The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

किरणोत्सर्गी पाणी चक्क एनर्जी ड्रिंक म्हणून दिलं जायचं, भीषण परिणाम समोर आल्यावर बंदी घातली

by Heramb
27 November 2024
in आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आधुनिक औषध युगासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हा अजूनही एक प्रायोगिक टप्पा होता. विविध आजारांसाठी कोकेन आणि हेरॉइन सारखी अति-परिणामकारक औषधे घेण्याचा सल्ला वैद्य देत असत. काही लोक तर आपण आज ज्या गोष्टींना ‘विषारी’ समजतो त्यांचा उपयोग औषधोपचारांसाठी करून घेत असत. अशाच प्रायोगिक काळात अनेक वैद्यांनी ‘प्रिस्क्राइब’ केलेलं एक औषध म्हणजे ‘रेडिथोर’. रेडिथोर म्हणजेच रेडियम किंवा पाण्यात मिसळलेला अत्यंत किरणोत्सर्गी पदार्थ. या औषधाची जाहिरातही “जिवंत मृतांसाठी एक उपचार” असं म्हणत केली गेली.

अमेरिकेतील न्यू जर्सी येथील ‘बेली रेडियम लॅबोरेटरीज कंपनी’ने या औषधाची निर्मिती केली होती. या कंपनीची स्थापना जे.ए. बेली याने केली होती. खरं तर जे.ए. बेली ‘सर्टिफाईड’ डॉक्टर नव्हता. त्याने हार्वर्ड विद्यापीठातून ड्रॉप-आऊट घेतलं होतं. पण पदवीधर झाला असल्याचं तो लोकांना सांगत राहिला आणि प्रत्येकानेच त्याच्यावर विश्वास ठेवला.

बेली रेडियम लॅबोरेटरीजमधील बेली आणि त्याच्या रसायनशास्त्रज्ञांच्या टीमने रेडियमवर काही प्रमाणात संशोधन केले आणि त्यांना रेडियम मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे आढळले. यावेळी किरणोत्सर्गावर फारसे संशोधन झाले नव्हते आणि विशेषतः किरणोत्सर्ग मानवी शरीरावर किती भीषण परिणाम करू शकतो, याची तर कोणालाही पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती.

किरणोत्सर्गी पदार्थाचा मोठ्या प्रमाणावरील डोस म्हणजे माणसाचा मृत्यू हे बेली आणि टीमला माहित होते. पण त्यांच्यामते, पाण्याबरोबर घेतलेला अत्यंत कमी डोस माणसाला फायदेशीर ठरू शकतो असा त्यांचा अंदाज होता. यातूनच त्यांनी रेडिथोर म्हणजेच रेडियम किंवा पाण्यात मिसळलेला किरणोत्सर्गी पदार्थ सर्वांसमोर आणला.

हे प्रोडक्ट १९१८ साली युनायटेड स्टेट्समध्ये लाँच करण्यात आले. रेडिथोरच्या ‘डिस्क्रिप्शन’मध्ये फक्त ‘शरीरातील महत्त्वपूर्ण प्रक्रिया वृद्धिंगत करेल’ असे नमूद केले असल्याने रेडिथोरचे फायदे फारच अस्पष्ट होते. पण याकडे दुर्लक्ष करीत लोकांनी आणि डॉक्टरांनी ते वापरणं थांबवलं नाही आणि याचा प्लेसबो इफेक्ट झाला. कारण प्रत्येकालाच काही डोस घेतल्यानंतरच बरे वाटू लागले. प्लेसबो इफेक्ट म्हणजे अनेक लोकांना एकसारख्या औषधाचा किंवा उपचाराचा फायदा झाल्याने त्याच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होणे किंवा एखादी गोष्ट घेतल्यानंतर अथवा केल्यानंतर विशिष्ट आजार बरा झाला असे मनात ठसणे. 



पण या औषधाचा गंभीर परिणाम झाला तो एका तरुण खेळाडूवर. एबेन बायर्स. एबेन बायर्सचा जन्म १२ एप्रिल १८८० रोजी झाला. च्या श्रीमंतीमुळे त्याला चांगले शिक्षण मिळू शकले, त्याने येल विद्यापीठातून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तो एक खेळाडूसुद्धा होता. त्याने इसवी सन १९०० च्या सुरुवातीला अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकली होती. कालांतराने त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे गिरार्ड आयर्न कंपनीचे अध्यक्षपद सोपवले.

१९२७ साली एका सामन्यादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. जखम फारशी गंभीर नव्हती तरी त्याला वेदना होत होत्या. या वेदनांची सवय बायर्सला नव्हती. त्यामुळे त्याच्या डॉक्टरने इतर सर्व औषधांव्यतिरिक्त जलद बरे होण्यासाठी त्याला रेडिथोर हे औषध सुचवले. बायर्सने त्याच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करीत दिवसाला फक्त एक छोटा चमचा रेडिथोरचा डोस घेण्यास सुरुवात केली. काहीच काळात बायर्सला देखील प्लेसबो प्रभावाचा फटका बसला. त्याला हे औषध वारंवार घेणे आनंददायी वाटू लागले आणि त्याने दिवसातून एक संपूर्ण बाटली, नंतर काही आठवड्यांनी दिवसाला दोन आणि एका वर्षानंतर दिवसातून तीन बाटल्या घेणे सुरू केले.

पण याचा घातक परिणाम त्याला १९३१ साली दिसला. त्याचा जबडा अक्षरशः खाली पडल्यासारखा झाला होता. किरणोत्सर्गी पाण्याच्या जास्त वापरामुळे त्याचे टिशूज आणि हाडे आतून विखुरली गेली होती. त्याला याचा फारसा त्रास झाला नाही कारण त्याच्या सर्व नसा देखील मागच्या काही वर्षांत किरणोत्सर्गी पदार्थाने वितळल्या होत्या. डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यावरील सडलेल्या सर्व टिशूज काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो विकृत दिसू नये यासाठी शस्त्रक्रियेने एक नवीन जबडा तयार केला.

हे देखील वाचा

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

१९२७ ते १९३१ या कालावधीमध्ये बायर्सने एकूण १४०० बाटल्यांमधून रेडिथोरचे सेवन केले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गी पदार्थाचे सेवन केल्याने, त्याच्या शरीरातील महत्वाच्या टिशूज आणि अवयवांचे विघटन होत होते. यामुळे १९३२ साली त्याचा मृत्यू झाला. यावेळी तो फक्त ५१ वर्षांचा होता.

या घटनेनंतर मात्र अधिकाऱ्यांनी बेलीची कंपनी बंद पाडली. पण त्याने हेच औषध वेगवेगळ्या नावाने विकण्याचा प्रयत्न केला.१९६५ साली बायर्सचा मृतदेह अभ्यासासाठी बाहेर काढण्यात आला आणि तब्बल ३० वर्षांनंतरही त्याचा मृतदेह अत्यंत किरणोत्सर्गी होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एक्स्प्लेनर – कोरोना व्हायरसचा नवीन सापडलेला व्हॅरिएंट किती धोकादायक आहे..?

Next Post

कम्युटरचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला, परंतु पहिला कम्युटर प्रोग्राम या महिलेने लिहिला होता

Related Posts

आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
आरोग्य

इंग्लंडच्या राजाला वेड लागलं आणि मानसिक विकारावर अभ्यास सुरु झाला!

1 June 2025
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

19 April 2025
आरोग्य

फ्रेंच फुटबॉलर करीम बेंझेमासुद्धा ज्याचा फॅन आहे ती हिजामा थेरपी काय आहे?

8 April 2025
आरोग्य

स्टील्थ ओमिक्रॉनमुळे भारतात पुन्हा लॉकडाउन लावावं लागणार का..?

25 March 2022
आरोग्य

या पेयांमुळे शरीरातील जळजळ वाढू शकते, त्यामुळे सांभाळूनच!

15 March 2024
Next Post

कम्युटरचा शोध चार्ल्स बॅबेजने लावला, परंतु पहिला कम्युटर प्रोग्राम या महिलेने लिहिला होता

इसवीसन २९५७ साठी पुरून ठेवलेलं टाइम कॅप्सूल MIT ला चुकून २०१५ सालीच सापडलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.