The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“टु मिनिट” मॅगीच्या ३० वर्षांच्या प्रवासाची कहाणी…

by द पोस्टमन टीम
24 April 2024
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘मॅगी’ हे ‘नेस्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीचं उत्पादन भारतात आणि जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे. जसं चॉकलेट म्हणजे ‘कॅडबरी’ हे समीकरण लोकांच्या मनात घर करून बसलं आहे, तसंच नूडल्स म्हणजे ‘मॅगी’ हे लोकांच्या डोक्यात घट्ट बसलं आहे. ‘मॅगी’ सन १९८३ पासून भारतीय बाजारपेठेत अवतरलेला प्रसिद्ध ब्रँड तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ भारतात झटपट नूडल्ससाठी सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड होता आणि मॅगीच्या या प्रवासात अनेक चढउतार आणि वाटा-वळणं अनुभवत बाजारपेठेत आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.

‘फक्त दोन मिनिटात तयार’ हे मॅगीचं मुख्य वैशिष्ट्य असलं तरीही त्याला पौष्टीकतेची जोड देऊन कंपनीने आपलं उत्पादन अधिक लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच मॅगी नूडल्स हे निःसंशयपणे सर्वांत प्रसिद्ध उत्पादनांपैकी एक आहे. एवढ्या प्रचंड यशाचे रहस्य काय, हा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.

मॅगी हे देशातील आघाडीच्या फास्ट फूड कंपन्यांपैकी एक असलेल्या नेस्ले इंडियाच्या मालकीचे उत्पादन आहे. इन्स्टंट नूडल्स, स्टॉक्स, केचप आणि इन्स्टंट सूप ही मॅगीची प्रमुख उत्पादनं आहेत. त्या शिवाय २ मिनिट नूडल्स, मॅगी मसाला-ए-मॅजिक, मॅगी सॉस, मॅगी राईस मॅनिया आणि मॅगी मॅजिक क्यूब्स ही स्वित्झर्लंडच्या नेस्लेची उपकंपनी असलेल्या नेस्ले इंडियाची उत्पादनं भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहेत. 

तमिळनाडू, पंजाब, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेल्या नेस्ले इंडियाच्या सात तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत कारखान्यांमध्ये मॅगीची विविध उत्पादनं तयार केली जातात.

‘मॅगी नूडल्स’ने भारतातल्या सुमारे ७० टक्के शहरी कुटुंबांच्या घरात स्थान प्राप्त केलं आहे. या नूडल्सच्या माध्यमातून माणसाला दर दिवशी आवश्यक असलेल्या लोहाच्या १५ टक्के लोहाचा पुरवठा होतो. त्यामुळे हे उत्पादन लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी उल्लेखनीय योगदान देऊ शकते. हे ‘मॅगीचं महत्त्वाचं बलस्थान ठरलं आहे.



मॅगीची ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ ही ‘मार्केटिंग मिक्स फ्रेमवर्क’ वापरून निश्चित करण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये 4Ps (उत्पादन, किंमत, ठिकाण, जाहिरात) यांचा समावेश आहे. उत्पादनात नवकल्पनेचा वापर, किफायतशीर किंमत धोरण आणि जाहिरात नियोजन हे ‘मॅगी’च्या विपणन धोरणाचे महत्वाचे घटक आहेत. मॅगीची ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ आपल्या ब्रँडचे बाजारपेठेतले स्थान मजबूत करण्यात आणि व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी ठरली आहेत.

काय आहे ‘मॅगी’ची ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी?’

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

‘मॅगी’ हा ‘नेस्ले’ या बलाढ्य कंपनीच्या छत्राखालचा प्रमुख खाद्य ब्रँड आहे. ‘मॅगी’ या ब्रँडची विविध प्रकारची उत्पादनं आहेत आणि त्यांची प्रत्येक देशासाठी विविध प्रकारच्या श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. त्याची उत्पादने मुख्यत्वे मॅगी इन्स्टंट नूडल्स, सॉस, मॅगी सूप आणि सीझनिंग या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

केवळ ‘इन्स्टंट नूडल्स’ या श्रेणीमध्ये प्रचंड विविधता आहे आणि ती जगभरात खूप लोकप्रिय आहेत. या श्रेणीतील प्रमुख उत्पादने म्हणजे 2-मिनिट नूडल्स, व्हेजिटेबल मल्टीग्रेन नूडल्स, चिकन नूडल्स, कपा मॅनिया, ओट्स नूडल्स, हॉट हेड नूडल्स, आटा नूडल्स. हे प्रकार ‘मॅगी मार्केटिंग मिक्स’मधील उत्पादन धोरणाचा कणा आहेत. 

मॅगी सूप श्रेणीमध्ये ‘डिहायड्रेटेड सूप मिक्स’ची विपुल विविधता आहे आणि ही उत्पादने देशांतील मागणी आणि खाद्यसंस्कृतीप्रमाणे वेगवेगळी आहेत. भारतात, खास करून टोमॅटो, कॉर्न, मिक्स व्हेज हे सूपचे प्रकार लोकप्रिय आहेत.

वेगवेगळ्या देशांमधल्या बाजारपेठेत अन्य उत्पादनांशी तगडी स्पर्धा करण्याच्या दृष्टिकोनातून ‘मॅगी’चं किंमत धोरण आखण्यात आलं आहे. विविध देशांमधल्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून ‘मॅगी’ने चलाखीने आपल्या उत्पादनांच्या पॅकिंगमधले पदार्थांचे प्रमाण कमी करून किंमत कायम ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. 

किमान किंमती आणि कमाल गुणवत्ता या धोरणाने बाजारपेठेचा अधिकाधिक हिस्सा व्यापण्याचा ‘नेस्ले’चा पवित्रा आहे. या शिवाय वेगवेगळ्या ‘ऑफर्स,’ विविध प्रकारची पॅकेजेस यामुळे ग्राहक या ब्रँडकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या गरजेनुसार खरेदी करू शकतात. अलीकडेच, मॅगीने हॉट हेड नूडल्स आणि कप नूडल्ससारखी नवीन उत्पादने आणण्यास सुरुवात केली आहे. ही उत्पादने उच्च उत्पन्न गटातल्या ग्राहकांना नजरेसमोर ठेऊन विकसित करण्यात आले आहेत. अर्थातच, त्यांची किंमतही सामान्य उत्पादनांच्या तुलनेत अधिक आहे.

‘नेस्ले’चं भक्कम पाठबळ असल्यामुळे ‘मॅगी’ची उत्पादने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. नेस्लेने उत्पादक ते वितरक आणि वितरकांच्या व्यापक साखळीद्वारे ते घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि अंतिमतः ग्राहक, ही वितरणाची पद्धत स्वीकारली आहे. या व्यापक वितरण साखळीमुळे अगदी ग्रामीण भागातही त्याची उत्पादने मोठ्या प्रमाणावर आणि किफायतशीर किंमतीत उपलब्ध होत आहेत.

आपल्या उत्पादनांबद्दल ग्राहकांमध्ये उत्सुकता आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘मॅगी’ने जाहिरातींचा प्रभावी वापर केला आहे. कंपनीचं जाहिरात धोरण हे प्रामुख्याने लहान मुलं आणि काम करणार्‍या महिलांना नजरेसमोर ठेऊन आखण्यात आलं आहे. या जाहिराती मुख्यतः मुलांच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर विविध प्रभावी टॅगलाइनसह दाखवल्या जातात.

‘मॅगी’च्या उत्पादनांमध्ये मानवी शरीराला घातक रसायनांचा समावेश असल्याच्या आरोपावरून भारतात काही काळ या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठल्यानंतर या उत्पादनांपासून दूर गेलेले ग्राहक परत मिळवण्यासाठी “मिस यू मॅगी” या भावनेला हात घालणाऱ्या टॅगलाइनचा वापर करून विशेष जाहिरात मोहीम राबवण्यात आली.

गेल्या काही वर्षांत विक्री धोरण म्हणून ‘मॅगी’ने लहान मुलांना आवडतील अशी मजेदार पुस्तक, खेळणी आणि विनामूल्य नमुने या सह आपल्या उत्पादनांवर विनामूल्य भेटवस्तू यांचा वापर केला आहे. शिवाय ‘स्क्रॅच अँड विन’ योजना आणि सवलती देखील ऑफर केल्या आहेत. ग्राहकांच्या मनावर ब्रँड ठसवण्यासाठी माधुरी दीक्षित सारख्या अनेक सेलिब्रिटींचा देखील वापर केला आहे.

नेस्ले इंडियाने नुकतीच एक ‘इनवेइगल’ मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ‘मॅगी’प्रेमींना त्यांच्या खास आवडत्या फ्लेवरसाठी मतदान करण्याची संधी मिळेल. तसेच मॅगीचे टोमॅटो, चटपाटा, यम्मी कॅप्रिका, आणि देसी चीझी असे अनेक नवीन प्रकारही बाजारपेठेत आणले आहेत. अनेक वर्षांच्या अनुभवातून नाविन्यपूर्ण उत्पादनं आणि दर्जात्मक वृद्धी याद्वारे ग्राहकांमध्ये आत्मीयता आणि विश्वासार्हता निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

मॅगी हा नेस्लेचा एक प्रसिद्ध ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा महत्वाचा भाग म्हणून डिजिटल आणि सोशल मीडियावरही सातत्याने विविध उपक्रम आणि जाहिरात मोहीम राबविण्यावर कंपनीचा भर आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांबरोबरच कंपनी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधत आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हे त्यांच्या ‘ब्रँड-बिल्डिंग’ प्रक्रियेचे केंद्रबिंदू आहेत.

‘मिस यू मॅगी’ या जाहिरात मोहिमेचा पुढचा भाग म्हणून ‘वुई मिस यू टू’ ही जाहिरात मोहीमही हाती घेण्यात आली आहे. तसंच ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी 24×7 टोल-फ्री दूरध्वनी ग्राहक सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘मॅगी’ने प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘स्नॅपडील’ सोबत ‘टाय-अप’ केले आहे. त्यातून ‘मॅगी वेलकम किट’ ही योजना राबवण्यात आली.

मॅगीची बलस्थानं

सध्या नूडल्सच्या बाजारपेठेत ‘मॅगी’ हा ब्रँड आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणावर ग्राहक आकर्षित करून घेण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. त्याच्या उत्कृष्ट जाहिरातींमुळे मॅगी हा ‘टॉप-ऑफ-माइंड’ ब्रँड बनला आहे.

‘नेस्ले’चा ब्रँड असल्याने ‘मॅगी’कडे उत्पादनांमध्ये सातत्याने वैविध्य आणणे शक्य होत आहे. आपल्या उत्पादनांची चव ग्राहकांच्या जिभेवर रुळवण्यात ‘मॅगी’ यशस्वी ठरली आहे. ‘मॅगी’ची इन्स्टंट नूडल्स व्यतिरिक्त सूप, सॉस आणि इतर उत्पादनही लोकप्रिय ठरली आहेत. हे पदार्थ तयार करणं सोपं, कमी वेळखाऊ असल्याने विशेषतः विद्यार्थी, युवावर्गात खूप लोकप्रिय आहेत, दूरचित्रवाणी जाहिराती, मुद्रित जाहिराती, वेब जाहिराती आणि समाजमाध्यमांमुळे ‘मॅगी’ला भरपूर प्रसिद्धी मिळत आहे.

‘मॅगी’समोरची आव्हानं

‘मॅगी’ हा ब्रँड सर्वाधिक नूडल्सच्या उत्पादनावर अवलंबून आहे. सन २०१४ मध्ये कंपनीच्या उत्पन्नात ५७ टक्के वाटा मॅगी नूडल्सचा होता. या उत्पादनाचा बाजारातील हिस्सा सन २०१२ च्या ८४ टक्क्यांवरून २०१४ मध्ये ६३ टक्क्यांपर्यंत घातला. बाजारपेठ वाढत आहे तसेच ‘मॅगी’चे स्पर्धकदेखील वाढत आहेत.

अधिकाधिक लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक होत असताना ‘मॅगी’सारख्या पदार्थांबद्दल नकारात्मकताही वाढत आहे. कंपनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या उत्पादकांप्रमाणेच छोट्या छोट्या स्थानिक उत्पादनांनीही ‘मॅगी’समोर मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. इंटरनेट आणि समाजमाध्यमातून ‘मॅगी’ आणि एकूणच ‘इन्स्टंट फूड’चे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर पसरल्याने ‘मॅगी’च्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

मॅगी हा नूडल्स उत्पादनाचा अनेक दशकांपासून निश्चितच अव्वल क्रमांकाचा ब्रँड राहिला आहे, परंतु इतरही अनेक ब्रँड्सनी ‘मॅगी’ला स्पर्धा निर्माण केली आहे.

त्यामध्ये ‘टॉप रेमेन’ हा भारतात नूडल्सचा दुसऱ्या क्रमांकावरचा टॉप ब्रँड आहे आणि मॅगीला मागे टाकण्यासाठी गेल्या १८ वर्षांपासून तो जोरदार प्रयत्न करत आहे. हा ‘निसिन’चा जागतिक ब्रँड आहे, सन १९९१ पासून तो भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. ‘रेमेन’ मोठ्या प्रमाणावर जाहिरात मोहीम राबवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

‘सनफिस्ट’चा ‘यिप्पी’ हा तुलनेने अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेत आलेला ब्रँडही हळूहळू आपले पाय रोवत आहे. या शिवाय ‘एचयूएल’चा ‘नॉर’ ‘कॅपिटल फूड्स’चा ‘चिंग्स सिक्रेट’ असे ब्रँड्स ‘मॅगी’शी स्पर्धा करण्यासाठी सज्ज होत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

त्या दोन वर्षात भारतीयांनी सगळ्यात जास्त काय खाल्लं असेल तर ती म्हणजे डोलो गोळी!

Next Post

इतिहासातील अशी यु*द्धं ज्यात कमजोर गटाने आश्चर्यकारक पराक्रम गाजवला होता!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post

इतिहासातील अशी यु*द्धं ज्यात कमजोर गटाने आश्चर्यकारक पराक्रम गाजवला होता!

अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवलेल्या 'द अमेरिकन फाईल्स'!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.