The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या गावातले लोक एकमेकांशी चक्क पक्षांच्या भाषेत संवाद साधतात

by द पोस्टमन टीम
24 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही शाळेत असताना कधी एकमेकांना शिट्टी मारून जवळ बोलावलंय? किंवा मुलींना पाहून शिट्टी मारणारा एखादा मुलगा तर नक्कीच पाहिला असेल. त्या व्यक्तीनं आपल्याकडे पहावं किंवा आपल्या जवळ यावं हाच शिट्टी मारण्याचा उद्देश असतो. म्हणजे हे एक प्रकारचं संभाषणचं आहे, असं म्हणता येईल. हे असं शिट्टीचं संभाषण एखाद्या वेळेपुरता मर्यादित न राहता जर दैनंदिन आयुष्यात लागू करता आलं तर, किती मजा येईल, पण सगळं संभाषण शिट्टीच्या माध्यमातून करणं शक्य आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

पृथ्वीवर असा एक प्रांत आहे ज्या ठिकाणचे लोक फक्त शिट्टी मारून एकमेकांशी संवाद साधतात. जसे पक्षी शीळ घालून एकमेकांशी संवाद साधतात अगदी तसंच हे नागरिक संवाद साधतात.

टर्कीमधील गिरसन या प्रातांतील कॅनाक्की या जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिक केवळ शिट्ट्यांच्या मदतीनं संवाद साधतात. खडकाळ, डोंगराळ प्रदेशात लांब अंतरापर्यंत यामुळे संवाद साधता येतो. शिट्या वाजवण्याची त्यांची एक अत्यंत विकसित प्रणाली आहे.

शिट्यांच्या या अनोख्या भाषा प्रणालीविषयी अधिक माहिती घेण्याअगोदर भाषा काय आहे आणि तिचं मानवाच्या आयुष्यात काय महत्त्व आहे, याबाबत जाणून घेऊया.

सजीव प्राण्यांचा विचार केला तर मानव हा एकमेव प्राणी आहे जो तोंडानं बोलून आपल्या भाव-भावना समोरच्या वक्तीला सांगू शकतो. इतर प्राण्यांचं तसं नाही. त्यांना मानवाप्रमाणं बोलता येत नाही. एकूणच भाषा ही दोन व्यक्तींमधील संवादाचा मुख्य माध्यम आहे. संवादासाठी आपण कधी ‘स्पोकन लँग्वेज’चा वापर करतो तर कधी ‘साईन लँग्वेज’चा. भाषा ही विशिष्ट देश किंवा समुदायाद्वारे वापरलेली एक संप्रेषण प्रणाली असते.



कशी आहे टर्कीतील शिट्ट्यांची भाषा?

कुशको हे गाव त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं. पर्वतांच्या कुशीत वसलेल्या या गावात चहा आणि हेजलनट्सची शेती केली जाते. या गावात पाय ठेवल्यानंतर शिट्ट्यांचे आवाज कानावर पडतात. घरी असलेले लोक थेट शेतात असलेल्या लोकांशी शिट्ट्यांच्या मदतीनं चक्क गप्पा मारताना दिसतात. प्रत्येक शिट्टीला एक वेगळी लय आणि आपल्या शब्दांप्रमाणं अर्थही आहे.

उत्तर टर्कीत गेल्या कित्येक शतकांपासून ही भाषा बोलली जाते. तिचा उगम नेमका कुठे आणि कसा झाला याबाबत माहिती नाही. मात्र, १९५६ साली पहिल्यांदा या भाषेचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास झाला. १९६८ साली याविषयी एक रिसर्च पेपर प्रकाशित करण्यात आला होता. ५० वर्षांपूर्वी कुशको गावासह इतर काही गावांमध्ये ही शिट्ट्यांची भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जात असे. मात्र, काळाच्या ओघात आता ही भाषा येणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. २०१४ पासून स्थानिक प्रशासन आपला हा भाषेचा अनोखा वारसा वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हापातळीवरील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मुलांना शिट्ट्यांच्या सहाय्यानं संभाषण करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

‘बर्ड लँग्वेज’च्या संवर्धनासाठी युनेस्कोचा पुढाकार

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत. संवादासाठी मोबाईल फोन आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अगदी घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीला बोलावण्यासाठी देखील आपण फोनचा वापर करतो. या सर्व परिस्थितीमुळं टर्कीतील ही शिट्ट्यांची भाषा नष्ट होण्याचा धोका आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सांस्कृतिक विभागानं टर्कीतील या शिट्ट्यांच्या भाषेला ‘बर्ड लँग्वेज’असं नाव दिलं असून तिला तातडीने संरक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. उत्तर टर्कीमधील या भाषेला युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केलं आहे.

युनेस्कोच्या या पुढाकारानंतर टर्कीचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री न्यूमन कुर्तुल्युमस यांनी ट्विट करून ‘ब्लॅक सी’च्या किनारी भागात राहणाऱ्या आणि ही भाषा बोलणाऱ्या नागरिकांचं अभिनंदन केलं होतं.

उत्तर टर्की विद्यापीठानं आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक खास अभ्यासक्रम सुरू केला आहे. ‘बर्ड लँग्वेज’ या विषयावर काही निवडक कोर्स विद्यापीठानं सुरू केले आहेत. कुशको (शब्दशः अर्थ बर्ड व्हिलेज) गावातील लोकांची शिट्ट्यांची भाषा विद्यापीठाच्या पर्यटन विभागात शिकता येणार आहे. सध्या विद्यापीठाच्या ‘भाषा विभागातील’ काही विद्यार्थ्यांना स्थानिक लोक ही भाषा शिकवत आहेत. हे विद्यार्थी पूर्णपणे पारंगत झाल्यानंतर त्यांचीच विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

फक्त कुशकोच नाही तर, जगभरात एक डझनपेक्षा जास्त ठिकाणी शिट्ट्यांची भाषा बोलली जाते. प्रामुख्यानं घनदाट जंगलांच्या आणि डोंगराळ भागात एकमेकांशी संवाद साधणं कठीण असतं. अ‌ॅटलास पर्वत, लाओसमधील हायलँड्स आणि अमेझॉनच्या खोऱ्यात ही समस्या जास्त आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे त्याठिकाणी संपर्क साधनांचा देखील विकास झालेला नाही. त्यामुळं स्थानिक लोक शिट्ट्यांची भाषा वापरतात. ठराविक अंतरापर्यंत यामुळे संवाद साधता येतो.

अमेरिकेतील अलास्कामध्ये युपीक, मेक्सिकोमध्ये अम्युझगो, टोटोनॅक, झापोटेक, पोपोल्युका, बोलिव्हियामध्ये सिरिनो, कोलंबियामध्ये देसानो, ब्राझीलमध्ये पिरान्हा या शिट्ट्यांच्या भाषा आहेत. आशिया खंडातील चीनमध्ये बे, व्हिएतनाममध्ये हमाँग, बर्मामध्ये चीन, नेपाळमध्ये चेपाँग या भाषा वापरल्या जातात. युरोपात स्पेनमध्ये ला गोमेरा, अल सिलिबो, फ्रान्समध्ये ओसिटन, ग्रीसमध्ये सफारिया या भाषांचा वापर होतो. आफ्रिकेतील जंगलांमध्ये बेन्च, बाफिया, बोबो, योरूबा, मोफू याभाषा वापरल्या जातात.

काळाच्या ओघात आणि बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरताना या भाषांचा अमूल्य ठेवा नष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण कुठल्या न कुठल्या प्रकारे संभाषण होणं अतिशय गरजेचं असतं. ‘बर्ड लँग्वेज’सारख्या भाषांचा वापर करून जर संभाषण झालं तर ते नक्कीच जास्त रंजक होईल नाही का?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अपयश झाकण्यासाठी परिस्थितीला दोष देताय, मग चेतन सकारियाची ही स्टोरी वाचाच

Next Post

अमेरिकेने एकदा ब्रिटनवर ह*ल्ला केला होता पण ब्रिटनने एवढं सिरियसली घेतलं नाही

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

अमेरिकेने एकदा ब्रिटनवर ह*ल्ला केला होता पण ब्रिटनने एवढं सिरियसली घेतलं नाही

फेरारीने अपमान केला म्हणून जगातली सगळ्यात लॅव्हिश कार जन्माला आली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.