The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१९१८च्या महामारीत व्हिस्कीचा वापर औषध म्हणून केला जात होता..!

by द पोस्टमन टीम
2 June 2025
in आरोग्य, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


२०२१ साली कोरोनाचा प्रादुर्भाव झाला म्हणून अत्यावश्यक सेवांसोबतच दारूचे दुकानं निर्धारित वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. २०२० च्या लॉकडाऊनच्या दरम्यान जेव्हा ही दुकानं उघडली होती, तेव्हा काय परिस्थिती निर्माण झाली हे तर आपण पाहिलंच असेल. दारूच्या दुकानासमोर अचानक गर्दी वाढली, लोकांनी कित्येक ठिकाणी तर किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आणि दारू मिळवली.

अशा महारोगाच्या साथीच्या काळात निर्बंध असताना अल्कोहोलची वाढती मागणी ही काही नवीन नाही. एकोणिसाव्या शतकातसुद्धा अशीच एक घटना घडली होती जेव्हा व्हिस्कीची मागणी प्रचंड वाढली होती.

खूप पूर्वी स्पॅनिश फ्लू नावाचा एक महारोग आला होता. यावेळी पहिल्या महायु*द्धाच्या शेवटी १९१८ साली अमेरिकेत या रोगावर औषध शोधण्यात यश आलं होतं. तुमचा विश्वास बसणार नाही पण या वेळी चक्क व्हिस्की हे या रोगावरचं औषध झालं होतं. पण त्यावेळी उपचारांची सुरुवात झाली आणि कित्येक राज्यांनी व्हिस्कीवर बंदी घातली. यावेळी दारू मिळणं अशक्य झालं होतं.

दारूवर आलेल्या निर्बंधांमुळे राज्यांतील दारूची दुकानं बंद झाली होती. लोक व्हिस्कीसाठी तळमळत होते, भीक मागत होते. हे चित्र पाहून काही अधिकाऱ्यांनी या बंदीच्या काळात जप्त केलेली अवैध दारू अनेक स्टोअर्समधून लोकांना देण्याचा प्रयत्न केला होता.

एका रात्रीत अचानक वाढलेल्या या व्हिस्कीच्या लोकप्रियतेचे कारण म्हणजे अमेरिकन वृत्तपत्रांतील काही बातम्यांत असे प्रकाशित करण्यात आले होते की, सैन्याचा फ्लूपासून बचाव करण्यासाठी जप्त केलेली व्हिस्की सैन्य छावणीत वापरण्याचा सल्ला सैन्य डॉक्टर देत आहेत. जिथे फ्लूच्या जोखमीमुळे ५०० सैनिकांचा जीव गेला होता, तिथे व्हिस्कीमुळे शेकडो सैनिक बरे झाले होते.



जेव्हा माध्यमांनी सैन्यदलाकडून या गोष्टीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सैन्याने या गोष्टीबाबत मौन बाळगलं. याचवेळी दुसरीकडे या दारूबंदीच्या समर्थक गटांनी असा दावा केला की जर वर्तमानपत्रांच्या अशा कथा पूर्णपणे चुकीच्या नसतील पण त्यात नक्कीच त्यांनी अतिशयोक्ती केली असणार. काहींनी तर या कथांना जर्मन प्रपोगंडा देखील म्हटले. अमेरिकन सैनिक दारूमुळे आजारी पडावेत म्हणून जर्मनीने साधलेला हा निशाणा आहे असं त्यांना वाटत होतं.

दारूबंदीला समर्थन असणारा गट काही करणार त्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी सरकारी रूग्णालयातही अवैध व्हिस्की पुरावण्याचं काम केलं होतं. ओमाहा, नेब्रास्कामधील रुग्णालयांना ५०० गॅलन मद्य पुरवठा करण्यात आला होता. वॉशिंग्टन आयुक्तांनी देखील उत्तर कॅरोलिना मध्ये जप्त केलेली व्हिस्की रुग्णांना देण्याचे आदेश दिले होते.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

प्रशासकीय स्तरावर व्हिस्कीवर इतका वादविवाद चालू असताना व्हिस्कीची औषधी गुणवत्ता काय आहे आणि असेल ती नेमकी कशी ठरवायची याबाबत डॉक्टरांमध्ये चर्चा व्हायला लागली होती. 

१९१६ साली एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराच्या वेळी व्हिस्की, ब्रँडी आणि वाइनला ड्र*ग एजंट म्हणून नाकारण्यात आले होते. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने देखील औषधांच्या क्षेत्रात अल्कोहोलचा वापर न करण्याची जोरदार शिफारस केली होती.

पण जेव्हा डॉक्टरांचा एक गट व्हिस्कीचा तसेच इतर अल्कोहोलयुक्त पदार्थांचा विरोध करीत होते त्याच वेळी काही तज्ज्ञ डॉक्टरांचा असा एक गट होता की ज्यांचा अल्कोहोलयुक्त औषधांवर विश्वास होता. 

याबद्दलची चर्चा दीर्घकाळ चालली. १९२२ साली जेव्हा मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांमध्ये सर्वेक्षण केले, तेव्हा केवळ १ टक्का डॉक्टर लोकांचा असा विश्वास होता की व्हिस्की थेरपी एजंट म्हणून योग्य आहे. म्हणजेच एक गट असे म्हणत होता की अल्कोहोल हा घटक आजारपणात हृदय आणि श्वसन प्रणालीस मदत करतो. तर दुसर्‍या गटाचं असं म्हणणं होतं की औषधांमधील अल्कोहोलच्या वापरामुळे रुग्णांना नशा होते आणि त्यांना काही काळ आराम मिळतो.

नॅशव्हिलमधील डॉक्टरांच्या सूचनांच्या आधारे स्थानिक अधिकाऱ्यांनी नागरिकांना १०,००० व्हिस्कीच्या बाटल्या दिल्या. इतकेच नाही तर या काळात प्रिस्क्रिप्शनवरुन व्यवसायसुद्धा सुरू झाला होता. १९१९ मध्ये पिट्सबर्गमधील चार डॉक्टरांना बनावट प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी अटक केली गेली, ज्यांनी व्हिस्कीचा एक डोस अनावश्यकपणे रुग्णाला दिला होता. हे डॉक्टर बनावट पुराव्यांच्या आधारे प्रति बाटली १ डॉलर कमवत होते, तर मेडिकल स्टोअरला प्रत्येक बाटलीमागे ५ डॉलर मिळत होते. या गदारोळाबद्दल वर्तमानपत्रात बर्‍याच बातम्या छापल्या जातं होत्या.

औषधनिर्मात्यांना या संपूर्ण प्रकरणातून पैसे कमविण्याची अक्कल आली होती. इन्फ्लूएन्झासाठी ज्या औषधांची विक्री केली जात होती अशा औषधांची जाहिरात करताना ते जाहिरातीत या औषधात अल्कोहोल आहे हा मुद्दा प्रामुख्याने समाविष्ट करत.

मास्टर मेडिसिन म्हणून वापरले जाणारे औषध टानलॅकबद्दल असा दावा केला गेला होता की त्यात १७% अल्कोहोल आहे, तर पेरूना नावाच्या दुसर्‍या पेटंट औषधामध्ये २८% अल्कोहोल असल्याची जाहिरात करण्यात आली होती.

म्हणजेच व्हिस्कीची मागणी आणि त्या वेळी औषधाच्या रूपामुळे निर्माण झालेली खळबळ यात औषधाच्या बाजाराने कोणतीही कसर सोडली नाही. हिस्ट्री डॉट कॉमच्या लेखावर आधारित या कथेचा शेवट जर आपण पाहिला तर असे लक्षात येते की एक आपत्कालीन आजाराच्या साथीच्या वेळी भेडसावणारी कोणतीही समस्या खळबळजनक होते आणि त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला जातो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

..म्हणून जागतिक आरोग्य संघटना चीनची पाठराखण करत असते.!

Next Post

आदिवासींना अ*त्याचारांची जाणीव करून देऊन इंग्रजांविरोधात एल्गार करणारे भगवान बिरसा

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
Next Post

आदिवासींना अ*त्याचारांची जाणीव करून देऊन इंग्रजांविरोधात एल्गार करणारे भगवान बिरसा

नेपाळ-भारत सीमेवर सैन्य तैनात करणाऱ्या नेपाळची सैन्यशक्ती किती आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.