The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

९ वर्षांचा हा नायजेरियन मुलगा जगातला सर्वात लहान अरबपती आहे..!

by द पोस्टमन टीम
18 February 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात दिवसाकाठी लाखो मुलं जन्माला येतात. काहींचा जन्म अतिशय गरिब घरांमध्ये होतो तर काही मुलं जन्मला येतानाच तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात. अशा मुलांमध्ये प्रामुख्यानं जे अब्जाधीश आणि कोट्याधीश आहेत त्याच्या मुलांचा समावेश होतो. जगात अशी अनेक मुलं आहेत जे जन्मापासून लक्झ्युरियस लाईफस्टाईल जगतात. आपल्या पालकांकडून मिळालेल्या संपत्तीमुळं त्यांना हे शक्य होतं. मात्र, ही संपत्ती जमा करण्यासाठी त्यांच्या पालकांना कित्येक वर्ष मेहनत करावी लागलेली असते.

दक्षिण आफ्रिकेतील एक मुलगा मात्र, याला अपवाद ठरला आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी हा मुलगा जगातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जाऊन बसला आहे. मोम्फा ज्युनिअर असं या मुलाचं नाव आहे. नायजेरियन इंटरनेट सेलिब्रिटी इस्माइलिया मुस्तफा याचा तो मुलगा आहे. मुस्तफाचादेखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होतो. या अब्जाधीश बाप-लेकाच्या जोडीबाबत जगभरातील नेटीझन्सला कुतुहल आहे. त्यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा…

मोम्फा ज्युनियरचं खरं नाव मोहम्मद अवल मुस्तफा आहे. पण त्याला लोकांमध्ये तो मोम्फा ज्युनियर नावानं प्रसिद्ध आहे. अवल मुस्तफाला इन्स्टाग्रामवर एक मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. मोम्फा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लक्झरी लाइफचे फोटो पोस्ट करत असतो. तो कायम सोशल मीडियावर प्रायव्हेट जेट, लक्झरी कार्स आणि घरांचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करतो. अवघ्या नऊ वर्षांचा या मुलाकडे ब्रँडेड कपडे, घड्याळं, शूज आणि गाड्यांचं कलेक्शन आहे.

असं म्हटलं जातं की, मोम्फा ज्युनियरला वयाच्या सहाव्या त्याच्या वडिलांनी सिल्व्हर रंगाची बेंटले कार गिफ्ट केली होती. याशिवाय त्याच्याकडं एकापेक्षा एक आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. फक्त डिझायनर कपडे घालणाऱ्या मोम्फाला व्हर्साचे आणि गुच्चीसारखे महागडे ब्रँड्स आवडतात. एकदम लॅव्हिश लाईफस्टाईलमुळंच मोम्फाला जगातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती समजलं जात आहे.

तुम्ही जर मोम्फा ज्युनिअरचं इन्स्टाग्राम पेज बघितल्यास, तुम्हाला त्याचे लाल रंगाच्या लॅम्बोर्गिनी अव्हेंटाडोरवर गाडीसोबतचे अनेक फोटो दिसतील. लक्झ्युरियस जेटमधीलसुद्धा काही फोटो त्याच्या अकाऊंटवर आहेत. काही फोटोंमध्ये मोम्फासोबत त्याची लहान बहिणही दिसते. डेली मेलनं दिलेल्या अहवालानुसार मोम्फा ज्युनियरची नेट वर्थ 15 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. लागोस ब्युरो डी चेंजमधील एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं ही माहिती डेली मेलनं प्रसिद्ध केली होती.



जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा विचार केल्यास जेफ बेझोस, एलॉन मस्क, बिल गेट्स यासारख्या दिग्गज उद्योजकांचा त्यामध्ये समावेश होतो. या लोकांनी यशाचं शिखर गाठण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं आहे. त्यानंतर त्यांना श्रीमंती अनुभवण्यास मिळत आहे. जगातील तरुण अब्जाधीशांबद्दल जरी बोलायचं झालं तरी, या तरुण मुलांनी दिवसरात्र कष्ट केलेले आहेत. मगच त्यांची जगानं दखल घेतली आहे.

मात्र, मोम्फा ज्युनियरनं सर्वांना मागे टाकत वयाच्या नवव्या वर्षीच सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. यामागे त्याचे वडील म्हणजे इस्मायला मुस्तफा यांचा मोठा वाटा आहे. ‘मोम्फा’ या नावानं प्रसिद्ध असलेला इस्मायला मुस्तफा दुबईस्थित नायजेरियन अब्जाधीश आहे. दोन मुलांचा पिता असलेला मुस्तफा दक्षिण-पश्चिम नायजेरियातील लागोस बेटावर स्थित असलेल्या मोम्फा ब्यूरो डी चेंजचा मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तो त्याच्या विलक्षण जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. मुस्तफानं वैध आणि अवैध दोन्ही मार्गांचा वापर करून बक्कळ संपत्ती जमा केलेली आहे. त्याच्याकडे लक्झरी आणि सुपरकार्सचा ताफा आहे. ज्यामध्ये लिमिडेट एडिशन रोल्स रॉयस व मर्सिडीज कार्सचा समावेश आहे. त्याच्याकडे अंदाजे 500 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे, असा अंदाज आहे. 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

मोम्फाला सप्टेंबर 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, मीडियाला या प्रकरणापासून लांब ठेवण्यात आलं होतं. केमी ओलुनलोयो या नायजेरियन मुक्त पत्रकारानं त्याच्या अटकेची बातमी बाहेर काढली होती. आपल्याला अटक होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर दुबईतून पळून जाण्याचा प्रयत्न करताना इंटरपोलनं त्याला ताब्यात घेतलं होतं. तो कित्येक दिवसापासून नायजेरियातील लाचलुचपत प्रतिबंधक एजन्सीच्या रडारवरदेखील होता. अशा मुस्तफाचा मोम्फा ज्युनियर हा मुलगा आहे. त्याला आपल्या वडिलांकडून अब्जावधी रुपयांची संपत्ती वारशात मिळाली आहे.

मोम्फा ज्युनियरला जगातील सर्वात लहान अब्जाधीश समजलं जात असलं तरी अधिकृत यादीमध्ये त्याच्या नावाचा समावेश झालेला नाही. केविन लेहमन हा १८ वर्षीय जर्मन मुलगा जगातील सर्वात तरुण अब्जाधीश आहे. त्याचे वडील, गुएन्थर लेहमन हे जर्मनीतील ‘ड्रोजरी मार्क्‍ट’ या औषध दुकानांच्या चेनचे मालक आहेत. त्यांनी केविड १४ वर्षांचा असतानाचं कंपनीचे काही शेअर्स त्याच्या नावे ट्रान्सफर केले होते. मात्र, तो १८ वर्षांचा होईपर्यंत त्याची संपत्ती विश्वस्तांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आली होती. सप्टेंबर 2020 मध्ये तो १८ वर्षांचा झाल्यानंतर त्याची संपत्ती त्याच्या ताब्यात देण्यात आली.

अब्जाधीश होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अब्जाधीश झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्व सुविधांसह मिळणारं विलासी जीवन जगण्याचा मोह कुणाला नाही होणार? मात्र, अब्जाधीश होण्याचा मार्ग नक्कीच सोपा नसतो. त्यासाठी काही लोकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ खर्ची घालावा लागतो. पण, नऊ वर्षीय मोम्फाला काहीही कष्ट न करता अब्जाधीश होण्याची संधी मिळाली आहे. आता मोठा झाल्यानंतर तो आपल्या कर्तृत्त्वानं हा मान आपल्याकडे कायम टिकवून ठेवतो की, वडिलांप्रमाणं गैरव्यवहारांमध्ये अडकून संपत्तीची उधळपट्टी करतो, हे येणारा काळचं स्पष्ट करेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फ्रेनॉलॉजी – कवटीचा आकार आणि मानवाचा स्वभाव यांचा संबंध दाखवणारे स्युडो सायन्स

Next Post

धोनी हेडनला म्हणाला, “काय म्हणशील ते देतो, पण ही ‘मंगूस बॅट’ नको वापरू..!”

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

धोनी हेडनला म्हणाला, "काय म्हणशील ते देतो, पण ही 'मंगूस बॅट' नको वापरू..!"

जाणून घ्या मातृसत्ताक कुटुंबपद्धती जपणाऱ्या 'किहनू' बेटाबद्दल...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.