The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सफरचंदाच्या १२०० प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवणारा ‘ॲपल मॅन’

by द पोस्टमन टीम
14 August 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘२००१ साली एका व्यक्तीला एक फोन येतो. फोनवर दुर्मिळ वस्तू आढळ्याची टीप मिळते. फोन आलेली व्यक्ती हातातील सगळी कामं सोडून तत्काळ गाडी काढतो आणि एका रात्रीत तब्बल ३०० मैलांचा प्रवास करून ती दुर्मिळ गोष्टीचा माग काढण्यासाठी जातो,’ हे वर्णन वाचून तुम्हाला असं वाटेल की, ती व्यक्ती नक्कीच एखाद्या मौल्यवान गोष्टीच्या शोधात असेल. जर मी तुम्हाला म्हटलं ‘ती’ मौल्यवान वस्तू म्हणजे एक सफरचंद होतं तर..? हो! टॉम ब्राऊन नावाचा हा अवलिया सफरचंदाच्या एका दुर्मिळ जातीच्या शोधातचं एका रात्रीत कित्येक मैलांचा प्रवास करून गेला होता!

आपल्याकडे वारंवार सांगितलं जातं, ‘An Apple a day keeps Doctor away’ मात्र, टॉम ब्राऊनने ही गोष्ट गांभीर्यानं घेतली अन् ते सफरचंदांच्या प्रेमातच पडले. त्यांनी पूर्व अमेरिकेतील ॲपलेशियामध्ये दुर्मिळ झालेल्या सफरचंदाच्या १ हजारपेक्षा जाती शोधल्या आहेत. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी सफरचंदांच्या संशोधनाचं आणि जतनाचं काम हाती घेतलेलं आहे. टॉम ब्राऊन या सफरचंदांचं असं काय करतात की, त्यांना आता ‘ॲपलमॅन’ म्हणूनच ओळखलं जातं?

लहानपणी आईवडिलांना झाडे लावण्यास आणि कलम करण्यास मदत केली असली तरी टॉम ब्राऊन यांची कारकीर्द शेतीपासून दूरच होती. एक केमिकल इंजिनिअर असलेल्या ब्राऊन यांना शेतीमध्येदेखील विशेष रस नव्हता. १९९९ मध्ये टॉम आर जे रेनॉल्ड्स टोबॅको कंपनीमध्ये संशोधन अभियंता म्हणून काम करत होते. ब्राऊन दाम्पत्य भाजीपाला आणि फळांच्या खरेदीसाठी क्लेमॉन्स एनसीमधील स्थानिक बाजाराला भेट देत.

एक दिवस नेहमीप्रमाणं बाजारात फिरत असताना, विविध प्रकारची सफरचंद विकाणाऱ्या एका व्यक्तीनं टॉमचं लक्ष वेधून घेतलं. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर टॉमला सफरचंदाच्या विविध प्रजांतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी त्याबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्यास सुरुवात केली.

२००१ मध्ये त्यांनी सफरचंदाच्या हेरिलोम प्रजातीचा शोध घेतला. याबाबतचा एक किस्सा ब्राऊन यांनी अनेकदा संशोधक विद्यार्थी आणि माध्यमांना सांगितला आहे.



जेव्हा ब्राऊनला रबुन काउंटीमध्ये सफरचंदाच्या या दुर्मिळ प्रजातीबाबत टीप मिळाली तेव्हा त्यांनी परिसर अक्षरश: पिंजून काढला मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी काही स्थानिक जेष्ठ लोकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी इतिहासकार आणि फळबागतज्ज्ञ क्राफोर्डची भेट घेतली. क्राफोर्डनं त्याच्या ओळखीच्या काही ज्येष्ठ सफरचंद उत्पादकांशी ब्राऊनची भेट घालून दिली.

जवळपास एक आठवडाभर विविध लोकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ब्राउनला अनेक दुर्मिळ प्रजातींचा खजिनाचं हाती लागला. बार्ट, रॉयल लेमन, नेव्हरफेल, हॉग आणि कँडी स्ट्रीप, ब्लॅक वाईनसॅप या प्रजाती त्यांच्या हाती लागल्या. त्यावेळी नर्सरी किंवा फळबागांमध्ये या प्रजाती आढळतच नव्हत्या. ब्राऊन यांनी या सर्व दुर्मिळ सफरचंदाच्या प्रजातींची कलम आपल्यासोबत आणली आणि आपल्या बागेत त्यांची लागवड केली.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

एकोणिसाव्या शतकात प्रत्येक ॲपेलेशियन कुटुंबाकडे एक फळबाग असे. वाळवून ठेवण्यासाठी, तळण्यासाठी, सकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी, बेकिंग करण्यासाठी, ब्रँडी बनवण्यासाठी, कडक आणि गोड सिडर करण्यासाठी, व्हिनेगर तयार करण्यापासून तर अगदी जनावरांना खाऊ घालण्यासाठी देखील विविध सफरचंदाच्या आणि इतर काही फळांच्या प्रजाती या लोकांच्या बागेमध्ये असत. सफरचंदांचे आकार, रचना, रंग, पोत, चव आणि पिकण्याच्या वेळेतील विविधता थक्क करणारी होती.

१९०५ मध्ये, अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालात पूर्व किनारपट्टीच्या बागांमध्ये वाढणाऱ्या १४ हजारपेक्षा जास्त जातींची यादी करण्यात आली होती. व्हर्जिनियातील एकट्या शेनान्डोह व्हॅलीमध्येचं ७ हजाराहून अधिक प्रजातींची लागवड केली जाई. पण विसाव्या शतकात मोनोकल्चर आणि कॉर्पोरेट शेतीकडे नागरिकांच्या कल वाढल्यानं अगोदरची परिस्थिती बदलून गेली. २००० सालापर्यंत, सफरचंदाच्या ११ हजारपेक्षा जास्त अमेरिकन जाती नामशेष झाल्याचं मानलं जातं. सध्याचे व्यावसायिक सफरचंद उत्पादक फक्त ९० वेगवेगळ्या प्रकारच्या सफरचंदांची विक्री करतात.

या पार्श्वभूमीवर २००१ साली ब्राऊनच्या हाती लागलेल्या प्रजाती नक्कीच मोठी गोष्ट होती. एकाच भेटीत सफरचंदांच्या अनेक जुन्या जाती आपल्या नर्सरीमध्ये आणण्यात त्यांना यश आलं. ही खूपच मोठी गोष्ट होती. मात्र, ब्राऊन एवढ्यावरचं शांत बसणारे नव्हते त्यांनी आपलं शोधकार्य सुरूचं ठेवलं.

एक दिवस त्यांना हेवुड काउंटीमधील जुनालुस्का झाडाबद्दल माहिती मिळाली. २०० वर्षांपेक्षा जास्त जुनी असणारी ही प्रजात जवळपास नामशेष झाली होती. यावेळी देखील ब्राऊन यांनी क्रॉफर्डचा सल्ला घेतला. क्राफर्डच्या अंदाजानुसार हेवुड काउंटीतील काही लोकांकडे जुनालुस्काची कलमं असण्याची शक्यता होती.

ब्राऊन आणि क्रॉफर्ड यांनी हेवुड काउंटीतील डोंगरावर असलेल्या केट मिन्सीच्या घराला भेट दिली. वयाची ८० पार केलेल्या केटनं दोघांना आपल्या जुन्या सफरचंदाच्या बागेची सफर घडवून आणली. त्यात त्यांना बँक, वुल्फ रिव्हर, स्वीट, वाईनसॅप, जॉन बेरी आणि कीपर्स नावाच्या आणखी विंटेज प्रजाती आढळल्या.

टॉम ब्राऊननं आपल्या आयुष्यातील दोन दशकांचा काळ खर्च करून ॲपेलेशियन सफरचंदांची हरवलेली विविधता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. जॉर्जिया, दक्षिण कॅरोलिना, उत्तर कॅरोलिना, केंटकी, टेनेसी, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया, पेनसिल्व्हेनिया आणि मेरीलँडचा प्रदेश त्यांनी अनेकवेळा पालथा घातला आहे. दुर्मिळ सफरचंदांच्या शोधत आतापर्यंत त्यांनी सुमारे ६ लाख मैलांचा प्रवास केला आहे. त्यांनी हजारहून अधिक विविध जाती आपल्या रोपवाटिकेत रिस्टोर केल्या आहेत. आता वर्षाला ते हजार झाडे विकतात.

असंख्य कलमं दान करून, त्यांनी आणखी सात रोपवाटिकांनाही मदत केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळंच संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये दीर्घकाळ हरवलेल्या सफरचंदांची चव आणि अभिरुची परत आली आहे. ब्राऊनच्या प्रयत्नांचं संवर्धनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी कौतुक केलं आहे. याशिवाय सिडरमेकर्सवरही त्यांच्यावर खुश आहेत. कारण सफरचंदांच्या नवीन जातींची उपलब्धता सिडर क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास फायदेशीर ठरत आहेत.

सफरचंदाप्रमाणं अशी कितीतरी फळं आहेत, ज्यांच्या अनेक चांगल्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना वाचवणं गरजेचं आहे. टॉम ब्राऊन यांच्याप्रमाणं आपण जर या दुर्मिळ प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात आपल्यालाच त्याचा फायदा होईल नाही का?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved

ShareTweet
Previous Post

२०१०चा फिफा वर्ल्डकप गाजला, तो म्हणजे ‘ऑक्टोपस पॉलच्या’ भविष्यवाणीमुळे..!

Next Post

पद्माकर शिवलकरला BCCIने जीवनगौरव पुरस्कार दिला पण खेळायची संधी नाही दिली

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

पद्माकर शिवलकरला BCCIने जीवनगौरव पुरस्कार दिला पण खेळायची संधी नाही दिली

स्वतःची सगळी इस्टेट विकली आणि पूल बांधला, जो १७६ वर्षांनंतरही मजबूत आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.