The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विश्वास बसणार नाही पण हा माणूस अठरा वर्षे विमानतळावर अडकून पडला होता

by द पोस्टमन टीम
17 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करण्याचे काही नियम आहेत. त्यासाठी तुम्हाला विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण एखाद्यावेळी प्रवासात जर जवळपासची आपली सगळी कागदपत्रे हरवली तर काय होईल? दूरच्या देशातून घरी परत येण्यासाठी तुम्ही काहीतरी धडपड नक्कीच कराल, पण ही धडपडही यशस्वी नाही झाली तर?

नेमक्या अशाच परस्थितीत फसलेल्या मेहरान करीमी नस्सेरी यांना तब्बल अठरा वर्षे पॅरीसच्या विमानतळावरच काढावी लागली. मेहरान करीमी नस्सेरी यांचा हा प्रवास खूपच थकवणारा आणि त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणारा ठरला. कोण आहेत हे मेहरन करीमी नस्सेरी? त्यांना नेमका कुठून कुठे प्रवास करायचा होता? त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करायचाच होता तर त्यांनी त्याच्या नियमांची पूर्तता का करू शकले नाहीत? जाणून घेऊया या लेखातून.

नस्सेरी यांना ब्रिटनला जायचं होतं, पण आवश्यक त्या कागदपात्रांची पूर्तता न झाल्याने आणि किचकट कायद्यामुळे ते ना पुढे जाऊ शकले ना मागे येऊ शकले. उलट आयुष्यातील १८ वर्षे त्यांना त्या एकाच एअरपोर्टवर काढावी लागली, तीही सोबत असलेल्या मोजक्या सामानासह.

२६ ऑगस्ट १९८८ पासून ते जुलै २००६ पर्यंत तब्बल अठरा वर्षे नस्सेरींनी विमानतळावरच दिवस काढले.

इराणच्या मस्जेद सोलेमन येथे १९४३ साली नस्सेरी यांचा जन्म झाला. १९७३ साली नस्सेरी ब्रिटनच्या ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीत शिकायला गेले. इराणचा हुकुमशहा शाह रेझा पहलवीविरुद्ध ब्रिटनमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यात नस्सेरी यांनी सहभाग घेतला होता.



१९७७ साली त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते इराणला परत आले. परंतु परदेशात राहून सरकार विरोधी कारवायांत सहभागी झाल्याच्या कारणावरून त्यांना त्यांच्या देशातून हाकलून देण्यात आले. इराण सरकारने त्यांचे इराणी नागरिकत्व रद्द केले. इराणमध्येच राजकीय आश्रय घेऊन त्यांनी वेगवेगळ्या देशांकडे आपल्याला नागरिकत्व मिळावे म्हणून विनंती केली, पण त्यांच्या या आवाहनाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

पुढे १९८१ साली बेल्जियमने त्यांना इराणी निर्वासित म्हणून मान्यता दिली. यामुळे त्यांना इतर युरोपियन राष्ट्रांकडे सदस्यत्व मिळण्याची विनंती तरी करता आली. आधी इंग्लंडमध्ये राहिलेले असल्याने त्यांनी पुन्हा एकदा इंग्लंडलाच जाण्याचा विचार केला.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

१९८८ साली नस्सेरी फ्रांसला गेले. तिथून इंग्लंडला जाण्याचे त्यांचे नियोजन होते. फ्रांसच्या चार्ल्स दि गॉले इंटरनॅशनल एअरपोर्टवर प्रवेश केल्यावर त्यांनी सांगितले की त्यांना निर्वासित म्हणून मिळालेली कागदपत्रे हरवली आहेत. त्यांच्याकडे जर ही कागदपत्रे असती तर निदान ते निर्वासित असल्याचे तरी सिद्ध झाले असते. त्यांनी लंडनचे विमान पकडले. पण ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा फ्रांसला पाठवले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांच्याकडून पासपोर्ट मागितले तेव्हा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. फ्रांसमध्ये परतल्यावर फ्रांसच्या अधिकाऱ्यांनीही पहिल्यांदा नस्सेरी यांना अटक केली, पण नंतर सोडून दिले.

फ्रांसमध्ये त्यांनी कायदेशीर प्रवेश केल्याचे या अधिकाऱ्यांनी मान्य केले, पण आता इथून पुढे कुठे जायचे हे ठरवणे मात्र खूपच कठीण होते. कारण, त्यांना स्वतःचा देशच नव्हता, तर ते कुठे जाणार?

प्रत्येक एअरपोर्टवर एक आंतरराष्ट्रीय ठिकाण असते, म्हणजे त्या जागेवर कुठल्याच देशाचा हक्क, अधिकार नसतो. नस्सेरी आशा आंतरराष्ट्रीय ठिकाणी कुठल्याही कागदपत्रांशिवाय राहू शकत होते. त्यांच्याकडे निर्वासित असल्याचा दाखलाच नसल्याने ते कुठल्याच देशात जाऊ शकत नव्हते. त्यांना जर एअरपोर्ट सोडायचे असेल तर त्यांनी त्यांचा निर्वासित असल्याचा पुरावा सादर करणे गरजेचे होते. या अडचणीमुळे ते चार्ल्स दि गॉले एअरपोर्टवरच राहू लागले. ते विमानतळ हेच त्यांच घर बनलं.

फ्रांसमधील मानवाधिकार कार्यकर्ते वकील ख्रिस्तियन बुर्जेट यांच्या कानावर जेंव्हा नस्सेरी यांची बातमी गेली तेव्हा त्यांनी नस्सेरी यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चय केला. त्यांनी नस्सेरीचा प्रश्न फ्रांसच्या कोर्टापर्यंत नेला. १९९२ साली कोर्टाने आदेश दिला की, नस्सेरी यांनी फ्रांसमध्ये कायदेशीर मार्गाने प्रवेश मिळवला असला तरी, सध्या त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नसल्याने त्यांना फ्रांसमध्ये प्रवेश देणे कठीण आहे. शिवाय, त्यांना एअरपोर्टवरूनही हाकलू शकत नाही.

कोर्टाने या प्रकरणी असा पवित्रा घेतल्याने नस्सेरी यांना एअरपोर्टही सोडता येत नव्हते. त्यांना फ्रेंच भाषा बोलता येत नव्हती त्यामुळे फ्रांसमध्ये प्रवेश मिळाला असता तरी भाषेची अडचण होतीच. नस्सेरी एअरपोर्टवरच बसून असे, पण त्यांना कुणाशीही संवाद साधता येत नसे. एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांनाही वाटे की त्यांना एअरपोर्ट सोडण्यात त्यांना काही रस नसावा. ते रेस्टॉरंटमध्ये जेवण करत आणि विश्रांतीगृहात आपली सगळी स्नानादी क्रियाकर्मे उरकत. उरलेला वेळ, पेपर वाचण्यात, पुस्तके वाचण्यात, अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यात आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे निरीक्षण करण्यात घालवत असत.

बेल्जियमने नस्सेरी यांना पुन्हा एकदा निर्वासित असल्याचा दाखला द्यावा यासाठी वकील ख्रिस्तियन बुर्जेट यांनी प्रयत्न सुरु केले. बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी, नस्सेरी स्वतःहून हजर झाल्याशिवाय त्यांना तसा दाखला देता येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

१९९५ साली बेल्जियमने नस्सेरी यांना बेल्जियमला येण्याची परवानगी दिली. तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या निगराणीखाली राहण्याची बेल्जियमची अट होती. ती नस्सेरी यांनी अमान्य केली. कारण, त्यांना ब्रिटनला जायचे होते.

बेल्जियम आणि फ्रांस दोन्ही देशांनी त्यांना आपल्या देशाचे नागरिकत्व देऊ केले, पण नस्सेरी यांना ब्रिटनचेच नागरिकत्व हवे होते. त्यांनी या दोन्ही देशांचे नागरिकत्व नाकारले. अशा नस्सेरीनीच हे नागरिकत्व नाकारल्याने त्यांचे वकीलही हतबल झाले. नस्सेरींच्या या अवस्थेबद्दल त्यांच्या घरच्यांना जेव्हा कळवण्यात आले तेव्हा त्यांचे कुटुंबीय म्हणाले की, तो त्याला हवे तसेच जीवन जगतो आहे.

२००६ साली नस्सेरींची तब्येत खूपच खालावली तेव्हा त्यांना एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने रुग्णालयात भरती केले. इतक्या वर्षांत या कर्मचाऱ्यांशी त्यांचे चांगले सुत जुळले होते. हे कर्मचारीच स्वतःहून त्यांना खाणे-पिणे आणि इतर ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ती आणून देत. २००७ साली त्यांची तब्येत सुधारल्यावर रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज दिला. पुढे फ्रेंच रेड क्रॉस संस्थेने त्यांची जबाबदारी स्वीकारली.

ते एअरपोर्टवरच राहत होते त्या काळात अनेक मोठमोठ्या वर्तमानपत्रांनी त्यांची दखल घेतली. वर्तमानपत्रातील त्यांच्याबद्दलची कात्रणे वाचून लोक त्यांना मदतीसाठी चेक पाठवत असत, पण नस्सेरी यांना हे चेकही वठवणे शक्य नसे. कारण, कुठल्याच देशाचे रहिवासी नसल्याने त्यांच्याकडे कुठल्याच बँकेचे खातेही नव्हते तेव्हा एअरपोर्टवरील कर्मचारी त्यांना हे चेक स्वतः वठवून देत.

२००८ पासून नस्सेरी पॅरीसमधील निराधार व्यक्तींसाठी असलेल्या आश्रमात राहत आहेत.

इतका मोठा काळ फक्त एकाच ठिकाणी बसून घालवल्याने नस्सेरी यांचे मानसिक स्वास्थ्य देखील बिघडले आहे. ते मुळचे कुठल्या देशाचे विचारले असता वेगवेगळ्या वेळी त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली.

नस्सेरी यांनी आपल्या एअरपोर्टवरील अनुभवावर आधारित एक पुस्तकही लिहिले आहे. ज्याचे नाव आहे, ‘द टर्मिनल मॅन.’ ब्रिटीश लेखक अँड्र्यू डॉंकीन यांनी त्यांना सहलेखक म्हणून मदत केली आहे. २००४ साली हे पुस्तक प्रकाशित झाले होते. जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशांत एकाचवेळी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

त्यांच्या या कथेवर आधारित एक चित्रपटही आला. ज्याचे नाव होते ‘द टर्मिनल.’ यामध्ये टॉम हँक्स यांनी अभिनय केला असून स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

नस्सेरी यांची कथा या चित्रपटासाठी वापरण्यात आल्याने त्यांना तीन लाख डॉलर्सचा चेकही देण्यात आला होता.

एखाद्या बसस्टॉपवर अठरा मिनिटे जरी बसची वाट बघावी लागली तरी आपण किती अस्वस्थ होतो, आपली किती चिडचिड होते. बस जरी उशिरा आली तरी आपल्याला माहित असते आपल्याला कुठे जायचे आहे. एकाच ठिकाणी कुठल्याच गोष्टीची शाश्वती आणि खात्री नसताना नस्सेरी यांनी इतकी वर्षे कशी घालवली असतील याची कल्पनाही आपल्याला करवणार नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

Next Post

इंग्रजांनी या यु*द्धात विजय मिळवून आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इंग्रजांनी या यु*द्धात विजय मिळवून आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती

साऊथमधे धुमाकूळ घातलेला सुरीयाचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता हिंदीत आलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.