The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डेन्झल वॉशिंग्टन नसता तर आपण ‘ब्लॅक पँथर’ला मुकलो असतो..!

by द पोस्टमन टीम
1 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


“डेन्झल वॉशिंग्टन नसता तर ब्लॅक पँथर घडला नसता. फक्त मीच नाही, तर माझ्यासह एक संपूर्ण पिढी वॉशिंग्टनच्या खांद्यावर उभी आहे!” 

हे उद्गार आहेत मार्व्हल सुपरहीरो ब्लॅक पँथर साकारणाऱ्या चॅडविक बोसमनचे. मार्व्हलच्या या सुपरहीरोसाठी चॅडविक हाच बेस्ट चॉईस होता, याबाबत एकाही मार्व्हल फॅनचं दुमत नसेल. आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो, थॉर, वांडा, फाल्कन यासारखे एक से बढकर एक सुपरहिरो कॅरेक्टर मार्व्हलच्या चित्रपटांमधून समोर आले आहेत.

मात्र, या सर्वांमध्ये वकांडाचा ‘ब्लॅक पँथर’ नक्कीच जास्त भाव खाऊन गेला. कृष्णवर्णीय कलाकार चॅडविक बोसमननं आपल्या सहज सुंदर अभिनयानं जगभरातील चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. आपण आज ज्या ठिकाणी आहोत, त्यामागे ‘डेन्झल वॉशिंग्टन’ यांचा खूप मोठा हात असल्याचं चॅडविकनं जाहीरपणे मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

डेन्झल वॉशिंग्टन यांनी चॅडविकसाठी असं काय केलं होतं, की तो त्यांना देवासमान मानतो?



हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही काळ मागे जावं लागेल. तेव्हा चॅडविक हावर्ड विद्यापीठात दिग्दर्शनाचे धडे गिरवत होता. त्याच वेळी त्यानं यूकेतील एका प्रतिष्ठित ‘समर ऍक्टिंग प्रोग्राम’मध्ये भाग घेतला होता. चॅडविक आणि त्याच्या मित्रांना प्रोग्राममध्ये येण्याची संधी देखील मिळाली होती मात्र, त्यांच्याकडे प्रवासासाठी पैसे नव्हते. तेव्हा या मुलांच्या शिक्षिका, फेलिसिया राशद यांनी इतर कलाकारांना या मुलांना मदत करण्याची विनंती केली. या मुलांना एका कलाकारानं मदत केली आणि मुलांनी आपला कोर्स पूर्ण केला. त्यानंतर कितीतरी वर्ष चॅडविकनं आपल्या मदतकर्त्याचं नाव जाहीर केलं नव्हतं.

एक दिवस अमेरिकन फिल्म इन्स्टिट्युटनं जेष्ठ अभिनेते डेन्झल वॉशिंग्टन यांच्या सन्मानार्थ एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात चॅडविकनं सर्वांसमोर या व्यक्तीचे आभार मानले होते! चॅडविक आणि त्याच्या वर्गमित्रांना मदत करणारी व्यक्ती डेन्झल वॉशिंग्टनच होती. 

‘डेन्झल वॉशिंग्टन यांच्या उदारतेमुळंच आज मी स्टेज आणि स्क्रीनवर दिसतो आहे. आमच्या शिक्षिका फेलिसिया राशद आमच्यासाठी मदत शोधत असल्याची माहिती वॉशिंग्टन यांच्यापर्यंत पोहचली तेव्हा त्यांनी आम्हा ९ विद्यार्थ्यांची फी भरली होती. मी देखील त्या नऊ विद्यार्थ्यांपैकीचं एक आहे’, असं चॅडविकनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. पुढे तो असंही म्हटला होता, ‘जेव्हा माझी ब्रिटिश थिएटर अकॅडमीची फी भरल्याचं लेटर माझ्या हातात आलं होतं तेव्हा मला आश्चर्य वाटलं. फी भरणारी व्यक्ती डेन्झल वॉशिंग्टन नावाचा दिग्गज आहे, हे समजल्यानंतर तर मी अक्षरश: हवेत उडालो होतो. मी आणि माझे सर्व चाहते डेन्झल वॉशिंग्टन यांचे ऋणी आहोत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

‘ब्लक पँथर’ चित्रपटाच्या न्यूयॉर्क प्रिमिअरला डेन्झल वॉशिंग्टन आले होते. त्यांनी चॅडविकच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. त्यावेळी देखील चॅडविकनं त्यांचे आभार मानले होते.

डेन्झल वॉशिंग्टन (ज्युनियर) अमेरिकन अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. चित्रपट आणि रंगमंचावरील दमदार अभिनयासाठी त्यांना प्रामुख्यानं ओळखलं जातं. त्यांनी ‘क्लासिक मूव्ही स्टारडम’च्या संकल्पनेची पुनर्रचनाच केली आहे, अशा शब्दात समीक्षक त्यांचं कौतुक करतात. डेन्झल यांनी दिग्दर्शक स्पाइक ली, अँटोईन फुक्वा आणि टोनी स्कॉट यासारख्या दिग्गजांसह काम केलेलं आहे.

एखादा ऑस्कर पुरस्कार मिळवण्यासाठी कलाकार आयुष्यभर मेहनत घेत असतात. डेन्झल यांना मात्र तब्बल दोन ऑस्कर, तीन गोल्डन ग्लोब, एक स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड आणि एक टोनी पुरस्कार मिळाले आहेत. 

या व्यतिरिक्तही इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. २०१६ मध्ये त्यांना ‘सेसिल बी. डेमिल लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ मिळाला. तर २०२० मध्ये न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांना ‘एकविसाव्या शतकातील महान अभिनेता’ म्हणून मान दिला.

न्यूयॉर्कच्या माउंट व्हेर्नॉन याठिकाणी डेन्झल वॉशिंग्टन लहानाचे मोठे झाले. लहान असताना ते काही चुकीच्या मित्रांच्या संगतीमध्ये गेले होते. त्यांच्या काही मित्रांना तर तुरुंगात देखील जावं लागलं होतं. वॉशिंग्टन ‘बॉईज अँड गर्ल्स क्लब’ला आपलं प्रेरणास्थान मानतात. या क्लबनं त्यांना सुरक्षित वातावरण आणि नैतीक शिक्षण उपलब्ध करून दिलं.

लहान मुले ही सर्वात जास्त संवेदनशील असतात. त्यांना आपण जसे वळण लावू तशी ती वळतात, ही गोष्ट लक्षात घेऊन वॉशिंग्टन गरीब मुलांसाठी काम करतात. आफ्रिका आणि अमेरिकेतील कृष्णवर्णीय नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ते कायम पुढे असतात. बऱ्याच लोकांना वॉशिंग्टन हे केवळ पुरस्कारप्राप्त अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणूनच माहिती आहेत. मात्र, त्यांनी आजपर्यंत अनेक लोक कल्याणकारी कामं केलेली आहेत. चॅडविकला केलेली मदत त्याचाचं एक भाग होता.

आपली पत्नी पॉलेटा वॉशिंग्टन यांच्यासह मिळून त्यांनी असंख्य समाजसेवी संस्थांसोबत काम आणि दान केलं आहे. आफ्रिकन-अमेरिकन इतिहासावर काम करणाऱ्या ‘स्मिथसोनियन संग्रहालया’साठी वॉशिंग्टन यांनी कोट्यवधी रुपयांची चॅरिटी जमा केली होती. नाटककार ऑगस्ट विल्सन यांच्या बालपणीच्या घराच्या नूतनीकरणासाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

टेक्सासमधील कृष्णवर्णीयांचं सर्वात जुनं महाविद्यालय असलेल्या ‘विली कॉलेज’ला डेन्झल वॉशिंग्टन दरवर्षी मदत करतात. गेल्या १५ वर्षांपासून यात एकदाही खंड पडलेला नाही. मागील वर्षी त्यांनी १ लाख डॉलर्स महाविद्यालयाला दिले होते.

त्यांच्या प्रयत्नांनी महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध वाद-विवाद स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कल्पक आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या आताच्या पिढीला पाठिंबा मिळाल्यास शिक्षण व करिअरच्याही पलीकडे त्यांना काहीतरी मिळवता येईल. त्यांच्यासाठी संधीची अनेक दरवाजे उघडतील. त्यांना मदत करण्याची मला संधी मिळते आहे, हे मी माझं भाग्य समजतो, असे वॉशिंग्टन म्हणाले होते.

डेन्झल वॉशिंग्टन यांच्यासारखे असंख्य कलाकार जगभरात आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा आणि प्रसिद्धी आहे. मात्र, ज्या पद्धतीनं डेन्झल वॉशिंग्टन लोकांना मदत करतात, तशी मदत खूप कमी कलाकार करतात. या सर्वांनी निदान एका जरी ‘चॅडविक’ला मदत केली, तरी भविष्यात नक्कीच असंख्य गुणी कलाकार आपल्याला मिळतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

यांच्या मुर्खपणामुळे स्कॉटलंडचा सगळा लिखित इतिहास शब्दशः पाण्यात गेला होता

Next Post

भारतीय हॉकी संघाला जेव्हा कोणी प्रायोजक मिळत नव्हता तेव्हा नवीन पटनाईक पुढे आले

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

भारतीय हॉकी संघाला जेव्हा कोणी प्रायोजक मिळत नव्हता तेव्हा नवीन पटनाईक पुढे आले

ब्राझीलच्या प्रसिद्ध 'स्नेक आयलंड'वरून सापांची संख्या का कमी होतेय..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.