The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेम्स बॉण्डने कॅडबरी जेम्सला कोर्टात खेचलं होतं

by द पोस्टमन टीम
23 February 2021
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


“कॅडबरी” या कंपनीचे चॉकलेट आवडत नाहीत असा माणूस देशात सापडणे कठीणच. “कॅडबरी इंडिया”चे बहुसंख्य उत्पादने आबाल वृद्धांमध्ये लोकप्रिय आहेत. जगातील ही दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी कन्फेक्शनरी प्रोडक्ट निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीचे “कॅडबरी इंडिया” म्हणून भारतामध्ये युनिट आहे. या कंपनीचे सुमारे २०० हून जास्त चॉकलेट, कँडी, चॉको पावडर अशी उत्पादने आहेत.

काही कारण असो वा नसो आपल्या प्रत्येकाच्या बॅगमध्ये कॅडबरी इक्लेअर्स, कॅडबरी चॉकलेटची छोटी पाकिटे असतातच.

कॅडबरीच्या या विक्रीमागे त्याच्या अनेक हटके जाहिराती देखील कारणीभूत ठरलेल्या आहेत.

“कुछ मीठा हो जाये!!” म्हणत जीवनातील सर्व आनंदाच्या, उत्सवाच्या, गोड क्षणांच्या प्रसंगी आपल्याला तोंड गोड करायला चॉकलेट हवेच अशा जाहिरातीमुळे तिने भारतीयांच्या घरामध्ये मानाचे स्थान पटकावलेले आहे.

आपण ज्या जाहिराती पाहतो त्यामध्ये अनेकदा उत्पादनाचे नाव झळकल्यावर त्याच्या उजव्या बाजूला वर कोपऱ्यात TM असे चिन्ह पाहतो. उदा. कॅडबरी, पारले-जी, ब्रिटानिया, पतंजली ही जी नावे आहेत या नावांच्या मागे अनेकदा आपण TM चिन्ह पाहतो. या चिन्हाचा फुल फॉर्म होतो Trademark.



ज्या ज्या नावांच्या मागे असे सिम्बॉल लागलेले असते त्याचा अर्थ होतो की सदरचे नाव हे एक ब्रँडनेम असून ते ट्रेडमार्क म्हणून त्या त्या देशातील ट्रेडमार्क कायद्याखाली संरक्षित केलेले आहे. या नावाने अन्य कोणीही कसलीही जाहिरात करू शकत नाही. या नावात किरकोळ बदल करून कोणीही आपली नकली उत्पादने विकण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत.

आपण ज्या जाहिराती पाहतो त्या बऱ्याच वेळा या ट्रेडमार्क कायद्याचा भंग करतात आणि त्यानंतर त्यांची दीर्घकाळ कोर्टात न्यायालयीन लढाई देखील चालते. अगदी सुप्रसिद्ध उदाहरण घ्यायचे झाले तर आपली भारतीय औषध कंपनी “नॅटको वि. अमेरिकन कंपनी बायर”चे उदाहरण घेता येईल.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

भारताच्या नॅटको फार्मा कंपनीला बायर कंपनीचे मूळ औषध “नेक्सावार”चे जेनेरिक व्हर्जन तयार करत राहण्याचे आदेश मिळाले. हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गाजला.

टोयोटा कंपनीने देखील प्रियस ऑटोमोबाईल कंपनी विरुद्ध आपला जुना रजिस्टर्ड ट्रेडमार्क प्रियस ऑटोमोबाईल कंपनी वापरत असल्याची केस दिल्ली हायकोर्टमध्ये दाखल केलेली पण यात कोर्टाने टोयोटाच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे.

अशीच काहीशी केस आपल्या कॅडबरीबाबत देखील झाली होती. निमित्त होते कॅडबरी जेम्सच्या जाहिरातीचे.

आता कॅडबरी जेम्सच्या रंगीबेरंगी गोळ्या आणि त्या गोळ्यांच्या आवरणाखाली भरलेले लिक्विड चॉकलेट फिलिंग हा लहान मुलांच्या प्रचंड आवडीचा विषय आहे. पिवळ्या रंगाचे आणि त्यावर निरनिराळ्या रंगाच्या गोळ्या रंगवलेले जेम्सच्या गोळ्यांचे पाकीट भारतातील छोट्यात छोट्या दुकानात विक्रीला ठेवलेले असते.

या गोळ्यांची जाहिरात काहीतरी हटके करावी म्हणून कॅडबरी इंडियाने एक कँपेन केले होते. या अंतर्गत २० -२० सेकंदाच्या काही कमर्शियल कॅडबरी जेम्ससाठी बनवल्या गेल्या.

या कमर्शियल्स ऍनिमेटेड स्वरुपात बनवल्या गेल्या होत्या. बुमरमॅन नावाचा बबल गमचा जसा काल्पनिक सुपरहिरो होता त्या प्रमाणे जेम्सचा ही एक सुपरहिरो दाखवला होता. पण कॅडबरी इंडियाने स्वत:च्या ब्रँडसारखा स्वतंत्र सुपरहिरो बनवण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यांनी आपल्या उत्पादनाच्या नावाच्या सारखेपणाचा फायदा उचलून जेम्स बॉंड या इंग्लिश गुप्तहेराचे पात्र आपल्या जाहिरातीत वापरले.

आता जेम्स बॉंड हा स्वत:मध्येच एक ब्रँड आहे. त्याला दुसरी कंपनी आपल्या उत्पादनासाठी पूर्वपरवानगी शिवाय वापरू शकत नव्हती.

या सिरीज मधली पहिली जाहिरात केली गेली जिथे एक सुटा बुटातील तरुण आपल्या बुलेटवर बसला आहे आणि तो म्हणतो “ माय नेम इज बॉंड, जेम्स बॉंड” असं म्हणून तो आपल्या हातातील जेम्सच्या गोळ्यापैकी एक गोळी तोंडात टाकतो.

त्याला बातमी मिळते की एक स्कूल बस हायजॅक झाली आहे तेंव्हा तो स्कूल बसच्या पाठलागावर जातो. त्याच्या बुलेटच्या दोन्ही बाजूंनी जेम्सच्या गोळ्या सुसाट बाहेर पडतात आणि स्कूल बस हायजॅक करणारा ड्राईव्हर गारद होतो.

प्रचंड हास्यास्पद, कसलीही नाविन्य नसणारी, गुळगुळीत आणि कमालीची क्लिशे वाटणारी ही जाहिरात होती. फार फार तर ५ वर्षाच्या मुलांना ती कळली नसेल म्हणून आवडली असेल असे या जाहिराती बाबत म्हणता येईल.

या सिरीज मधल्या २० सेकंदाच्या ज्या काही जाहिराती तयार केल्या गेल्या त्या अशाच हास्यास्पद आणि फार काही नाविन्यपूर्ण कल्पना नसलेल्या होत्या. याचं कल्पनेवर आधारित नंन्तर जेम्स कॉमिक बुक देखील कंपनीकडून प्रसारित करण्यात आले पण अर्थात ते फेल गेले.

बाकी या जाहिरातीमुळे उत्पादनाचा खप किती वाढला ते माहित नाही परंतु कॅडबरी इंडियाला इंग्लंड स्थित जेम्स बॉंडच्या कादंबरीचे आणि मोशन पिक्चरचे हक्क असणाऱ्या “डंजाक एलसीसी” या कंपनीने आपल्या जेम्स बॉंड या नावाच्या ट्रेडमार्क आणि कॉपीराईटचा भंग केल्याची नोटीस पाठवली.

आता यातील गंमत अशी की कॅडबरी इंडियाने या कमर्शियल बनवल्या होत्या ८० आणि ९० च्या दशकामध्ये. त्या फार चालल्या नाहीत म्हणून त्यांनी तशा प्रकारच्या जाहिरातींचा प्रोजेक्ट गुंडाळून ठेवला आणि डंजाक एलसीसीची नोटीस त्यांना मिळाली साधारणपणे २००७ साली.

भारतात कुठलाही गुन्हा दखल करण्यासाठी एक मुदतीचा कायदा असतो त्याला इंग्लिशमध्ये Limitation Act असे म्हटले जाते. या कायद्यानुसार गुन्हा घडल्याच्या आत साधारणपणे ३ वर्षाच्या आत त्याच्यावर तक्रार दखल होवून तो कोर्टासमोर आला पाहिजे.

९० च्या दशकात केलेल्या कमर्शियलबद्दल डंजाक एलसीसी आम्हाला आत्ता लीगल नोटीस पाठवू शकत नाही असा स्टँड कॅडबरी इंडियाच्या वकिलांनी घेतला.

सध्या या बाबत कायदेशीर प्रक्रिया चालू असून केस बोर्डावर अजून तरी हिअरिंग साठी आलेली नाही. मात्र कंपन्या आपल्या क्रिएटीव्हीटीमुळे कशा धोक्यात येऊ शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमसारखे प्लॅटफॉर्म्स कमाई कसे करतात?

Next Post

लई भारीसारखा रेकॉर्डब्रेक चित्रपट करूनही या मराठी दिग्दर्शकाचं नाव फार कुणाला माहिती नव्हतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

लई भारीसारखा रेकॉर्डब्रेक चित्रपट करूनही या मराठी दिग्दर्शकाचं नाव फार कुणाला माहिती नव्हतं

गंगेच्या किनाऱ्यावरचं झुलतं मंदिर : भारतीय शिल्पकलेचा असामान्य नमुना

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.