The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेणाच्या पुतळ्यांच्या ‘मॅडम तुसाँ’ संग्रहालयाचा रंजक इतिहास माहिती आहे का..?

by द पोस्टमन टीम
26 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मादाम तुसाँ संग्रहालयाचं नाव ऐकलं नाही असे लोक खुप कमी असतील. मादाम तुसाँ संग्रहालयात मेणाचा पुतळा बनवला जाणे म्हणजे तुम्ही जगभर प्रसिद्ध आहात यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखंच आहे. महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर अशा अनेक भारतीयांचे पुतळे या संग्रहालयात आहेत.

आज या संग्रहालयाची सुरुवात कशी झाली आणि ते इतके प्रसिद्ध कसे झाले हा प्रवास आज आपण पाहणार आहोत. लंडनमधील तुसाँ संग्रहालयाच्या या गोष्टीत कला, मृत्यू, क्रांती आणि प्रसिध्दी सगळंच आहे.

संग्रहालयाची संस्थापक असलेली मेरी ग्रोशॉल्ट्झ हीचा जन्म १७६१ साली फ्रांसमध्ये झाला. यु*द्धातल्या भयानक जखमांनी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या विधवा आईनेच तिचे पालनपोषण केले. पुढे दोघी स्वित्झर्लंडला राहायला गेल्या. तिथे तिची आई फिलीप कर्शीयस या वैद्याकडे मोलकरीण म्हणून काम करत होती.

कोणी म्हणतात कर्शीयस स्वत: मेणाचे पुतळे बनवत असे आणि त्यानेच मेरीला मेणाचे पुतळे बनवायला शिकवले. 

मेरी पुतळे बनवण्यात फारच निपुण झाली होती. तिने अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे मेणाचे पुतळे बनवले होते. यात फ्रेंच तत्त्वज्ञ व्हॉल्टेअर, बेंजमीन फ्रँकलीन यांचा पण नंबर होता. तिच्या या कौशल्याची चर्चा वाढत चालली होती. पुढे तिला सोळाव्या लुईच्या दरबारात बोलावले गेले. सोळाव्या लुईच्या बहिणीसाठी  कला शिक्षिका म्हणून मेरीची नियुक्ती करण्यात आली. आता फ्रांसमधील नावाजलेल्या लोकांसोबत मेरीचे उठणे-बसणे सुरु झाले.



फ्रेंच राज्यक्रांती सुरु झाली आणि मेरीकडे प्लास्टरचे साचे आणि चेहऱ्याच्या प्रतिकृती बनवण्याचे काम आले. हे साचे दुसऱ्या कोणासाठी नाही तर राज्यक्रांतीच्या दरम्यान शिर*च्छेद करण्यात आलेल्या व्यक्तींचे होते. यातील काही व्यक्ती मेरीच्या अगदी जवळच्या होत्या.

सोळावा लुई आणि राणी यांच्या चेहऱ्याचे मास्क बनवून आपली भूमिका स्पष्ट करण्यासही तिला सांगितले गेले. सोळाव्या लुईच्या शिर*च्छेद केलेल्या शीराची तिने बनवलेली प्रतिकृती रस्त्यावरून फिरवण्यात आली. तसेच राणी मेरी अँटोनी आणि मैक्सीमिलीयन रोबेस्पायर या प्रसिद्ध व्यक्तींच्या शरीरापासून वेगळ्या केलेल्या शीरांच्या प्रतिकृतीसुद्धा खुद्द मेरी ग्रोशॉल्ट्झने बनवल्या होत्या.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पुढे मेरीने फ्रांस सोडले. नेपोलियनमुळे झालेल्या युद्धांनी तिचे परत फ्रांसमध्ये येणे अवघड करुन टाकले. मग ती युरोपभर आपल्या मेणाच्या पुतळ्यांचं प्रदर्शन करत फिरली. अशातच तिने फ्रांसिस तुसाँशी लग्न केले. इथुन पुढे ती मादाम तुसाँ बनली आणि आपल्या या कलेचे संग्रहालय सुरु केले.

फ्रांसिसने तिला आणि तिच्या २ मुलांना १८०२ साली सोडले ज्यानंतर ती लंडनमध्येच स्थायिक झाली. तिथेच तिने आपला व्यवसाय सुरु केला. त्यावेळी एका महिलेने संग्रहालय चालवणे ही खूप मोठी बाब होती. 

संग्रहालय आणि तिच्या कलाकृती चांगल्याच प्रसिद्ध होत्या. व्यवसाय अगदी जोमात सुरु होता. वेलिंग्टनचे राजकुमार स्वत: या संग्रहालयात स्वत:ची आणि नेपोलियनची प्रतिकृती बघण्यासाठी आले होते. मेरीची सगळ्यात अद्भूत आणि प्रसिद्ध असलेली कलाकृती (विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाची कलाकृती) १८३७ साली बनली.

मेरी वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत काम करत राहिली. पुढे तिच्या मुलांनी व्यवसाय आपल्या हातात घेतला.

तुसाँ संग्रहालयाबद्दल आणखी एक रंजक बाब म्हणजे संग्रहालय बनवताना यात एक ‘सेपरेट रुम’ बनवली गेली होती. यात सगळ्या भितीदायक कलाकृती ठेवण्यात आल्या होत्या. सोळावा लुई आणि राणीच्या चेहऱ्याचे मास्क, इजिप्शियन ममी, काही फ्रेंच गुन्हेगारांची शिक्षा देतानाची दृष्ये, तसेच शिर*च्छेद करण्यासाठी वापरण्यात आलेल्या यंत्राची प्रतिकृती अशा भयंकर कलाकृती ठेवल्या होत्या. या खोलीचे ‘चेंबर ऑफ हॉरर्स’ असे नामकरण करण्यात आले इथे जाण्यासाठी जास्त फी आकारली जात असे.

दुसऱ्या महायु*ध्दात एक जर्मन बॉं*ब थेट संग्रहालयात जाऊन आदळला तेव्हा ३०० साचे नष्ट झाले होते. पण मेरीने बनवलेल्या बऱ्याच कलाकृती अजूनही या संग्रहालयात आहेत.

रंजकतेने भरलेल्या या इतिहासात अजून भर पडते ती हि*टल*रच्या मेणाच्या पुतळ्याबरोबर घडलेल्या एका घटनेने. हि*टल*रला मेणाच्या पुतळ्याच्या रुपात अमर केले गेले ते १९३३ साली. चेंबर ऑफ हॉरर्समध्ये ठेवलेला हा पुतळा लोकांच्या काही खास मनात घर करू शकला नाही. २००८ साली एका ४१ वर्षीय जर्मन माणसाने हि*टल*रच्या पुतळ्याचे डोके उडवून लावले. आता तो पुतळा पुन्हा नीट करुन सुरक्षित ठेवला गेला आहे.

आता तुसाँ संग्रहालयाची ख्याती जगभर पसरली आहे. लंडनच्या बेकर स्ट्रीटवर वसलेले हे संग्रहालय फ्रेंच राज्यक्रांतीचे रक्तरंजीत पुरावे पोटात घेऊन उभे आहे..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दीक्षित-दिवेकर सोडा या कार्यकर्त्याने ३८२ दिवस उपाशी राहून वजन कमी केलं होतं

Next Post

लिंकन नसते तर अमेरिकेचे पण तुकडे झाले असते..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

लिंकन नसते तर अमेरिकेचे पण तुकडे झाले असते..!

व्हिस्की, स्कॉच आणि बर्बनमध्ये नेमका 'फरक' काय आहे ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.