The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘टायटॅनिक’सह विसाव्या शतकातील तीन मोठ्या सागरी अपघातांतून वाचलेली ‘व्हायलेट’

by Heramb
29 September 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


टायटॅनिक म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते महाकाय जहाज. पृथ्वीवरील सर्वांत हुशार आणि प्रगल्भ मानव जातीचा एक उत्कृष्ट अविष्कार किंवा मूर्खपणा. काहीही म्हणा पण टायटॅनिक हे मानव जातीच्या कायम लक्षात राहणारं जहाज आणि घटना आहे. टायटॅनिकच्या बुडण्याने सुमारे १५०० लोकांना जलसमाधी मिळाली. आरएमएस टायटॅनिक हे ‘व्हाईट स्टार लाइन’ संचालित एक ब्रिटिश प्रवासी जहाज होतं.

साऊथम्प्टनकडून न्यूयॉर्क शहराकडे जाताना पहिल्याच प्रवासादरम्यान एका हिमखंडाला धडकल्यानंतर टायटॅनिक १५ एप्रिल १९१२ रोजी अटलांटिक महासागरात बुडालं. याच प्रवासादरम्यान टायटॅनिकवर २२२४ लोक होते. या जहाजावरील १५०० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले, पण या भयाण घटनेतून कित्येक लोक वाचलेही. त्या वाचलेल्यांपैकीच एक होती ‘व्हायलेट जेसॉप’. 

व्हायोलेट जेसॉप, एक आयरिश मुलगी.  व्हायोलेट विसाव्या शतकातील तीन सर्वांत मोठ्या आपत्तीजनक आणि जीवघेण्या जहाज अपघातांमधून वाचली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या बालपणातून वाचल्यानंतर व्हायोलेट १९११च्या आर.एम.एस. ऑलिम्पिकच्या जहाज अपघातात अगदी थोडक्यात वाचल्या. याशिवाय १९१२ च्या ब्रिटानिक जहाज अपघातात आणि चक्क १९१२ मध्ये अपघात झालेल्या टायटॅनिक मधूनही त्या वाचल्या.

‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्प्रचाराचा सर्वोत्तम उदाहरण म्हणजे व्हायोलेट जेसॉप. व्हायोलेट जेसॉपला ‘मिस अनसिंकेबल’ असेही म्हणतात. जीवघेण्या तीन अपघातांमध्ये मृत्यूच्या ओठांवरून फिरल्यानंतरही व्हायोलेट यांनी आपली सेवा सोडली नाही. कदाचित हीच त्यांची ताकद असावी.

अर्जेंटिनामध्ये १८८७ साली व्हायोलेट कॉन्स्टन्स जेसॉप यांनी अनेक अडचणींवर मात करून जन्म घेतला. स्थलांतरित पालकांच्या पोटी जन्म घेणारी व्हायोलेट कदाचित सर्वांत नशीबवान मुलगी होती. तिच्या आई-वडिलांना एकूण नऊ अपत्ये झाली, पण त्यातली सहाच अपत्ये जगली. जगलेल्या अपत्यांपैकी पहिली म्हणजे व्हायोलेट जेसॉप.



जन्मल्यापासूनच तिने जीवघेण्या अडचणींचा आणि रोगांचा सामना केला होता. अत्यंत लहान वयातच तिने मृत्यूला जवळून पहिले. क्षयरोगासारखा अत्यंत जीवघेणा रोग होऊनही आणि त्याकाळी क्षयरोगावर औषध उपलब्ध नसूनही व्हायोलेट या आजारातून सुरक्षितपणे बाहेर पडली. कारण नियतीच्या काही वेगळ्याच योजना होत्या.

वयाच्या तेविसाव्या वर्षी व्हायोलेटने आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत प्रसिद्ध जहाज कम्पनी, व्हाईट स्टार लाइनबरोबर काम करण्याचे ठरवले. १९१० साली व्हायलेट जेसॉपला आरएमएस ऑलिम्पिक या जहाजावर नोकरी मिळाली. आरएमएस ऑलिम्पिकची एचएमएस हॉक या ब्रिटीश यु*द्धनौकेला धडक होईपर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं.

एचएमएस हॉकशी धडक होऊनही दोन्ही जहाजं व्यवस्थितपणे बंदरात पोहोचली. पण तरीही तो पर्यंत व्हायोलेटने घेतलेला हा सर्वांत भीतीदायक अनुभव होता. अशा घटनेननंतर एखाद्या सामान्य माणसाने तत्सम काम सोडूनही दिलं असतं, पण व्हायोलेटने माघार घेतली नाही. 

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

जेव्हा आरएमएस ‘टायटॅनिकला’ कर्मचाऱ्यांची गरज होती, तेव्हा व्हायोलेट जेसॉपने स्वतःहून ती नोकरी स्वीकारली. आरएमएस टायटॅनिकला ‘शिप ऑफ ड्रीम्स’, ‘द अनसिंकेबल शिप’ अशा अनेक विशेषणांनी अलंकृत करण्यात आले होते. त्यामुळे आपल्यासारखीच तिलाही जहाज न बुडण्याची किंवा जहाजाला काहीही इजा न होण्याची खात्री होती. पण १४ एप्रिल १९१२ रोजी या सर्व विशेषणांना काहीही अर्थ राहिला नव्हता. टायटॅनिक एका हिमखंडाला धडकले आणि अटलांटिक महासागराच्या तळाशीच ते जहाज स्थिर झाले. 

टायटॅनिक हिमखंडाला धडकलं तेव्हा व्हायलेट आपल्या शयनगृहात होती, पण काहीतरी भयानक घडत आहे हे लक्षात आल्यावर तिने डेकवर धाव घेतली. व्हायोलेटने महिलांना आणि लहान मुलांना लाईफबोटमध्ये चढण्यास मदत केली. “स्त्रिया आणि लहान मुलांना प्राधान्य” या नियमामुळे व्हायलेट जेसॉपला १६ क्रमांकाची लाईफबोट मिळाली. तिच्या हातात एका अनोळखी बाळाला टाकण्यात आले. पण १६ क्रमांकाच्या द कार्पेथिया या बोटीवर असताना एका महिलेने तिच्याकडून ते बाळ हिसकावून घेतले. कदाचित ती त्या बाळाची आई असावी. पुढच्या दिवशी व्हायोलेट सुरक्षितरित्या बंदरात पोहोचली.

व्हायलेट जून १९१२ मध्ये पुन्हा व्हाईट स्टार लाईन्सच्या ऑलिम्पिक जहाजावर नोकरी केली. त्याठिकाणीच बहुतांश वेळा किनाऱ्यावरच तिने ब्रिटिश रेड क्रॉससाठी व्हीएडी नर्स म्हणून १९१४ पर्यंत सेवा केली. त्यानंतर तिला हॉस्पिटल जहाज एच.एम.एच.एस. ब्रिटानिक या टायटॅनिक आणि ऑलिम्पिकसमान जहाजावर सेवा देण्यासाठी पाठवण्यात आले.

एवढा जीवघेणा अपघात झाल्यानंतर आणि दोन वेळा जहाज अपघातांचा अनुभव आल्यानंतर तुमच्या-आमच्यासारखा माणूस दुसरं काहीही काम करायला तयार होईल पण पुन्हा समुद्रात जहाजावर काम करायला जाणार नाही. पण एका जहाजाचा जवळ जवळ बुडण्याचा अनुभव घेतल्यानंतर आणि दुसऱ्यांदा पूर्णपणे जहाज बुडाल्यानंतरही व्हायोलेट जेसॉपने तिसऱ्यांदा पुन्हा त्याच व्हाईट स्टार लाईनच्याच एच.एम.एच.एस. ब्रिटानिक या जहाजावर १९१४ पासून नोकरी सुरु केली.

२१ नोव्हेंबर १९१६ च्या सकाळी एच.एम.एच.एस. ब्रिटानिकने एका माइनला धडक दिली आणि ती बुडू लागली. किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात नेण्याच्या प्रयत्नामुळे ब्रिटानिक पूर्णतः बुडाली. सुदैवाने जहाजावरील बहुतेक लोक लाईफबोट्सच्या साहाय्याने वाचले, पहिल्या काही लाईफबोट्स प्रवाशांनी पुढे नेल्या.

पण मागच्या काही लाईफबोट्स बुडत्या जहाजाच्या प्रोपेलरमध्ये अडकल्याने त्यांचे बाहेर येणे अवघड होऊन बसले. व्हायलेट जहाजाच्या इतक्या जवळ खेचली गेली आणि तिला तिचे डोके किलवर आदळून लाईफबोटमध्ये जावे लागले. या घटनेत व्हायलेटसह एक हजारहून अधिक जणांना वाचवण्यात यश आले पण तीस जणांचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतरही व्हायलेटने जहाजावर सेवा देणे सुरू ठेवले आणि १९५०च्या डिसेम्बरमध्ये ६३ वर्षीय व्हायलेट समुद्रातील तिच्या उल्लेखनीय जीवनातून निवृत्त झाली. १९७१ मध्ये हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला आणि एक चित्तथरारक जीवनक्रम संपुष्टात आला. तिच्या निधनानंतर सुमारे दोन दशकांनी, १९९६ साली तिच्या आठवणी समोर आल्या.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हि*टल*रने आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी तिबेटला संशोधकांची एक टीम पाठवली होती

Next Post

अमेरिकन सैन्याची फेव्हरेट असलेली एम-१६ राय*फल एवढी विशेष का आहे..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

अमेरिकन सैन्याची फेव्हरेट असलेली एम-१६ राय*फल एवढी विशेष का आहे..?

मुहम्मद अली बॉक्सिंगमध्ये किंग तर होताच पण त्याला दोन वेळा ग्रॅमी'चं नामांकनही मिळालं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.