The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पेटीएम’मध्ये गुंतवणूक करून आपला घाटा झालाय पण ‘वॉरन बफे’ने बक्कळ पैसे छापलेत

by द पोस्टमन टीम
27 December 2021
in गुंतवणूक
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही वॉरन बफे हे नाव ऐकले असेलच. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक, ख्यातनाम अमेरिकन उद्योगपती आणि यशस्वी गुंतवणूकदार म्हणून वॉरन बफे यांचे नाव घेतले जाते. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती तर आहेच शिवाय त्यांच्याकडे व्यवसायाच्या हटके कल्पना आणि गुंतवणुकीची सूत्रे देखील आहेत, त्यामुळे इतर श्रीमंतांच्या मांदियाळीत ते वेगळे उठून दिसतात.

गुंतवणुकीतील फादर फिगर म्हणजे वॉरन बफे. असे म्हटले जाते, की जेव्हा इतर लोक गुंतवणूक करत असतात तेव्हा वॉरन बफे पैसे काढून घेतात आणि जेव्हा इतर लोक पैसे काढून घेतात तेव्हा बफे महाशय गुंतवणूक करत असतात. एप्रिल २०२१ अखेर त्यांची एकूण संपत्ती १००. ६ अब्ज अमेरिकन डॉलर्स ($१००.६ Bn USD ) एवढी म्हणजेच भारतीय ७४,००,००,००,००,००० रुपये इतकी होती.

वॉरन बफे यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात अतिशय लवकर म्हणजे वयाच्या अवघ्या ९-१० व्या वर्षीच झाली होती आणि ‘१००० डॉलर्स कमावण्याचे १००० मार्ग‘ या पुस्तकातून त्यांनी पैसा कमावण्याची प्रेरणा घेतली. पुढे त्यांनी अफाट संपत्ती मिळवली तरी आपली जीवनशैली काटकसरीची ठेवली. मिळालेल्या उत्पन्नाचा ९९% हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी बिल गेट्स यांच्या ‘बिल अँड मेलिंडा फाऊंडेशन’ला देऊ केला आहे.

तर अशा या बफे यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये पहिल्यांदाच भारतात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘डिजिटल वॉलेट’ कंपनी म्हणून भारतात प्रसिद्ध असलेल्या ‘पेटीएम’ची पॅरेंट कंपनी असलेल्या ‘वन 97 कम्युनिकेशन्स’मध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यावर बफे यांच्या ‘बर्कशायर हॅथवे’ या कंपनीची गुंतवणूक असलेली पेटीएम ही भारतातील पहिली कंपनी ठरली. या गुंतवणुकीमुळे पेटीएमला चांगलाच फायदा झाला. ई-मार्केटमध्ये आणि इतर डिजिटल वॉलेट कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी यामुळे पेटीएमला जास्त बळ मिळाले असे मानले गेले.

त्याआधी फेब्रुवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात पेटीएमचा संस्थापक विजय शेखर शर्मा कॅनडामध्ये बोर्ड मेम्बर असलेल्या ‘मार्क श्वार्ट्झ’ याला भेटून आला होता. मार्क त्याची ओळख जगातील सर्वात मोठी गुंतवणूक कंपनी असलेल्या बर्कशायर हॅथवे शी करून देणार होता. ही कंपनी वॉरन बफे यांच्या नावामुळे सर्वपरिचित होती.



त्यानंतर एकाच आठवड्याने विजय शेखर शर्मा आपल्या काही सहकाऱ्यांसह ‘टॉड कोंब’ या बर्कशायर हॅथवेच्या इन्व्हेस्टमेंट मॅनेजरला भेटायला निघाला. तो व्हॅलेंटाईन डे होता आणि त्यांची एक तासासाठी ठरलेली मीटिंग सुमारे साडेतीन तास चालली. यात वैयक्तिक कामगिरी, हवामान, भारतातील पेमेंट इकोसिस्टीम, आवडते खाद्यपदार्थ अशा अनेक बाबींवर चर्चा झाली. त्या मीटिंगनंतर दोन फोन कॉल्स झाले आणि त्यात व्यवहार पक्का झाला.

बर्कशायरसारख्या मोठ्या खेळाडूने पेटीएमची निवड करण्यामागे तज्ज्ञांच्या मते दोन करणे होती – कंपनीचे स्केल आणि एक्झिक्युशन. बदल्यात बर्कशायरबरोबर जोडले गेल्याने पेटीएमलाही काही फायदे निश्चितच होणार होते. मोठ्या नावाखेरीज बर्कशायरकडे जागतिक पातळीवर वित्तीय सेवा देण्याचा अनुभव होता. स्वतः टॉड बँकिंग, पेमेंट्स या विषयांमधील तज्ज्ञ होता. त्यामुळे त्याच्या अनुभवातून जगात इतरत्र डिजिटल पेमेंट बिझनेस कसा चालतो याची माहिती मिळणे शक्य होते. शिवाय या गुंतवणुकीमुळे पेटीएमची विश्वासार्हता वाढणार होती.

पण तुम्हाला माहीत आहे का? नुकत्याच झालेल्या पेटीएम आयपीओच्या वेळी इतर किरकोळ गुंतवणूकदारांचे हात पोळले असताना पेटीएमने मात्र भरपूर नफा कमावला आहे.

हे देखील वाचा

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

दिवाळीनंतर पेटीएमसारख्या मोठ्या कंपनीच्या आयपीओ मध्ये पैसे टाकून अनेकांनी चांगल्या कमाईची अपेक्षा केली होती, पण पेटीएमचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला आणि गुंतवणूकदारांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. लिस्टिंगनंतर आयपीओ शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात घसरली. त्यामुळे आता गुंतवणूकदारांना नफ्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार हे नक्की झाले. मात्र याचवेळी वॉरेन बफे यांनी पेटीएमच्या आयपीओमधील १४ लाख शेअर्सच्या विक्रीवर १.६ कोटी डॉलरचा नफा कमावला. फॉर्च्युन इंडियाने दिलेल्या अहवालात अशी माहिती आहे.

सप्टेंबर २०१८ मध्ये, जेव्हा बर्कशायर हॅथवेने ‘वन 97 कम्युनिकेशन्स’मध्ये ३० कोटी डॉलरची गुंतवणूक केली तेव्हा त्यांच्याकडे २.६ टक्के शेअर्स होते. हा करार ‘BH इंटरनॅशनल होल्डिंग्स’च्या माध्यमातून झाला होता. आयपीओनंतर पेटीएमचा स्टॉक २७ टक्क्यांची घसरण होऊन शेअर बाजारात लिस्ट झाला. १४ लाख शेअर्सच्या विक्रीवर १.६ कोटी डॉलरचा नफा झाल्यानंतर बर्कशायर हॅथवेकडे आता ‘वन 97 कम्युनिकेशन्स’मध्ये २.४१ टक्के हिस्सा आहे.

डिजिटल पेमेंट स्टार्ट-अप असलेल्या पेटीएम या कंपनीमध्ये होल्डिंग कंपनीची सरासरी संपादन किंमत १२७९.७ रुपये प्रति शेअर इतकी आहे. याचा अर्थ १७९ कोटी रुपये (२४ दशलक्ष डॉलर) किमतीचे १.४ दशलक्ष शेअर्स रुपये २१५० प्रति शेअर दराने ३०१ कोटी रुपयांना (४० दशलक्ष डॉलर) विकले गेले. यातून बर्कशायरला १२२ कोटी रुपये (१६ दशलक्ष डॉलर) म्हणजे ६८% एवढा नफा झाला.

तसे पाहता बर्कशायरच्या टॉप ५० होल्डिंग्सच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण क्रमवारीत, ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ ३४ व्या क्रमांकावर आहे, परंतु तरी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ची कामगिरी यूएसमधील सॅटेलाइट रेडिओ आणि ऑनलाइन रेडिओ सर्व्हिस प्लेअर असलेल्या सिरियसपेक्षा (जिचे मूल्य $276 दशलक्ष आहे) खूपच चांगली आहे. बर्कशायरचे ब्राझिलियन डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या StoneCo मधील गुंतवणुकीचे मूल्य देखील पेटीएमपेक्षा कमी आहे, परंतु होल्डिंगचे प्रमाण खूपच कमी आहे.

बर्कशायर हॅथवे कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अमेझॉन, ॲपल, कोका-कोला, अमेरिकन एअरलाइन्स, अमेरिकन एक्सप्रेस अशा दादा कंपन्या समाविष्ट आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये बर्कशायर हॅथवे स्टॉकची किंमत प्रति शेअर ४,२१,३०६ डॉलर्स इतकी होती. पेटीएमच्या आधीच्या गुंतवणुकीवर ते ही फळे चाखू शकत आहेत, त्यामागे नक्कीच वॉरन बफे यांची पुण्याई आहे. तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

केरळ सरकारने आता स्वतःची प्रशासकीय सेवा सुरू केली आहे

Next Post

कोहिनूर जेवढा मौल्यवान आहे तेवढाच तो शापित देखील आहे…!

Related Posts

गुंतवणूक

कंपनी आणि गुंतवणूकदारांना धक्क्याला लावून, करोडो डॉलर्स घेऊन तो बाहेर पडलाय..!

20 November 2024
गुंतवणूक

३ कोटींचा लॉस भरून काढण्यासाठी त्याने करोडोंचे ट्रेडिंग कोर्सेस विकून अनेकांना गंडवलंय..!

4 November 2024
गुंतवणूक

या माणसाने कर्ज दिलं म्हणूनच टाटा सन्सचे सुमारे १९% शेअर्स मिस्त्री कुटुंबाकडे आहेत..!

5 November 2024
गुंतवणूक

लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट केली नसती तर आज वॉरेन बफेच्या तोडीस तोड असता..!

7 October 2023
विश्लेषण

रशिया-युक्रेन यु*द्ध थांबले नाही तर लोकांचे खाण्याचे वांधे सुरु होतील!

8 March 2025
गुंतवणूक

खेळणी उद्योगातलं चीनचं वर्चस्व मोडून काढणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं आहे..!

28 February 2025
Next Post

कोहिनूर जेवढा मौल्यवान आहे तेवढाच तो शापित देखील आहे...!

एवढे अपघात होऊनही भारतीय वायुसेना कालबाह्य झालेलं मिग-२१ विमान का वापरत आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.