The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने टाइम ट्रॅव्हल केल्याचा फक्त दावाच नाही तर पुरावेसुद्धा दिलेत

by द पोस्टमन टीम
25 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भविष्य जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. काही लोकांना स्वतःच्या भविष्याची काळजी असते तर काही लोकांना सबंध जगाची चिंता लागून राहिलेली असते. तुम्हाला जर भविष्यातील पृथ्वीची सफर करून आलेल्या व्यक्तीबद्दल सांगितले तर तुम्ही काय कराल? निश्चितच तुम्हाला वाटेल की, काहीही काय, भविष्यातील पृथ्वीचा प्रवास कसे शक्य आहे? उगाच कोणी उठून काहीही थापा माराव्या आणि आम्ही ऐकाव्या काय? असे एक ना दोन अनेक प्रश्न तुमच्या मनात थैमान घालू लागतील.

पण, १९४३ साली अमेरिकन नौदलाने एक प्रयोग केला होता. फिलाडेल्फिया एक्स्परिमेंट नावाने हा प्रयोग ओळखला जातो, ज्यामध्ये या नौदलाने आईनस्टाईनची युनिफाइड फिल्ड थेअरी वापरून एक अख्खे जहाज गायब केले होते. 

या प्रयोगात अल बेलेक नावाच्या एका शास्त्रज्ञाचाही सहभाग होता. अल बेलेक यांच्या मते हे जहाज गायब करून भविष्यात पाठवण्यात आले होते. हे जहाज गायब करण्यामागे वेळेच्या पुढचा प्रवास करणे हाच हेतू होता, असे ते सांगत.

अल बेलेक यांच्या मते त्यांनी दोनदा भविष्यातील प्रवास केला होता.

भविष्यातील दोन वेगवेगळ्या कालखंडाला त्यांनी भेट दिल्याचे ते सांगत असत. २०११ साली बेलेक यांचा मृत्यू झाला असला तरी, आपल्या या भविष्यातील प्रवासाबद्दल त्यांनी खूपच रंजक आठवणी सांगितल्या आहेत. अल बेलेक यांच्या नजरेने पाहिलेली भविष्यातील पृथ्वी कशी असेल, याची उत्सुकता असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.



अल बेलेक यांच्या जन्म १९२७ साली एका साधन कुटुंबात झाला. त्यांच्या मते ते नऊ महिन्याचे असल्यापासूनच चाणाक्ष होते. ते नऊ महिन्याचे असताना घरी ख्रिसमस पार्टी आयोजित करण्यात आली होती आणि त्या पार्टीतील लोक जी काही चर्चा, संभाषण करत होते ते त्याच्या कानावर येत होते आणि नंतर ते लक्षातही राहिले असे ते सांगत. शाळेत गेल्यानंतरही त्याच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेमुळे त्यांना सर्वजण चालताबोलता एनसायक्लोपिडिया म्हणत.

दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात त्यांनाही नौदलात भरती व्हावे लागले. नौदलात असतानाच त्यांना हा प्रवास करण्याची संधी मिळाली. ते अमेरिकेच्या एलरिज जहाजावर एक सामान्य अधिकारी होते. पण फिलाडेल्फिया प्रयोगानंतर एलरिजचीही खूपच चर्चा होऊ लागली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एके दिवशी याच एलरिज जहाजावर असताना बेलेक आणि त्यांच्या भावाला काही तरी धोक्याची सूचना जाणवली. जीव वाचवण्यासाठी त्यांनी जहाजातून उडी मारली तर ते थेट इसवी सन २१३७ मध्ये पोहोचले होते.

तिथे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भविष्यातील रुग्णालये फारच अद्यावत होती. जखम बरी करण्यासाठीही तिथे प्रकाश आणि कंपन पद्धतीचा वापर करण्यात येत होता. शिवाय, या रुग्णालयात मनोरंजनाच्या उद्देशाने जे टीव्ही बसवले होते त्यावर फक्त शैक्षणिक माहिती देणारे कार्यक्रमच दाखवले जात होते. संपूर्ण जगात टीव्हीसाठी फक्त हाच एक पर्याय होता.

२१३७ मधील पृथ्वी खूपच बदलेली होती. जगाचा भूगोलच बदला होता. प्रत्येक खंडाची सीमा रेषा बदलली होती आणि हे बदल अगदीच आश्चर्यकारक होते. अमेरिकेतील सगळे ग्रेट लेक्स एकमेकांत मिसळून त्यांचा एकच मोठा ग्रेट लेक बनला होता. अटलांटिक समुद्रापासून अटलांटा फक्त तीन किमी दूरवर होता.

अमेरिका तर पूर्णतः नामशेष झाली आहे आणि फेडरल सरकार ही फक्त एक इतिहासातील गोष्ट बनून राहिली आहे. जगाची लोकसंख्याही खूपच कमी होती. चीन आणि रशियाच्या भीतीने अमेरिका आणि युरोप एकत्र आल्याने झालेल्या यु*द्धात जगातील करोडो लोक बळी पडले होते. त्यामुळे जगातील लोकसंख्या खूपच कमी झाली होती. कमी लोकसंख्येमुळे जगभरतील शासन नावाची व्यवस्थाच नाहीशी झाली होती.

२१३७ मधून बेलेक तिथूनही पुढच्या प्रवासाला गेले. ते इसवी सन २७४९ मध्ये पोहोचले. या कालखंडात त्यांनी दोन वर्षे घालवली. मग तिथून पुन्हा त्यांना २१३७ मध्ये पाठवण्यात आले कारण, त्यांचा भाऊ तिथेच राहिला होता.

२७४९ मध्ये तर जगात तरंगणारी आणि हलती शहरे निर्माण झाली होती. कुठल्याही प्रकारची शासन व्यवस्था अस्तित्वात नव्हती आणि संपूर्ण जग हे सिंथेटिक इंटिलिजन्स कम्प्युटर सिस्टमवर चालत होते.

आनंदाची गोष्ट म्हणजे २७४९ मध्ये यु*द्धच अस्तित्वात नव्हते. कारण, त्याकाळात यु*द्ध करणे ही एक अशक्य कल्पना होती. शासनच नसल्याने कुठेही लष्कर आणि सैन्य अस्तित्वात नव्हते. नौदल किंवा हवाई दल काहीही नव्हते. त्यामुळे कुठल्याही देशात तणावपूर्ण स्थिती निर्माण होण्याची शक्यताच नव्हती.

या जगात सगळे व्यवहार समाजवादी नियमानुसार होत होते. लोकांना पैसा कमावण्याची गरज नव्हती. कारण कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना पैसा खर्च करण्याची वेळच येत नव्हती. सगळ्यांना सगळे मिळत होते आणि तेही हवे तेंव्हा. २७४९ मधून त्यांना पुन्हा २१३७ मध्ये पाठवण्यात आले आणि इथून ते मागे म्हणजे १९८४ मध्ये गेले. इथे ते डॉ. जॉन वोन न्यूमन यांना भेटले आणि तिथून ते परत १९४३ म्हणजे त्यांच्या त्यांच्या कालखंडात परत आले.

नौदलातील काम संपल्यावर बेलेक यांनी इलेक्ट्रॉनिक्समधून आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर लगेचच त्यांना मॉंटॉक प्रोजेक्टवर नेमण्यात आले. यावेळी ते कॅलिफोर्नियातील एका कंपनीसाठी नोकरीही करत होते. पण, त्यांना मॉंटॉक प्रोजेक्टचे काम करता यावे म्हणून शहरातील जमिनीखालून वेगाने पाळणाऱ्या रेल्वे सेवेचा लाभ देण्यात आला. या प्रोजेक्टअंतर्गत त्यांना अनेकदा मंगळावर जाण्याची संधी दिली. यावेळी ते टाईम ट्रॅव्हलच्या सहाय्याने इसपू १००,००० मध्ये जाऊन आले. आणि नंतर इसवी सन ६०३७ मध्ये.

परंतु त्यांनी आपले हे अनुभव उघड केल्याने त्यांना पुढच्या मोहिमांतून वजा करण्यात आले. पण, सरकारने त्यांच्या अनुभवांची दखलच घेतली नाही. उलट ते एक वेडसर व्यक्ती असल्याची अफवा सरकारने उठवली.

काही लोकांनी तर बेलेक आणि फिलाडेल्फिया एक्स्प्रीमेंटचा काहीच संबंध नाही हे सांगण्यासाठी खास मोहीम चालवली आहे.

अल बेलेक यांच्या मते ते अल बेलेक नसून एडवर्ड कॅमेरॉन आहेत. अशाच एका टाईम ट्रॅव्हलच्या सहाय्याने त्यांना मागे पाठवण्यात आले जिथे ते थेट नऊ महिन्याचे बाळ बनून अवतरले आणि तिथे त्यांचे संगोपन अल बेलेक या नावाने केले. त्यांना त्यांच्या योग्य कालखंडात वेळेत परतता न आल्याने सरकार त्यांचे काहीही वाकडे करू शकली नाही, असेही ते म्हणायचे. १० ऑक्टोबर २०११ रोजी त्यांचे मेक्सिको येथे निधन झाले.

पण, भविष्यातील पृथ्वीचे त्यांनी वर्णन केलेले चित्र पाहिल्यास आपल्याही मनात टाईम ट्रॅव्हलच्या सहाय्याने पुढे जाण्याची इच्छा नक्कीच निर्माण झाली असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सायनाच्या आयुष्यावर आधारित अमेझॉनचा ‘सायना’ चित्रपट कसा आहे.?

Next Post

या आदिवासी यो*द्ध्यामुळे फर्डिनांड मॅगेलनचं विश्वभ्रमंतीचं स्वप्न अपूर्ण राहिलं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

या आदिवासी यो*द्ध्यामुळे फर्डिनांड मॅगेलनचं विश्वभ्रमंतीचं स्वप्न अपूर्ण राहिलं

दीक्षित-दिवेकर सोडा या कार्यकर्त्याने ३८२ दिवस उपाशी राहून वजन कमी केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.