The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने स्थापन केलेली संघटना आज अडीचशे वर्षांनंतरही लोकांची झोप उडवतेय

by द पोस्टमन टीम
20 November 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अठराव्या शतकात जर्मनीमध्ये अ‍ॅडम वाईसहाप्ट नावाचा विचारवंत होऊन गेला. सन १७४८ साली इन्गोश्टाट नावाच्या एका जर्मन गावात त्याचा जन्म झाला. त्याकाळी त्या प्रदेशाला बव्हेरिया असे नाव होते. त्या काळात ज्या ज्यू कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता अशापैकीच एक वाईसहाप्टचे कुटुंब होते. अ‍ॅडमचे आईवडील तो लहान असतानाच वारले. त्याच्या काकांनी त्याचा सांभाळ केला; त्याचे शिक्षण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाईसहाप्ट इन्गोश्टाट युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागला. यथावकाश त्याचे लग्न झाले आणि संसारही सुरू झाला. वरवर पाहता हे सगळे रीतीला धरून, ठीकठाकच होते. प्रतिष्ठेची नोकरी, बायको, घरदार.. सर्व काही आलबेल. पण कोणीही या वरवर सुखीसरळ वाटणार्‍या आयुष्याचा वरचा पापुद्रा जरा खरवडला असता तर त्याखाली बरेच काही गूढ होते. अर्थातच याची मुळे शोधायची तर वाईसहाप्टच्या बालपणात प्रवेश करावा लागेल.

लहानपणापासूनच वाईसहाप्ट चंचल मनोवृत्तीचा होता. शाळेत असताना त्याला वाचनाचे वेड होते. इतके, की त्याच्या काकांच्या लायब्ररीतील बहुतेक पुस्तकांचा त्याने फडशा पाडला होता. त्या काळचा बव्हेरिया म्हणजे कॅथलिक प्रदेश होता. लोक जुन्या मतांना चिकटून असणारे, धार्मिक, रूढीप्रिय होते. अशा वातावरणातच वाईसहाप्ट लहानाचा मोठा झाला. पण त्याचा जीव या वातावरणात रमत नसे.

तेथील राजेशाही आणि चर्च या संस्था लोकांच्या वैचारिक स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत असे त्याचे स्पष्ट मत होते. आधुनिक समाज या रूढी, प्रथापरंपरांना चिकटून कधीही स्वतःची प्रगती करू शकणार नाही असा त्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्याला यात बदल करणे गरजेचे वाटू लागले. त्यातूनच तो ज्ञानाच्या प्रकाशाचा, ते देऊ पाहणार्‍या धर्माचा/पंथाचा शोध घेऊ लागला. असा पंथ, ज्याच्या संकल्पना आणि प्रथांच्या आधारे युरोपीय समाजाला एक नवी दिशा देता येईल.

या काळात संपूर्ण युरोपमध्ये फ्रीमेसनरी पंथ आपले हातपाय पसरू लागला होता. वैचारिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांना तो हवाहवासा वाटत होता. सुरुवातीला वाईसहाप्टने हा पंथ स्वीकारायचा विचार केला. परंतु त्यांच्या एकंदर विचारसरणीमुळे त्याची निराशा झाली. त्यानंतर तो स्वतः अशा प्रकारचा गुप्त पंथ स्थापन करण्याचा विचार करू लागला.



वाईसहाप्टच्या मते तो स्वतः धर्माविरुद्ध नव्हता. पण ज्याप्रकारे धर्माचे पालन केले जाते आणि इतरांवर तो लादला जातो त्याला त्याचा विरोध होता. त्याने एका ठिकाणी लिहिले आहे त्यानुसार त्याच्या विचारसरणीमध्ये सर्व प्रकारच्या धार्मिक पूर्वग्रहांपासून मुक्तता, समाजातील बंधुभावाची जोपासना आणि वैश्विक आनंद निर्माण करण्यासाठी अनुकूल वातावरण यांचा पुरस्कार केला होता.

१ मे १७७६ रोजी रात्री या पंथाचे म्हणजेच ‘इल्युमिनाटी’चे सभासद इन्गोश्टाटनजीकच्या जंगलात भेटले. ते पाच जण होते. तेथे त्यांनी आपल्या संस्थेची रचना, पाळावयाचे नियम यांचा आराखडा तयार केला. यापुढे या पंथाचे सभासद होऊ पाहणार्‍या सर्व सभासदांना या सभासदांची परवानगी घेण्याची गरज लागणार होती.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सुरुवातीला या पंथाची रचना त्रिस्तरीय ठेवण्यात आली – नोव्हाइसेस, मिनर्व्हल्स आणि इल्युमिनेटेड मिनर्व्हल्स असे हे तीन स्तर. त्यापैकी मिनर्व्हल्स हा शब्द मिनर्व्हा या बुद्धीचे प्रतीक असलेल्या रोमन देवतेच्या नावावरून घेण्यात आला. पुढील काही वर्षात या पंथाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. अनेक राजकीय नेते, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, पंडित, लेखक यासारखे विविध क्षेत्रातील विद्वान या पंथाचे सभासद झाले.

पण कालांतराने इल्युमिनाटी पंथाची घोडदौड रोखली गेली. त्याला अनेक घटक कारणीभूत होते. वाईसहाप्ट आणि या पंथाचा प्रसार होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारा बॅरॉन व्हॉन केनिगी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. तोपर्यंत संस्थेची त्रिस्तरीय रचना जाऊन त्यामध्ये तेरा स्तर निर्माण झाले होते, आणि ती अतिशय गुंतागुंतीची बनली होती.

हे स्तर, त्यांची कामे, आणि उद्दिष्टे यावरून या दोघांमध्ये टोकाचे वाद झाले. अखेरीस केनिगीला संस्थेला रामराम ठोकावा लागला. त्याच वेळी अजून एका माजी सदस्याने बव्हेरियाच्या ग्रँड डचेसला पत्र लिहून संस्थेची गुपिते उघड करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या म्हणण्यानुसार इल्युमिनाटीमध्ये आत्मह*त्या करण्याला कायदेशीर परवानगी होती. तसेच शत्रूंवर विषप्रयोग करणे हे देखील न्यायसंमत होते. या पंथाच्या शिकवणीप्रमाणे धर्म हा मूर्खपणा होता.

या सगळ्यांत भर म्हणजे ऑस्ट्रियाच्यावतीने बव्हेरिया राजसत्तेच्या विरोधात इल्युमिनाटी कटकारस्थान आखत होती. अखेर बव्हेरियाच्या राजसत्तेने अशा प्रकारच्या संस्थांवर बंदी जाहीर केली आणि वर्षभरातच इल्युमिनाटीवरही बंदी घालण्यात आली. संस्थेच्या सभासदांचे धरपकड सत्र सुरू झाले.

पोलिसांना संस्थेच्या कार्यालयात अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली. त्यामध्ये आत्मह*त्या आणि निरिश्वरवाद यांचा पुरस्कार करणारी, संस्थेची महिला शाखा निर्माण करण्यासाठीचे नियोजन असणारी, अदृश्य शाईने लिहिलेली, आणि गर्भपात घडवण्यासाठीच्या सूचनांचा समावेश असलेली कागदपत्रे होती. त्यामुळे धर्म आणि राजसत्ता यांच्याविरोधात कारस्थान केल्याचा आरोप या पंथावर ठेवण्यात आला.

ऑगस्ट १७८७ मध्ये बव्हेरियाच्या राजसत्तेने हा पंथ बेकायदेशीर ठरवला आणि त्याचे सदस्यत्व घेणार्‍यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. वाईसहाप्टला इन्गोश्टाट युनिव्हर्सिटीमधून काढून टाकले गेले आणि त्याला देशातून हद्दपार करण्यात आले. उरलेले आयुष्य त्याने युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंजेन येथे तत्त्वज्ञान शिकवण्यात व्यतीत केले.

इल्युमिनाटी पंथ संपल्याचे बव्हेरिया राजसत्तेने जाहीर केले. असे असले तरी या पंथाने अनेक कारस्थानांना नकळत खतपाणी घातले आहे. अगदी फ्रेंच राज्यक्रांती हादेखील वाईसहाप्ट आणि त्याचा इल्युमिनाटी पंथ यांच्या विचारसरणीचा परिपाक असल्याचा आरोप केला गेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या ह*त्येमागची प्रेरणा देखील इल्युमिनाटीनेच दिली असेही मानले जाते. आजही अनेक ठिकाणी सत्तेची सूत्रे पडद्यामागून हलवणारे असे गुप्त पंथ अस्तित्वात आहेत असा समज होण्यास देखील वाईसहाप्ट कारणीभूत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

याने १२ हजार पुस्तकं नुसती वाचलीच नव्हती तर जशीच्या तशी लक्षात ठेवली होती

Next Post

एक्सप्लेनेर : आज नौदलाकडे हस्तांतरित झालेलं ‘INS विशाखापट्टणम’ एवढं विशेष का आहे..?

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

एक्सप्लेनेर : आज नौदलाकडे हस्तांतरित झालेलं 'INS विशाखापट्टणम' एवढं विशेष का आहे..?

रॉबिन विलियम्सने अलादिनमधल्या जीनीच्या आवाजासाठी मानधन नाकारलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.