The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॅम्बॉर्गिनीनं डिझाईन नाकारलं म्हणून ‘पागानी’सारखी सुपरकार तयार झाली

by द पोस्टमन टीम
14 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


मित्रांनो, स्पोर्ट्स व्हेईकल्सची एक वेगळीच शान, वेगळाच ‘स्वॅग’ असतो नाही! स्पोर्ट्स व्हेईकल्सची हीच वाढती क्रेझ बघून अनेक कंपन्यांनी आपल्या बाईक्सदेखील अगदी स्पोर्ट्स बाईकप्रमाणे डिझाईन करून बाजारात आणल्या, आणि त्या लोकप्रियसुद्धा झाल्या जसे की बजाज पल्सर, सुझुकी जिक्सर, करिझ्मा, यामाहा R15 (दोन्ही मॉडेल्स), TVS आपाची, कावासाकी निन्जा, हिरो एक्सट्रीम, होंडा CBR ई. आपल्याकडची १९ ते ३० वयोगटातली तरुणाई त्यांच्यावर फिदा झाली.

तसंच स्पोर्ट्स कार्सचंही मार्केट आहे आपल्याकडे, BMW, ऑडी, फेरारी, लॅम्बॉर्गिनी, अकुरा, पोर्श, जग्वार अशा बऱ्याच कार्स आपल्याला माहिती असतीलच. यांपैकी एखाद्या  तरी स्पोर्ट्स कारचा प्रवास ही कित्येक जणांची एक इच्छा असते. या स्पोर्ट्स कार्सच्या मालिकेतलं एक प्रसिद्ध नाव म्हणजे ‘पागानी’. जगातल्या प्रसिध्द स्पोर्ट्स कार्समधलं एक आघाडीचं नाव. फरारी असो वा लॅम्बॉर्गिनी, त्यांना तोडीस तोड टक्कर देणारी ही पागानी. आज जाणून घेऊया तिचीच गोष्ट!

या कारचं पागानी असं नाव तिचे निर्माता होराशियो पागानी यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. होराशियो यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५५ रोजी अर्जेंटिनामध्ये झाला. अगदी लहान वयातच त्यांना गाड्यांची आवड निर्माण झाली. त्यांच्या घराजवळच असलेल्या एका गॅरेजमध्ये ते दिवसेंदिवस घालवत असत. मिळेल ते काम करत. त्यांच्या घरची परिस्थितीही फारशी बरी नव्हती.

गॅरेजमधली एकेक कामं शिकत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षीच त्यानं चिकणमाती आणि लाकूड यांचा वापर करून एक गाडीचं डिझाईन तयार केलं.

एकदा त्यांना अर्जेंटिनातील प्रसिद्ध फॉर्म्युला-वन चॅम्पियन जुआन मॅन्युअल फॅंजिओला भेटायचा योग आला. जुआन या भेटीनं इतका प्रभावित झाला की, त्यांची चांगली मैत्रीच झाली. जुआननं होराशियोची डिझाईन्स पाहून त्याचं केवळ कौतुकच केलं नाही, तर त्याला या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहनदेखील दिलं.



२८व्या वर्षी होराशियो नोकरीच्या शोधात इटलीला आले, त्यावेळी जुआन फॅंजिओनं त्यांना एक शिफारस पत्र दिलं होतं. त्याच्या जोरावर लॅम्बॉर्गिनी या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. त्यांनी आपल्या टॅलेंटची झलक तिथंही दाखवलीच. ‘लॅम्बॉर्गिनी काऊंट’ हे त्यांनी डिझाईन केलेलं मॉडेल खूप प्रसिद्ध झालं. आजही स्पोर्ट्स कारमध्ये लॅम्बॉर्गिनीचं हे मॉडेल सर्वोत्कृष्ट मानलं जातं.

या गाडीने होराशियो यांचे दिवसच बदलले, त्यांना नवी ओळख मिळवून दिली. मात्र होराशियो हे इतक्यातच थांबणार नव्हते, त्यांचं पुढचं लक्ष्य आता त्यांना दिसू लागलं होतं. त्यांना कारच्या विश्वात क्रांती करायची होती. त्यावेळी सर्व गाड्यांची बॉडी लोखंडी असायची, जी होराशियोना कार्बन फायबरचा वापर करून बनवायची होती. यामुळे दोन फायदे झाले असते, एक तर गाडीचं वजन कमी होऊन ती हलकी झाली असती, आणि दुसरं म्हणजे कार्बन फायबर हे लोखंडापेक्षा टिकाऊ होतं. पण एक अडचण होतीच, कार्बन फायबर बरंच महाग होतं. जेव्हा होराशियो हा प्रस्ताव घेऊन गेले तेव्हा त्यांना सरळ नकार मिळाला. कारण त्यावेळी कार्बन फायबरची कार हा विचारच कोणाला पटत नव्हता. शेवटी याचा परिणाम असा झाला की होराशियो लॅम्बॉर्गिनीतून बाहेर पडले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

एखाद्याला कोणीही वेड्यात काढलं असतं की, एवढी चांगली कंपनी सोडली म्हणून. पण होराशियो मात्र आपल्या विचारावर ठाम राहिले. त्यांचं ध्येय एकच होतं, कार्बन फायबरची कार बनवणं. सुरवातीला तर त्यांच्याकडे पुरेसे पैसेदेखील नव्हते, तरीही थोडं कर्ज घेऊन एक कार्बन फायबर बनवणारी कंपनीच सुरु केली. ज्यामधून त्यांना बराच फायदा मिळाला.

कंपनी नीट चालायला लागली असली तरी ते आपलं कार्सचं स्वप्न विसरले नव्हते. अखेर १९९२ साली त्यांनी ‘पागानी ऑटोमोबाईल्स’ची सुरुवात केली. जवळजवळ सात वर्षं लागली त्यांना त्यांची पहिली गाडी बाजारात आणायला!

त्यांच्या कार्बन फायबर कंपनीचे एक क्लाएंट यावेळी त्यांच्या मदतीला आले. त्यांनी कारला लागणारं मिडमाऊंट DOHC V12 इंजिन होराशियो यांना मर्सिडीजकडून उपलब्ध करून दिलं. कार तयार झाली तेव्हा तिचं नाव होरोशियोला जुआन फॅंजिओच्या नावावरून ‘फॅंजिओ F1’ असं ठेवावंसं वाटलं, पण १९९५ मध्ये जुआन निधन पावल्यानंतर त्यांनी तो विचार बदलून नवीन नाव हे ‘पागानी झोंडा C12’ असं ठरवलं.

१९९९ साली स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय मोटार शोमध्ये पहिल्यांदा ही गाडी सादर झाली, त्यावेळी तिचं इंजिन सहा लिटरचं होतं. ही कार फक्त ४ सेकंदात ६० किमी प्रति तास हा वेग घेऊ शकते, सुमारे २९७ किमी प्रति तास इतका तिचा सर्वोच्च वेग आहे. या कारची किंमत त्यावेळी ३,२०,०००/- डॉलर होती. सुरवातीला फक्त पाचच गाड्या बनवण्यात आल्या होत्या. जेव्हा ही कार बाजारात आली, तेव्हा तिनं आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांनी लोकांना अक्षरशः वेड लावलं.

होरोशियो पागानी यांचं स्वप्न तर साकार झालं, पण म्हणून ते काही तेवढ्यावरच थांबले नाहीत. यशस्वी व्यक्तींची ही एक खूण असते की, ते कधीच थांबत नाहीत. एखादं शिखर सर केलं की, लगेच पुढच्या तयारीला लागतात. होरोशियो यांनी २००५ साली जाहीर केलं की, पुढच्या तीन वर्षांत आपल्या कंपनीत तिप्पट उत्पादन होईल आणि तसं झालंही.

२००७ साली अमेरिकेत पागानी लॉंच करायची घोषणाही त्यांनी अशीच पूर्ण केली. २००९ साली ‘झोंडा सिंक’ व ‘झोंडा सिंक रोडस्टर’ या नावाने त्यांनी याच कारची आणखी दोन मॉडेल्स लॉंच केली. यातसुद्धा मर्सिडीजचंच M297 V12 इंजिन वापरलं होतं. याची बॉडी आधुनिक कार्बन टायटॅनियम फायबरने बनली होती, जी अधिक हलकी व मजबूत होती. या दोन्ही गाड्या ४ सेकंदात १०० किमीचा वेग गाठू शकतात.

दोन्ही गाड्यांचा वेग साधारण ३५० किमी प्रतितास आहे. या दोन्ही कार्सची सुरवातीला फक्त प्रत्येकी पाच मॉडेल्स बनवण्यात आली, विशेष म्हणजे ती सर्व लाँचच्या आधीच बुक झालेली होती.

त्यानंतर २०११ सालच्या आंतरराष्ट्रीय मोटार शोमध्ये पागानीची नवी कार सादर झाली, ती म्हणजे ‘पागानी व्हूऐरा’. पागानी झोंडाचा वेगाचा वारसा या मॉडेलनंही घेतला. २५ जानेवारी २०११ रोजी एका पत्रकार परिषदेत या कारची ऑनलाईन झलक दाखवण्यात आली होती. या गाडीला मर्सिडीजचं ६ लिटरचं ट्विन टर्बो M158 V12 इंजिन जोडण्यात आलं होतं, तसंच याची बॉडी ही कार्बोटॅनियम या अत्याधुनिक व कमी वजनाच्या टिकाऊ मटेरियलने बनवण्यात आली होती. आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत व्हूऐरा संपूर्णतः नव्याने डिझाईन करण्यात आली होती. ३ सेकंदांत ९७ किमीचा वेग आणि ताशी ३९७ किमीची क्षमता ही या गाडीची ठळक वैशिष्ट्यं. व्हूऐराचेही फक्त १०० मॉडेल्स बनवण्यात आले.

२०१६ मध्ये पागानीचे सर्वप्रथम ग्राहक बेनी कैओला यांच्या स्मरणार्थ व्हूऐरा BC ही नवी गाडी लॉंच करण्यात आली. या गाडीचं वजन आधीच्या गाडीपेक्षा १३२ किलोने कमी होते. तर टायर्स हे १२ प्रकारच्या रबरांपासून बनवण्यात आले होते. पागानीच्या सर्व कार्सचं वैशिष्ट्य म्हणजे सिंगल क्लच गिअरबॉक्स, जो डबल क्लच गिअरबॉक्सपेक्षा हलका असतो. पागानीने हे तत्त्व अगदी सुरवातीपासून पाळलं आहे.

तर ही होती पागनी कार्सच्या निर्मितीची गोष्टं. एकूणच होराशियो पागानी यांचा हा प्रवास पाहिला, तर एक नक्कीच लक्षात येतं की, तुमची स्वप्नं मोठी असतील, जर तुमची त्यांच्यासाठी कष्ट करायची जिद्द, तयारी असेल तर तुम्हांला काहीही अशक्य नसतं!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा पेंग्विन नॉर्वेच्या सैन्यात ब्रिगेडिअर आहे, त्याला मानाची सलामीसुद्धा मिळते.

Next Post

४३६ लोकांचा जीव घेऊन चंपावत वाघिणीने गिनीज बुक रेकॉर्ड केला होता..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

४३६ लोकांचा जीव घेऊन चंपावत वाघिणीने गिनीज बुक रेकॉर्ड केला होता..!

मुकेश अंबानींनी नीता अंबानींना बड्डे गिफ्ट दिलेलं प्रायव्हेट जेट सरकारने जप्त केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.