The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जापानी सैन्याने चीनी नागरिकांवर केलेले हे प्रयोग वाचून कोणाच्याही अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही

by ऋजुता कावडकर
23 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आज आपण तिसऱ्या महायु*द्धाच्या उंबरठ्यावर आहोत असं म्हणतात. यु*द्ध व्हावं असं म्हणणं फार सोपं असतं पण यु*द्धाचे परिणाम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतात हे आपण सहज विसरतो.

दुसऱ्या महायु*द्धात संपूर्ण जगाची अपरिमित हानी झाली. आर्थिक, सामाजिक, मानसिक सगळंच नुकसान. त्याकाळात जे काही घडलं ते कल्पनेपल्याडचं होतं. विकसित देशांतील “नेत्यांचा” एकमेकांवर जो काही राग होता तो सगळा या यु*द्धाच्या रूपाने बाहेर आला आणि भरडले गेले सामान्य नागरिक, यु*द्धात लढणारे सैनिक, बंदी बनवलेले निष्पाप लोक, लहान मुलं, महिला सगळेच.

पहिल्या महायु*द्धानंतर युरोपात जी अस्थिरता निर्माण झाली त्याचं भयानक स्वरूप म्हणजे वीस वर्षांनंतर झालेलं दुसरं महायु*द्ध. राजकीय आणि आर्थिकदृष्टीने अस्थिर जर्मनीने इटलीसोबत केलेला करार. जपानची जगावर राज्य करण्याची मनिषाही दुसऱ्या महायु*द्धात दिसून आली.

१ सप्टेंबर १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर ह*ल्ला करून या यु*द्धाची सुरुवात केली. पोलंडच्या मदतीला फ्रांस आणि ग्रेट ब्रिटन धावून आले. बाकी ऑपरेशन बार्बारोसा वगैरे इतिहास आपल्याला माहितीच आहे.



१९३७ साली चीनवर ह*ल्ला करून जपानने चीनसोबत उघड उघड यु*द्ध छेडले. ज्यामुळे चीन मुळापासून हादरला. जपानच्या ह*ल्ल्यामुळे चीनचे नुकसान तर झालेच पण त्याबरोबर दुष्काळ, महामारी आणि सोबतीला १९४५ पर्यंत चाललेलं गृहयु*द्धही भोगायला लागलं.

आपल्याला जर्मनीमध्ये ना*झींनी केलेले अ*त्याचार तर माहिती आहेतच. पण जपानने चीनवर जे अ*त्याचार केले त्याची फार कमी माहिती उपलब्ध आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

विसाव्या शतकात जपानच्या सैन्याने युनिट 731 म्हणून एक प्रोजेक्ट चालवला होता. जवळपास ४० वर्षं युनिट 731 चं काम बेमालूमपणे चालू होतं. अगदी अलीकडे १९८४ मध्ये जपानने हे मान्य केलं की जर्म वॉ*रफेअरच्या तयारीसाठी त्यांनी असे अघोरी प्रयोग राबवले होते.

या प्रयोगांसाठी त्यांनी तब्बल तीस हजाराच्या वर शत्रू सैनिकांचा आणि सामान्य नागरिकांचा वापर केला.

कोणाला प्लेगच्या कोणाला डायरियाच्या तर कोणाला अजून कुठल्या जंतूंनी संसर्गित कर, काही व्यक्तींना तर भूल न देता त्यांच्यावर ऑपरेशन करून एखादा मनुष्य किती शारीरिक यातना सहन करू शकतो याचा अभ्यास करण्यात आला.

युनिट 731 १९३८ साली जपानने जिंकलेल्या चीनमधील एका भागात सुरू करण्यात आलं. याचा उद्देश जैवयु*द्धासाठी शस्त्र बनवणे हाच होता. सेन्ट्रल टोकियो येथे त्यांनी एक प्रयोगशाळा उघडली होती ज्याचा प्रमुख lieutenant shiro ishii होता. 

आधी केवळ प्रायोगिक तत्वावर या युनिटची सुरुवात झाली. नंतर त्या शस्त्रांमध्ये वाढ होत गेली. जर का जपानला वेळीच रोखले नसते तर पृथ्वीवर न*रसं*हार व्हायला वेळ लागला नसता. जंतुसंसर्ग करणे वगैरे तर होतंच पण त्यातही ५-६ असे “प्रयोग” होते ज्यांची कल्पनाही करवत नाही.

Frostbite. ज्याला आपण हिमबाधा म्हणतो, या रोगात तापमान फार कमी झालं की हातापायाची बोटं थिजून जातात. ज्यांच्यावर हे प्रयोग केले जात त्यांना मरुता म्हणत.

तर, योशीमुरा हिसाटो म्हणून एक फिसीओलॉजिस्ट या युनिटमध्ये होता. त्याला हायपोथॅर्मिया या विषयात विशेष रुची होती. त्याने काय केलं, या मरुताना बर्फाच्या पाण्यात बसवलं. तोवर बसवलं जोपर्यंत त्यांचे हात पाय सुजून कडक होत नाहीत आणि त्यावर बर्फाचा थर जमा होत नाही.

एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने काहींना लगेच गरम पाण्यात टाकले किंवा आगीजवळ नेऊन बसवले, तर कधीकधी काहीही उपचार न करता तसंच सोडून दिलं. आपलं गोठलेलं रक्त पुन्हा नसांमधून पूर्वीसारखं वाहायला किती वेळ लागतो हे तपासण्यासाठी.

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे vivisection म्हणजे थोडक्यात सांगायचे तर मानवी शरीराची चिरफाड करणे.  हजारो लहान मुलं, म्हातारी माणसं यांना आधी कॉलरा, प्लेगने संसर्गित करण्यात येत आणि मग त्यांच्या मृत्यूच्या आधीच अवयव काढून घेतले जात. मेल्यानंतर शरीर decompose होतं ते होण्याआधी शरीरावर रोगांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात असे.

एवढंच करून ते थांबले का? नाही!

कित्येकदा एखादा अवयव, उदाहरणार्थ एखाद्याचा हात, कापून तो पुन्हा दुसऱ्या जागी जोडण्यात येत किंवा रक्तपुरवठा बंद करून गँगरीन कसा होतो उगाच अभ्यास (?) करण्यासाठी.

आणि मग जेव्हा या मरूतांचं काम झालं, त्यांचं शरीर चिरफाड करून झालं की त्यांना विषबाधा करण्यात येई. तेही नसेल तर तसंच जिवंत पुरण्यात येई.

अजून एक प्रयोग म्हणजे लैंगिक रोग. प्राचीन इजिप्तपासूनच लैंगिक रोग तिथल्या सैनिकांच्या मृत्यूचं मुख्य कारण होतं. याच्यावर उपाय शोधून स्वतःचा फायदा करून घेण्यात जपानला रस होता. गुप्तरोगाबद्दल संपूर्ण माहिती मिळावी, तो कसा पसरतो किती वेळ लागतो, लक्षणे काय यासाठी या युनिट 731 मधल्या डॉक्टरांनी गुप्तरोगाच्या रुग्णांचा इलाज बंद केला. एवढंच नाही तर याचा प्रसार व्हावा म्हणून स्त्री आणि पुरुष दोन्ही कैद्यांवर जबरदस्ती करून याचा अभ्यास (?) केला जाई.

फक्त गुप्तरोगांंसाठीच म्हणून नाही पण बला*त्कार हा आता युनिट 731चा प्रयोगातील एक भागच बनला होता. उदाहरण घ्यायचं झालं तर वयात आलेल्या मुली, स्त्रिया यांच्यावर जबरदस्ती करून गर्भधारणा करण्यात येई, जेणेकरून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रयोग राबवता येतील. वेगवेगळ्या रोगांचा संसर्ग झाला, रासायनिक शस्त्रांचा मारा, बंदु*कीच्या जखमा सगळं करून झालं की त्या गर्भाला बाहेर काढून त्याच्यावर या सगळ्याचा काही परिणाम होतो का आणि झाला तर काय याचा अभ्यास केला जाई. दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा पण याचे पुरावे आता उपलब्ध नाहीत.

या युनिटचा मुख्य उद्देश जर्म वॉ*रफेअर हाच होता. त्यादृष्टीने त्यांनी पावलं उचलली देखील. टायफॉईड, प्लेग, typhus अशा काही भयानक साथीच्या रोगांचे विषाणू त्यांनी मोठ्या प्रमाणात बनवले. आता तेव्हाचे तंत्रज्ञान काही आत्तासारखे प्रगत नव्हते मग हे विषाणू मोठ्या प्रमाणात तयार कसे करायचे?

तर जे कैदी होते त्यांच्या शरीरात या विषाणूला सोडण्यात येई. त्यांच्यातला जो सगळ्यात कमजोर असेल तो साहजिकच लवकर मृत्यू पावत, मग त्याचं रक्त काढून विषाणूची नवीन आणि जास्त घातक बॅच तयार करण्यात येई.

एक असाच कैदी होता. त्याचं सगळं दूषित रक्त काढून घेतलं आणि आता त्याच्यात ताकद उरली नव्हती तेव्हा एक टीममधला डॉक्टर होता त्याने याच्या छातीवर उडी मारून उरलं सुरलं रक्त काढून घेतलं.

विषाणू तर तयार केला पण याचा प्रसार कसा करायचा? जे संसर्गित कैदी होते त्यांना एका ठिकाणी बंदिस्त करून तिथे fleas (पिसं) सोडण्यात आले. त्या पिसांना डब्ब्यात बंद करून जपानी सैनिकांनी चीनच्या गावागावात नेले आणि तिथे सोडून दिले. थोड्याच वेळात या रोगांचा प्रसार सगळीकडे होऊ लागला आणि हजारोंच्या संख्येने चिनी लोकांचा बळी जाऊ लागला.

१९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या ह*ल्ल्यात जपानची अपरिमित हानी झाली. तेव्हाच हा १३ वर्ष चाललेला प्रोजेक्ट पण बंद करण्यात आला. त्याचे जे काही पुरावे, कागदपत्र होते ते नष्ट करण्यात आले.

दुसऱ्या महायु*द्धादरम्यान केलेले आपल्या लोकांचे हाल चीन कधीच विसरणार नाही आणि जपान कधीही ते मान्य करणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चीनी मालावर संपूर्ण बहिष्कार टाकणे कितपत शक्य आहे?

Next Post

रत्नागिरीतील भव्य कातळशिल्प आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

रत्नागिरीतील भव्य कातळशिल्प आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात

या माणसामुळे इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.