The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जहाजावर काम करणाऱ्या कामगाराने लावला होता व्हॅसलिनचा शोध !

by द पोस्टमन टीम
30 December 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कडाक्याची थंडी सुरु झाली की पहिली आठवण होते ती व्हॅसलीनची. कोरडी, निस्तेज झालेली त्वचा, फुटलेले ओठ, पांढरट दिसणारे हात पाय, अशा सगळ्या समस्यांवर हा हमखास उपाय. हिवाळ्यात घराघरात व्हॅसलीनच्या या छोट्या डब्या दिसणारच. पण, व्हॅसलीनची सुरुवात कोठून झाली, त्याचा शोध कधी आणि कसा लागला? व्हॅसलीनमधे नेमके कोणते घटक असतात हे तुम्हाला माहिती आहे का? व्हॅसलीनच्या डबीवर जर तुम्ही त्यात कोणते घटक वापरलेले असतात याची यादी वाचलीत, तर इथे तुम्हाला फक्त १००% व्हाईट पेट्रोलियमयुएसपी (100% White PetrolatumUSP) असे लिहिलेले आढळेल.

आता ही पेट्रोलियम जेली नेमकी आली कुठून? कुठे बनवली जाते? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला हवी असतील तर हा लेख पूर्ण वाचावा लागेल.

रॉबर्ट चेस्ब्रो समुद्रातील मोठ्या व्हेल माशापासून तेल काढणाऱ्या कंपनीत काम करत होता. पण पेनिसिल्व्हानियामधील टायटसव्हिल या गावामध्ये तेलाच्या खाणी सापडल्या आणि त्याचे कामच बंद पडले. पण, रॉबर्ट निराश झाला नाही. त्याने दुसरे काही तरी काम शोधायचे ठरवले. त्याने टायटसव्हिल येथे जाऊन हा पदार्थ जमिनीतून काढतात तरी कसा हे बघायचे ठरवले. टायटसव्हिलमधे गेल्यानंतर याठिकाणी त्याला एक नवी युक्ती सापडली. त्याने पहिले की जमिनीतून तेल काढल्यानंतर त्या तेलातून एक पदार्थ निघतो ज्याला रोड वॅक्स म्हटले जाते.

खाणीतून तेल काढणारे कामगार त्यांच्या जखमांवर हा पदार्थ लावत असत. हा रोड वॅक्स चेस्ब्रोने आपल्यासोबत न्यूयॉर्कला आणला. त्याने या रोड वॅक्सवर काही प्रयोग करायला सुरुवात केली. त्याने रोड वॅक्सचे शुद्धीकरण केल्यानंतर त्यातून तेलाचा एक प्रकार मिळाला.



ते तेल नव्हते तर तो होता एक पांढरट जेल. १८६५ साली चेस्ब्रोने रोड वॅक्सपासून जेल बनवण्याच्या या प्रक्रियेचे पेटंट मिळवले.

रोड वॅक्सपासून मिळणाऱ्या या जेलचे शुद्धीकरण करण्याची सुलभ आणि जलद प्रक्रिया शोधण्यासाठी चेस्ब्रोने आणखी दहा वर्षे घालवली. त्या जेलचे पूर्ण शुद्धीकरण झाल्यानंतर तो याचा वापर कसा करायचा त्याचे प्रयोग दाखवत फिरत होता. तो स्वतःचा हात दिव्याच्या ज्योतीवर धरून स्वतःलाच चटके बसवून घेत असे आणि त्यावर ही शुद्ध जेली लावून लोकांना त्याचा वापर कसा कसा होऊ शकतो याबद्दल माहिती देत असे. छोट्या छोट्या जखमांवरही ही जेली कशी उपयुक्त याचे प्रात्यक्षिक तो लोकांना दाखवत असे.

१८७० मधे त्याने स्वतःचा पेट्रोलियम जेलीची निर्मिती करणारा कारखाना सुरु केला. १८७२ साली त्याने या पदार्थाला व्हॅसलीन हे नाव दिले. पाण्यासाठी वापरला जाणारा शब्द वॅसर आणि तेलासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द ओलीन, अशा दोन भाषेतील दोन शब्दांचे मिश्रण करून व्हॅसलीन हा शब्द तयार झाला. दोनच वर्षात पूर्ण अमेरिकेत या उत्पादनाची मागणी वाढली.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

चेस्ब्रोने कॅनडा, युरोप आणि आफ्रिकेतही याचे उत्पादन करणारे कारखाने उभारले. १९०८ पर्यंत चेस्ब्रो या कंपनीच्या अध्यक्षपदावर राहिला. १९५५ साली चेस्ब्रोने आपली चेस्ब्रो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पॉंड्स एक्स्ट्रॅक्टमधे विलीन केली. पुढे ही कंपनी चेस्ब्रो-पॉंड्स इंक या नावाने ओळखली जाऊ लागली. नंतर १९८७ मध्ये युनिलिव्हरने ही कंपनी विकत घेतली.

पेट्रोलियम जेली हा हायड्रोकार्बन्सपासून बनलेला पदार्थ आहे. याला द्रव रुपात असतानाच उष्णता दिली तर पेट्रोलियम जेली पेट घेऊ शकते.

यावर पाणी टिकत नाही म्हणूनच फुटलेली त्वचा, ओठ यांवर हे लावले असता, त्वचेची झालेली झीज भरून येते. शिवाय त्वचेची आर्द्रताही टिकवून ठेवते.

व्हॅसलीनच्या डब्यावर जी माहिती दिलेली असते त्यातील युएसपी म्हणजे युनायटेड स्टेट्स फार्मकॉपीया, औषधाची माहिती आणि त्यातील संकलित पदार्थांचे मानदंड दर्शवणारी माहिती.

१९३३ मध्ये चेस्ब्रोचे निधन झाले तेंव्हा त्याचे वय ९६ वर्षाचे होते. असे म्हटले जाते की तो दररोज एक चमचा पेट्रोलियम जेलीचे सेवन करत असे. पेट्रोलियम जेलीचे सेवन केल्यानेच तो इतके दीर्घायुषी आयुष्य जगला असेही काही लोकांचे म्हणणे आहे.

तर ही पेट्रोलियम जेली अनेक प्रकारे गुणकारी आहे. फक्त फुटलेली त्वचा आणि ओठच नाही तर याचा वापर करून अनेक आजार बरे करता येतात आणि याचे इतरही अनेक उपयोग आहेत.

तुमच्याकडे जर लेदर शुज असतील तर त्यांना चमकवण्यासाठीही तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. तुमच्या रुमालावर लिपस्टिकचे डाग पडले असतील तर त्याठिकाणी थोडीशी पेट्रोलियम जेली लावा आणि तो डाग धुवा काही वेळातच हे लिपस्टिकचे डाग निघून जातील. घरातील टेबलवर किंवा कपड्याला चुईंग गम चिकटले असेल तर तिथेही पेट्रोलियम जेली लावू शकता.

एखाद्या मशीनमध्ये ल्युब्रीकेंट म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो. कासवाच्या कवचावर हे लावले असता त्यांच्यात होणारे फंगल इन्फेक्शन रोखता येऊ शकते. कुत्र्याच्या जखमांवर किंवा त्यांचे पंजे फुटले असतील तर त्यावरही व्हॅसलीन लावू शकता. आपल्या त्वचेवर होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवरही याचा वापर केला जाऊ शकतो. दुभंगलेले केस दुरुस्त करण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता.

बघा, व्हॅसलीनचा इतिहास आणि इतके फायदे तुम्हाला आजच कळले असेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ना*झी सैन्यात झालेल्या कन्फ्युजनमुळे २५० किलोमीटर लांब ट्राफिक जॅम झालेलं

Next Post

ब्रिटिशांच्या नाकर्तेपणामुळे ४० लाख बंगाली लोकांचा दुष्काळाने होरपळून जीव गेला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

ब्रिटिशांच्या नाकर्तेपणामुळे ४० लाख बंगाली लोकांचा दुष्काळाने होरपळून जीव गेला होता

या मॅचनंतर जगाला कळलं आता भारताला हलक्यात घेऊन चालणार नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.