The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने ब्रिटिश राजघराण्याशी पंगा घेत चक्क शाही मुकुटावरच डल्ला मारला होता..!

by द पोस्टमन टीम
6 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


इंग्लंडचं राजघराणं आज जगातील मोजक्या राजघराण्यांपैकी एक आहे. सध्या जगभरात राजेशाहीला फारसं महत्त्व राहिलेलं नसलं तरी इंग्लंडच्या या राजघराण्याला मात्र आजही तितकाचं मान-सन्मान मिळतो. राजघराण्यातील प्रत्येक व्यक्ती आणि वस्तू सर्वोच्च सुरक्षाव्यवस्थेत असते. ही सुरक्षाव्यवस्था पार करून साधी टाचणी चोरणंही कठीण आहे.

मात्र, साधारण ३५० वर्षांपूर्वी एका व्यक्तीनं कडक सुरक्षाव्यवस्था भेदून शाही दागिने चोरण्यात यश मिळवलं होतं. राजकीय डावपेच खेळण्यात आणि वेशांतर करण्याची कला जणू त्याला जन्मजातच अवगत होती, इतका तो निष्णात होता.

इंग्लंडच्या राजघराण्याला शह देणाऱ्या या व्यक्तीचं नाव होतं, कर्नल थॉमस ब्लड!

आयर्लंडच्या काउंटी क्लेअर या ठिकाणी १६१८ साली कर्नल थॉमस ब्लडचा जन्म झाला होता. १६७१ मध्ये ‘टॉवर ऑफ लंडन’मधून इंग्लंड आणि स्कॉटलंडचे शाही दागिने चोरण्याच्या प्रयत्नामुळं कर्नल ब्लड प्रसिद्ध आहे.

इंग्लंडमधील गृहयु*द्धात ऑलिव्हर क्रॉमवेलच्या पार्लमेंटरी राऊंडहेड्समध्ये सामील झाल्यानंतर प्रथम कर्नल ब्लड चर्चेत आला होता. यामुळं त्याला आयर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळाली होती. परंतु, १६६० मध्ये जेव्हा किंग चार्ल्स दुसरा पुन्हा सिंहासनावर बसल्यानंतर ब्लडला आपली संपत्ती गमवावी लागली होती. तेव्हापासून शब्दांचे खेळ करण्यात पटाईत असलेला ब्लड एक षडयंत्रकार आणि कारस्थानी व्यक्ती झाला. राजाच्या ह*त्येसाठी त्यानं अनेक योजनांमध्ये भाग घेतला होता, १६६३ मध्ये आयर्लंडच्या डब्लिन कॅसलवर झालेल्या ह*ल्ल्याचं नेतृत्व देखील त्यानं केलं होतं.



१६७० साली, आयर्लंडचा माजी लॉर्ड लेफ्टनंट व ड्यूक ऑफ ऑर्मंडचं अपहरण करुन त्यांची ह*त्या करण्याच्या कारस्थानाचा ब्लड मास्टरमाईंड होता. असं म्हणतात तो स्वयंघोषित कर्नल होता. प्रत्यक्षात त्यानं लष्करामध्ये कधीही कर्नल पद गाठलं नव्हतं. ड्यूकच्या खू*नामुळं त्याच्या त्याच्या डोक्यावर एक हजार पौंडांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं. परिणामी त्याला नाव बदलून लपून-छपून राहणं भाग पाडलं. अगोदरपासून पोलिसांच्या रडावर असून देखील ब्लडनं जगातील सर्वात धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

१६४९ मध्ये ऑलिव्हर क्रॉमवेलच्याकाळात ब्रिटनच्या राजघराण्याची सर्व राजचिन्ह वितळवून विकण्यात आली होती.

मात्र, जेव्हा चार्ल्स दुसरा राजसिंहासनावर आला तेव्हा त्यानं पुन्हा राजचिन्ह तयार करून घेतली. त्यात हिरेजडीत मुकुट, सोन्याचा क्रॉस असलेला ऑर्ब आणि राजदंडाचा त्यात समावेश होता. ही सर्व राजचिन्हे ‘टॉवर ऑफ लंडन’च्या तळघरात ठेवण्यात आलेली होती. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तालबोट एडवर्ड्स या एका माजी सैनिकाकडं देण्यात आलेली होती. माफक शुल्क आकारून त्या बदल्यात राजेशाही दागदागिने पर्यटकांना दाखवण्याची परवानगी त्याला देण्यात आलेली होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

हे दागिने चोरण्यासाठी कर्नल ब्लडनं अतिशय हुशारीनं एक योजना तयार केली होती. १६७१च्या वसंत ऋतूमध्ये त्यानं एका सिलर्जीचा वेश धारण केला आणि एका अभिनेत्रीला त्याची पत्नी म्हणून तयार केलं. त्यानंतर दोघांनी टॉवर ऑफ लंडनला पर्यटक म्हणून भेट दिली. त्याच वेळी ब्लडची पत्नी झालेल्या अभिनेत्रीनं आजारी पडण्याचं नाटक केलं. रखवालदार एडवर्डसनं दया दाखवत तिला त्याच्या घरी नेऊन उपचार केले.

या उपकाराची परतफेड म्हणून काही दिवसांनी कर्नल ब्लड काही भेटवस्तू घेऊन एडवर्डच्या घरी गेला. त्यानं एडवर्ड आणि त्याच्या पत्नीसोबत मैत्री केली. रखवालदार जोडप्याचा विश्वास संपदान केल्यानंतर त्यानं आपल्या पुतण्यासाठी त्यांच्या मुलीला मागणी घातली. एक दिवस नवरदेव मुलाला घरी घेऊन येण्यास सांगितलं. कर्नल ब्लड याच संधीची वाट पाहत होता.

९ मे १६७१ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास, कर्नल ब्लड हा थॉमस, रॉबर्ट पॅरोट, रिचर्ड हॅलीवेल आणि विल्यम स्मिथ या आपल्या चार साथीदारांसह टॉवर ऑफ लंडन येथे आला. थॉमस हा नवरदेव म्हणून तर इतर दोन त्याचे मित्र म्हणून आले होते. प्रत्येकानं आपल्या पोषाखामध्ये एक खंजीर आणि पिस्तूल लपवलेलं होतं. पाहुणचार आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या पाहुण्यांना राजेशाही दागिने दाखवण्याचा ब्लडनं आग्रह केला.

मुलीचं लग्न जमल्याच्या आनंदात एडवर्डनं देखील त्यांना दागिने पाहण्यासाठी नेलं. ज्याक्षणी त्यानं दागिन्यांच्या कक्षाचा दरवाजा उघडला त्याच क्षणी ब्लड आणि त्याच्या साथीदारांनी त्याला पोत्यात भरलं. ७७ वर्षीय एडवर्डनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र, कर्नल ब्लडनं त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्याच्या पोटात खंजीर खुपसली.

एडवर्डला जखमी केल्यानंतर त्यांनी दागिने चोरीकडं आपलं लक्ष केंद्रीत केलं. त्यांनी सर्व दागिने सहज बाहेर नेता यावेत म्हणून ते चेपून त्यांचा आकार सपाट केला. मात्र, त्याचं वेळी एडवर्डचा सैनिक असलेला मुलगा वेथ अचानक घरी आला आणि वडिलांना शोधू लागला. त्यामुळं कर्नल ब्लड आणि त्याच्या साथीदारांनी बाहेर जाण्यासाठी घाई केली व बाहेर पडले.

चोर बाहेर गेल्याचे लक्षात येताच जखमी एडवर्डनं सर्व ताकतीनिशी बाहेर पडून सुरक्षा अलार्म वाजवला आणि गेटवरील रक्षकांना सतर्क केलं. अर्लाममुळं सतर्क झालेला वेथ आणि त्याचा मिलीटरी इंजिनिअर साथीदार मार्टीन बेकमन यांनी चोरांचा पाठलाग सुरू केला. गेटवरील सुरक्षा रक्षकांना गोळ्या घालून चोर बाहेर पडण्यात यशस्वी तर झाले मात्र, वेथ आणि मार्टीन यांनी त्यांना रोखलं. तोपर्यंत जमा झालेल्या सैनिकांनी कर्नल ब्लड आणि त्याच्या साथीदारांना अटक केली.

कर्नल ब्लडला राजा चार्ल्स दुसरा याच्यासमोर उभं करण्यात आलं. ब्लडचे गुन्हे त्याला देशद्रोही ठरवून मृत्यू मिळण्याइतके गंभीर होते. सर्वांना हाच निर्णय अपेक्षित होता. मात्र, राजानं त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला वर्षाला ५०० पौंड मिळकतीची जमीन आयर्लंडमध्ये देऊ केली. राजानं असा विलक्षण निर्णय का घेतला याबाबत अनेक चर्चा झाल्या आणि तर्क लढवले गेले.

काहींच्या मते, कर्नल ब्लड हा चार्ल्सचा विरोधक ड्यूक ऑफ बंकिंगहमसाठी काम करत होता. त्याला खुश करून ड्यूक विरोधात वापरण्यासाठी चार्ल्सनं हा निर्णय घेतला होता. चार्ल्सनं ब्लडला माफी देण्यामागे जे काही कारण असले ते असो. मात्र, त्याचा हा निर्णय इंग्लंडच्या इतिहासातील वादग्रस्त निर्णयांपैकी एक राहिला आहे.

राजाची दया मिळाल्यानंतर, कर्नलनं ब्लडं आपलं पुढील आयुष्य एकदम आरामात काढलं. त्यानं काही दिवस हेर म्हणूनही काम केलं. मात्र, म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तसंच ब्लडची देखील कटकारस्थानं करण्याची सवय गेली नाही.

त्यानं पुढं राजदरबारातील षडयंत्रांमध्ये स्वत:ला सामिल करून घेतलं. नंतर तो काही दिवस आजारी होता. २४ ऑगस्ट १६८० रोजी वेस्टमिनिस्टर येथील घरी त्यानं आपला श्वास घेतला.

कर्नल ब्लड नक्कीच वाईट काम करणारा एक गुन्हेगार आणि कपटी व्यक्ती होता. मात्र, त्याची बुद्धीमत्ता आणि धाडसाचं कौतुक करण्याचा मोह इंग्लंडमधील अनेक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनाही रोखता येत नाही. आजही इंग्लंडमधील पोलीस दलात त्याचे अनेक दाखले दिले जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जसं रायफलमध्ये AK-47 तसं पिस्तूलमध्ये ग्लॉक १७..!

Next Post

बोट बुडाली, पण जगण्याच्या जिद्दीने हा पठ्ठयाने १३३ दिवसांनी समुद्रातून जिवंत परत आला

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

बोट बुडाली, पण जगण्याच्या जिद्दीने हा पठ्ठयाने १३३ दिवसांनी समुद्रातून जिवंत परत आला

दुसऱ्या देशांच्या अंतर्गत विषयात नाक खुपसणं सोडलं तर जॉर्ज सोरोसकडून शिकण्यासारखं खूप आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.