The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युट्युबवरचा पहिला व्हिडीओ कोणता असा प्रश्न कधी पडलाय का..? तर हे घ्या उत्तर..!

by द पोस्टमन टीम
21 June 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज सगळं जग सोशल मिडियाच्या जाळ्यात अडकलंय. सगळ्या गोष्टी आता “ट्रेंड”नुसार चालतात. हेच सोशल मिडिया आज अनेकांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलंय. यात सगळ्यात वर नंबर लागतो तो युट्युबचा. युट्युब काय आहे  हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.

आज युट्युबवर जगातील जवळपास प्रत्येक विषयावर व्हिडीओ आहेत. पण जगातला पहिला युट्युब व्हिडिओ कधी बनला असेल? कुठल्या विषयावर असेल? कोणी बनवला असेल? असे प्रश्न जर तुम्हालाही पडत असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला या लेखात नक्की मिळतील!

२३ एप्रिल २००५! हीच ती तारीख आहे ज्यादिवशी जगातला पहिला युट्युब व्हिडीओ बनवला होता.

हा व्हिडीओ युट्युबचा को-फाउंडर जावेद करीम याने बनवला होता. “जावेद” या नावाच्या पहिल्या-वहिल्या युट्युब अकाऊंटवरून हा व्हिडीओ टाकण्यात आला होता.

१९ सेकंदाच्या या व्हिडीओचं नाव होतं “मी ॲट द झू”. हा व्हिडीओ सॅन डीएगो प्राणीसंग्रहालयात शूट करण्यात आला होता. दोन हत्तींच्या समोर बनवलेल्या या व्हिडीओपासून युट्युबचा प्रवास सुरु झाला.



कुठला मेकअप नाही, काही अद्ययावत तंत्रज्ञान नाही, कुठली स्क्रिप्ट नाही. असा हा व्हिडीओ बघाल तर तुम्हाला त्यात छोटा करीम उगाचच दोन हत्तींबरोबर गप्पा मारताना दिसेल.

 

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

“तर, आम्ही इथे आज झूमध्ये आलो आहोत. इथल्या हत्तींसमोर आम्ही उभे आहोत. आणि गमतीची गोष्ट अशी की या हत्तींची सोंड खूप खूपच लांब आहे. बस! एवढंच सांगायचं आहे.”

एवढं बोलून हा व्हिडीओ संपतो. तुम्ही बघाल तर आजच्या युट्युबर्ससारखं करीम आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला सांगत नाहीये. हा व्हिडीओ एकदम साध्या कॅमेरा वापरून बनवला होता त्यामुळे याची क्वालिटी पण खूप चांगली नाहीये.

पण हा पहिला व्हिडीओ आजही तुम्हाला जावेदच्या चॅनेलवर दिसेल आणि या व्हिडीओला १२३ मिलियनहून अधिक लोकांनी बघितलंय.

आजवरच्या युट्युब व्हिडीओपैकी हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडीओ आहे असंच म्हणावं लागेल. कारण कुठल्याही तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय बनवलेला हा व्हिडीओ युट्युबचा खरा उद्देश सांगतो. तुमच्याकडे असणारी एखादी गोष्टं, एखादी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असणारं साधन म्हणजे युट्युब! तुम्हाला त्यासाठी खूप मोठा सेटअप हवा, मोठाले कॅमेरे हवे असं काही नाही. साध्या कॅमेरावर शूट करून तुम्ही तुम्हाला हवा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवू शकता हेच हा व्हिडीओ सांगतो.

जून २०२४च्या डेटानुसार, युट्युबची मार्केट व्हॅल्यू जवळपास १८३० करोड डॉलर्सपेक्षा जास्त आहे. मार्च २०२४च्या डेटानुसार, सुमारे २५ लाख लोकांनी युट्युबवर लॉग इन केलं आहे. प्रत्येक मिनिटाला ५०० तासांचे व्हिडीओ युट्युबवर पडतायत.

जगातील कितीतरी लोकांच्या करियर सुरुवात युट्युबला केलेल्या एका व्हिडीओमुळे झाली आहे. आज ते लोक आपापल्या क्षेत्रात खूप चांगलं नाव कमावताना दिसतायत आणि या सगळ्याची सुरुवात झाली एका १९ सेकंदाच्या प्राणीसंग्रहालयातील व्हिडीओने! त्या व्हिडीओसाठी आणि युट्युबसाठी करीमचे खूप खूप आभार!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

२१व्या वर्षी ‘हज’ला निघालेला इब्न बतुता तीस वर्ष जग फिरून घरी गेला..!

Next Post

सतरा वर्षाचा ‘विली’ दोनवेळा मृत्युदंडाला सामोरा गेला होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सतरा वर्षाचा 'विली' दोनवेळा मृत्युदंडाला सामोरा गेला होता..!

परिसा तब्रीज - 'गुगल'ला हॅकिंगपासून वाचवणारी प्रिन्सेस

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.