The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या व्हिएतनामी कुटुंबाने कोका कोलाची २.५ अब्ज डॉलर्सची ऑफर धुडकावून लावली होती

by द पोस्टमन टीम
4 July 2024
in मनोरंजन, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


तुमच्या कंपनीसाठी तुम्हाला कोणी २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स देण्याची तयारी दर्शविली तर तुम्ही काय कराल? हसत हसत ‘हो’ हेच उत्तर बरेच लोक देतील. परंतु व्हिएतनाममधील एका कुटुंबाने या ऑफरला चक्क नकार दिला होता.

२.५ अब्ज डॉलरची रक्कम धुडकावून लावणाऱ्या या व्यावसायिकाचे नाव आहे ‘ट्रान कि थान्ह’. कौटुंबिक व्यवसाय म्हणून व्हिएतनाममध्ये स्वत:चा शीतपेय व्यवसाय चालवणाऱ्या ‘ट्रान कि थान्ह’ यांना कोका कोला कंपनीने २.५ अब्ज डॉलर्सची ही ऑफर दिली होती जी त्यांनी धुडकावून लावली.

‘ट्रान कि थान्ह’ यांच्या आईचे एका कार अपघातात निधन झाले, त्यावेळी ते फक्त ९ वर्षांचे होते. तिथून त्यांना एका अनाथाश्रमात भरती करण्यात आले. तिथे त्यांनी पुढची सहा वर्षे काढली. अनाथाश्रमात त्यांना अतिशय वाईट वागणूक मिळत होती. स्वत:च्या जिवीकेसाठी भांडण्याची त्यांची वृत्ती इथूनच निर्माण झाली.

अतिशय घाणेरड्या जागी त्यांना झोपावे लागत असे. जेवणात मिर्ची टाकताना पकडले असता फक्त मिरची त्यांना कशी खाऊ घातलेली हे सगळे प्रसंग आजही त्यांच्या अंगावर शहारे आणतात.



या सगळ्यातून त्यांची सुटका झाली आणि १९७५ साली त्यांनी यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यावेळी त्यांना सरकारी मंत्रालयात नोकरी मिळाली ती धातू विभागात. इथे त्यांना अतिशय तोकडा पगार मिळत असे.

यात खुश नसल्याने त्यांनी दोन वर्षांत ही नोकरी सोडली आणि यीस्ट निर्मितीचा व्यवसाय सुरु केला. अजून काही उद्योगांत हात आजमावून त्यांनी बीअरची निर्मिती सुरु केली. १९९४ मध्ये त्यांनी ‘टीएचपी’ या त्यांच्या उद्योग समुहाची सुरुवात केली. हे तेच वर्ष होतं, जेव्हा अमेरिकेने व्हिएतनामवरील व्यापारी निर्बंध उठवले.

२००० च्या दशकात ट्रान कि थान्ह यांनी अल्कोहोलच्या उत्पादनांऐवजी चहा आणि शीतपेयांच्या निर्मितीवर लक्ष देण्याचे ठरवले. यात त्यांना नफाही चांगला होत होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

टीएचपीने खरी भरारी घेतली ती २००६ ते २००९ या काळात. काही नवीन पेयांची सुरुवात करुन कंपनीच्या उत्पन्नात ४०० टक्क्यांची वाढ झाली.

ट्रान कि थान्ह यांची मुलगी ‘फुओंग उयेन ट्रान’ तिच्या वडीलांपासून प्रचंड प्रेरीत आहे.

कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची त्यांची वृत्ती आणि आयुष्याबद्दल कधीही तक्रार न करणे हे त्यांचे गुण तिला सगळ्यात जास्त प्रेरीत करतात असे ती म्हणते. “काहीच अशक्य नाही. आपल्या क्षमतेला कोणतीही मर्यादा नाही.” हे त्यांच्या वडिलांचे आवडते वाक्य आहे.

‘फुओंग उयेन ट्रान’ यांनी टीएचपी समूहाच्या प्रवासाबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात लिहिताना त्यांनी आपल्या पालकांची भेट कशी झाली हे ही सांगितले आहे.

“आई-वडील साखर कारखान्यात काम करत असताना पहिल्यांदा भेटले. १९७९ साली त्यांनी लग्न केले. त्यांची जोडी एकमेकांना पुरक अशी असून वडीलांकडे असणाऱ्या दूरदृष्टी आणि बुद्धीमत्तेला योग्य जोड मिळाली आहे ती त्यांच्या आईच्या लोकव्यवस्थापन कौशल्याची. दोघेही अतिशय जिद्दी असून कष्ट करण्यासाठी नेहमी तयार असतात.”

‘फुओंग उयेन ट्रान’ यांना एक लहान बहीण आहे, तसेच एक छोटा भाऊ पण आहे. तिघेही आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करतात. ‘फुओंग उयेन ट्रान’ या स्वत: हार्वर्ड विद्यापीठातून पदवीधारक आहेत. पदवी घेतल्यानंतर त्यांना सिंगापूरमध्ये चांगली नोकरी मिळाली होती. परंतु त्यांच्या मते घरच्या कंपनीत काम करणेच जास्त योग्य होते.

दुसरीकडे कुठे स्वत:च्या वडीलांच्या कंपनीत काम करण्यासाठी कष्ट घेण्याची गरज कोणाला पडेल का..? परंतु ‘फुओंग उयेन ट्रान’ या सांगतात की त्यांना ही नोकरी मिळवण्यासाठी आपली योग्यता सिद्ध करावी लागली. यासाठी १९९९ मध्ये त्यांनी कंपनीला डिजीटाईज करण्याचे सुचवले. त्यांनी दिलेल्या या सुचनेनुसार कंपनीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यात आले.

Enterprise Resource Planning (ERP) या नावाने ओळखली जात असलेली ही प्रक्रिया कंपनीच्या भरभराटीचे मुख्य कारण बनली.

या कार्याची दखल घेत त्यांच्या वडीलांनी त्यांना विपणन संचालकाच्या सचिवपदावरुन समुहाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त केले. आजही कामात चुक झाली तर त्यांचे वडील त्यांना बाकीच्या कर्मचाऱ्यांएवढेच ओरडतात. आपला पगार ठरवण्यासाठीसुद्धा त्यांना आपल्या वडीलांची मनधरणी करावी लागली होती असे त्या पुस्तकात लिहितात.

पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी कोका कोला कंपनीने टीएचपी विकत घेण्यासाठी २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स देण्याची तयारी दर्शविल्याचा किस्सा सांगितला आहे. २०१२ साली हा किस्सा घडला.

कंपनी विकत घेऊन टीएचपी समूहाला यापुढे कोणतेही पेय बनवता येणार नाही असा हा करार होता.

कराराची एवढी मोठी रक्कम बघूनही ‘ट्रान कि थान्ह’ यांनी या कराराला धुडकावले. कोका-कोला कंपनी विकत घेईल अशी अपेक्षा त्यांना नव्हती, उलट कोका-कोलाबरोबर भागीदारी करुन आपला व्यवसाय जागतिक पातळीवर पोहचवण्याचा त्यांचा मानस होता असे ते सांगतात.

टीएचपी समूह आज अगदी जगप्रसिद्ध नसला तरी १६ देशांमध्ये समूहाचे शीतपेय निर्यात केली जातात. थायलंड, कंबोडिया, लाओस, ऑस्ट्रेलिया, रशिया या महत्त्वाच्या देशांतसुद्धा शीतपेयांची निर्यात केली जाते. डॉ. थान्ह हर्बल चहा, झिरो डिग्री ग्रीन चहा, नंबर वन एनर्जी ड्रिंक आणि नंबर वन ज्युसी फ्रूट हे समूहाचे काही प्रसिद्ध पेय आहेत.

उद्योगाच्या सुरुवातीला असलेले २० लोकांचे मनुष्यबळ आता ४००० एवढे झाले आहे. दिवसाला ३००० लिटर शीतपेय याप्रमाणे वार्षिक १ दशलक्ष लिटर शीतपेय उत्पादित करणारा उद्योग आज प्रत्येक वर्षी १ अब्ज लिटरपेक्षाही जास्त शीतपेयाचे उत्पादन करतो. २०१५ साली कंपनीचे उत्पन्न ५० करोड अमेरीकन डॉलर एवढे होते.

बीबीसीच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार लवकरच अमेरिकी बाजारात पदार्पण करण्याची तयारी टीएचपी समूह करत आहे. २०२३ पर्यंत उत्पन्नाचा आकडा १ अब्ज डॉलर, तर २०२७ पर्यंत ३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचवण्याचा मानस असल्याचे ‘फुओंग उयेन ट्रान’ आपल्या पुस्तकात लिहितात.

एवढ्या उंचीवर पोहचूनही ‘ट्रान कि थान्ह’ आणि त्यांची मुलगी ‘फुओंग उयेन ट्रान’ थांबण्यास तयार नाहीत. कर्तुत्वाची किंमत पैशात नसुन कष्टात असते याचे ज्वलंत उदाहरण असलेले ‘ट्रान कि थान्ह’ हे नविन तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या हुकुमशाहच्या कारनाम्यांपुढे हि*टल*रही फिका पडेल

Next Post

आणि इंदिरा गांधींनी अमेरिकी राष्ट्रपतीला जशास तसे उत्तर दिले

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

आणि इंदिरा गांधींनी अमेरिकी राष्ट्रपतीला जशास तसे उत्तर दिले

स्वामीजींच्या त्या भाषणाने भारताच्या वैभवशाली परंपरेची ओळख जगाला करून दिली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.