The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गेली आठ दशकं आपल्या कानावर पडणारी रेडिओची धून एका ज्यू निर्वासिताने रचली आहे

by द पोस्टमन टीम
26 March 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


“आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ६ वाजलेत.”

अनेक घरांमध्ये हीच वाक्य गजराचं काम करतात. अगदी आमच्या घरातसुद्धा अजूनही सकाळी आई सगळ्यात आधी रेडिओ चालू करते आणि हे ऐकतच आमची सकाळ होते.

पण रेडिओवर प्रादेशिक बातम्या, कृषिनामा, गाणे हे सगळे कार्यक्रम चालू व्हायच्या आधी एक धून वाजते. गेली कित्येक वर्ष ही धून दिवसाची मधुर सुरुवात करते आहे.

भूपालीसारखाच पहाटेच्या प्रहरातला राग शिवरंजनी. व्हाईलीनवर वाजणारा कोमल गंधार स्वर आणि साथीला अर्थातच संथ वाजनारा तानपुरा. गेली ८ दशकं ही धून भारतात घराघरात वाजते आहे.



पण ही धून कोण्या भारतीयाने बनवली नव्हती. ती बनवली होती एका निर्वासिताने. तिचा निर्माता ना*झींपासून वाचत वाचत युरोपातून भारतात आलेला,झेक गणराज्याचा एक नागरिक होता.

त्याचं नाव होतं ” वॉल्टर कौफमन”.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

वॉल्टरचा जन्म १९०७ साली कार्ल्सबाद येथे ज्युलियस कौफमन याच्या ज्यू कुटुंबात झाला. त्याकाळी जर्मनीत हि*टल*रची सत्ता होती. ज्यूंना पकडून त्यांचे अपरिमित हाल केले जात होते. १९३४ साली जेव्हा हि*टल*रने प्रागवर चढाई केली त्यावेळी ना*झींपासून वाचण्यासाठी त्याने तिथून पलायन केले. २७ वर्षांचा वॉल्टर प्रागवरून निघाला आणि थेट येऊन पोहचला ते मुंबईच्या स्वप्ननगरीत.

इतके सगळे देश सोडून मुंबईच का? तर त्यावेळी भारताचा व्हिसा मिळणं फारच सोपं होतं म्हणून. आणि हो नाही करत त्याने तब्बल १४ वर्षं मुंबईत काढली.

वॉल्टर एक उत्कृष्ट संगीतकार होता. त्याला वाटलं होतं की भारतात आपल्या कलेला चांगला वाव मिळेल. त्यानी तसे प्रयत्न देखील केले. पण भारतीय संगीताशी त्याची गट्टी काही केल्या जमत नव्हती. त्याच्यामते ते अनाकलनीय होते.

पण तरीही त्याने हार मानली नाही. इथे आल्यावर थोड्याच दिवसात त्याने बॉम्बे चेंबर ऑफ म्युझिक सोसायटी काढली. याद्वारे दर गुरुवारी विलिंग्डन जिमखान्याला त्यांचा गाण्याचा कार्यक्रम असायचा.

अवघ्या वर्षभरातच ही सोसायटी लोकप्रिय झाली. त्यांनी जवळजवळ १३० कार्यक्रम केले आणि प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल.

वॉल्टरची काही पत्रं नंतर सापडली त्यात तो म्हणतो की सुरुवातीला मला हे संगीत अजिबात आवडलं नाही कारण कळतच नव्हतं काही. पण नंतर मला लक्षात आलं की हे संगीत फार मनापासून तयार केले आहे, याला समजून घ्यायचं असेल तर अगदी मुळापासून सुरुवात करून याचं शिक्षण घ्यावं लागेल.

थोड्या दिवसांनी त्याने आकाशवाणीला संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली. १९३६ ते १९४६, दहा वर्षं तो आकाशवाणीला होता. तिथेच त्यांनी आपली आवडती धून बनवली. यात त्याला वायोलिनची साथ दिली होती मेहली मेहता यांनी.

मुंबईमध्ये वॉल्टरला काम मिळावं म्हणून चक्क अल्बर्ट आइनस्टाइनने शिफारशीचं पत्र पाठवलं होतं.

त्यात ते लिहितात की,

“वॉल्टर कौफमनला मी गेली अनेक वर्षे ओळखतो आहे. तो एक अत्यंत प्रतिभावंत संगीतकार आहे. आजवर त्याने अनेक रचना केल्या आहेत आणि सगळ्या एकापेक्षा एक आहेत. संगीतासोबतच त्याला अध्यापनाचा देखील चांगला अनुभव आहे. कुठल्याही शाळेत संगीत संचालक म्हणून काम करण्यास योग्य व्यक्ती आहे.”

वॉल्टर ज्यावेळेस मुंबईला आला तेव्हा चित्रपट क्षेत्रात बदल होत होते. मूक अभिनयाची जागा आता संवादाने घेतली होती. वॉल्टरचे पाश्चिमात्य संगीतात प्रभुत्व तर होतेच. त्याचा त्याला सिनेक्षेत्रात चांगलाच फायदा झाला. त्याने मोहन भावनानीच्या कितीतरी चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले होते.

१९४६ मध्ये त्याची भारताची सफर संपली. इथून तो वर्षभर इंग्लंडमध्ये राहिला जिथे त्याने बीबीसी मध्ये काही दिवस काम केले. १९५७ पर्यंत वेगवेगळ्या जागी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर त्याने १९५७ मध्ये अमेरिकेला आपली दुसरी पत्नी फ्रेडा हिच्यासोबग कायमस्वरूपी स्थायी होण्याचा निर्णय घेतला.

तिथे तो इंडियाना विद्यापीठाच्या संगीत विभागात १९७७ पर्यंत संगीत शिकवत होता. १९८४ साली त्याला देवाज्ञा झाली.

आज त्याला जाऊन जवळपास ३ दशकं उलटली पण त्यांनी तयार केलेली धून आज कितीतरी पिढ्यांना सकाळी उठवण्याचे काम करतायत. संगीताला भाषा नसते, प्रांत नसतो, कुठलीही मर्यादा नसते याची साक्ष वॉल्टरची ही अजरामर धून देते आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

संजय गांधी आजवरचे गांधी परिवाराचे सर्वात वादग्रस्त सदस्य आहेत

Next Post

लोकमान्य टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला मोहम्मद अली जीनांनी लढवला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

लोकमान्य टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला मोहम्मद अली जीनांनी लढवला होता

गांधीजींच्या अगोदर भारतीय नोटांवर कोणाचे फोटो असायचे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.