The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिजाब, बुरखा, नकाब यामध्ये काय फरक आहे जाणून घ्या…!

by ऋजुता कावडकर
12 February 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


फेब्रुवारी २०२२ मध्ये कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर स्थित ज्युनिअर कॉलेजमध्ये काही मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्या होत्या. हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थीनींना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेवरून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली. काही आंदोलने ही हिजाबच्या समर्थनार्थ होती तर काही आंदोलने ही हिजाब पद्धतीचा विरोध करण्यासाठी केली गेली. यावरून देशभरात अनेक ठिकाणी पडसाद उमटले.

जगभरातील विविध संस्कृतींमध्ये स्त्रियांनी आपलं डोकं आणि केस झाकून ठेवण्यास सांगितलं आहे. इस्लाममध्ये तर स्त्रियांनी आपला पती आणि वडील सोडून  परपुरुषांसमोर स्वतःचे शरीर पूर्णपणे झाकून ठेवण्यास सांगण्यात आले आहे, असे म्हणतात. यासाठी त्या स्त्रिया एक विशिष्ट पेहराव परिधान करत असतात. भारत, पाकिस्तान, इराण, इराक, इंग्लंड, अमेरिका यासारख्या देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिम समाजातील स्त्रिया आपले संपूर्ण शरीर झाकण्यासाठी जो पेहराव परिधान करतात त्याला हिजाब म्हणतात.

या हिजाबबद्दल जगभरात विविध प्रदेशात वेगवेगळे नियम आढळून येतात. अनेक मुस्लिम बहुल देशांमध्ये हिजाब न घालता बाहेर फिरणं गुन्हा मानला जातो. तर युरोपातील काही देशांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे.

आता, या कपड्याचेही अनेक प्रकार असतात. काही स्त्रिया फक्त डोळे उघडे ठेवतात, काही फक्त डोकं झाकतात. प्रत्येक प्रकार वेगळा. हिजाब, बुरखा, नकाब अशी नावं तुम्हीही ऐकली असतीलच आणि यामधील फरक काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर तुमच्यासाठीच हा लेख आहे असं समजा. आज या लेखात आम्ही तुम्हाला या सगळ्या पेहरावांमध्ये काय मूलभूत फरक असतो ते सांगणार आहोत.



१. ओढणी (दुपट्टा)

भारत-पाकिस्तानात महिलांचा मुख्य पेहराव असतो सलवार कमीज. या सलवार कमीजचाच एक भाग असतो तो म्हणजे ओढणी. या ओढणीचा प्रयोग स्त्रिया आपलं डोकं झाकण्यासाठी करतात. भारत पाकिस्तान येथील इतर धर्मीय स्त्रियाही आपल्या डोक्यावरून ओढणी घेऊन कामं करताना तुम्ही बघितल्या असतीलच.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

२. अबाया 

या पेहरावाला भारतात बुरखा म्हणतात. मध्य पूर्व आशियाई देशांमध्ये या पेहरावाला अबाया म्हणून संबोधतात. आपण घातलेल्या कपड्यांवरून हा पोशाख घातला जातो. हा पोशाख एक सबंध शरीर झाकणाऱ्या गाऊन सारखा असतो. यात डोकं झाकण्यासाठी एक रूमाल येतो. या पेहरावात चेहरा मात्र झाकलेला नसतो. पूर्वी काळ्या रंगाचा असणारा हा पेहराव आजकाल विविध रांगांमध्ये उपलब्ध आहे.

३. अल-अमिरा 

हा एक दोन कपड्यांचा सेट असतो. एक टोपीसारखं कापड डोक्यात घालतात आणि दुसरं जरा लांब कापड डोक्यावर गुंडाळून छातीपर्यंत ओढून घेतात. यात फक्त डोकं झाकलं जातं, बाकी कुठलेही कपडे घातले तरी चालतात.

४. नकाब (निकाब)

नकाब किंवा निकाब हा स्त्रियांचा चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारा पोशाख आहे. यामध्ये संपूर्ण चेहरा, डोकं आणि मान झाकलेली असते. खरंतर इस्लाममध्ये चेहरा झाकण्याविषयी काही लिहिल्याचे आढळत नाही, केवळ डोकं आणि केस झाकण्यासाठी पोशाख असावा असा उल्लेख आढळतो. परंतु, कट्टरपंथी मुस्लिम राष्ट्रांमध्ये स्त्रियांनी आपले संपूर्ण शरीर अगदी चेहराही झाकावा असे फर्मान आहे. यासाठीच तेथील स्त्रिया नकाब वापरताना दिसतात. नकाबाने स्त्रिया आपला चेहरा, डोकं, केस अगदी गळा देखील झाकतात, फक्त त्यांचे डोळे तेवढे उघडे असतात. साधारणपणे नकाब हा काळ्या रंगाचा असतो.

५. बुरखा 

भारतात मुस्लिम स्त्रियांच्या काळ्या पोशाखासच आपण बुरखा म्हणतो. पण बुरखा म्हणजे नकाबाचीच अजून एक वरची पायरी. नकाबमध्ये स्त्रियांचे डोळे उघडे असतात हे आपण बघितलं, पण या बुरख्यात स्त्रियांचा संपूर्ण चेहरा तर झाकलेला असतोच त्याशिवाय त्याच्या डोळ्यांसमोर एक छोटं जाळीवजा कापड लावलेलं असतं. हा कापड लावण्याचा उद्देश हाच की त्यांचे डोळेही झाकले जातील आणि त्यांना बघण्यात अडचणही येणार नाही. याशिवाय बुरख्यात एक संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कापडही असते. हे कापड (गाऊन) शक्यतो एकाच रंगाचे असते. याचे कारण एकच की परपुरुष स्त्रीकडे आकर्षित होऊ नये.

६. हिजाब 

सध्या सगळीकडे गाजलेला शब्द म्हणजे हिजाब! आधुनिक इस्लाममध्ये हिजाबचा अर्थ पडदा असा होतो. मुसलमानांचा धर्मग्रंथ कुराणमध्ये हिजाबचा उल्लेख कुठलं एक कापड म्हणून नाही तर पडदा म्हणून केलेला आहे. हा पडदा स्त्रिया आणि पुरुषांच्यामध्ये असावा असं कुराण सांगतं. हिजाबमधे स्त्रिया आणि पुरुष दोहोंना आरामदायी, लूज कपडे घालण्यास सांगितले आहेत आणि सोबतच आपलं डोकं झाकण्यास सांगितलं आहे.

तर हे होते इस्लाममधील स्त्रियांकरिता असणारे विविध प्रकारचे ‘हिजाब’, ‘बुरखे’. पुन्हा या गोष्टींमध्ये तुमची गल्लत होऊ नये म्हणून हा लेखाचा खटाटोप. तूर्तास एवढेच. पण तुम्ही द पोस्टमनचे इतर माहितीपूर्ण लेख मात्र वाचायला विसरू नका!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ब्रिटीश काळात ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यासाठी भारतीयांना विशेष परवाना घ्यावा लागायचा

Next Post

साऊथ आफ्रिकेचा ‘बेबी एबीडी’ आता आयपीलमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

साऊथ आफ्रिकेचा 'बेबी एबीडी' आता आयपीलमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे

राहुल बजाज यांनी स्वदेशी स्कुटरसाठी थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.