The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बकार्डीने क्युबात बंडखोरांना सत्तेत यायला मदत केली, त्यांनीच बकार्डीला देशाबाहेर काढलं

by द पोस्टमन टीम
14 July 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


दारू (किंवा चांगलं वाटावं म्हणून ‘लिकर’) म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर काही ठराविक ब्रँड येतातच. जरी आपण दारू पित नसलो, तरी विविध जाहिरातींच्या माध्यमातून किंवा पोस्टरवर पाहून आपल्याला ते माहिती होतात. असाच एक नावाजलेला ब्रँड म्हणजे ‘बकार्डी’. ‘बकार्डी लिमिटेड’ ही जगातील सर्वात मोठ्या खासगी लिकर कंपन्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे याची मालकी गेल्या सात पिढ्यांपासून एकाच कुटुंबाकडे आहे.

आज तब्बल १७०हून अधिक देशांमध्ये या ब्रँडच्या लिकरचा खप होतो. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या देशात ही कंपनी सुरू झाली होती, त्या देशातच ही लिकर कुठे मिळत नाही!

बकार्डी लिमिटेडची स्थापना डॉन फॅकंडो बकार्डी मास्सो यांनी १८६२ मध्ये केली. त्यांचा जन्म १८१४ मध्ये स्पेनमध्ये झाला होता. त्यानंतर १८३०च्या सुमारास ते क्युबामध्ये आले, आणि तिथेच स्थाईक झाले. त्या काळी क्युबामध्ये मिळणारी रम, ही आता आपल्याकडे मिळणाऱ्या देशी दारुपेक्षाही हलक्या प्रतिची होती. त्यामुळे श्रीमंत सोडाच, पण मध्यमवर्गीय लोकही त्याकडे पाहत नव्हते. फॅकंडो यांनी या रमवर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. जवळच्याच एका साखर कारखान्यामध्ये तयार झालेलं यीस्ट वापरुन, त्यांनी रमला अधिक रिफाईन करण्याचा प्रयत्न केला. या यीस्टमुळेच बकार्डी रमला एक विशिष्ट चव मिळाली.

तब्बल दहा वर्षे वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर फॅकंडो यांनी ‘चार्कोल रम फिल्ट्रेशन’ या पद्धतीचा शोध लावला. यानंतर त्यांनी दोन वेगवेगळी रसायनं एकत्र करुन, त्यावर विविध प्रक्रिया करुन जगातील पहिली शुद्ध, लाईट-बॉडीड आणि मिक्सेबल ‘व्हाईट रम’ तयार केली.

यानंतर फॅकंडो ज्युनिअर आणि त्याचा भाऊ होसे यांनी ‘सँटियागो डे क्युबा’मध्ये एक डिस्टिलरी खरेदी केली. हाच बकार्डीचा पहिला अधिकृत कारखाना.



या इमारतीमध्ये खूप वटवाघुळं राहत होती. त्यांच्याकडे पाहूनच बकार्डीचा लोगो वटवाघूळ ठेवण्यात आला.

डॉन फॅकंडो यांच्या पत्नी डोना अमालिया यांची ही आयडिया होती. १८८० आणि ९०चं दशक बकार्डीसाठी बरंच त्रासदायक ठरलं. डॉन फॅकंडोचा मोठा मुलगा एमिलिओ हा क्युबाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी होता. त्यामुळे त्याला दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यातच डॉन फॅकंडो यांचं १८८६मध्ये निधन झालं. युद्धाचा काळ सुरू असल्यामुळे त्यांची पत्नी डोनाने जमैकामध्ये आश्रय घेतला. त्यानंतर १८८९मध्ये हे युद्ध संपताना जेव्हा अमेरिकेनं क्युबाचा ताबा घेतला होता, तेव्हा एमिलिओ हा लोकांमधून निवडून आलेला सँटियागोचा पहिला मेयर ठरला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एमिलियोने आपल्या कारकिर्दीत अनेक शाळा, रुग्णालये उघडली आणि कित्येक लोकोपयोगी कामं पूर्ण केली. दुसरीकडे त्याचे भाऊ फॅकंडो ज्युनिअर आणि होसे आपल्या वडिलांची कंपनी पुढे नेत होते. होसेचा मेहुणा एनरिके हेन्री स्कुएग याने पुढे १९१०मध्ये बार्सिलोना, आणि १९१६मध्ये न्यूयॉर्कमध्ये कंपनीचे प्लांट्स सुरू केले.

अमेरिकेतील प्लांट नंतर बंद पडला. मात्र, अमेरिकेमध्ये कॉकटेल कल्चर सुरू करण्यात बकार्डीचा मोठा वाटा राहिला. १९३०पर्यंत स्कुएगमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बकार्डी हा मोठा ब्रँड झाला होता. याचा क्युबालाही मोठा फायदा होत होता.

स्कुएगने क्युबाला ‘होम ऑफ रम’ आणि बकार्डीला ‘किंग ऑफ रम्स अँड रम ऑफ किंग्स’ अशी ओळख मिळवून दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीची धुरा स्कुएजचा जावई होसे ‘पेपिन’ बॉश याच्या हातात आली.

पेपिनने न्यूयॉर्कमध्ये ‘बकार्डी इंपोर्ट्स’ ही कंपनी सुरू केली. पुढे १९४९मध्ये तो क्युबाचा अर्थमंत्रीही झाला. असं सगळं सुरळीत सुरू असूनही, पुढे बकार्डीला क्युबामधून गाशा गुंडाळावा लागला. याला कारण ठरली, क्युबामधील क्रांती!

क्युबामधील क्रांतीच्या काळात बकार्डी कुटुंबियांनी (म्हणजेच कंपनीनेही) बंडखोर आंदोलकांना पाठिंबा दिला. मात्र, या बंडखोरांचा विजय झाल्यानंतर क्युबा कम्युनिस्ट देश म्हणून समोर आला. यावेळी बकार्डी कुटुंबीयांनी फिडेल कॅस्ट्रोला मात्र कडाडून विरोध केला. १९६०मध्ये या नव्या क्युबा सरकारने देशातील सर्व खासगी संपत्तीला सरकारजमा केलं. लोकांना खासगी संपत्ती जमा करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच, सर्व बँक खातीही बंद करण्यात आली. याला बकार्डी कुटुंबियांचा विरोध होता. मात्र, या विरोधाला न जुमानता १४ ऑक्टोबर १९६०मध्ये सरकारने कंपनीची देशातील सर्व मालमत्ता जप्त केली. या बदल्यात बकार्डी कुटुंबीयांना कोणतीही नुकसानभरपाई देण्यात आली नाही हे विशेष. यामुळे बकार्डी कुटुंबीय कंगाल झाले असते; मात्र क्रांती सुरू होण्याच्या काही वर्षांपूर्वीच घेतलेल्या एका निर्णयामुळे ही कंपनी बुडता बुडता वाचली.

फुल्जेन्सिओ बटिस्टा हा क्युबामधील एक सैन्य अधिकारी आणि नेता होता. १९४० ते ४४ या काळात तो क्युबाचा राष्ट्राध्यक्ष राहिला. त्यानंतर त्याच्या हातातून सत्ता गेली होती. मात्र, अमेरिकी सैन्याच्या पाठिंब्याने त्याने १९५२मध्ये पुन्हा क्युबावर सत्ता मिळवली. यावेळी तो लोकांमधून निवडून गेलेला अध्यक्ष नव्हे, तर स्वतः सत्ता स्थापन केलेला हुकूमशाह होता. बटिस्टा हुकूमशाह असल्यामुळे तो भविष्यात आपल्यासाठी अडचण ठरू शकतो, असा विचार करुन बकार्डी कुटुंबियांनी खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली होती.

कंपनीने आपलं उत्पादन अगोदरच बाहेरच्या देशांमध्येही सुरू केलं होतं. पोर्टो रिको आणि मेक्सिकोमध्ये कंपनीचे प्लांट्स होते. मात्र, बटिस्टाच्या सत्तेदरम्यान बकार्डी कंपनीने हळूहळू आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन, ट्रेडमार्कचं लायसन्स, प्रोप्रायटरी फॉर्म्युला आणि बरीच मालमत्ता ‘बहामा’ला हलवली होती. यामुळेच क्युबाच्या क्रांतीनंतर देशातील सर्व मालमत्ता सरकार दरबारी जमा होऊनही बकार्डीचं फारसं नुकसान झालं नाही. यानंतर १९६५मध्ये बकार्डीने बर्मुडा देशातील हॅमिल्टनमध्ये आपलं नवीन ग्लोबल हेडक्वार्टर्स सुरू केलं.

क्युबाच्या क्रांतीमुळं बकार्डीसोबत आणखी एका ब्रँडचं नुकसान झालं होतं. तो म्हणजे ‘हवाना क्लब’.

होसे आरेचाबाला या व्यक्तीने हवाना क्लब नावाने लिकर विकण्यास सुरुवात केली होती. त्यांचा स्वतःचा असा विशिष्ट फॉर्म्युलाही होता. मात्र, क्रांतीनंतर झालेल्या सरकारने बकार्डीप्रमाणेच हवाना क्लबचीही मालमत्ता जप्त केली. बकार्डीसारखा बॅकअप नसल्यामुळे आरेचाबाला कुटुंबीयांनी क्युबा सोडलं, आणि रमचं उत्पादन बंद केलं. उत्पादनच बंद केल्यामुळे त्यांनी १९७३मध्ये अमेरिकेला आपला ट्रेडमार्क रद्द करण्याची परवानगी दिली. मात्र याचाच फायदा घेत क्युबा सरकारनं १९७६मध्ये हवाना क्लब नावाने अमेरिकेत ट्रेडमार्क रजिस्टर केला. या ट्रेडमार्कखाली लिकर तयार करण्याचं कंत्राट क्युबा सरकारने पेर्नोड रिकार्ड या कंपनीला दिलं. यामुळं बकार्डीनं १९९९ मध्ये ओट्टो रेईच या लॉबिस्टच्या मदतीनं अमेरिकेच्या एका कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मांडला. यालाच पुढे ‘बकार्डी कायदा’ म्हणूनही ओळख मिळाली.

या कायद्यानुसार, क्रांतीनंतरच्या क्युबा सरकारने सुरू केलेल्या उत्पादनांना ट्रेडमार्क संरक्षण मिळू नये, अशी तरतूद करण्यात आली. याचाच दाखला देत पुढे बकार्डीने क्युबा सरकारने अमेरिकेत घेतलेला ट्रेडमार्क अवैध ठरवण्यात यावा असा खटला दाखल केला. हे प्रकरण अजूनही सुरूच आहे.

पण आजची परिस्थिती पहायची झाली, तर क्युबामध्ये ‘बकार्डी’ रम ही दुर्मिळ आहे. आज क्युबामधील रमचा सर्वात मोठा ब्रँड हा ‘हवाना क्लब’ आहे. जो सरकारसोबतच्या भागिदारीमध्ये पेर्नोड रिकार्ड ही कंपनी बनवते. हीच ‘हवाना क्लब’ रम ही अमेरिका वगळता जगभरात बऱ्याच ठिकाणी विकली जाते. दुसरीकडे बकार्डीने आरेचाबाला कुटुंबियांकडून त्यांचा ओरिजिनल फॉर्म्युला विकत घेत, त्यापासून रम तयार केली आहे. जी ‘रिअल हवाना क्लब’ या नावाने फक्त अमेरिकेत विकली जाते. आपल्या या ‘रिअल हवाना क्लब’ ट्रेडमार्कला अमेरिकेबाहेरही परवानगी देण्यात यावी, यासाठी बकार्डी आजही कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे.

रमपासून सुरू झालेली बकार्डी, आज त्यासोबतच टकिला, स्कॉच व्हिस्की, बर्बॉन, अमेरिकन व्हिस्की, व्होडका, जिन, वर्माऊथ, स्पार्क्लिंग वाईन यासोबतच अनेक प्रकारची उत्पादनं घेतंय. तसेच बकार्डीचे आज तब्बल २००हून अधिक ब्रॅंड्स आणि लेबल्स उपलब्ध आहेत. तसेच, जगातील सर्वात जास्त पुरस्कार मिळालेला रम ब्रँड म्हणून बकार्डीची ओळख आहे. बकार्डीच्या मुख्यालयाबाबत बोलायचं झाल्यास, बर्मुडा हेच आता बकार्डीचं घर आहे, आणि पुढील ५०० वर्षांपर्यंत तरी बकार्डीचं मुख्यालय इथून हलणार नसल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश माधवन यांनी २०१९मध्ये स्पष्ट केलं होतं. हो, जगातील या मोठ्या लिकर ब्रँडचा सध्याचा सीईओ भारतीय आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

निळ्या त्वचेच्या कुटुंबाचं कोडं शास्त्रज्ञांनी शोधून त्यावर इलाज पण केलाय..!

Next Post

या माणसाने जगाला बेफिकिरीच्या हिप्पी लाइफस्टाइलचं वेड लावलं होतं..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या माणसाने जगाला बेफिकिरीच्या हिप्पी लाइफस्टाइलचं वेड लावलं होतं..!

इजिप्तमधील या जुळ्या मंदिरांना वाचवण्यासाठी सगळं जग एकवटलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.