The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वास बसणार नाही, पण हे अदृश्य शिल्प एका माणसाने १८ हजार डॉलर्सला खरेदी केलंय

by Heramb
4 October 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


या जगात ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तूंचा तसेच शिल्पांचा आर्थिक मोबदला दिला जातो. भारतात मात्र अशा ऐतिहासिक आणि कलात्मक गोष्टींना आवश्यक तसे महत्त्व दिले जात नाही. आपल्याकडे असलेल्या या वैभवाची प्रचंड किंमत असूनही अनेक लोक फक्त त्याकडे दुर्लक्षच करीत नाहीत तर या ‘जुन्या’ गोष्टी कशाप्रकारे संपतील किंवा राहणारच नाहीत याचीही जणू काळजीच घेतली जाते.

मोगलांच्या बाबतीत जे झालं ते ब्रिटिशांना स्वतःच्या बाबतीत होऊ द्यायचं नव्हतं. भारताच्या वैभवशाली इतिहासातून लोकांनी प्रेरणा घेतली तर इथे राज्य करणं अवघड होईल. म्हणूनच त्यांनी शालेय शिक्षणातून भारतीय इतिहास वगळला आणि ऐतिहासिक महत्वाचे किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी पैसे देऊन माणसे कामावर ठेऊन घेतली. पण शेवटी घडलं उलटंच! ‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य टिळक, सावरकर, यांच्यासारखे अनेक सिंह याच मातीतून उभे राहिले. असो. पण ब्रिटिश काळापासूनच भारतीयांनी ऐतिहासिक आणि तत्सम वास्तूंना महत्व देणे कायमचेच सोडून दिल्यासारखे वाटते. पण परदेशात सहसा असे होत नाही.

कलेच्या संकल्पनेपेक्षा अधिक मायावी काहीही नाही. सामान्य माणसासाठी कदाचित हे समजणे कठीण आहे. तथापि, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्यासाठी कला हा त्यांच्या जीवनाचा आवश्यक भाग आहे. डेड पोएट्स सोसायटीच्या रॉबर्ट विलियम्सच्या शब्दांत सांगायचं झालं तर, “कविता सुंदर आहे म्हणून आपण कविता वाचत आणि लिहित नाही. आपण मानवजातीचे सदस्य आहोत म्हणूनच आपण कविता वाचतो आणि लिहितो. मानवजाती उत्कटतेने भरलेली आहे. औषध, कायदा, व्यवसाय, अभियांत्रिकी, हे उदात्त धंदे आहेत आणि ते मानवी जीवन टिकवण्यासाठी आवश्यक आहेत. पण कविता, सौंदर्य, प्रणय, प्रेम, यांसाठी आपण जिवंत राहतो. ”

आपल्याकडे संपूर्ण इतिहासात बरेच हुशार कलाकार आहेत. चित्रकार, आविष्कारक आणि पॉलीमॅथ लिओनार्डो-द-विंचीने आपल्याला मोनालिसा आणि इतर असंख्य उत्कृष्ट कलेचे नमुने दिले. व्हिन्सेंट व्हॅन गॉग, अत्याचारग्रस्त डच चित्रकार, त्याने स्वतःचे कान कापले, त्याने कलाकारांना एक वेगळीच कला शैली दिली. अशी शैली यापूर्वी कधीही कोणी पाहिली नव्हती. ‘द स्टॅरी नाईट’ हा त्याचा पुरावा आहे. पाब्लो पिकासो, स्पॅनिश उस्तादाने स्वतःच्या अमूर्त कला शैलीचा शोध लावला. इतक्या प्रचंड प्रतिभेचे कलाकार आणि त्यांचे संग्रह उपलब्ध असतानाही कोणीतरी अदृश्य शिल्पावर तब्बल १८३०० डॉलर्स खर्च केले. यामागे नेमकं कारण काय होतं..



साल्वाटोर गरौ एक इटालियन कलाकार आहे. त्याचा जन्म सार्दिनियाच्या भूमध्य बेटावर १९५३ साली झाला. त्याने १९७४ साली  अकॅडेमिया-डी-बेले-आर्टी डी फायरन्झमधून पदवी प्राप्त केली. आश्चर्याची बाब म्हणजे पदवीनंतर तो एका पुरोगामी रॉक ग्रुपचा ड्रमर बनला आणि व्हिज्युअल आर्ट करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. पण, हा बँड विखुरल्यानंतर तो कलेकडे वळला.

त्याने १९८४ साली पहिला शो केला आणि तेव्हापासून त्याच्या प्रसिद्धीत सातत्याने वाढ होत राहिली. २००५ साली त्याने २०० मीटर चौरस पीव्हीसी शीटवर एक अमूर्त तुकडा रंगवला. मिलानमधील कोर्सो मॅजेन्टा येथील एका इमारतीमध्ये हे चित्र लावले गेले. फेब्रुवारी २०२१ मध्ये, गारौने त्याचे पहिले अदृश्य शिल्प प्रदर्शित केले. त्याने त्याला “बुद्ध इन कॉन्टेम्प्लेशन” असे नाव दिले आहे. मिलानमधील पियाझा डेला स्काला येथे त्याचे प्रदर्शन झाले. तिथेच त्याला अदृश्य शिल्पाची कल्पना आली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

या तुकड्याचे शीर्षक “लो सोनो” (मी आहे) असे होते आणि ते एका अज्ञात खरेदीदाराला विकले गेले. खरेदीदाराला हे शिल्प खरे असल्याचे आणि त्याच्या मालकीचे असल्याचा पुरावा म्हणून प्रमाणपत्रही देण्यात आले.

गरौ त्याचे कार्य सिद्ध करताना लिहितो: “व्हॅक्यूम हे उर्जेने भरलेल्या जागेपेक्षा दुसरे काहीच नाही, आणि जरी आम्ही ते रिक्त केले तरी काहीही शिल्लक राहणार नाही, हायझेनबर्गच्या अनसर्टेनीटीच्या तत्त्वानुसार, ‘कशाचेही’ वजन नाही. म्हणून, त्यात ऊर्जा आहे जी घनरूप आणि कणांमध्ये रूपांतरित होते, म्हणजेच आपल्यामध्ये. तुम्हाला ते दिसत नाही, पण ते अस्तित्वात आहे. हे हवा आणि आत्म्याने बनलेले आहे. हे एक असे काम आहे जे तुम्हाला कल्पनाशक्ती सक्रिय करण्यास प्रवृत्त करते.” या कलाकाराने आपले काम सिद्ध करण्याचा प्रयत्न करत त्या कलेची तुलना देवाशी केली. तो म्हणाला, “शेवटी, कधीही न पाहिलेला देव आपण तयार करतोच की!”

कला वेळेनुसार अमूर्त होत चालली आहे आणि काही कलाकृतींना तर हास्यास्पदही म्हणता येईल, एका व्यक्तीने एका कलादालनात चष्म्याची एक जोडी ठेवली आणि लोकांनी ती कला असल्याचे मानले. कलेच्या या विचित्र विकासामागे काय कारण असू शकते?

कलेचा इतिहास लेण्यांमध्ये सुरू झाला. आपल्या पूर्वजांनी आठवणी जपण्यासाठी आणि स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी भिंतींवर चित्रकला दाखवली. मानवी समाजाबरोबर त्याची प्रगती झाली. ऑइल पेंट्सच्या शोधामुळे कला संपूर्ण वेगळ्या पातळीवर पोहोचली. अत्यंत गुंतागुंतीची आणि तपशीलवार चित्रे बनविण्यावर कलाकारांनी भर दिला. अशी चित्रे सर्वात लहान बिंदूच्या स्तरावरही अतिशय अचूक होती. मोनालिसाचे चित्र हे याचे एक उदाहरण आहे.

कलेच्या या प्रकाराला वेढलेले वेगळेपण मात्र मावळू लागले आणि नवीन कलाकारांना प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागत आहेत. एक उदाहरण म्हणजे व्हॅन गॉगची कला शैली. ही शैली त्या काळातील ट्रेंडपेक्षा खूप वेगळी होती. मग पिकासो कलेचा एक प्रकार घेऊन आला जो आणखी वेगळा होता. त्याने अमूर्त क्षेत्रात प्रवेश केला. आता, अखेरीस, काहीतरी अनन्यसाधारण घडून अदृश्य कलेला जन्म दिला गेला आहे. या मुक्कामापासून कलाक्षेत्र कोणत्या दिशेला जाईल असे तुम्हाला वाटते?, कमेंट करून नक्की सांगा..


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तिला ‘फाशीची शिक्षा’ भोगून झाल्यानंतर, उर्वरित आयुष्य जगण्याची परवानगी देण्यात आली होती

Next Post

न्यूझीलँड तर सगळ्यांना माहिती आहे, पण ओल्ड झीलँड कुठे आहे..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

न्यूझीलँड तर सगळ्यांना माहिती आहे, पण ओल्ड झीलँड कुठे आहे..?

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईनसुद्धा एका रशियन हेर स्त्रीच्या जाळ्यात अडकला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.