The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगभरातील फॅन्सनी जेव्हा एकत्र येत एका स्टुडिओला चित्रपट पुन्हा बनवायला लावला..!

by द पोस्टमन टीम
19 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


एखादा चित्रपट तुम्हाला जेव्हा आवडत नाही, तेव्हा तुम्ही काय करता? सर्वांत आधी तर आपण पश्चाताप करतो, की का एवढा टुकार सिनेमा आपण थिएटरमध्ये पाहिला! आपल्या गेलेल्या पैशाबद्दल दुःख व्यक्त करतो, किंवा फार तर फार सोशल मीडियावर आपली भडास काढतो. कित्येक लोक त्याही पुढे जाऊन, सिनेमाच्या डिरेक्टरला ट्विटरवर टॅग करुन रिफंड मागतात. शेवटी मग एखाद्या ब्रेकअप व्यक्तीप्रमाणे झालेल्या आहे ते स्वीकारुन आपण ‘मूव्ह ऑन’ होतो, आणि झालेल्या गोष्टीबाबत विसरुन जातो.

साधारण सगळे असंच करतात. मात्र, जगभरातील ‘डीसी’च्या चाहत्यांचा स्वॅगच वेगळाय!

जेव्हा ‘वॉर्नर ब्रदर्स’ स्टुडिओने ‘जस्टिस लीग’ चित्रपट रिलीज केला; तेव्हा फॅन्सना तो अजिबात आवडला नाही. त्यानंतर त्या फॅन्सनी असं काही केलं, की या स्टुडिओला हा चित्रपट पुन्हा बनवावा लागला.

हॉलिवूडमधील सुपरहिरो चित्रपटांच्या चाहत्यांसाठी डीसी आणि मार्वलमध्ये सुरू असलेली लढाई नवीन नाही. बॅटमॅन, सुपरमॅन आणि ‘जस्टिस लीग’मधील इतर हीरो हे ‘डीसी कॉमिक्स’चा भाग आहेत. तर, कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन, स्पायडरमॅनसह इतर ‘अ‌ॅव्हेंजर्स’, आणि ‘एक्स मेन’ हे सगळे मार्वल कॉमिक्सचा भाग आहेत. या दोन्ही विश्वांमधील सुपरहिरोजचे आपापले फॅन्स आहेत. यामधील ‘बेस्ट’ कोण याबाबत गेल्या कित्येक वर्षांपासून या फॅन्समध्ये शीतयु*द्ध सुरू आहे.

मार्वलचे सिनेमे आणि डीसीचे सिनेमे यातील सर्वांत मोठा फरक म्हणजे त्यांचा टोन! डीसीचे सिनेमे हे मार्वलच्या तुलनेत अगदीच ‘डार्क’ (कंटेंटच्या दृष्टीनेही आणि पडद्यावर दिसणारी दृष्येही) असतात. हेच त्यांच्या आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये पहायला मिळालं होतं. याला कारण म्हणजे, या चित्रपटांचा दिग्दर्शक झॅक स्नायडर! डीसीच्या सुपरहीरोंच्या कथा या बऱ्यापैकी गंभीर स्वरुपाच्या आहेत. त्यांना तितक्या प्रभावीपणे मांडण्यासाठी डार्क टोनच परफेक्ट आहे हे झॅकला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच तो चित्रपटांना त्या दृष्टीने बनवत आला होता. अगदी २०१६ला आलेल्या ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ (बीव्हीएस) या चित्रपटाचा टोनही बराच डार्क होता. बीव्हीएस बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चांगला चालला. मात्र, समीक्षकांनी आणि बऱ्याच नेटिझन्सनी यावर टीकाही केली होती.



बीव्हीएसमध्ये सुपरमॅनच्या मृत्यूनंतर आता बॅटमॅन जस्टिस लीगच्या इतर सदस्यांना कसा एकत्र आणतो, आणि पुढं काय होतं हे पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक होते. यासाठी ते ‘जस्टिस लीग’ सिनेमाची वाट पाहत होते, जो नोव्हेंबर २०१७ मध्ये रिलीज होणार होता. मात्र, हा सिनेमा रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच झॅक स्नायडर आणि त्यांच्या पत्नीने हा सिनेमा सोडला.

बीव्हीएसला मिळालेल्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे वॉर्नर ब्रदर्स पुढच्या सिनेमामध्ये जरा ब्राईट कलर टोन वापरण्याची आणि सिनेमात थोडेफार विनोदी सीन्स टाकण्याची मागणी करत होते.

झॅकला अर्थातच हे मान्य नव्हतं. यावरुनच स्टुडिओ आणि झॅकमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यातच त्याची मुलगी ऑटमने आत्मह*त्या केली होती. यानंतर पूर्णपणे खचून गेलेल्या झॅकने हा सिनेमा सोडला होता.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

झॅकच्या जाण्यानंतर जस्टिस लीगची धुरा जॉस व्हीडनकडे देण्यात आली. मग त्याने आपलं स्टुडिओ जे सांगेल त्याप्रमाणे स्क्रिप्टमध्ये बदल केले, बरेच सीन पुन्हा शूट आणि एडिट केले; आणि मग ठरलेल्या तारखेला सिनेमा रिलीज झाला. वॉर्नर ब्रदर्ससाठी अगदी महत्त्वाचा असणारा हा सिनेमा, जो बॉक्स ऑफिसवर किमान एक बिलियन डॉलर्सचा गल्ला जमवू शकला असता – अशा या चित्रपटाने अवघी ६५७ मिलियन डॉलर्सची कमाई केली.

ना फॅन्सना हा चित्रपट आवडला, ना समीक्षकांना. हार्डकोर डीसी फॅन्सच्या अपेक्षांचा तर अक्षरशः चुराडा झाला होता.

फॅन्स या चित्रपटाला शिव्या घालत होते, वॉर्नर ब्रदर्सला शिव्या घालत होते. मात्र, झॅकविरुद्ध कोणीही काहीही बोलत नव्हतं. मॅन ऑफ स्टील (२०१३) आणि बीव्हीएस (२०१६) पाहिलेल्या फॅन्सना एवढं तर नक्कीच माहिती होतं, की झॅकचे सिनेमे कशा प्रकारचे असतात. त्यामुळं त्यांना या गोष्टीची पूर्ण खात्री होती, की त्यांनी थिएटरमध्ये जे पाहिलं, ते झॅकने नक्कीच बनवलं नव्हतं, किंबहुना त्याने तसं काही बनवलंच नसतं!

यातूनच मग ‘झॅक’ने बनवलेला ‘जस्टिस लीग’ पाहण्यासाठी डीसी फॅन्सनी ‘रिलीज दि स्नायडर कट’ (#ReleaseTheSnyderCut) या हॅशटॅगची मोहीम सुरू केली.

लवकरच ही मोहीम जगभरात पोहोचली. सगळीकडचे डीसी फॅन्स हा हॅशटॅग वापरुन वॉर्नर ब्रदर्सला सांगू लागले की आम्हाला ‘झॅक’चा ‘जस्टिस लीग’ पहायचा आहे. साधारणपणे अशा हॅशटॅगच्या लाटा फार दिवस टिकत नाहीत. आपण आतापर्यंत असे कित्येक ‘ट्रेंड’ काही आठवड्यांमध्ये गायब झालेले पाहिले आहेत. मात्र रिलीज दि स्नायडर कट हा केवळ एक ट्रेंड नव्हता; ती एक मोहीम होती. इंटरनेटवर सुरू झालेलं ते एक आंदोलन होतं, जे सर्जनशीलतेला, झॅकला आणि ‘जस्टिस लीग’ला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे हे आंदोलन केवळ सोशल मीडियावर सुरू होतं असं नाही. डीसीच्या चाहत्यांनी ‘स्नायडर कट’बाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली होती. न्यूयॉर्कमधील ‘कॉमिक कॉन’च्या वेळी लोकांनी क्राऊडफंडिंग करुन ‘टाईम्स स्क्वेअर’वर या हॅशटॅगचं बॅनर लावलं होतं. (टाईम्स स्क्वेअरवर बॅनर लावण्यासाठी दिवसाला पाच हजार डॉलर्स एवढं भाडं आहे!)

एवढंच नाही, तर २०१९ साली सॅन डिएगोमध्ये झालेल्या कॉमिक कॉनमध्ये तर लोकांनी एक छोटं विमान भाड्याने घेऊन, त्यामागे ‘वॉर्नर ब्रदर्स रिलीज दि स्नायडर कट ऑफ जस्टिस लीग’ असं लिहिलेला बॅनर जोडून ते उडवलं होतं. केवळ अमेरिकाच नाही, तर जगभरातील डीसी फॅन्सनी हा हॅशटॅग तब्बल चार वर्षांपर्यंत ट्रेंडिंग ठेवला होता.

डीसी फॅन्सच्या या मोहिमेबाबत झॅकला माहिती झालं होतं. मात्र, आपल्या मुलीच्या मृत्यूमुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. त्यामुळे त्याची हा चित्रपट करण्याची इच्छा नव्हती. फॅन्सना देखील त्याच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच त्यांनी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारी मोहीमही राबवली. या मोहिमेतून त्यांनी गरजूंसाठी तब्बल सहा हजार डॉलर्स एवढी मदत उभी केली. फॅन्सचे हे काम झॅकला अगदीच आवडलं. त्यामुळे मग त्यानेही स्नायडर कट बनवण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला. आता फक्त गरज होती ती वॉर्नर ब्रदर्सने याबाबत गंभीरपणे विचार करण्याची.

अखेर चार वर्षं फॅन्सनी टाकलेल्या दबावापुढं हॉलिवूडचा हा स्टुडिओ झुकला. २०२०च्या फेब्रुवारीमध्ये झॅकनं जाहीर केलं, की स्टुडिओने स्नायडर कट बनवण्याचा निर्णय घेतलाय. या चित्रपटाचं नाव असणार होतं ‘झॅक स्नायडर्स जस्टिस लीग’.

हा सिनेमागृहांमध्ये रिलीज न करता, एचबीओ मॅक्स या ओटीटीवर रिलीज होणार होता. या चित्रपटासाठी झॅकने सांगितल्याप्रमाणे नवे सीन्सही शूट करण्यात आले. नवे व्हीएफएक्स वापरण्यात आले, आणि बरेच सीन्स वेगळ्या प्रकारे एडिट करण्यात आले. या सगळ्यासाठी स्टुडिओला सुमारे ७० मिलियन डॉलर्स एवढा खर्च आला. एकाच सिनेमावर दोन-दोन वेळा काम आणि दोन-दोन वेळा खर्च करण्याची वेळ कदाचित एखाद्या स्टुडिओवर पहिल्यांदाच आली असावी.

अगोदर असं ठरलं होतं, की हा कट चार तासांचा सिनेमा आणि एक मिनी सीरीज या दोन प्रकारे प्रदर्शित करण्यात येईल. मात्र, २०२१च्या जानेवारीपर्यंत मिनी सीरीजची आयडिया रद्द करण्यात आली. अखेर मार्च २०२१मध्ये हा ‘स्नायडर कट’ रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा एचबीओ मॅक्स अ‌ॅपचे डाऊनलोड्स ६४ टक्क्यांनी वाढले होते! फोर्ब्स मासिकाने असा अंदाज व्यक्त केलाय, की जर ‘स्नायडर कट’साठी ज्या लोकांनी नव्याने हे अ‌ॅप डाऊनलोड केलंय, त्यांनी १२ महिन्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं, तर कंपनीला २६६ मिलियन डॉलर्सचा फायदा होईल!

हा सिनेमा फॅन्सच्या अपेक्षेप्रमाणे अगदीच उत्कृष्ट झाला होता. समीक्षकांनी तर याचं कौतुक केलंच, मात्र कित्येक मार्वल फॅन्सनीही हा चित्रपट ‘एकदम भारी’ असल्याचं कबूल केलं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फेसबुकवर आपण ज्याचे १ मिनिटांचे असंख्य व्हिडिओज पाहिलेत तो ‘नॅस डेली’ कोण आहे..?

Next Post

रोमन साम्राज्याला धक्का देणारी पामायराची राणी झेनोबिया

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

रोमन साम्राज्याला धक्का देणारी पामायराची राणी झेनोबिया

झिम्बाब्वेच्या खेळाडूने फाटक्या बुटांचं एक ट्विट केलं आणि त्यांना पुमाने स्पॉन्सरशिप दिली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.