड या हॉलीवुड सिनेमातले आहेत!!

मग प्रश्न उरतो ती विहीर खोदली कुणी? १९७० साली रशियाने हा कोल सुपर्डीप बोरहोलचा प्रकल्प सुरू केला होता. कोला हा एक सायबेरियाचा मोठा भाग आहे. पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल अधिक जाणून घेणे हाच या मागचा उद्देश होता. साधारणतः १९७८ पासून १९९२ पर्यंत हे काम सुरू होते. आणि २००५ पर्यंत या ठिकाणी १६,६११ मीटरपर्यंत खोदकाम झाले होते. हा पृथ्वीवरचा मानवाने खोदलेला सर्वात खोल भाग आहे! यादरम्यान शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या पोटातील बरीच रहस्य शोधून काढली. आणि अजूनही ते संशोधन सुरू आहे.

त्यामुळे आपल्याला ऐकले जाणारे नरक खरंच अस्तित्वात आहे की नाही, याचा शोध घ्यायलाच हवा पण, तो पृथ्वीच्या आत नव्हे तर स्वतःच्याच आत. कारण नील गेमनच्या म्हणण्याप्रमाणे, “I think hell is something you carry around with you, not somewhere you go!!”


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

तुमच्या गुंतवणुकीची दामदुप्पट केव्हा होणार..? शोधा या सोप्या ‘ट्रिक’ने..!

Next Post

जयचंद – खोट्या इतिहासामुळे गद्दार आणि राष्ट्रद्रोही असा शिक्का बसलेला राजा

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जयचंद - खोट्या इतिहासामुळे गद्दार आणि राष्ट्रद्रोही असा शिक्का बसलेला राजा

या माणसाने जगाला नैतिकतेचे धडे दिले..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.