The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा चायनीज बाम आपल्या सगळ्या दुखण्यावरचा रामबाण उपाय आहे

by द पोस्टमन टीम
21 May 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


खेळताना, काम करताना किंवा अचानक शरीराचा एखादा भाग लचकला तर दुखावलेल्या स्नायूंना आराम पडावा म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी टायगर बाम वापरलेला आहेच. टायगर बाम हे तसे आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचे नाव आहे.

लहान काचेच्या डबीतील पिवळ्या रंगाचा बाम म्हणजे स्नायूंच्या दुखण्यावर अगदी रामबाण इलाज!

टायगर बामची मूळ कंपनी आहे सिंगापूरमध्ये. हॉ पर हेल्थकेअर या कंपनीतर्फे या बामची निर्मिती आणि वितरण जगभरात केले जाते. अनेक घरांत अडीनडीला उपयोगी पडावी म्हणून बनवून ठेवलेल्या ‘फर्स्ट एड कीट’मध्ये एक टायगर बामची छोटी डबी देखील नेहमी आढळते.

या टायगर बामचा इतिहास बघायला पार १८७० सालापर्यंत आपल्याला मागे जावे लागते.

ब्रह्मदेशातील म्यानमार या शहरांमध्ये हाऊ चून कीन नावाचा एक धडपड्या तरुण केमिस्ट स्वतःचा उद्योग उभारण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या गरीब परिस्थितीमुळे त्याला या उद्योगासाठी दुसरा कोणी साथीदार मिळत नव्हता. सतत काही ना काही तरी औषधांचे प्रयोग करण्याचे त्याचे वेड बघून घरच्यांनी त्याला घराबाहेर काढले होते.



तो मूळचा राहणारा चीन देशातील होता परंतु म्यानमारमध्ये काकांकडे राहत होता. काकांच्या दुकानामध्ये हरकाम्या नोकर म्हणून तो कामाला होता. पण दुकानात काम करत असताना देखील त्याचे वनौषधींचे प्रयोग चालूच होते. उद्योग करण्याची त्यांची मनीषा त्याला स्वस्थ बसू देईना.

त्याने काकाच्या दुकानात काम करून पैसे जमवले आणि स्वतःचा एक असा उद्योग सुरू केला. यामध्ये पहिल्यांदा तो निरनिराळ्या वनौषधींपासून बनवलेले प्रोडक्ट विकत असे. त्यामध्ये त्याला खास असे यश मिळत नव्हते.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९०८ साली हाऊ चुन कीनचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या दोन तरुण मुलांना आपला उद्योग पुढे नेण्यास सांगितले. त्यावेळी हाऊ चुन कीन एक असं मलम बनवण्याच्या प्रयत्नात होता, ज्याचा उपयोग स्नायू दुखीवर आणि इतर किरकोळ जखमांवर केला जाऊ शकेल.

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे अपूर्ण स्वप्न या दोन्ही मुलांनी पूर्ण केले. त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रोजेक्टवर काम केले. टायगर बामचा शोध लावून म्यानमारमध्ये स्वतःचे एक साम्राज्य उभारले.

या टायगर बामच्या पुढे अनेक व्हरायटी निघाल्या परंतु सगळ्यात प्रसिद्ध असे त्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे पांढर्‍या रंगाचा टायगर बाम, जो डोकेदुखीसाठी वापरला जातो आणि दुसरा लाल रंगाचा टायगर बाम जो स्नायू दुखीवर वापरला जातो.

तुम्ही जर टायगर बामची डबी कधी बघितली असेल तर त्याच्यावर बारीक अक्षरांमध्ये एक डिस्क्लेमर लिहिलेले असते त्याचा सारांश असा-

“चीनमध्ये अगदी प्राचीन काळापासून आढळणाऱ्या काही गुप्त औषधांपासून टायगर बामचा सिक्रेट फॉर्मुला बनवण्यात आलेला आहे. ऑ बुन हॉ आणि ऑ बुन पर या दोन्ही भावांना हा फॉर्म्युला त्यांच्या वडिलांकडून वारसाहक्काने मिळाला. ऑ बुन हॉ च्या नावावरून याला टायगर बाम असे नाव देण्यात आले कारण ऑ बुन हॉच्या प्रयत्नांमुळे आज टायगर बाम हे नाव जगभरातील प्रत्येक घरांमध्ये ओळखीचे झालेले आहे.”

१९२० साली हे दोघे भाऊ व्यापारानिमित्त सिंगापूरला आले. सिंगापूरला टायगर बामचा बिजनेस जोरात चालला. सिंगापूर त्यांना इतके आवडले की त्यांनी आपल्या कंपनीचे मुख्यालय सिंगापूर येथे ठेवले. त्यांनी टायगर बामची निर्मिती देखील सिंगापूर येथूनच सुरू करण्याचा निर्णय घेतला.

टायगर बामच्या बेस फॉरम्युलेशनमध्ये पेट्रोलियम जेली आणि पॅराफीन वापरले जाते. इतर मुख्य घटक म्हणून मेंथॉल आणि कापूर यांचा वापर केला जातो. टायगर बाम जगभरातील पेनकि*लर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मलमामध्ये एक सुप्रसिद्ध असे नाव आहे.

आज टायगर बामचे क्लासिक, बॅलन्स, जूनियर आणि ऍक्टिव्ह असे चार प्रकार येतात.

वेगवेगळ्या प्रकारची स्नायूदुखी,पाठदुखी, डोकेदुखी, कंजेशनचे प्रॉब्लेम, किरकोळ दुखापती, भाजणे अशा दुखण्यासाठी टायगर बामचा प्रामुख्याने वापर केला जातो.

ऑ बुन हॉ आणि ऑ बुन पर या दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर टायगर बामच्या बिझनेसला खूप मोठा धक्का बसला. कंपनी तोट्यात गेली. त्यानंतर स्लेट वॉकर नावाच्या एका ब्रिटिश माणसाने ही कंपनी विकत घेतली. पण पुढे हा माणूस देखील दिवाळखोर निघाला आणि त्यानंतर टायगर बामला कोणी वाली राहिला नाही अशी अवस्था सत्तरच्या दशकामध्ये निर्माण झाली. त्यावेळी हॉपर हेल्थकेअर ही कंपनी पुढे सरसावली आणि त्यांनी टायगर बामला टेकओव्हर केले.

सध्या या कंपनीतर्फे इ लिम वि हे कार्यकारी अधिकारी म्हणून टायगर बामच्या निर्मितीपासून वितरणापर्यंत सगळी जबाबदारी सांभाळतात. त्यांनी कारभार हातात घेतल्यापासून बऱ्याच सुधारणा झाल्या.

पूर्वी टायगर बाम प्लास्टिकच्या डबीमधून यायच्या. कंपनीचे माजी कार्यकारी अधिकारी हान यांनी काचेच्या डबीमधून टायगर बामचे उत्पादन सुरू केले. या काचेच्या डब्या पारदर्शक ठेवण्यावर त्यांनी भर दिला. आपले उत्पादन जास्तीत जास्त कसे आकर्षक दिसेल आणि हाताळायला कसे सोपे पडेल यावर कंपनीने काम केले.

टायगर बामचा मुख्य स्पर्धक म्हणून विक्स ओळखला जातो परंतु आज जागतिक बाजारपेठेमध्ये विक्सपेक्षा टायगर बामचा वाटा जवळपास १०% जास्त आहे.

माजी कार्यकारी अधिकारी हान यांनी प्रकर्षाने मार्केटिंगवर लक्ष दिल्याचे चांगले फळ या प्रॉडक्टला मिळालेले आहे. जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत आपले प्रॉडक्ट कसे पोहोचवता येईल यावरदेखील कंपनीच्या मार्केटिंग विभागाने काम केले.

आज सोशल मीडियावर लेडी गागासारख्या सेलिब्रिटीजसुद्धा टायगर बामची शिफारस करतात हे टायगर बामचे आजच्या घडीचे मोठे यश म्हणावे लागेल. २०१९ साली टायगर बामने ६६० करोड रुपयांचा बिजनेस केला.

शंभरहून जास्त देशांमध्ये या बामची विक्री आजच्या घडीला होते. आज सिंगापूरच्या टायगर बामच्या कारखान्यांमध्ये एक हजारहून जास्त कामगार काम करतात. याचे युनिट आज मलेशिया, हॉंगकॉंग, चायना, युरोप, उत्तर अमेरिका इत्यादी भागात पसरलेले आहेत.

एका धडपड्या केमिस्टने बनवलेला फॉर्मुला आज जगभरामध्ये करोड रुपयांचा व्यवसाय करत आहे!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फेसबुकच्या आधी लोक ऑरकुटवर “झालं का जेवण?” विचारायचे

Next Post

आज गार्डन वरेलीच्या साड्या आणि तो ब्रँड दोन्ही अडगळीत आहेत..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आज गार्डन वरेलीच्या साड्या आणि तो ब्रँड दोन्ही अडगळीत आहेत..!

नील आर्मस्ट्रॉंगचा चंद्रावर पाऊल टाकण्याचा तो क्षण बघण्यासाठी इंदिराजी पहाटे ४ पर्यंत जागल्या होत्या

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.