The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युट्युब चॅनेलपासून सुरु झालेल्या ‘या’ कंपनीची नेट वर्थ आज कोट्यवधींमध्ये आहे!

by Akshay Bikkad
13 September 2023
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मोठी स्वप्ने बघताना पैसा ही गोष्ट महत्त्वाची ठरतेच. पण जर पैसा नसेल तर स्वप्ने पूर्ण होत नाहीत, असेही नाही. जिद्द, चिकाटी, महत्वकांक्षा यांच्या जोरावर माणूस आपला काळ बदलू शकतोच, हे सिद्ध केलंय अलख पांडे यांनी. अलख पांडे हे नाव ऐकलं की आपल्याला आठवते फिजिक्स वाला. आज अलख पांडे आणि फिजिक्स वाला हे नाव प्रत्येकाला माहीत आहे, कारण अलख पांडे यांच्या अथक परिश्रमाने बनलेली एडटेक फर्म फिजिक्स वाला ही कंपनी आता देशातील युनिकॉर्न कंपन्यांमध्ये समाविष्ट झाली आहे.

मेडिकल आणि इंजिनिअरिंगची तयारी करणाऱ्या मुलांसाठी फिजिक्स वाला ही युट्यूब वाहिनी एक वरदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ पर्यंत अलख पांडे हे नावही कोणाला माहित नव्हते. पण आज शिक्षणक्षेत्रात प्रत्येकाला अलख पांडे आणि फिजिक्स वाला माहीत आहे. आजही अनेक विद्यार्थी कोणतंही कोचिंग न लावता फिजिक्स वाला वाहिनीवरूनच अभ्यास करतात. तर आज आपण अलख पांडे यांची प्रेरक कथा जाणून घेऊया…

अलख पांडे हे भारतातील सर्वांत प्रसिद्ध तरुण युट्यूबर आहेत. आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून अतिशय सोप्या‌ पद्धतीने अगदी आनंदी वातावरणात अलख पांडे हे त्यांच्या फिजिक्स वाला या चॅनलवरून मुलांना भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे धडे देतात. यूट्यूबवर त्यांचे १ कोटी १० लाख सबस्क्राइबर्स आहेत. अलख हे एक प्रेरक वक्तेदेखील (मोटिव्हेशनल स्पीकर) असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

अलख पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे झाला. अलख पांडे सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे खूप कष्टाने अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांचे वडील सतीश पांडे आणि आई रजत पांडे यांना मुलगा अलख आणि मुलगी अदिती यांच्या शिक्षणासाठी घर विकावे लागले. अलख पांडे यांचे सुरुवातीचे शिक्षण प्रयागराज येथील बिशप जॉन्सन शाळेत झाले. त्यांना हायस्कूलमध्ये ९१ टक्के आणि बारावीत ९३.५ टक्के गुण मिळाले. बारावीनंतर एका कोचिंग क्लासमध्ये तीन हजार रुपये महिन्यावर त्यांनी शिकवायला सुरुवात केली.

२०१५ साली आयआयटी कानपूरमधून त्यांनी बीटेकचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्याच संस्थेत शिकवायला सुरुवात केली. शिक्षक बनलेले प्रोफेसर अलख पांडे यांनी सहकारी प्रतीक माहेश्वरी यांच्यासोबत २०१६ साली फिजिक्स वाला नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले. यानंतर यूट्यूबवर त्यांनी आपल्या लेक्चर्सचे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यात ते विद्यार्थ्यांना नोट्स, प्रश्नमंजुषा पुरवतात. संपूर्ण अभ्यासक्रम पुरवल्यानंतर ते शेवटी सर्व विषयांची उजळणी करून घेतात. त्यांच्या चॅनलवर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या त्यांच्या शैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. या उत्कृष्ट शैलीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांचे यूट्यूब व्हिडीओ आवडू लागले आणि त्यांच्या व्हिडीओंना मिळणारे व्ह्यूजही वाढले.



कोरोनाकाळात ॲप सुरू केल्यानंतर अलख पांडे यांनी सलग ३ वर्षे युट्युबवर अशाच लेक्चर्सचे व्हिडीओ अपलोड केले. याद्वारे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा, संयुक्त प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षित केले जाते. यानंतर कोरोना काळात IIT, NEET आणि JEE ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक मोबाइल ॲप तयार करण्यात आले, ज्यामध्ये अत्यंत कमी शुल्कात ऑनलाइन कोचिंगची सुविधा सुरू करण्यात आली. तसेच मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल या दृष्टीने या ॲपमध्ये भर देण्यात आला. लवकरच या ॲपला ६९ लाख सबस्क्रायबर्स मिळाले.

अलख पांडे यांच्या युनिकॉर्नमध्ये १९ हजार कर्मचारी आहेत, ज्यात ५०० शिक्षक, २०० सहयोगी प्राध्यापक, २०० विषय तज्ज्ञ आणि सुमारे १०० तंत्रज्ञ आहेत. देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्वे करणाऱ्या कंपनीनुसार प्रत्येकी १० पैकी १ विद्यार्थी फिजिक्स वालामध्ये शिकत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ही संख्या ६ पैकी १ असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे यश सोपे नाही. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या कठीण प्रश्नांची उत्तरे अगदी सहज देत असल्यामुळे अलख विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. याच गुणवत्तेमुळे फिजिक्सवालाच्या यूट्यूब चॅनेलचे सबस्क्राइबर्स वाढत तर गेलेच, शिवाय त्यांचे ॲपही ५० लाख जणांनी डाउनलोड केले.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

सिरिज ए फंडिंगमध्ये १० कोटी डॉलर्स (अंदाजे ८२७ कोटी ३३ लाख रूपये) मिळवलेल्या कंपनीचा २०१६ साली फक्त एका युट्यूब वाहिनीपासून ते फिजिक्स वाला आणि त्याच्या सिईओपर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. २०२० साली ‘फिजिक्स वाला’ला कंपनी ॲक्टमध्येही सामील करण्यात आले. आयआयटी बीएचयूमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले प्रतीक माहेश्वरी अलख पांडे यांच्यासोबत काम करतात. ते संपूर्ण व्यवसाय सांभाळतात.

आज या एड-टेक कंपनीची नेट वर्थ १.१ बिलियनपर्यंत पोहोचली आहे. तसेच ही कंपनी देशातील १०१ वी युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. वेस्टब्रिज आणि GSV व्हेंचर्स यांनी अलख पांडे यांच्या कंपनीत १० कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

कोटींच्या ऑफर्स असून देखील अलख पांडे यांनी आपल्या चॅनलद्वारे संपूर्ण शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर जगभर आपली ओळख निर्माण केली. वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षात एवढे मोठे यश मिळवणे सोपे नाही. या यशाचे श्रेय अलख पांडे आपले वडील आणि आपले सहकारी प्रतीक माहेश्वरी यांना देतात. अलख पांडे यांना त्यांच्या भावी यशासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जेंव्हा “बिल गेट्स” मैलापाण्यापासून रिसायकल केलेले पाणी पितात..

Next Post

हिऱ्यांच्या किंमती अवाढव्य असण्यामागे एक मार्केटिंग टेक्निक आहे..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

हिऱ्यांच्या किंमती अवाढव्य असण्यामागे एक मार्केटिंग टेक्निक आहे..!

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.