The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..म्हणून जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असते.!

by द पोस्टमन टीम
29 March 2024
in विश्लेषण, आरोग्य, संपादकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जागतिक आरोग्य संघटना. जागतिक आरोग्य समस्यांशी लढण्यासाठी या संस्थेची स्थापना ७ एप्रिल, १९४८ रोजी झाली. परंतु कोरोना विषाणूच्या संक्रमणाबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल या संघटनेची सध्या जगभरात अवहेलना केली जात आहे. 

चीनबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या आरोप करत संघटनेचे अध्यक्ष असलेले ‘टेड्रोस ए घेब्रेयसस’ यांच्यावर जगभरातून टीका केली जात आहे. कोरोनाच्या प्रसारात चीनचा हात होता ही बाब दाबून टाकण्याचा प्रयत्न या संघटनेमार्फत केला जात आहे असा आरोप संघटनेच्या अध्यक्षांवर केला गेला आहे.

संघटनेचे अध्यक्ष ‘टेड्रोस ए घेब्रेयसस’ यांच्यावर त्यांचा संबंध द*हश*तवादी संघटनांशी आहे असाही आरोप करण्यात आला आहे. आज आपण याच आरोपांचा लेखाजोखा बघणार आहोत.

टेड्रोस हे एक कम्युनिस्ट नेते होते. ‘पॉलिटिकलाइट पोर्टल’ने टेड्रोस यांच्या जुन्या छायाचित्रांबरोबर छापलेल्या वृत्ताचे शिर्षक आहे- “जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष एक इथोपियन द*हश*तवादी आहेत”. या वृत्तानुसार टेड्रोस यांना ‘टिगरे पीपल्स लिबरेशन फ्रंट/आर्मीचे सदस्य म्हटले आहे आणि ते या संघटनेत असताना तिसरे महत्त्वपुर्ण अधिकारी होते असेही या वृत्तात नमुद केले आहे.



खरे तर या संघटनेला इथियोपियामध्ये राजकीय पक्ष म्हणून ओळखले जाते. परंतु, १९९० च्या दशकात अमेरिकेने या संघटनेस द*हश*तवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले होते. ‘द हिल’ वृत्तपत्राच्या आत्ताच आलेल्या वृत्तानुसार हा पक्ष काही संघर्षानंतर सत्तेत आला होता आणि नंतर ९०च्या दशकाच्या सुरवातीस या पक्षास वैश्विक द*हश*तवाद्यांच्या सुचीमध्ये टाकण्यात आले. या पक्षाशी असलेल्या संबंधामुळेच ‘टेड्रोस’ यांना द*हश*तवादी म्हणून संबोधले जात आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

यु*ध्दनितीबरोबरच भेदभाव आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन असे अनेक आरोप या संघटनेवर केले गेले. ‘पॉलिटिकलाइट’च्या मते या पक्षाच्या कारकीर्दीत आरोग्य मंत्री असलेल्या टेड्रोस यांच्या काळात अमहारा प्रजातीच्या लोकांचा जन्मदर अतिशय कमी झाला. त्याच बरोबर जनगणनेच्या वेळी याच प्रजातीच्या २० लाख लोकांना गायब करण्यात आले.

सन २००० आणि २०१० मध्ये इथियोपियामध्ये आलेल्या कॉलराच्या साथीच्या वेळीही टेड्रोस यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप लावला गेला पण तो त्यांनी फेटाळून लावला. तसेच विदेश मंत्री असताना एका ब्रिटिश नागरिकावर बळजबरी केल्याचा आरोप झाला होता. नक्षली हिं*सेच्या बाबतीत ‘मानवाधिकार वॉच’ने इथियोपिया सरकारवर ४०० मृत्यू, ७० हजार आंदोलकांची अटक आणि १५ हजार लोकांच्या स्थलांतरासाठी जिम्मेदार धरले होते.

‘पॉलिटिकलाइट’ आणि ‘द हिल’ दोघांच्या वृत्तानुसार २०१७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर टेड्रोस यांनी झिंबाब्वेचा माजी हुकुमशहा ‘रॉबर्ट मुगाबे’ याला जागतिक आरोग्य संघटनेचा सदिच्छादुत म्हणून निवडले. या नियुक्तीवरही वाद उद्भवले होते, ज्याचा परीणाम म्हणून ‘मुगाबे’ला पदावरुन हटविण्यात आले होते.

कोरोनाच्या जागतिक प्रसारात चीनची चूक नसल्याचे स्पष्टीकरण देऊन टेड्रोस यांनी चीनची पाठराखण केली आहे. इथियोपियामध्ये चीनच्या असलेल्या भरघोस गुंतवणूकीमुळे टेड्रोस चीनची पाठराखण करत आहेत असा अंदाज जगभर वर्तवला जात आहे. ‘द हिल’नेही या गोष्टीस दुजोरा दिला आहे.

चीनबाबत असणाऱ्या वादांबरोबरच अजुनही बरेचसे वाद जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीत आज चालू आहेत. कोरोना विषाणू जगभरात पसरला असुन हजारो मृत्यू होत आहेत. कोरोना विषाणूला हाताळण्यात जागतिक आरोग्य संघटना पुर्णपणे निष्फळ ठरल्याचा आरोप संघटनेवर केला जात आहे. अमेरिकेच्या नेहमीच निशाण्यावर असलेले टेड्रोस आता बाकी संयुक्त राष्ट्र सदस्यांच्या नजरेतही आले आहेत.

टेड्रोस यांच्याबरोबरच संघटनेच्या भविष्यावरही आता टांगती तलवार आहे. कोरोना विषाणूमुळे टेड्रोस यांची कारकिर्द आता धोक्यात आली आहे एवढे मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

20 हजार टन डिझेल नदीत मिसळल्यामुळे रशियात आणीबाणी लागू केली आहे.

Next Post

१९१८च्या महामारीत व्हिस्कीचा वापर औषध म्हणून केला जात होता..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

१९१८च्या महामारीत व्हिस्कीचा वापर औषध म्हणून केला जात होता..!

आदिवासींना अ*त्याचारांची जाणीव करून देऊन इंग्रजांविरोधात एल्गार करणारे भगवान बिरसा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.