The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इसवीसन २९५७ साठी पुरून ठेवलेलं टाइम कॅप्सूल MIT ला चुकून २०१५ सालीच सापडलं होतं

by Heramb
27 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


माणूस जसा जसा उत्क्रांत होत जातो, तसा तसा तो आपल्या पूर्वजांच्या पिढ्यांचेही वेध घेऊ लागतो. मग यासाठी कित्येक प्रकारची वैज्ञानिक आणि ऐतिहासिक साधनं वापरली जातात. याच प्रयत्नांमध्ये विकसित झाले ते मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, इतिहास असे विषय. पण भविष्यात काय होईल याचा वेध घेणे जवळ जवळ अशक्यच आहे.

पण तरीही काही श्रीमंत आणि विचारवंत लोकांनी भविष्यासाठी तयारी करून ठेवली आहे. जगामध्ये अणुयु*द्ध, जैविक यु*द्ध किंवा रासायनिक यु*द्ध झालं तर अशा यु*द्धापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एनबीसी शेल्टर्स उभारले गेले आहेत. हे शेल्टर्स बहुतेकदा जमिनीच्या खाली असतात आणि त्यांच्यावर विविध प्रकारचे धातूंचे कव्हरिंग असते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, यामध्ये अमेरिकेची झॉंबींबरोबर लढण्याची तयारी, माणसाने मंगळावर वास्तव्य करण्याचा प्रयत्न इत्यादींचा समावेश होतो.

पण आपल्यानंतरच्या पिढ्यांसाठी किंवा उत्क्रांतीची प्रक्रिया झाल्यानंतर उत्क्रांत होणाऱ्या बुद्धिमान जीवांसाठी काही प्रयत्न झाल्याचे तुम्ही ऐकले आहे का? असे प्रयत्न जगात अनेक ठिकाणी झाले आहेत. जगात अनेक ठिकाणी ‘टाइम कॅप्सूल’ पुरून ठेवण्यात आली आहे. टाइम कॅप्सूल म्हणजे वस्तू किंवा माहितीचा एक ऐतिहासिक संचय आहे. याचा वापर भविष्यातील लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि भविष्यातील पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांना मदत करण्यासाठी करण्यात येणार आहे.

एकोणिसाव्या शतकानंतरचा कालावधी प्रामुख्याने विज्ञान तंत्रज्ञानाचा आणि औद्योगिक क्रांतीचा होता. यावेळी तंत्रज्ञानाच्या प्रगतीने कळस गाठला होता. अशाच नव-शोधांच्या वातावरणात ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी’च्या इंजिनिअर्सनी एकत्र येऊन अशी एक टाइम कॅप्सूल तयार केली जी ‘२९५७’ साल उजाडेपर्यंत उघडता येणार नव्हती. नेमकं काय होतं हे प्रकरण हे जाणून घेऊया या लेखातून..

जेव्हा तंत्रज्ञान इतके विकसित झाले नव्हते अशा पूर्वीच्या काळातही मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजीने वर्तमानात वैज्ञानिक क्रांती घडवतील असे उत्कृष्ट शोध लावले. पण एमआयटीमधील काही मोजके विद्यार्थी मात्र काळाच्या पुढचा विचार करणारे होते. १९५० च्या दशकात मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या.



‘चुकून लागलेला शोध’:

पहिल्यांदा टाइम-कॅप्सूल सापडले ते २०१५ साली. नॅनोटेक्नोलॉजी लॅबच्या उभारणीच्या कामादरम्यान. हा एक चुकून लागलेला शोध होता. हे टाइम-कॅप्सूल एमआयटीचे तत्कालीन अध्यक्ष जेम्स आर. किलियन ज्युनियर आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे प्राध्यापक हॅरोल्ड “डॉक” एडगर्टन यांनी १९५७ साली एका लेबलसह पुरले होते. त्या लेबलवरचा मजकूर होता, “कृपया २९५७ पर्यंत उघडू नका.”

टाइम कॅप्सूलमध्ये एमआयटीचे तत्कालीन अध्यक्ष किलियन ज्युनियर यांचे पत्र आहे. त्या पत्रात टाइम कॅप्सूलमधील वस्तूंचे तपशीलवार वर्णन आहे. टाइम कॅप्सूलमध्ये १९५७ पासून लागलेल्या शोधांचे विविध वैज्ञानिक सिद्धांत तसेच इतर तांत्रिक उपकरणांची कागदपत्रे समाविष्ट होती. तसेच या टाइम कॅप्सूलमध्ये १९५० च्या बातम्यांचे विश्लेषण करणारी काही प्रसिद्ध वृत्तपत्रंसुद्धा होती. यामध्ये पुढच्या पिढ्यांना समजतील अशा काही गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या.

आणखी एक विशेष गोष्ट त्या ‘टाईम-कॅप्सूल’मध्ये होती, ती म्हणजे क्रायट्रॉन. अध्यक्ष किलियन ज्युनियर यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी क्रायट्रॉनला एक अज्ञात इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणून परिभाषित केले आहे. या उपकरणाचा शोध १९५० साली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजीच्या ड्युडले ऍलन बक यांनी लावला होता. ट्रान्झिस्टरपेक्षाही अत्याधुनिक म्हणून ‘क्रायट्रॉन’ हे उपकरण संगणकशास्त्राचा मुख्य भाग बनणार होते.

१९५७ मधील एमआयटीच्या टाइम कॅप्सूलची रचना १९३९ सालच्या न्यूयॉर्क वर्ल्ड फेअर दरम्यान जमिनीत पुरण्यात आलेल्या टाइम कॅप्सूलसारखीच आहे. पण न्यूयॉर्क वर्ल्ड फेअरची टाइम कॅप्सूल पुढील ५ हजार वर्षांत उघडली जाणार होती. एमआयटीच्या टाइम कॅप्सुलची काच ही अतिशय टिकाऊ होती. ही काच कॅप्सूलमधील गोष्टींचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

भविष्याकडे:

एमआयटीने कॅप्सूल परत सील करून ते वेगळ्या ठिकाणी पुरले आहे. एमआयटी प्रशासन टाइम कॅप्सुलच्या उत्तम नोंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ही कॅप्सूल पुरल्याच्या जागेवर कोणतीही नवी इमारत उभी राहणार नाही, शिवाय हे रेकॉर्डस् २९५७ पर्यंत अबाधितपणे टिकवता येतील. भविष्य काय आहे हे कोणालाच माहिती नाही. पण मानवता २९५७ पर्यंत किंवा त्याही पुढील काळापर्यंत टिकेल अशी आपण आशा करू शकतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

कम्युटरचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला, परंतु पहिला कम्युटर प्रोग्राम या महिलेने लिहिला होता

Next Post

खऱ्या आयुष्यातील ‘इंडियाना जोन्स’ ॲमेझॉनच्या जंगलात मोहिमेवर असताना बेपत्ता झाला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

खऱ्या आयुष्यातील 'इंडियाना जोन्स' ॲमेझॉनच्या जंगलात मोहिमेवर असताना बेपत्ता झाला होता

महाराष्ट्रातील या दोन बहिणींनी ४० मुलांचं अपहरण करून त्यांचा अमानुषपणे खू*न केला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.