The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

पतंजलीच्याही आधी ‘स्वदेशी’चं भांडवल न करता डाबरने आयुर्वेदिक औषधं उपलब्ध करून दिली होती

by द पोस्टमन टीम
24 September 2020
in आरोग्य, ब्लॉग
Reading Time:1min read
0
Home आरोग्य

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब

आजच्या धावपळीच्या जीवनात औषधं ही मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. मग या औषधांमध्ये काही औषधे अशीही असतात की ज्यांची विदेशातून आयात केली जाते. विदेशातून आयात करण्यामागे कदाचित हेच कारण असावे की ती औषधे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. जर आजसुद्धा आपल्याला विदेशातून औषधे मागवायला लागत असतील तर विचार करा की १९ व्या शतकात ही परिस्थिती कशी असेल?

चांगल्या औषधांची मारामार असणारी परिस्थिती असताना त्या काळात एक व्यक्ती अशी होती की ज्याने सहज उपलब्ध होतील आणि सामान्य लोकांना परवडतील अशी औषधे तयार करण्याचा ध्यास घेतला होता. यातूनच डाबर या कंपनीची स्थापना झाली.

डाबरच्या कथेची सुरुवात बंगालमध्ये राहत असलेल्या डॉक्टर एस. के. बर्मन यांनी केलेल्या छोट्या पण दूरदर्शी प्रयत्नाने झाली.

दुर्गम खेड्यातल्या सामान्य लोकांना परवडणारी चिकित्सा देणं हे त्यांचे ध्येय होते. डॉ. बर्मन यांनी त्या दिवसात कॉलरा, मलेरिया आणि प्लेग यासारख्या कित्येक रोगांवर नैसर्गिक उपचारांची तयारी करण्याचे काम हाती घेतले.

लवकरच त्यांच्या या औषधांच्या प्रवासाची बातमी परिसरातल्या लोकांना कळली आणि त्यांना विश्वासू ‘दक्तार’ किंवा प्रभावी उपचार घेऊन आलेले डॉक्टर म्हणून लोक ओळखू लागले. यातूनच त्यांच्या उपक्रमाला डाबर असे नाव मिळाले. डॉ. बर्मन यांनी १८८० मध्ये आयुर्वेदिक औषधांची निर्मिती व वितरण करण्यासाठी डाबर या कंपनीची स्थापना केली.

डॉ. एस. के. बर्मन यांची वचनबद्धता आणि अविरत प्रयत्नांमुळे एका छोट्या घरात सुरू झालेली कंपनी वाढत गेली त्यांच्या डाबर या नावानं विश्वास व विश्वासार्हता निर्माण केली.

पुढे डॉ. बर्मन यांनी “सुंदरेश” ही एक ना-नफा संस्था चालू केली. या संस्थेचा हेतू आरोग्य, सेवा, शिक्षण आणि इतर सामाजिक-आर्थिक क्षेत्रात कल्याणकारी उपक्रम राबविणे हा होता. आजही डाबरने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीब्लीटी (सीएसआर) कार्यक्रम सुंदरेशच्या माध्यमातून चालविला असून आजही ही संस्था चालू आहे.

कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील २ खेड्यांमध्ये १,२०० ग्रामीण घरगुती शौचालये बांधून दिली आहेत. सुंदरेशच्या माध्यमातून डाबरची ९ अनौपचारिक शिक्षण केंद्रे व प्रौढ साक्षरता केंद्रे कार्यरत आहेत, जे वंचितांना व अशिक्षित महिलांना शिक्षण प्रदान करतात.

हे देखील वाचा

तत्कालीन राजकाराभारावर प्रश्न उपस्थित केले म्हणून सॉक्रेटिसला विषप्राशन करावं लागलं होतं…

रिलायन्स साम्राज्य उभारणाऱ्या धीरूभाई अंबानींची कहाणी…

गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!

पुढे १८८४ मध्ये डाबरची स्थापना प्रामुख्याने आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी व वितरणासाठी केली गेली. आज ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक औषध उत्पादक आणि देशातील पहिल्या ५ एफएमसीजी ब्रँडपैकी एक आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह आरोग्य सेवा कंपनी असणाऱ्या डाबर इंडिया लिमिटेडने ग्रामीण भारतातील आरोग्य आणि स्वच्छतेचे स्तर सुधारण्याचे ध्येय सुरू केले.

डाबरच्या आयुर्वेदिक स्पेशलिटीज डिव्हिजनकडे सामान्य सर्दीपासून तीव्र पक्षाघात होण्यापर्यंतच्या अनेक आजारांवर आणि शरीराच्या परिस्थितीवर उपचार करण्यासाठी २०० पेक्षा जास्त औषधे आहेत.

डाबर इंटरनॅशनल ही डाबर इंडियाची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. तर आयुर्वेदिक उत्पादनांच्या धंद्याव्यतिरिक्त डाबर गम मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात देखील आहे जो ‘दाबिस्को’ या नावाने चालतो.

डाबरने निसर्ग-आधारित आयुर्वेदिक औषधांच्या विशेष क्षेत्रात प्रवेश केला ज्यासाठी बाजारात प्रमाणित औषधे उपलब्ध नाहीत. चांगल्या ऑपरेशन आणि व्यवस्थापनासाठी, त्यांच्या उत्पादनांच्या मिश्रणानुसार ३ स्वतंत्र विभाग तयार केले जातात हेल्थ केअर, प्रॉडक्ट्स डिव्हिजन, फॅमिली प्रोडक्ट विभाग आणि डाबर आयुर्वेदिक स्पेशलिटी लिमिटेड.

१८८० मध्ये डॉ एस के बर्मन कुटुंबाने एक छोटी आयुर्वेदिक औषधी कंपनी म्हणून सुरुवात केलेली डाबर आता २०२० साली ‘डाबर इंडिया लिमिटेड’ ही आरोग्य, तसेच वैयक्तिक काळजी आणि खाद्यपदार्थ उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणारी चौथी मोठी कंपनी आहे.

डाबर च्यवनप्राश आणि हाजमोला ही त्यांची अतिशय लोकप्रिय उत्पादने आहेत.

१२५ वर्षानंतर ही कंपनी एवढी मोठी होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती पण आज कोलकाताच्या बर्मन कुटुंबाची मालकी असलेल्या डाबर इंडिया लिमिटेडने आता जगभरात खूप मोठा गौरव मिळवला आहे. आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार क्षेत्रात १२५ वर्षांची झालेली ही कंपनी आता सामान्य नाही. आज ही देशातील हर्बल आणि नैसर्गिक उत्पादनांची सर्वात मोठी व्यावसायिक कंपनी बनली आहे.

ADVERTISEMENT

डाबर ही कंपनी जरी बर्मन फॅमिली यांच्या मालकीची असली तरी ती आज एकाच व्यक्तीकडे मालकी नसते. तर डाबरचे जे १०० टक्के शेअर लिस्ट झाले आहेत त्यातले ६७.८८ टक्के हिस्सा हा बर्मन फॅमिलीकडे आहे.

म्हणजे मुख्य मालक हे बर्मन फॅमिली असून त्यांचे इतर भागीदार आहेत.

ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट २०१४ नुसार ब्रँड अँनालिटिक्स कंपनी ट्रस्ट रिसर्च अ‍ॅडव्हायझरी यांनी केलेल्या अभ्यासानुसार डाबरला भारताच्या सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये १०९ वा क्रमांक मिळाला आहे. १९८६ मध्ये, डाबर उत्पादनांची वाढती लोकप्रियता पाहत डॉ. बर्मन यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी उत्पादन प्रकल्प स्थापित करून आपल्या कार्याचा विस्तार केला ज्यामुळे डाबर आज देशासह विदेशात सुद्धा पोहचली आहे.

इतकं सगळं असलं तरीसुद्धा डाबरची डिजिटल उपस्थिती मर्यादित आहे. जरी ती एक अब्ज डॉलरची एफएमसीजी कंपनी असली तरीही तिच्या फेसबुक पेजच्या लाईक्स फारच मोजक्या आहेत आहेत. त्यांची माहिती स्लाइडशेअर किंवा स्क्रिड यासारख्या वेबसाइटवर सादरीकरणाच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

डाबरचे उत्पादने महाग असतात अशी बऱ्याचदा ओरड असते पण आयुर्वेदिक उत्पादनांत डाबरचेच नाही तर कोणत्याही कंपनीच्या आयुर्वेदिक वस्तू ह्या महागच असतात. अशी औषधे तयार करण्यास जास्त मोठा कालावधी व बराच खर्च येत असतो, तसेच या साठी लागणारा कच्चा माल हा सहजासहजी व स्वस्त नसतो.

याचबरोबर डाबर ही एक व्यावसायिक कंपनी आहे, ज्या कंपनीला सर्व प्रकारचे कर, कायदे लागू आहेत. ही व्यावसायिक कंपनी असल्याने ती किंमत ठरवतांना त्यांच्या नफ्याचे गुणोन्तरही बघत असते.

तसेच, डाबर हे एक प्रतिष्ठित नाव आहे त्याची पण किंमत यात येणारच की! डाबरचे सर्व प्रॉडक्ट हे उच्च गुणवतेच्या असल्याने त्याची किंमत काही प्रमाणात जास्त असते.

आमच्या घडीला कंपनीचे चेअरमन श्री अमित बर्मन हे असून केंब्रिज विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळविणारी अमित बर्मन हे पायलट देखील आहेत. त्यांना हवेत उड्डाण करायला आवडतं. अमित हे आपल्या पिढीजात चालत आलेल्या कंपनीला आजही अतिशय काळजीपूर्वक पुढे घेऊन जात आहेत.

भविष्यात सुद्धा डाबर या स्वदेशी कंपनीने आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून असेच भारतीयांच्या सेवेत राहावं राहावं हीच इच्छा!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Share this:

  • Twitter
  • Facebook

Related

ShareTweetShare
Previous Post

एका दिवसात ४० हजार सैनिक गमावल्यानंतर रेड क्रॉसची स्थापना करण्यात आली होती

Next Post

आजची टुकार पत्रकारिता बघून न्यूजट्रॅकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

तत्कालीन राजकाराभारावर प्रश्न उपस्थित केले म्हणून सॉक्रेटिसला विषप्राशन करावं लागलं होतं…

4 January 2021
रिलायन्स साम्राज्य उभारणाऱ्या धीरूभाई अंबानींची कहाणी…
ब्लॉग

रिलायन्स साम्राज्य उभारणाऱ्या धीरूभाई अंबानींची कहाणी…

28 December 2020
गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!
ब्लॉग

गंगेच्या किनाऱ्यावर मजूरांचे दुःख ऐकून स्वामी विवेकानंद रडले होते!

28 December 2020
गांधीजींना ‘महात्मा’ पदवी देणारे स्वामी श्रद्धानंद!
इतिहास

गांधीजींना ‘महात्मा’ पदवी देणारे स्वामी श्रद्धानंद!

23 December 2020
चोर, फकीर की आध्यात्मिक गुरू? ग्रिगोरी रास्पुतिन नेमकं काय रसायन होतं..?
इतिहास

चोर, फकीर की आध्यात्मिक गुरू? ग्रिगोरी रास्पुतिन नेमकं काय रसायन होतं..?

8 December 2020
मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!
ब्लॉग

मराठवाडी नेते, जनता अन् पंजाबचे शेतकरी…!

6 December 2020
Next Post
आजची टुकार पत्रकारिता बघून न्यूजट्रॅकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही

आजची टुकार पत्रकारिता बघून न्यूजट्रॅकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही

जाणून घ्या गणितात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही…

जाणून घ्या गणितात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही...

Leave a Reply Cancel reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

  • Trending
  • Comments
  • Latest
दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

दोन भावांच्या टोकाच्या वादातून ‘आदिदास’ आणि ‘पुमा’ या जगप्रसिद्ध ब्रँड्सचा जन्म झालाय!

21 April 2020
शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

शास्त्रज्ञांच्या मते पुढची जागतिक महामारी कोंबड्यांमुळे पसरेल..!

20 June 2020
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

अफगाणी सैनिकांसाठी युद्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

16 January 2021
भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

भारतीय औषध कंपन्यांनी जागतिक औषध माफियांची मक्तेदारी कायमची संपवली आहे

6
म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

म्हणून हिटलरने त्याचा देह त्याच्या धर्माप्रमाणे दफन न करता हिंदूंप्रमाणे जाळण्याचे आदेश दिले होते

3
“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

“रावण – राजा राक्षसांचा” : रावणाच्या जीवनावरील खिळवून ठेवणारी कादंबरी

2
स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

स्वतः तयार केलेल्या सोलर कारवर ३५०० किमीचा सफर करणारा मराठी माणूस

2
हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021
हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

हा लेख वाचून कळेल की KGF म्हणजे नुसतीच हाणामारी नाही..!

11 January 2021

पुणे करारावर सही करताना बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं..

4 January 2021

Recent News

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

हा भारतीय गुप्तचर अधिकारी नसता तर जगाच्या नकाशावर बांग्लादेश दिसला नसता

20 January 2021
जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

जाणून घ्या, झाडांचे पुनर्रोपण कसे करतात?

16 January 2021

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2021 Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!