The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटच्या आधी गुरु रवी शास्त्रींनी बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं

by द पोस्टमन टीम
14 February 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपण अनेक क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरीज वाचत असतो. क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील प्रेमसंबंध आपल्यासाठी नवीन नाहीत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची लव्हस्टोरी आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची देखील एक अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी आहे.

रवी शास्त्री ज्यावेळी क्रिकेट खेळत होते, त्यावेळी त्यांना भारतातील सर्वात कुल क्रिकेटर मानले जायचे. प्रत्येक मॅचच्या वेळी त्यांच्या समवेत कुठली न कुठली मुलगी नेहमी असायची. असं म्हणतात की त्याकाळी बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंह यांचे रवी शास्त्रीवर प्रेम होते. दोघांचे प्रेम चर्चेचा विषय बनले होते.

रवी शास्त्री ज्यावेळी मैदानावर खेळायला उतरत त्यावेळी मुली आनंदाने जल्लोष करायच्या. रवी शास्त्री यांचे मुलं कमी पण मुलीच जास्त चाहत्या होत्या. अनेक मुलींना रवी शास्त्रींशी विवाह करायचा होता. रवी शास्त्री ज्यावेळी मैदानात यायचे त्यावेळी मुली जोरजोरात टाळया वाजवून त्यांचे स्वागत करायचा.

शास्त्री यांना त्याकाळी सर्वात स्मार्ट क्रिकेटर मानले जात होते. आपल्या उमेदीच्या काळात रवी शास्त्री एक पोस्टर बॉय होते. त्यांच्या आकर्षक बांध्यामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे अनेक मुली त्यांच्या दिवान्या होत्या.

रवी शास्त्री ज्यावेळी बॅटिंग करायचे, त्यावेळी मुलींच्या नजरा फक्त त्यांच्यावर खिळलेल्या असत. त्याकाळी अनेक क्रिकेटर होते, पण रवी शास्त्री यांची गोष्टच निराळी होती. मैदान असो की क्लबमध्ये एकांतात, जिथेही रवी शास्त्री जातील तिथे त्यांच्याभोवती मुली गराडा घालतच असत.



रवी शास्त्री यांची लाइफस्टाईल फारच झकास होती. लोक तर त्यांना प्लेबॉय म्हणूनच ओळखत. त्यांच्याभोवती नेहमी ग्लॅमरचे वलय होते.

रवी शास्त्री यांनी फक्त सामान्य मुलींना आपले फॅन केले नाही, अनेक बॉलिवूड तारका देखील त्यांच्या फॅन होत्या. या फॅन्सपैकी एक होती अमृता सिंह.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

असं म्हणतात कि अमृता सिंह यांचे रवी शास्त्री यांच्यावर प्रेम होते. रवी शास्त्री यांच्या चार्मपासून त्या स्वतःला लांब ठेवू शकत नाही. रवी शास्त्री ८०च्या दशकात अनेकांच्या मनातील ताईत बनले होते. दुसरीकडे अमृता सिंह बॉलिवूडमध्ये नशीब आजमावत होत्या. रवी शास्त्री यांच्या ग्लॅमरमुळे बॉलिवूडमध्ये त्यांचे चांगले संबंध होते. ते नेहमी बॉलिवूडच्या पार्टीजला उपस्थित असायचे.

रवी शास्त्री आपल्या हँडसम लूकमुळे ते अनेक नियतकालिकेच्या कव्हर पेजवर दिसायचे. अशाच एका कव्हरवर त्यांना अमृता सिंह यांच्यासोबत झळकायचे होते. त्यावेळी फोटोशूटसाठी दोन्ही एकत्र आले आणि त्यांची लवस्टोरी आकारास येऊ लागली. फोटोशूट झाल्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध बहरले. दोघांच्या अफेयरच्या बातम्या मीडिया गॉसिप्सचा विषय बनल्या.

शास्त्री यांच्यावर अमृता यांचे एवढे प्रेम होते की त्या त्यांच्या प्रत्येक मॅचला उपस्थित राहू लागल्या. रवी शास्त्री मैदानात आल्यावर अमृता यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असायचा. यानंतर सर्वांचा विश्वास बसला की अमृता आणि रवी शास्त्री यांच्यात नक्कीच काहीतरी शिजतंय.

रवी शास्त्री नेहमी अमृताबरोबर दिसू लागले. दोन्ही नेहमी एकत्र फिरताना दिसायचे. पण दोन्ही कधीच मीडियासमोर आपल्या नात्याची कबुली देत नव्हते. दोघंही आपल्या करियरवर फोकस करतोय, असं उत्तर द्यायचे. जगासमोर जरी दोन्ही मित्र बनत असले तरी त्यांना लोक एकत्र बघायचेच. बऱ्याचदा रवी शास्त्री यांच्यासोबत अमृता परदेशात क्रिकेट दौऱ्यावर देखील जात.

अशातच एक दिवस रवी आणि अमृताने साखरपुडा केला असल्याची बातमी मीडियात पसरली. ही बातमी बाहेर आल्यावर दोघे चर्चेचा विषय बनले. रवी आणि अमृता यांच्या संबंधांची चर्चा बराचकाळ सुरु होती. मीडिया त्यांना सतत प्रश्न विचारु लागली. पण काही काळाने ही बातमी खोटी सिद्ध झाली.

बरेच दिवस रवी आणि अमृता यांच्या साखरपुड्याच्या चर्चा चालू होत्या पण., अचानक दोघांची पण नावं, चर्चा मीडियातून गायब झाल्या. दोघांनीही असं काही नसण्याचं वारंवार सांगितलं म्हणून कोणीतरी अफवा पसरवली, असं बोललं जाऊ लागलं. काही काळाने मात्र दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. दोघांनी ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाल्या. १९९०मध्ये अमृता सैफ अली खानसमवेत लग्नाच्या बेडीत अडकली. दोघांनी आपला संसार थाटला आणि रवी-अमृता यांच्या संबंधांच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला.

रवी शास्त्री आणि अमृता राव यांच्या संबंधाची त्यावेळी खूप चर्चा होती. विराट आणि अनुष्काप्रमाणे हे प्रेम यशस्वी होऊ शकलं नाही. कदाचित अमृता आणि रवी शास्त्री  यांच्या नशिबात एकमेकांचा सहवास कधीच नव्हता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कहाणी आयर्लंडमधील बटाट्यांच्या दुष्काळाची !

Next Post

काशीतल्या एका पुजाऱ्याने महात्मा गांधींनाच शाप दिला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

काशीतल्या एका पुजाऱ्याने महात्मा गांधींनाच शाप दिला होता

जाणून घ्या, ओरछाच्या किल्ल्याचा वैभवशाली इतिहास..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.